Jump to content

२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक या पानावरून पुनर्निर्देशित)
२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमान बांगलादेश ध्वज बांगलादेश
सहभाग १०
सामने २३
अधिकृत संकेतस्थळ womens.t20worldcup.com
दिनांक ३ – २० ऑक्टोबर २०२४
२०२३ दक्षिण आफ्रिका (आधी) (नंतर) इंग्लंड २०२६

२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक ही आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेची नववी आवृत्ती असेल.[] सदर स्पर्धा ही ३ ते २० ऑक्टोबर २०२४ दरम्यान बांगलादेशमध्ये आयोजित केली जाणार होती.[] परंतु, बांगलादेशमध्ये चालू असलेल्या राजकीय अशांततेमुळे स्पर्धा आता त्याच वेळापत्रकानुसार संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवण्यात आली आहे, तरीही यजमानपदाचे अधिकार बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडे आहेत.[] ऑस्ट्रेलियाचा महिला संघ हा गतविजेता आहे, त्यांनी मागील स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता.

पार्श्वभूमी

[संपादन]

आयसीसी महिला टी२० विश्वचषक ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) द्वारे आयोजित महिलांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांदरम्यान आयोजित एक व्यावसायिक आंतरराष्ट्रीय टी२० स्पर्धा आहे. आता दर दोन वर्षांनी होणारी ही स्पर्धा २००९ मध्ये पहिल्यांदा इंग्लंडमध्ये खेळवली गेली. २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या मागीलच्या स्पर्धेत १० संघ सहभागी झाले होते. गतविजेता ऑस्ट्रेलिया होता, ज्याने मागील आवृत्तीच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता.

यजमानांची निवड

[संपादन]

ऑगस्ट २०२४ मध्ये, आयसीसीने घोषणा केली की २०२४ महिला टी२० विश्वचषक संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवला जाईल आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) अधिकृत यजमान राहील.[]

स्वरूप

[संपादन]

१० पात्र संघांना प्रत्येकी ५ संघांच्या २ गटांमध्ये विभागण्यात आले; एका गटातील सर्व ५ संघ इतर सर्व संघांसोबत सामने खेळतील. प्रत्येक गटामध्ये १० सामने खेळविले जातील आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीत प्रवेश करतील.

वेळापत्रक

[संपादन]

२८ जुलै २०२४ रोजी, आयसीसीने घोषणा केली की ही स्पर्धा ३ ते २० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत खेळवली जाईल. ती बांगलादेशमध्ये आयोजित केली जाणार होती. तथापि, ऑगस्ट २०२४ रोजी आयसीसीने जाहीर केल्यानुसार, बांगलादेशच्या सध्याच्या राजकीय स्थितीमुळे कारण काही सहभागी संघांच्या देशांतर्फे लागू करण्यात आलेल्या प्रवास सल्ल्यामुळे सदर स्पर्धा आता त्याच तारखांनुसार संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहे.

१६ ऑगस्ट २०२४ रोजी, आयसीसीने जाहीर केले की सराव सामने २७ सप्टेंबर ते १ऑक्टोबर दरम्यान आयोजित केले जातील. परंतु, २६ ऑगस्ट २०२४ रोजी, सुधारित वेळापत्रकाच्या घोषणेनंतर, सराव सामने २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत खेळविले जातील.

पात्रता

[संपादन]

एप्रिल २०२२ मध्ये, आयसीसीने स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेची पुष्टी केली.[] यजमान म्हणून बांगलादेश या स्पर्धेसाठी आपोआप पात्र ठरला. पात्रता स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत आयर्लंडचा पराभव करून स्कॉटलंडने प्रथमच महिला टी२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवली.[][] श्रीलंका दुसरा पात्र संघ ठरला. त्यांनी दुसऱ्या उपांत्य फेरीत संयुक्त अरब अमिरातीचा पराभव करून नवव्यांदा टी२० विश्वचषक गाठला.[]एकंदरीत, २०२३ मधील दहा पैकी नऊ संघ २०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेत पोहोचले, फरक इतकाच की फक्त स्कॉटलंडने आयर्लंडची जागा घेतली.[]

२०२४ महिला टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र संघ.
  आपोआप पात्र
   वैश्विक पात्रता स्पर्धेसाठी पात्र, परंतु टी२० विश्वचषक स्पर्धेपर्यंत पोहोचण्यात अपयशी.
  प्रादेशिक पात्रता स्पर्धेमध्ये सहभागी परंतु वैश्विक पात्रता स्पर्धेपर्यंत पोहोचण्यात अपयशी.
पात्रता निकष जागा पात्र संघ
यजमान बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२०२३ आयसीसी महिला टी२० विश्वचषक
(यजमान वगळून मागील स्पर्धेतील ६ अव्वल संघ)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
भारतचा ध्वज भारत
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
आयसीसी महिला आंतरराष्ट्रीय टी२० संघ क्रमवारी
(२७ फेब्रुवारी २०२३ रोजी पुढील अव्वल क्रमांकाचा संघ)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक पात्रता स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
एकूण १०

