अलका याज्ञिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलका याज्ञिक

अलका याज्ञिक
आयुष्य
जन्म २० मार्च, १९६६ (1966-03-20) (वय: ५८)
जन्म स्थान कोलकाता, पश्चिम बंगाल
संगीत साधना
गायन प्रकार पार्श्वगायन
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ १९७९ - चालू
बाह्य दुवे
संकेतस्थळ

अलका याज्ञिक ( २०० मार्च १९६६) ही एक भारतीय गायिका व लोकप्रिय बॉलिवूड पार्श्वगायिका आहे. सुमारे ३ दशके हिंदी सिनेमामध्ये कार्यरत राहिलेली याज्ञिक भारतामधील सर्वात यशस्वी पार्श्वगायिकांपैकी एक आहे. तिला आजवर फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कारासाठी विक्रमी ३५ नामांकने व एकूण ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. तसेच तिला दोनवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बहाल करण्यात आला.

कोलकात्यामध्ये जन्मलेल्या याज्ञिकने वयाच्या ६व्या वर्षापासून शास्त्रीय गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. १९७२ पासून ती आकाशवाणीच्या कोलकाता केंद्रासाठी भजने म्हणत असे. वयच्या दहाव्या वर्षी मुंबईमध्ये दाखल झालेल्या याज्ञिकने १९८० सालच्या लावारिस ह्या हिंदी चित्रपटामधील तिने म्हटलेले गाणे गाजले होते. परंतु तिला १९८८ सालच्या तेजाब चित्रपटामधील माधुरी दीक्षितवर चित्रित झालेल्या एक दो तीन ह्या गाण्यामुळे खरी प्रसिद्धी मिळाली. ह्या गाण्यासाठी तिला पहिला फिल्मफेर पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर तिने १९९० व २००० च्या दशकांमध्ये अनेक गाणी गायली जी लोकप्रिय झाली. अलका यज्ञिकने एकूण १,११४ हिंदी चित्रपटांमध्ये २,४८२ गाणी गायली आहेत. सर्वाधिक गाणी म्हटणाऱ्या बॉलिवूड गायकांमध्ये आशा भोसले, लता मंगेशकर, महम्मद रफीकिशोर कुमार खालोखाल तिचा पाचवा क्रमांक लागतो.

अलका याज्ञिकने हिंदी व्यतिरिक्त गुजराती, अवधी, उडिया, आसामी, मणिपुरी, नेपाळी, राजस्थानी, बंगाली, भोजपुरी, पंजाबी, मराठी, तेलुगू, तमिळ, मल्याळीइंग्लिश ह्या भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

अलका याज्ञिकने कल्याणजी-आनंदजी, आर.डी. बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, राजेश रोशन, नदीम-श्रवण, जतिन-ललित, अनू मलिक, ए.आर. रहमान, आनंद-मिलिंद, हिमेश रेशमिया, शंकर-एहसान-लॉय, इस्माईल दरबार इत्यादी सर्व आघाडीच्या संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. तिची बव्हंशी युगुलगीते कुमार सानू, उदित नारायणसोनू निगम ह्य सहपार्श्वगायकांसोबत आहेत.

प्रमुख पुरस्कार[संपादन]

फिल्मफेअर पुरस्कार[संपादन]

वर्ष गाणे चित्रपट संगीत दिग्दर्शक गीतकार
1989 "एक दो तीन" तेजाब लक्ष्मीकांत-प्यारेलाल जावेद अख्तर
1994 "चोली के पीछे"
इला अरुणसोबत विभागून
खलनायक लक्ष्मीकांत-प्यारेलाल आनंद बक्षी
1998 "मेरी मेहबूबा" परदेस नदीम-श्रवण आनंद बक्षी
2000 "ताल से ताल" ताल ए.आर. रहमान आनंद बक्षी
2001 "दिल ने ये कहा है दिल से" धडकन नदीम-श्रवण समीर
2002 "ओ री छोरी" लगान ए.आर. रहमान जावेद अख्तर
2005 "हम तुम" हम तुम जतिन-ललित प्रसून जोशी

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार[संपादन]

वर्ष गाणे चित्रपट संगीत दिग्दर्शक गीतकार
1993 "घूंघट की आड से" हम हैं राही प्यार के नदीम-श्रवण समीर
1998 "कुछ कुछ होता है" कुछ कुछ होता है जतिन-ललित समीर

ह्या व्यतिरिक्त अलका याज्ञिकला झी सिने पुरस्कार, स्क्रीन पुरस्कार, आय.आय.एफ.ए. पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

बाह्य दुवे[संपादन]