Jump to content

मस्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काश्मीरमधील दोन मस्त : छुंदनगामचे नब साहेब आणि कंगनचे रंभा मस्तान. स्रोत : द वेफेअरर्स : मेहेर बाबा विद द गॉड-इंटॉक्सिकेटिड, लेखक विल्यम डॉन्किन, १९४७

सुफी तत्त्वज्ञानात मस्त म्हणजे ईश्वराप्रती प्रेमाच्या पूर्णपणे आहारी गेलेला आणि बाह्य स्वरूपावरून तसा कैफ असणारा मनुष्य होय. पर्शिअन 'मस्त'चा अर्थ "नशेत असलेला" असा होतो.

परिदर्शन

[संपादन]

मेहेर बाबा यांच्या म्हणण्यानुसार मस्त म्हणजे आंतरिक आध्यात्मिक अनुभूतींमुळे व अत्यानंदांमुळे मंत्रमुग्ध झालेला मनुष्य होय. असा मनुष्य बाह्य वर्तनात सामान्य असत नाही आणि सहज पाहणारांना तो वेडा वाटू शकतो. द वेफेअरर्स : मेहेर बाबा विद द गॉड-इंटॉक्सिकेटिड या पुस्तकात इंग्लिश वैद्यकव्यवसायी विल्यम डॉन्किन यांनी दक्षिण आशियातील (मुख्यत्वे इराण, भारत आणि आजचा पाकिस्तान) मस्तांशी मेहेर बाबांच्या संपर्कांचे तपशिलात वर्णन केले आहे. या पुस्तकास मेहेर बाबांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत मस्तांच्या अद्भुत अवस्थेचे व बाह्य वैशिष्ट्यांचे वर्णन आलेले आहे. वेडेपणापासून ह्या अवस्थेचे वेगळेपण दाखविताना मेहेर बाबा सांगतात की, वेडेपणात मन विविध विचारांनी चक्रावलेले असते तर मस्तांमध्ये ते हळुवार झालेले असते.[]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ Donkin, William, M.D., "The Wayfarers: Meher Baba with the God-Intoxicated", Adi K. Irani, 1948, Sheriar Foundation, 2001, p. 19 (ISBN 1-880619-24-5)