Jump to content

मोनाली ठाकूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोनाली ठाकुर

मोनाली ठाकूर
आयुष्य
जन्म ३ नोव्हेंबर, १९८५ (1985-11-03) (वय: ३८)
जन्म स्थान कोलकाता
संगीत साधना
गायन प्रकार पार्श्वगायिका, शास्त्रीय गायिका, अभिनेत्री
गौरव
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार (२०१४)

मोनाली ठाकुर (बांग्ला: মোনালি ঠাকুর) ही एक भारतीय गायिका व अभिनेत्री आहे. पश्चिम बंगालमध्ये संगीताचा वारसा असलेल्या घराण्यामध्ये जन्मलेल्या व पंडित अजोय चक्रबर्ती ह्यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षण घेतलेल्या मोनालीने आजवर अनेक बंगालीबॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी म्हटली आहेत. २०१३ सालच्या लुटेरा चित्रपटामधील सवार लूं ह्या गाण्यासाठी तिला सर्वोत्तम महिला पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

गायनाबरोबरच अभिनयामध्ये देखील मोनाली कार्यरत असून तिने अनेक बंगाली चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]