मधुमती
Jump to navigation
Jump to search
मधुमती | |
---|---|
दिग्दर्शन | बिमल रॉय |
निर्मिती | बिमल रॉय |
कथा | ऋत्विक घटक |
प्रमुख कलाकार |
दिलीप कुमार वैजयंतीमाला जॉनी वॉकर प्राण |
गीते | शैलेंद्र |
संगीत | सलील चौधरी |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १९५८ |
मधुमती हा १९५८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. बिमल रॉय ह्यांनी दिग्दर्शन व निर्मिती केलेल्या ह्या चित्रपटामध्ये दिलीप कुमार व वैजयंतीमाला ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा प्रसिद्ध बंगाली लेखक ऋत्विक घटक ह्यांनी लिहिली होती.
मधुमती भारतीय सिनेमामधील अजरामर कलाकृतींपैकी एक मानला जातो. मधुमतीमधील सर्व गाणी प्रचंड लोकप्रिय झाली.
मधुमतीला सर्वोत्तम हिंदी चित्रपटासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. तसेच ६व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये मधुमतीला सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम दिग्दर्शक, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता, सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक, सर्वोत्तम महिला पार्श्वगायक (लता मंगेशकर) इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले.
बाह्य दुवे[संपादन]
- इंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील मधुमती चे पान (इंग्लिश मजकूर)