जवान (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जवान
दिग्दर्शन अ‍ॅटली
निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंट
प्रमुख कलाकार
संकलन रूबेन
छाया जी के विष्णू
संगीत अनिरुद्ध रविचंदर
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ७ सप्टेंबर २०२३
वितरक खाली पाहा
निर्मिती खर्च ₹३०० कोटी[१]
एकूण उत्पन्न ₹२४० कोटी[२]



जवान हा २०२३ चा भारतीय, हिंदी भाषेतील ॲक्शन थरारपट आहे, जो अ‍ॅटली यांनी त्यांचा पहिला हिंदी चित्रपट म्हणून सह-लिखित आणि दिग्दर्शित केला आहे.[३] रेड चिलीज एंटरटेनमेंट अंतर्गत गौरी खान आणि गौरव वर्मा द्वारे तो निर्मित आहे. या चित्रपटात शाहरुख खान पिता आणि मुलाच्या दुहेरी भूमिकेत असून, नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पडुकोण (विशेष उपस्थिती), प्रियामणी आणि सान्या मल्होत्रा हे इतर भूमिकेत आहेत.

मुख्य चित्रीकरण सप्टेंबर २०२१ मध्ये पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, राजस्थान आणि छत्रपती संभाजीनगर येथे झाले. चित्रपटाला साउंडट्रॅक आणि पार्श्वसंगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे. छायांकन जीके विष्णू यांनी केले होते आणि संपादन रुबेन यांनी केले होते.

जवान सुरुवातीला २ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु उत्तर-निर्मितीच्या कामांमुळे तो पुढे ढकलण्यात आला.[४] ७ सप्टेंबर २०२३ रोजी जन्माष्टमीच्या मुहूर्तावर हा चित्रपट मानक, आयमॅक्स, 4DX आणि इतर प्रीमियम फॉरमॅटमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "खर्च". हंगामा. Archived from the original on 2023-08-16. 2023-07-19 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "Box Office Collection". एबीपी माझा. Archived from the original on 2023-09-07. 2023-07-19 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  3. ^ "Shah Rukh Khan, Atlee's film titled 'Jawan'". The Hindu. 3 June 2022. Archived from the original on 7 March 2023. 28 July 2022 रोजी पाहिले.
  4. ^ "Jawan release pushed to September, Shah Rukh Khan says 'takes time and patience to make something worthy'". Hindustan Times. 6 May 2023. Archived from the original on 6 May 2023. 6 May 2023 रोजी पाहिले.