एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी
एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी
दिग्दर्शन नीरज पांडे
निर्मिती अरुण पांडे
कथा नीरज पांडे
प्रमुख कलाकार सुशांत सिंह राजपूत
कियारा अडवाणी - मल्होत्रा
दिशा पटानी
अनुपम खेर
भूमिका चावला
संगीत अमाल मलिक
रोचक कोहली
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ३० सप्टेंबर २०१६
वितरक फॉक्स स्टार स्टुडियोज
अवधी १९० मिनिटे
निर्मिती खर्च ₹१०४ कोटी
एकूण उत्पन्न ₹२१५ कोटी



एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी हा २०१६ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड व्यक्तिचित्रपट आहे. भारतीय क्रिकेट खेळाडू व कर्णधार महेंद्रसिंह धोनी ह्याच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज पांडेने केले असून धोणीची भूमिका अभिनेता सुशांत सिंह राजपूत ह्याने रंगवली आहे.तर धोनीच्या बायकोची भूमिका अभिनेत्री कियारा आडवाणी- मल्होत्रा रंगवली आहे.

एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी टीकाकारांच्या व प्रक्षकांच्या पसंदीस उतरला व त्याला तिकिट खिडकीवर चांगला प्रतिसाद लाभला. हिंदीसोबत हा चित्रपट तमिळ, तेलुगूमराठीमध्ये देखील भाषांतरित करण्यात आला.

हा चित्रपट अगदी कमी कालावधीत नावारूपाला आला आणि या चित्रपटामुळे सुशांत सिंह राजपूत ह्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतला एक कलावंत आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखु जायला लागलं. या चित्रपटासाठी सुशांतनी किमान एक ते दीड वर्ष धोनीची भूमिका साकारण्याकरिता प्रचंड अभ्यास व परिश्रम केलं होत.

बाह्य दुवे[संपादन]