विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
Sulakshana Pandit; સુલક્ષણા પંડિત; سلکھشنا پنڈت; Sulakshana Pandit; Sulakshana Pandit; Sulakshana Pandit; Sulakshana Pandit; سولاکشانا پاندیت; Sulakshana Pandit; सुलक्षणा पण्डित; سلکھشنا پنڈت; Sulakshana Pandit; Sulakshana Pandit; Sulakshana Pandit; सुलक्षणा पंडित; సులక్షణ పండిట్; Sulakshana Pandit; সুলক্ষণা পণ্ডিত; Sulakshana Pandit; சுலக்சனா பண்டிட்; सुलक्षणा पंडित; সুলক্ষণা পণ্ডিত; Sulakshana Pandit; Sulakshana Pandit; सुलक्षणा पंडित; ସୁଲକ୍ଷଣା ପଣ୍ଡିତ; Sulakshana Pandit; Sulakshana Pandit; Sulakshana Pandit; Sulakshana Pandit; सुलक्षणा पण्डित; Sulakshana Pandit; Sulakshana Pandit; Sulakshana Pandit; Sulakshana Pandit; Sulakshana Pandit; Sulakshana Pandit; Sulakshana Pandit; Sulakshana Pandit; Sulakshana Pandit; سولاكشانا پانديت; Sulakshana Pandit; سلکشنا پنڈت; ਸੁਲਕਸ਼ਨਾ ਪੰਡਿਤ; ᱥᱩᱞᱟᱠᱥᱟᱱᱟ ᱯᱟᱱᱰᱤᱛ; actriz india; ભારતીય અભિનેત્રી; aktore indiarra; ہِندوستٲنؠ فِلِمی اَداکارہ; actriz india; индийская актриса; indische Schauspielerin; ban-aisteoir Indiach; بازیگر و خواننده هندی; 印度女演員; indisk sanger og skuespiller; actriță indiană; indisk sångare och skådespelare; שחקנית הודית; onye na-eme ihe nkiri si India; भारतीय अभिनेत्री (1954-2025); intialainen näyttelijä; ভাৰতীয় কণ্ঠশিল্পী, অভিনেত্ৰী; Indian actress; இந்திய நடிகை; attrice indiana; ভারতীয় অভিনেত্রী; actrice indienne; indijska glumica; އިންޑިއާއަށް އުފަން އެކްޓްރެސެއް; Indian actress; actriz indiana; actriz india; indisk sanger og skuespiller; actores a aned yn 1954; actriu índia; індійська акторка; pemeran asal India; indisk songar og skodespelar; ഇന്ത്യന് ചലചിത്ര അഭിനേത്രി; Indiaas actrice; baaŋa ŋun nyɛ paɣa; Indian actress; panyanyi; India näitleja; Indian actress; ممثلة هندية; ଭାରତୀୟ ଅଭିନେତ୍ରୀ; ureueng meujangeun asai India; Sulakshana Pratap Narain Pandit
सुलक्षणा पंडित (१२ जुलै , १९५४ - ६ नोव्हेंबर , २०२५ ) या एक हिंदी चित्रपट अभिनेत्री, भारतीय पार्श्वगायिका आणि मेवाती घराण्यातील प्रशिक्षित शास्त्रीय गायिका होत्या. पंडितने १९७० आणि १९८० च्या दशकात उल्झन , संकोच , हेरा फेरी , अपनापन , चेहरे पे चेहरा , धरम कांटा यांसह अनेक चित्रपटांतून अनेक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. त्यांनी जितेंद्र , संजीव कुमार , राजेश खन्ना , विनोद खन्ना , शशी कपूर आणि शत्रुघ्न सिन्हा सह इतर अभिनेत्यांसोबत काम केले. याशिवाय पंडितने १९७८ मध्ये उत्तम कुमार बरोबर बंदी या बंगाली चित्रपटातही काम केले होते.
पंडित यांचे चित्रपट अभिनेते संजीव कुमार यांच्यावर प्रेम होते, परंतु संजीव कुमार यांनी त्यांच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. तसेच संजीव कुमार हे अविवाहित राहिले होते. सबब पंडित यांनी देखील लग्न केले नाही. ६ नोव्हेंबर १९८५ रोजी संजीव कुमार यांचे निधन झाले, ज्यामुळे पंडित खचल्या होत्या. विशेष म्हणजे चाळीस वर्षांनी याच तारखेस, म्हणजे ६ नोव्हेंबर २०२५ रोजी पंडित यांचे देखील हृदय विकाराने निधन झाले.[ १]