प्रेम रतन धन पायो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रेम रतन धन पायो
दिग्दर्शन सूरज बडजात्या
निर्मिती राजश्री प्रोडक्शन्स
कथा सूरज बडजात्या
पटकथा सूरज बडजात्या
प्रमुख कलाकार सोनम कपूर
सलमान खान
नील नितीन मुकेश
अनुपम खेर
स्वरा भास्कर
संगीत हिमेश रेशमिया
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १२ नोव्हेंबर २०१५
वितरक राजश्री प्रोडक्शन्स


प्रेम रतन धन पायो हा २०१५ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. सूरज बडजात्याचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट १२ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रदर्शित झाला. सलमान खान नायकाच्या भूमिकेमध्ये असलेला मैने प्यार किया, हम आपके हैं कौनहम साथ साथ हैं नंतर हा चौथा बडजात्या चित्रपट आहे. सोनम कपूर सलमानच्या नायिकेच्या भूमिकेत चमकत असून नील नितीन मुकेश, अनुपम खेर ह्यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत हिमेश रेशमियाने दिले आहे. तिकिट खिडकीवर प्रेम रतन धन पायोला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून पहिल्या ४ दिवसांमध्येच त्याने सुमारे भारतीय रूपया २५० कोटींची मिळकत केली आहे.

कलाकार[संपादन]

सलमान खान - प्रेम दिलवाला, युवराज विजयसिंग, प्रीतमपुरचे राजकुमार

सोनम कपूर - राजकुमारी मैथीलीदेवी

नील नितीन मुकेश - युवराज अजयसिंग, विजयचा सावत्र भाऊ

स्वरा भास्कर - राजकुमारी चंद्रिका, विजयची सावत्र बहीण

अरमान कोहली - चिराग सिंग, प्रीतमपुर राज्याचे सी. ई. ओ.

संजय मिश्रा - चौबे जी (रामलीला टोळीचे प्रमुख)

दिपक डोबरियाल - कन्हैया / फोटोग्राफर

अनुपम खेर - दीवान साहेब / बापू

समैरा राव - समीरा

बाह्य दुवे[संपादन]