कुछ कुछ होता है
| कुछ कुछ होता है | |
|---|---|
|
| |
| दिग्दर्शन | करण जोहर |
| निर्मिती | यश जोहर |
| प्रमुख कलाकार |
काजोल शाहरुख खान राणी मुखर्जी सलमान खान |
| संगीत | जतिन-ललित |
| पार्श्वगायन | उदित नारायण, कुमार सानू, अलका याज्ञिक, कविता कृष्णमुर्ती |
| देश | भारत |
| भाषा | हिंदी |
| प्रदर्शित | ऑक्टोबर १६ इ.स. १९९८ |
| वितरक | यश राज फिल्म्स |
| अवधी | १८५ मिनिटे |
| एकूण उत्पन्न | १०३.८ कोटी |
कुछ कुछ होता है हा १९९७ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. करण जोहरने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान, काजोल व राणी मुखर्जी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.
कलाकार
[संपादन]- काजोल
- शाहरुख खान
- सलमान खान
- राणी मुखर्जी
- फरीदा जलाल
- अनुपम खेर
- रीमा लागू
- हिमानी शिवपुरी
- अर्चना पुरण सिंह
- गीता कपूर
- जॉनी लिव्हर
- सना सईद
- परजन दस्तुर
पार्श्वभूमी
[संपादन]कथानक
[संपादन]राहुल खन्ना नावाचा एक विद्यार्थी असतो तो बास्केटबॉल खेळायचा आणि अंजली शर्मा नावाची एक मुलगी असते ती राहुलवर प्रेम करत असते. पण राहुलचे टिना नावाच्या मुलीवर प्रेम असतं नंतर अंजलीला समजल्यावर ती या दोघांच्या आयुष्यातून निघून जाते परत तिचा फोन, पत्र काहीच येत नाही मग राहुलचे आणि टिनाचे लग्न होते त्यांना एक मुलगी होते तिचे नाव अंजली ठेवतात टिनाचा मृत्यू होतो जाताना ती एका कागदावर सगळी कहाणी लिहुन जाते. तिची मुलगी अंजली जेव्हा सर्व कागद वाचते तेव्हा तिला सगळं समजतं नंतर १२ वर्षांनी अंजली शर्मा परत येते तिच लग्नं अमन नावाच्या मुलाशी जमलेल असतं पण राहुल आणि अंजलीची भेट होते. अमनला जाणीव होते की राहुलच अंजलीवर प्रेम आहे आणि अंजलीच ही असतं. नंतर राहुल आणि अंजलीच लग्न होतं.[ संदर्भ हवा ]
पुरस्कार
[संपादन]- फिल्मफेर पुरस्कार
- सर्वोत्तम चित्रपट
- सर्वोत्तम दिग्दर्शक - करण जोहर
- सर्वोत्तम अभिनेता - शाहरूख खान
- सर्वोत्तम अभिनेत्री - काजोल
- सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता - सलमान खान
- सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - राणी मुखर्जी
- सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक - उत्तम सिंग
- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट
- सर्वोत्तम महिला पार्श्वगायक - अलका याज्ञिक
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील कुछ कुछ होता है चे पान (इंग्लिश मजकूर)