सुषमा श्रेष्ठ
Indian singer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९६० मुंबई | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
| |||
सुषमा श्रेष्ठ किंवा पूर्णिमा श्रेष्ठ (जन्म ६ सप्टेंबर १९६०) ही एक भारतीय पार्श्वगायिका आहे. बालकलाकार म्हणून सुरुवात करून, १९९० च्या दशकात ती बॉलिवूडमधील आघाडीची पार्श्वगायिका बनली. १९९० च्या नंतरच्या काळात तिने पूर्णिमा श्रेष्ठ हे नाव वापरले.
कारकीर्द
[संपादन]नेपाळी नेवार समुदायातील, सुषमाचा जन्म मुंबईत झाला. तिचे वडील संगीतकार भोलानाथ श्रेष्ठ होते, त्यांनी प्रामुख्याने हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले ते काठमांडूचे होते आणि कोलकाता आणि शेवटी मुंबईत स्थायिक झाले.
शंकर-जयकिशनच्या एक मित्र आणि सहाय्यक यांनी सुषमाची शंकरकडे शिफारस केली. मुलांसाठी गाण्याची महिला पार्श्वगायिकांनी आवाज देण्याची प्रचलित प्रथा असूनही, शंकरने अंदाज चित्रपटासाठी "है ना बोलो बोलो" गाण्यासाठी लहान मुलीचा वापर करण्याचे आव्हान स्वीकारले. सुषमा यांनी ११ नोव्हेंबर १९६९ रोजी मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्यासोबत तिचे पहिले गाणे रेकॉर्ड केले.[१] हिंदी चित्रपटांतील ती पहिली यशस्वी बालगायिका होती. तिने बाल गीत नावाचा लहान मुलांचा अल्बम रेकॉर्ड केला, ज्यात श्रीनिवास खळे यांनी गाणी संगीतबद्ध केली होती आणि शांता शेळके यांनी लिहिली होती. त्यात तिने चार गाणी गायली.
संगीत दिग्दर्शक आर.डी. बर्मन यांनी काही अविस्मरणीय गाणी दिली, "एक दिन बिक जायेगा " (धरम करम, १९७५), "यादौ की बारात" (यादौ की बारात, १९७३), "तेरी है जमीन तेरा आसमान" (द बर्निंग ट्रेन, १९८०), "तेरा मुझे है पहले" (आ गले लग जा, १९७३) आणि "क्या हुआ तेरा वादा" (हम किसीसे कम नहीं, 1977). नंतरच्या दोन गाण्यांसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन पुरस्कारासाठी १९७४ आणि १९७८ मध्ये नामांकन मिळवून दिले आणि वयाच्या ११ व्या वर्षी या श्रेणीतील सर्वात तरुण नामांकित व्यक्ती बनली.[२] तिने तिच्या गायन कारकीर्दीतील त्यांचे योगदान मान्य केले आहे की, "आर.डी. बर्मन हे माझे गुरू होते आणि मला जे काही गाण्यातले माहीत आहे त्यात त्यांना आभार आहे".[३]
सुषमाच्या सुरुवातीच्या काळात तिला नौशाद, मदन मोहन, सी. रामचंद्र, सलील चौधरी, अनिल बिस्वास, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, एस.डी. बर्मन आणि शंकर-जयकिशन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.[४]
१९८० च्या दशकाच्या मध्यात तिने प्रौढ गायिका म्हणून संघर्ष केला. तिच्या लग्नामुळे तिची गायन कारकीर्द तात्पुरती थांबली. सुषमा श्रेष्ठा म्हणून तिचे शेवटचे गाणे एन. चंद्राच्या अंकुश (१९८६) चित्रपटामध्ये होते ज्यात "इतनी शक्ती हमे देना दाता" ह्यात मुख्य गायिका पुष्पा पागधरे होती. नंतर तिने अनेक जिंगल्स मध्ये काम केले.[५]
१९९० च्या दशकात, संगीत कंपनी टिप्सने तिचे नाव आणि प्रतिमा बदलण्याचे सूचविले व तिने सुषमाचे "पौर्णिमा" हे नाव घेतले. माँ (१९९२) चित्रपटा मधील तिचे "बरसात में जब आएगा सावन का माहीना" हे गाणे हिट झाले होते. त्यानंतर डेव्हिड धवनचा बोल राधा बोल (१९९२) आला ज्यात "तूतू तू तूतू तारा’ हे गाणे यशस्वी झाले. तिने धवनसोबत हिरो नं १ (१९९७), हसिना मान जायेगी (१९९९) आणि बीवी नं. १ (१९९९), जुडवा (१९९७) साठी गाणे गायले.[६]
तिने अंजाम (१९९४) मधील "चने के खेत में", गोपी किशन (१९९४) मधील "बत्ती ना बुझा", दिलजले (१९९६) मधील "शाम हैं धुआं धुआं", इश्क (१९९९) मधील "मिस्टर लोवा लोवा" सारखे लोकप्रिय गाणे गायले आहे.[७]