प्रत्येक संघाने स्पर्धेपूर्वी १५ खेळाडूंचा एक संघ निवडला आणि कोणत्याही जखमी खेळाडूच्या जागी नवीन नेमणूक करण्याची संघाला मुभा होती. पाकिस्तानने 25 ऑगस्ट 2024 रोजी त्यांच्या संघाचे नाव जाहीर केले.[] तर दुसऱ्यादिवशी ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर केला.[१०] २७ ऑगस्ट रोजी भारत आणि इंग्लंडने त्यांच्या संघांची घोषणा केली.[११][१२] वेस्ट इंडीजने २९ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांचा संघ जाहीर केला.[१३] स्कॉटलंडने २ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्या संघाची घोषणा केली.[१४] त्यानंतर ३ सप्टेंबर २०२४ रोजी दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या संघाची घोषणा केली.[१५] न्यू झीलंडने १० सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्या संघाची घोषणा केली.[१६]

ठिकाणे

[संपादन]

जुलै २०२२ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) ने जाहीर केले की ढाका आणि सिलहट या दोन ठिकाणी विश्वचषक सामने आयोजित केले जातील.[१७] जरी सिलहट हे मूळतः अंतिम सामन्याचे यजमानपद भूषवणार होते, तरी ते यजमानपद ढाकाला मिळणार होते. नंतर, ऑगस्ट २०२४ मध्ये, आयसीसीने घोषणा केली की बांगलादेश ऐवजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये महिला टी२० विश्वचषक खेळवला जाईल, परंतु तरीही या स्पर्धेचे आयोजन बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) करेल. हे सामने दुबई आणि शारजा येथे होणार आहेत.[१८]

संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती

मधील ठिकाणे

दुबई शारजा
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: २५,००० प्रेक्षक क्षमता: १६,०००
सामने: १२ (उपांत्य आणि अंतिम सामना) सामने: ११ (उपांत्य सामना)

पारितोषिक रक्कम

[संपादन]

स्पर्धेसाठी US$७,९५८,०८० ची एकूण बक्षीस रक्कम उपलब्ध होती आणि संघाच्या कामगिरीनुसार खालीलप्रमाणे रकमेची विभागणी करण्यात आली [१९][२०]

पारितोषिक रक्कम
टप्पा संघ रक्कम (USD) एकूण (USD)
विजेते $२,३४०,००० $२,३४०,०००
उपविजेते $१,१७०,००० $१,१७०,०००
उपांत्य सामन्यातील पराभूत संघ $६७५,००० $१,३५०,०००
गट फेरीतील प्रत्येक विजेता २० $३१,१५४ $६२३,०८०
५ ते ८ व्या स्थानावरील संघ $६७,५०० $२७०,०००
९व्या आणि १०व्या स्थानावरील संघ $६७,५०० $१३५,०००
एकूण $७,९५८,०८०

सराव सामने

[संपादन]

टी२० विश्वचषकापूर्वी, सहभागी राष्ट्रे २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या दहा सराव सामन्यांमध्ये भाग घेतील. या सामन्यांना महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय दर्जा किंवा महिला टी२० दर्जा नसेल.[२१]

सराव सामने









गट फेरी

[संपादन]

आयसीसीने ५ मे २०२४ रोजी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले.[२२] स्पर्धेचे संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्थलांतर केल्यानंतर, २६ ऑगस्ट २०२४ रोजी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले.[२३]

गट अ

[संपादन]
स्थान संघ सा वि गुण नि.धा. पात्रता
1 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 0 0 0 0 0 0 बाद फेरीसाठी पात्र
2 भारतचा ध्वज भारत 0 0 0 0 0 0
3 न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड 0 0 0 0 0 0
4 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान 0 0 0 0 0 0
5 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका 0 0 0 0 0 0
पहिला सामना ३ ऑक्टोबर २०२४ रोजी खेळविला जाईल. स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो

सामने

[संपादन]









गट ब

[संपादन]
स्थान संघ सा वि गुण नि.धा. पात्रता
1 बांगलादेशचा ध्वज बांगलादेश (H) 0 0 0 0 0 0 बाद फेरीसाठी पात्र
2 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 0 0 0 0 0 0
3 स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड 0 0 0 0 0 0
4 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका 0 0 0 0 0 0
5 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज 0 0 0 0 0 0
पहिला सामना ३ ऑक्टोबर २०२४ रोजी खेळविला जाईल. स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो
(H) यजमान.

