ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८८-८९
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८२-८३ | |||||
पाकिस्तान | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | १५ सप्टेंबर – १४ ऑक्टोबर १९८८ | ||||
संघनायक | जावेद मियांदाद | ॲलन बॉर्डर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने सप्टेंबर-ऑक्टोबर १९८८ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका पाकिस्तानने अनुक्रमे १-० आणि १-० अशी जिंकली.
एकदिवसीय मालिकेत तीन सामने अनुक्रमे ३० सप्टेंबर, १४ ऑक्टोबर आणि १५ सप्टेंबर या तीन दिवशी होणार होते. गुजराणवाला येथील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. तर कराची आणि हैदराबाद येथील दुसरा आणि तिसरा सामना हैदराबादमध्ये झालेल्या दंगलीमुळे रद्द करण्यात आले. लाहोर येथील कसोटी नियोजित दिवसापेक्षा एक दिवस आधी संपल्याने लाहोर कसोटीचा विश्रांतीचा दिवस रद्द केला गेला. व त्या दिवशी अर्थात १४ ऑक्टोबर रोजी गद्दाफी स्टेडियम वर अचानक ठरविण्यात आलेला एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. एकदिवसीय सामना टाय झाला. परंतु पाकिस्तानपेक्षा ऑस्ट्रेलियाचा १ गडी जास्त बाद झाला होता, त्यामुळे पाकिस्तानला एकदिवसीय सामन्याचा विजेता घोषित केला गेला.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२री कसोटी
[संपादन]३री कसोटी
[संपादन]आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना
[संपादन] १४ ऑक्टोबर १९८८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- इयान हीली आणि जेमी सिडन्स (ऑ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.