रेखा भारद्वाज
Indian singer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी २३, इ.स. १९६४ दिल्ली | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
वैवाहिक जोडीदार | |||
पुरस्कार | |||
| |||
रेखा भारद्वाज (जन्म २४ जानेवारी १९६४) ही एक भारतीय गायिका आणि कलाकार आहे. तिला दोन फिल्मफेअर आणि एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.[१][२] हिंदी व्यतिरिक्त तिने बंगाली, मराठी, पंजाबी आणि मल्याळम भाषांमध्येही गाणी गायली आहेत.[३]
वैयक्तिक जीवन
[संपादन]भारद्वाज यांचा जन्म दिल्ली येथे झाला आणि ते सहा भावंडांपैकी एक आहेत (५ बहिणी आणि एक भाऊ). तिने १९९१ मध्ये प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, संगीतकार आणि पार्श्वगायक विशाल भारद्वाज यांच्याशी लग्न केले.[४] १९८४ मध्ये नवी दिल्लीतील हिंदू कॉलेजच्या वार्षिक कार्यक्रमाची तयारी करत असताना ती त्यांना पहिल्यांदा भेटली.[५]
कारकिर्द
[संपादन]भारद्वाज यांना सुरुवातीला त्यांच्या घरी त्यांच्या मोठ्या बहिणीने संगीताचे प्रशिक्षण दिले. तिने पंडित अमरनाथ यांच्याकडे औपचारिक प्रशिक्षण घेतले.[६] तिने दिल्लीतील गांधर्व महाविद्यालयात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे आठ वर्षे शिक्षण घेतले.
१९९७ मध्ये प्रकाशित झालेला चित्रपट चाची ४२० मध्ये विशाल भारद्वाजने संगीत दिले व गुलजार यांनी गीत लिहीले होते. ह्या चित्रपटातील "एक वो दिन भी" हे रेखा भारद्वाज यांचे पहिले पार्श्वगायक म्हणून गाणे आहे.[७] पती विशाल यांच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी गाणी गायली जसे जहाँ तुम ले चलो (१९९९), गॉडमदर (१९९९), माकडी (२००२), मकबूल (२००३).
भारद्वाजचा "इश्का इश्का" नावाचा पहिला अल्बम त्याच्या संकल्पनेनंतर दहा वर्षांनी २००२ मध्ये प्रकाशीत झाला. ह्याचे गीत गुलजार यांनी लिहीले होते. २००६ मधील ओमकारा चित्रपटात त्यांनी "नमक इश्क का" आणि "लाकड जलके कोयला होयी जाए" ही गाणी गायली. त्यांचे "नमक इश्क का" हे गाणे खुप गाजले व ह्यामुळे त्यांना ओळख मिळाली. त्यांना बॉलीवूड मुव्ही पुरस्कार, स्क्रीन पुरस्कार आणि स्टारडस्ट पुरस्कार मध्ये सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेसाठी नामांकन मिळाले.
२००९ मधील चित्रपट दिल्ली ६ मध्ये त्यांनी "ससुराल गेंदा फूल " गाणे गायले. ए.आर. रहमानने तयार केलेले गीत हे छत्तीसगढ़ी लोकगीतावर आधारीत होते.[४][८] ह्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट महिला गायकासाठी मिर्ची संगीत पुरस्कार आणि फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार मिळाले. सोबतच त्यांना आय.आय.एफ.ए. पुरस्कार व स्क्रीन पुरस्कारमध्ये नामांकन मिळाले होते. २०१० मध्ये आलेल्या इश्किया चित्रपटात तिने "बडी धीरे जाली" आणि "अब मुझे कोई" ही गझल गायली होती. "बडी धीरे झाली" हे गाणे ललित रागावर आधारित होते ज्यासाठी तिला भारत सरकारकडून सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय पुरस्कार समितीने दिलेल्या प्रशस्तिपत्रात, हा पुरस्कार "प्रेयकरासाठी आसुसलेल्या हृदयाच्या कामुक आणि उद्बोधक प्रस्तुतीकरणासाठी" हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे असे नमुद केले आहे.[९] तिला गझलसाठीसर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाच्या स्क्रीन पुरस्काराचे नामांकन मिळाले.[१०][११] सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेसाठी आयफा पुरस्काराचे नामांकन हे तिला दोन्ही गाण्यांसाठी मिळाले होते.[१२][१३] २०११ च्या ७ खून माफ चित्रपटासाठी तिने ज्येष्ठ गायिका उषा उत्थुप सोबत "डार्लिंग" हे युगल गाणे गायले, ज्यासाठी त्या दोघांना फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार मिळाला.[१४] डेढ इश्किया (२०१४) चित्रपटातील "हमारी अतारिया पे" या गाण्यासाठी तिला पुन्हा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.[१५]
संदर्भ
[संपादन]- ^ "Rekha Bhardwaj, who has won the National Award for Best Female Playback singer, said it's a great feeling having been able to share the same high with hubby Vishal Bhardwaj, who has won the Best Music Director award for the same film, "Ishqiya". - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 3 ऑक्टोबर 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 ऑक्टोबर 2017 रोजी पाहिले.
- ^ "Rekha Bhardwaj sings for 'Bin Roye' - The Express Tribune". The Express Tribune (इंग्रजी भाषेत). 10 जून 2015. 3 ऑक्टोबर 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 ऑक्टोबर 2017 रोजी पाहिले.
- ^ "The lesser known side of singer Rekha Bhardwaj". 11 November 2016. 12 June 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2018 रोजी पाहिले.
- ^ a b "The lesser known side of singer Rekha Bhardwaj". hindustantimes.com (इंग्रजी भाषेत). 11 नोव्हेंबर 2016. 15 फेब्रुवारी 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 ऑक्टोबर 2017 रोजी पाहिले.
- ^ "Vishal and I met through music: Rekha Bhardwaj". 3 ऑक्टोबर 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 ऑक्टोबर 2017 रोजी पाहिले.
- ^ "Lataji can give anyone a complex". Timesofindia.indiatimes.com. 3 April 2006. 23 October 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 October 2012 रोजी पाहिले.
- ^ Vajpayee-Tiwari, Soumya (१३ जून २०१५). "I had to fight hard to get what I deserved: Rekha Bhardwaj". https://www.hindustantimes.com/. २० मार्च २०२४ रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य) - ^ "Gulzarsaab is my Santa Claus". Specials.rediff.com. 27 December 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 October 2012 रोजी पाहिले.
- ^ "58th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 29 March 2012 रोजी पाहिले.
- ^ "Nominations for 17th Annual Star Screen Awards 2011". Bollywood Hungama. 6 January 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 January 2011 रोजी पाहिले.
- ^ "Winners of 17th Annual Star Screen Awards 2011". Bollywood Hungama. 9 January 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 January 2011 रोजी पाहिले.
- ^ "Nominations for IIFA Awards 2011". Bollywood Hungama. 5 April 2011. 19 June 2020 रोजी पाहिले.
- ^ "Winners of 12th IIFA Awards 2011". The Hollywood Reporter. 25 June 2011. 19 June 2020 रोजी पाहिले.
- ^ "Filmfare Awards 2012: Usha Uthup wins after 42 years of singing". 5 एप्रिल 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 ऑक्टोबर 2017 रोजी पाहिले.
- ^ "Filmfare Awards 2015: 2 States, Haider Lead Nominations - NDTV Movies". NDTVMovies.com (इंग्रजी भाषेत). 20 जानेवारी 2015. 3 ऑक्टोबर 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 ऑक्टोबर 2017 रोजी पाहिले.