सामने

[संपादन]









बाद फेरी

[संपादन]
  उपांत्य सामने अंतिम सामना
                 
अ१  गट अ विजेता  
ब२  गट ब उपविजेता  
    उसा१वि  उपांत्य सामना १ विजेता
  उसा२वि  उपांत्य सामना २ विजेता
ब१  गट ब विजेता
अ२  गट अ उपविजेता  

उपांत्य सामने

[संपादन]

१८ ऑक्टोबर २०२४
१८:०० (दि/रा)
धावफलक
ब१
वि
अ२

अंतिम सामना

[संपादन]

संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ a b "मोठ्या आयसीसी स्पर्धेसाठी पात्रता मार्ग निश्चित". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १० एप्रिल २०२२. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "२०२७ पर्यंतच्या आयसीसी महिला जागतिक स्पर्धांसाठी यजमानांची घोषणा". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ जुलै २०२२. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी नवे ठिकाण म्हणून संयुक्त अरब अमिरातीच्या निवड". www.icc-cricket.com. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "आयसीसी महिला टी२० विश्वचषक संघर्षग्रस्त बांगलादेशातून युएईमध्ये हलवला". क्रिकबझ्झ. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "आयर्लंडवर विजय मिळवून स्कॉटलंडने पहिल्या महिला टी२० विश्वचषकाचे तिकीट मिळवले". www.icc-cricket.com. ५ मे २०२४.
  6. ^ "महिला टी२० विश्वचषक पात्रता: स्कॉटलंडची आयर्लंडवर मात, बांगलादेश विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळविले". बीबीसी स्पोर्ट. ५ मे २०२४.
  7. ^ "युएईवर मात करत श्रीलंकेचे महिला टी२० विश्वचषक जागेवर शिक्कामोर्तब". www.icc-cricket.com. ५ मे २०२४.
  8. ^ "स्कॉटलंडकडून दारुण पराभवानंतर आयर्लंड महिला टी२० विश्वचषक स्पर्धेला मुकला". द आयरिश टाइम्स.
  9. ^ "आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेमध्ये फातिमा सना पाकिस्तानचे नेतृत्व करणार". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. १० जानेवारी २०२४. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  10. ^ जॉली, लॉरा (२६ ऑगस्ट २०२४). "ब्राऊनचे पुनरागमन पण जोनासेनला विश्वचषक संघात जागा नाही". Cricket.com.au. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  11. ^ "आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर". बीसीसीआय. २७ ऑगस्ट २०२४. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  12. ^ "आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ साठी इंग्लंड महिला संघाची निवड". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. २७ ऑगस्ट २०२४. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  13. ^ "टी-२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजच्या संघात डिआंड्रा डॉटिनचे पुनरागमन झाले आहे". ईएसपीएन क्रिकइन्फो. २७ ऑगस्ट २०२४. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  14. ^ "आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ साठी स्कॉटलंड महिला संघाची निवड". क्रिकेट स्कॉटलंड. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  15. ^ "नवोदित तरुण खेळाडू सेश्नी नायडू, वोल्वार्डच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका टी२० विश्वचषक संघात". ईएसपीएन क्रिकइन्फो. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  16. ^ "डेव्हाईन आणि बेट्स सलग नवव्या टी२० विश्वचषकासाठी सज्ज". न्यूझीलंड क्रिकेट. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  17. ^ "ढाका, सिलहट २०२४ महिला टी२० विश्वचषक सामने आयोजित करणार". न्यू एज बांगलादेश. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  18. ^ "आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ साठी नवीन ठिकाणे निश्चित". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  19. ^ "आयसीसीतर्फे महिला टी२० विश्वचषक २०२४ साठी बक्षीसाची विक्रमी रक्कम जाहीर". आयसीसी. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  20. ^ "महिला टी२० विश्वचषक विजेत्यांना बक्षीस रकमेत मोठी वाढ". आयसीसी. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  21. ^ "आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ सराव वेळापत्रक: संपूर्ण सामन्यांची यादी, सामन्यांच्या वेळा आणि ठिकाणे". विस्डेन. ६ मे २०२४. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  22. ^ "महिला टी२० विश्वचषक २०२४ साठी गट, सामने उघड झाले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ५ मे २०२४. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  23. ^ "महिला टी२० विश्वचषक २०२४ साठी अद्ययावत वेळापत्रक जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ ऑगस्ट २०२४. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]