१९९० च्या दशकात, अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती सोबत पूर्णिमा या सर्वात प्रसिद्ध महिला पार्श्वगायिका होत्या.[८][९]
ती आता चित्रपट पार्श्वगायनात सक्रिय नसून, भारतात आणि जगाच्या इतर भागांमध्ये थेट कार्यक्रमात सादरीकरण करते.[१०] [११]
पौर्णिमाने बंगाली, नेपाळी, मराठी, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, उडिया, राजस्थानी, आसामी, हरियाणवी, गढवाली आणि अरबीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त, तिने भजन, गझल, चटणी सोका आणि इंडियन पॉप सारख्या शैलींमध्ये असंख्य गाणी गायली आहेत.[१२][१३][१४]
पुरस्कार
[संपादन]- १९७४: फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार - "तेरा मुझे है पहले" (आ गले लग जा) - नामांकित[१५][१६]
- १९७८: फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार - "क्या हुआ तेरा वादा" (हम किसीसे कम नहीं) - नामांकित[१७][१८]
- १९९८: झी सिने पुरस्कार - सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला) - "सोना कितना सोना हैं" (हिरो नं १) - नामांकित
- २०१७: मोहम्मद रफी पुरस्कार - भारताचे उपराष्ट्रपतीने प्रदान केले.[१९]
- २०२०: जागतिक चित्रपट आणि संगीत महोत्सव - जीवनगौरव पुरस्कार.[२०]
संदर्भ
[संपादन]- ^ "From Child singer Sushma Shrestha to playback queen of 90s- we chart Singer Poornima Shrestha's long career in Bollywood".
- ^ "Biography of Poornima Shrestha, Sushma Shrestha (Well known Bollywood Playback singer)". 4 September 2020.
- ^ "DJ 'King' Strikes Retro Recall Note". 20 December 2011.
- ^ "From Child singer Sushma Shrestha to playback queen of 90s- we chart Singer Poornima Shrestha's long career in Bollywood".
- ^ "11 Unusual Playback Singer Debuts". 6 Aug 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Celebrating musical hits of 20 less-heard female voices of Bollywood in 1970s & 1980s". 11 November 2016.
- ^ "Poornima - Singer, Artist, Actor | MySwar".
- ^ "Biography". 6 Mar 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Sunidhi Chauhan interview: 'Any song can sound good if you do a good job'".
- ^ "Singer Poornima Back After 20 Years".
- ^ "Musical evening".
- ^ "SINDOOR (1980)". Screen. 2011-07-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 December 2010 रोजी पाहिले.
- ^ "Poornima – Top 15 Bollywood Songs". 4 July 2017. 2020-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-03-20 रोजी पाहिले.
- ^ "Blast from the past: Voices we miss". 2 Jan 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "The Filmfare Awards Nominations – 1973". The Times Group. 29 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "The Filmfare Awards Winners – 1973". The Times Group. 28 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "The Filmfare Awards Nominations – 1977". The Times Group. 29 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "The Filmfare Awards Winners – 1977". The Times Group. 28 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India's Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region".
- ^ "Global Film and Music Festival Awards Show 2020-21 (Part-1)". 28 June 2021. 2021-10-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-03-20 रोजी पाहिले.