शाल्मली खोलगडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शाल्मली खोलगडे

शाल्मली खोलगडे
आयुष्य
जन्म ३१ जानेवारी, १९८८ (1988-01-31) (वय: ३६)
जन्म स्थान मुंबई
संगीत साधना
गायन प्रकार पार्श्वगायिका
गौरव
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार (२०१३)

शाल्मली खोलगडे ( ३१ जानेवारी १९८८) ही एक मराठी गायिका आहे. मराठीसह तिने आजवर बॉलिवूड चित्रपटांमध्ये तसेच काही इंग्रजी बँडसाठी गाणी म्हटली आहेत. २०१२ साली शाल्मलीने इशकझादे ह्या चित्रपटामधील परेशान ह्या गाण्यासह बॉलिवूडमध्ये पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. ह्या गाण्याकरिता तिला २०१३ सालचा सर्वोत्तम महिला पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

शाल्मलीने २००९ साली प्रदर्शित झालेल्या व ईस्ट इंडियन लोकांवर आधारित तू माझा जीव ह्या मराठी चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका केली होती.‎

कारकिर्दीच्या सुरुवातीला :

शाल्मलीने १६ वय असताना आपले गायन प्रेक्षकांसमोर आणले. ८ वर्षाची असताना तिने आपल्या आईच्या मार्गदर्शनाखाली गायनास सुरुवात केली. तिची आई उमा खोलगडे भारतीय शास्त्रीय गायिका आणि थिएटर मधील व्यक्तिमत्त्व आहे.तिने नंतर शुभदा पराडकरच्या अंतर्गत तिचे संगीत शिक्षण चालू ठेवले.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: