Jump to content

२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक अंतिम सामना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक अंतिम सामना
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (२०१९ मध्ये चित्रित), येथे पहिलाच महिला टी२० विश्वचषक अंतिम सामना आयोजित केला गेला.
कार्यक्रम २०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक
दक्षिण आफ्रिका न्यू झीलंड
दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड
१५८/५ १२६/९
२० षटके २० षटके
न्यूझीलंड ३२ धावांनी विजयी
तारीख २० ऑक्टोबर २०२४
स्थळ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
सामनावीर आमेलिया केर (न्यू)
पंच निमाली परेरा (श्री)
क्लेर पोलोसॅक (ऑ)
उपस्थिती २१,४५७

२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना २० ऑक्टोबर २०२४ रोजी दुबई, संयुक्त अरब अमिराती येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर २०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेचा विजेता निश्चित करण्यासाठी खेळवला गेलेला महिला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट सामना होता.[][] हा सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यू झीलंड या संघादरम्यान खेळला गेला.[]

न्यू झीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ३२ धावांनी पराभव करून त्यांचा पहिलावाहिला टी२० विश्वचषक जिंकला.[] आमेलिया केरला तिच्या ३८ चेंडूंत ४३ धावा आणि २४ धावांतील ३ बळी अशा अष्टपैलू कामगिरीसाठी तसेच सामानावीराचा तर १५ बळी आणि १३५ धावा केल्याबद्दल मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.[][]

पार्श्वभूमी

[संपादन]

ऑगस्ट २०२४ मध्ये, आयसीसी महिला टी२० विश्वचषक बांगलादेशमधून संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्थलांतरित केल्यानंतर, आयसीसीने जाहीर केले की दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई २० ऑक्टोबर रोजी अंतिम सामन्याचे आयोजन करेल.[][]

दक्षिण आफ्रिका २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीसाठी पात्र ठरली.[][१०] दुसरीकडे २००९ मध्ये एकदा इंग्लंड आणि २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झालेला न्यू झीलंडचा संघ , तिसऱ्यांदा अंतिम फेरीमध्ये पोहोचला.[११] यापूर्वी आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांविरोधात पाच वेळा खेळले होते आणि दक्षिण आफ्रिकेने दोनदा (२०१४, २०२३) आणि न्यू झीलंडने तीनदा (२०२९, २०१२, २०१६) विजय मिळवला होता.[१२]आयसीसी पुरुष किंवा महिला टी२० विश्वचषक जिंकण्याची दोन्ही देशांची ही पहिलीच संधी असणार होती.[१३][१४]

अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास

[संपादन]

आढावा

[संपादन]
  • स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो[१५]
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका वि न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
प्रतिस्पर्धी दिनांक निकाल गुण सामना प्रतिस्पर्धी दिनांक निकाल गुण
गट ब गट फेरी गट अ
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४ ऑक्टोबर २०२४ विजयी भारतचा ध्वज भारत ४ ऑक्टोबर २०२४ विजयी
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ ऑक्टोबर २०२४ पराभूत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ ऑक्टोबर २०२४ पराभूत
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ९ ऑक्टोबर २०२४ विजयी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १२ ऑक्टोबर २०२४ विजयी
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १२ ऑक्टोबर २०२४ विजयी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १४ ऑक्टोबर २०२४ विजयी
उपांत्य सामना १ उपांत्य फेरी उपांत्य सामना २
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १७ ऑक्टोबर २०२४ विजयी उपांत्य वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १८ ऑक्टोबर २०२४ विजयी
२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक अंतिम सामना

दक्षिण आफ्रिका

[संपादन]

दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या टी२० विश्वचषक मोहिमेची सुरुवात वेस्ट इंडीजवर १० गडी राखून विजय मिळवून केली.[१६] ७ ऑक्टोबर रोजी त्यांना इंग्लंडकडून ७ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.[१७] ९ ऑक्टोबर रोजी त्यांनी स्कॉटलंडचा ८० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.[१८] त्यांच्या अंतिम गट सामन्यात, त्यांनी बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला,[१९] आणि गट ब मध्ये उपविजेते म्हणून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले.

त्यानंतर दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव करून सलग दुसऱ्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले.[२०]

न्यू झीलंड

[संपादन]

न्यू झीलंडने त्यांच्या टी२० विश्वचषक मोहिमेची सुरुवात भारतावर ५८ धावांनी विजय मिळवून केली.[२१] ८ ऑक्टोबर रोजी त्यांना दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ६० धावांनी पराभव पत्करावा लागला.[२२] त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी त्यांनी श्रीलंकेचा ८ गडी राखून पराभव केला.[२३] त्यांच्या अंतिम गट सामन्यात, त्यांनी पाकिस्तानचा ५४ धावांनी दणदणीत पराभव केला,[२४] आणि गट अ मध्ये उपविजेते म्हणून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले.

त्यानंतर न्यू झीलंडने शारजाह येथील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर उपांत्य फेरीत वेस्ट इंडीजचा ८ धावांनी पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.[२५]

सामना अधिकारी

[संपादन]

१९ ऑक्टोबर २०२४ रोजी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) श्रीलंकेच्या निमाली परेरा आणि ऑस्ट्रेलियाच्या क्लेर पोलोसॅक यांना मैदानावरील पंच म्हणून, इंग्लंडच्या ॲना हॅरिस यांना टीव्ही पंच म्हणून, वेस्ट इंडीजच्या जॅकलीन विल्यम्सला राखीव पंच म्हणून आणि भारताच्या जी.एस. लक्ष्मी यांना सामनाधिकारी म्हणून  नियुक्त केले.[२६]

संघ आणि नाणेफेक

[संपादन]

दोन्ही संघांनी आपापले उपांत्य फेरीतील संघ कायम ठेवले. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड हिने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.[]

न्यू झीलंडचा डाव

[संपादन]

सुझी बेट्सने पहिल्याच चेंडूवर एकेरी धाव घेत डावाची सुरुवात केली. त्यानंतर, जॉर्जिया प्लिमरने पहिल्याच षटकात दोन चौकार मारले परंतु त्याच्या पुढच्याच षटकात तिला अयाबाँगा खाकाने बाद केले. त्यानंतर बेट्स आणि अमेलिया केर यांनी ३७ धावांची भागीदारी करून धावसंख्या स्थिर ठेवली. नॉनकुलुलेको म्लाबाने बेट्सला बाद करून ही भागीदारी तोडली. त्यानंतर नेडीन डि क्लर्कने तिच्या पहिल्याच षटकात न्यू झीलंडची कर्णधार सोफी डिव्हाइनला अवघ्या ६ धावांवर असताना बाद केले. त्यानंतर केरला ब्रुक हालीडेने साथ दिली आणि त्यांच्यात ५७ धावांची भागीदारी झाली. हॅलिडेला क्लोई ट्रायॉनने ३८ धावांवर बाद केले आणि त्यानंतर केरला म्लाबाने ४३ धावांवर बाद केले. मॅडी ग्रीनने शेवटच्या षटकात षटकार मारला आणि न्यू झीलंडचा डाव २० षटकांनंतर ५ बाद १५८ धावांवर संपला.[२७][२८][२९][३०][३१]

दक्षिण आफ्रिकेचा डाव

[संपादन]
आमेलिया केरला ३८ चेंडूंत ४३ धावा आणि २४ धावांत ३ बळी अशा अष्टपैलू कामगिरीबद्दल अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लॉरा वॉल्व्हार्ड आणि तझमिन ब्रिट्स यांनी दक्षिण आफ्रिकेला दमदार सुरुवात करून दिली. पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेने बिनबाद ४७ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर, ब्रिट्सला ७व्या षटकात फ्रान जोनसने १७ धावांवर बाद केले. १०व्या षटकात, केरने दोन गडी बाद केले, पहिल्या चेंडूवर ३३ धावांवर वोल्वार्डला बाद केले आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर ॲनेके बॉशला ९ धावांवर बाद केले. इडन कार्सनच्या षटकामध्ये ८ धावांवर बाद होणारी मेरिझॅन कॅप पुढची फलंदाज होती आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर रोझमेरी मायरने नेडीन डि क्लर्कला ६ धावांवर बाद करून दक्षिण आफ्रिकेची अवस्था ५ बाद ७७ अशी केली. त्यानंतर, नियमित अंतराने दक्षिण आफ्रिकेचे गडी बाद होत गेले, सुने लूस ८ धावांवर, ॲनेरी डेर्कसेन १० धावांवर आणि क्लोई ट्रायॉन १४ धावांवर बाद झाली आणि दक्षिण आफ्रिकेचा डाव २० षटकांत ९ बाद १२६ धावांवर संपला. त्यांना सामना २१ धावांनी गमावावा लागला.[२७][२८][२९][३०][३१]

सामना माहिती

[संपादन]
२० ऑक्टोबर २०२४
१८:०० (रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१५८/५ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१२६/९ (२० षटके)
न्यू झीलंड ३२ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: निमाली परेरा (श्री) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: आमेलिया केर (न्यू)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
  • न्यू झीलंडचे हे पहिले आयसीसी महिला टी-२० विजेतेपद आहे.[३२][२८]

सामना धावफलक

[संपादन]

१ला डाव

[संपादन]
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड फलंदाजी[३३]
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
सुझी बेट्स गो. म्लाबा ३२ ३१ १०३.२२
जॉर्जिया प्लिमर झे. लूस गो. खाका १२८.५७
आमेलिया केर झे. ब्रिट्स गो. म्लाबा ४३ ३८ ११३.१५
सोफी डिव्हाइन (क) पायचीत गो. डी क्लर्क १० ६०.००
ब्रुक हालीडे झे. बॉश गो. ट्रायॉन ३८ २८ १३५.७१
मॅडी ग्रीन नाबाद १२ २००.००
इझ्झी गेझ (य) नाबाद १००.००
अतिरिक्त (ले.बा. २, नो ३, वा १०)
१५
एकूण
(५ गडी बाद; २० षटके)
१५८ १२ धावगती: ७.९०

फलंदाजी केली नाही:रोझमेरी मायर, लिया ताहुहु, इडन कार्सन, फ्रान जोनस
गडी बाद होण्याचा क्रम: १/१६ (प्लिमर, १.५ ष), २/५३ (बेट्स, ७.४ ष), ३/७० (डिव्हाइन, १०.२ ष), ४/१२७ (हालीडे, १७.२ ष), ५/१४१ (केर, १८.५ ष)

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका गोलंदाजी[३३]
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी वाईड नो
मेरिझॅन कॅप २५ ६.२५
अयाबाँगा खाका ४४ ११.००
क्लोई ट्रायॉन २२ ५.५०
नॉनकुलुलेको म्लाबा ३१ ७.७५
नादिन डी क्लर्क १७ ८.५०
सुने लूस १७ ८.५०

२रा डाव

[संपादन]
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका फलंदाजी[३३]
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
लॉरा वॉल्व्हार्ड (क) झे. बेट्स गो. केर ३३ २७ १२२.२२
तझमिन ब्रिट्स झे. ग्रीन गो. जोनस १७ १८ ९४.४४
ॲनेके बॉश झे. †गेझ गो. केर १३ ६९.२३
मेरिझॅन कॅप झे. प्लिमर गो. कार्सन १००.००
नादिन डी क्लर्क झे. केर गो. मायर ८५.७१
क्लोई ट्रायॉन झे. ग्रीन गो. मायर १४ १६ ८७.५०
सुने लूस झे. बेट्स गो. हालीडे ८८.८८
ॲनेरी डेर्कसेन झे. बेट्स गो. केर १० १११.११
सिनालो जाफ्ता (य) गो. मायर १५०.००
नॉनकुलुलेको म्लाबा नाबाद ८०.००
अयाबाँगा खाका नाबाद १००.००
अवांतर (बा २, वा ५)
एकूण
(९ बाद; २० षटके)
१२६ १० धावगती: ६.३०

गडी बाद होण्याचा क्रम: १/५१ (ब्रिट्स, ६.५ ष), २/५९ (वॉल्व्हार्ड, ९.१ ष), ३/६४ (बॉश, १० ष), ४/७७ (कॅप, १२ ष), ५/७७ (डी क्लर्क, १२.१ ष), ६/९७ (लूस, १५.१ ष), ७/१११ (डेर्कसेन, १७.३ ष), ८/११७ (ट्रायॉन, १८.१ ष), ९/१२० (जाफ्ता, १८.५ ष)

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड गोलंदाजी[३३]
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी वाईड नो
रोझमेरी मायर २५ ६.२५
इडन कार्सन २२ ५.५०
फ्रान जोनस २८ ७.००
लिया ताहुहु २१ ७.००
आमेलिया केर २४ ६.००
ब्रुक हालीडे ४.००

संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ आयसीसी (६ सप्टेंबर २०२४). "आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ अंतिम मार्गदर्शक: आपल्याला माहित असणे आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट". www.icc-cricket.com (इंग्रजी भाषेत). २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी महिला टी२०विश्वचषक २०२४: संपूर्ण वेळापत्रक, थेट प्रक्षेपण, गट आणि बरेच काही जाणून घ्या". द टाइम्स ऑफ इंडिया. ३ ऑक्टोबर २०२४. ISSN 0971-8257. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ a b "न्यू झीलंड महिला वि दक्षिण आफ्रिका महिला थेट धावफलक - आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४, २० ऑक्टोबर २०२४ दुबईमध्ये अंतिम सामना". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "अमेलिया केरने न्यूझीलंडला पहिले विश्वचषक विजेतेपद मिळवून दिले". क्रिकबझ्झ. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "न्यूझीलंडने पहिल्या T20 महिला विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्यानंतर कर्णधार डेव्हाईनने 'वन्स इन जनरेशन' केरचे कौतुक केले". स्पोर्टस्टार. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "तेजस्वी अष्टपैलू मेली केरला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ "आयसीसीने महिला टी२० विश्वचषक संघर्षग्रस्त बांगलादेशातून युएई मध्ये हलवला". क्रिकबझ्झ. १९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "युएईची आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ साठी नवीन ठिकाण म्हणून पुष्टी". आंतरराष्ट्रीय किकेट समिती. १९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  9. ^ "महिला टी२० विश्वचषक: ऑस्ट्रेलियाच्या अभूतपूर्व सहाव्या विजेतेपदाचे जगभरात कौतुक". द टाइम्स ऑफ इंडिया. 2023-02-27. ISSN 0971-8257. १९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  10. ^ icc (१७ ऑक्टोबर २०२४). "शानदार दक्षिण आफ्रिका गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत दाखल". www.icc-cricket.com (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  11. ^ icc (१८ ऑक्टोबर २०२४). "न्यू झीलंड स्किपर ओव्हरजॉइड बाय शॉट ॲट टी२० वर्ल्ड कप ग्लोरी". www.icc-cricket.com (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  12. ^ "आयसीसी महिला टी२० विश्वचषक विक्रम - क्रिकेटचे उल्लेखनीय पराक्रम". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  13. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक विक्रम - क्रिकेटचे उल्लेखनीय पराक्रम". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  14. ^ "आयसीसी महिला टी२० विश्वचषक विक्रम - क्रिकेटचे उल्लेखनीय पराक्रम". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  15. ^ "महिला टी२० विश्वचषक २०२४/२५ वेळापत्रक | आयसीसी महिला टी२० विश्वचषक सामने आणि निकाल". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १८ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  16. ^ "दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर आरामात विजय". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  17. ^ "इंग्लंडने क्लासच् दाखवत घेतला दक्षिण आफ्रिकेचा बदला". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  18. ^ "स्कॉटलंडचा पाडाव करून दक्षिण आफ्रिका विजयी मार्गावर परतला". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  19. ^ "साऊथ आफ्रिका एन्ड बांगलादेश टूर्नामेंट ऍज ग्रुप बी बिकम्स थ्री वे स्क्रॅप". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  20. ^ "शानदार दक्षिण आफ्रिका गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत दाखल". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  21. ^ "दुबईच्या विध्वंसात न्यूझीलंडकडून भारताचे मोठे नुकसान". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  22. ^ "अप्रतिम ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला धूळ चारली". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  23. ^ "प्रभावी न्यूझीलंडचा श्रीलंकेवर आरामात विजय". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  24. ^ "विजय मिळवून न्यूझीलंड उपांत्य फेरीत, भारत आणि पाकिस्तान स्पर्धेबाहेर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  25. ^ "थरारक विजय मिळवत न्यूझीलंडचा टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  26. ^ "आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ अंतिमसंन्यासाठी एमिरेट्स पॅनल ऑफ मॅच ऑफिशियलची नावे". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०२४. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  27. ^ a b "प्रेरित न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर मात करून महिला टी२० विश्वचषक २०२४ जिंकला". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  28. ^ a b c "केर, हालीडे डिलिव्हर वर्ल्ड कप ग्लोरी ऑन ड्रीम डे फॉर न्यूझीलंड क्रिकेट". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  29. ^ a b "दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड महिला थेट धावफलक टी२० विश्वचषक: संघ विश्वचषक ट्रॉफी घरी घेऊन गेल्यामुळे किवींसाठी उत्सव सुरू झाला". फायनान्शियल एक्सप्रेस. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  30. ^ a b "महिला टी२० विश्वचषक फायनल: अमेलिया केरच्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला नमवून पहिले विजेतेपद पटकावले". स्काय स्पोर्ट्स. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  31. ^ a b "दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून न्यू झीलंडने त्यांचा पहिला टी२० विश्वचषक जिंकला - सर्वोत्कृष्ट प्रतिक्रिया". बीबीसी. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  32. ^ "अमेलिया केरने न्यूझीलंडला प्रथमच विश्वचषक विजेतेपद मिळवून दिले". क्रिकबझ्झ. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  33. ^ a b c d e "न्यूझीलंड महिला वि दक्षिण आफ्रिका महिला थेट धावफलक - आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४, २० ऑक्टोबर २०२४, दुबईमध्ये अंतिम". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.