Jump to content

"गजानन महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ३: ओळ ३:
आधुनिक [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक [[संत]].
आधुनिक [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक [[संत]].
==महाराज कोण होते, कोठून आले?==
==महाराज कोण होते, कोठून आले?==
श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण होते अशी एक वदंता होती. त्याचे कारण म्हणजे श्री बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने "आंध्रा योगुलु" नावाच्या पुस्तकात श्री महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे. परंतु २००४ साली प्रकाशित झालेल्या "श्री गजानन महाराज चरित्र कोश" ह्या श्री दासभार्गव नावाच्या लेखकाने (हे शेगावात राहणारे असून आठ वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनानंतर त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केले) लिहिलेल्या पुस्तकात ह्या वदंतेचे व्यवस्थित स्पष्टिकरण केले आहे. इ.स. २००३ मध्ये ह्या लेखकाची मुलाखत १२९ वर्षे वयाच्या श्री शिवानंद सरस्वती नावाच्या सत्पुरुषाशी नाशिकक्षेत्री झाली. त्यावेळी श्री सरस्वतींनी त्यांना १८८७ साली अगदी तरुणपणी श्री महाराजांची आणि त्यांची नाशिकक्षेत्रीच भेट झाल्याचे सांगितले. हे सत्पुरुष मूळचे तमीळनाडूमधिल तिरुनेलवेल्लीहून आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी स्पष्ट केले की श्री महाराज जेव्हा शेगावी प्रकट झाले त्यानंतरही ते २५-३० वेळा महाराजांना भेटावयास गेले होते. प्रत्येक वेळी ते अमरावती येथील श्री खापर्डे ह्यांच्या घरी राहात. कालांतराने हे सत्पुरुष तपश्चर्येकरिता हिमालयात निघून गेले आणि त्यानंतर ते प्रदीर्घ काळी कोणासही दिसले नाहीत. ह्याच सत्पुरुषाचा उल्लेख श्री बा.ग. खापर्डे ह्यांनी "श्री गजानन विजय" ह्या प्रख्यात ग्रंथाच्या प्रस्तावनेत केला आहे. हा सर्व तपशील वर उल्लेखिलेल्या पुस्तकात पृष्ठ ३६२-३६५ वर वाचकांना वाचून पडताळून पहाता येईल. ह्यावरून एक गोष्ट मात्र निश्चित होते आणि ती म्हणजे की श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण नव्हते. परब्रह्म, परमात्म्याला कोणती जातगोत, कुलगोत्र, जन्मगाव, देशविदेश जोडता येतं का? महाराज कोण होते, कोठून आले?. (कारण ते उत्तम प्रकारे वेदपठण करीत, तसेच त्यांना वेदश्रवणदेखील फार आवडे.) <ref name=dasganu />. माघ वद्य ७ शके १८०० , २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते [[शेगांव]] जि. [[बुलढाणा]] येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले<ref>http://neelkant.wordpress.com/</ref> . त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या [[पत्रावळ|पत्रावळीतील]] शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात [[दासगणू महाराज|दासगणूंनी]] लिहिले आहे, "कोण हा कोठीचा काहीच कळेना | ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती | आलीसे प्रचिती बहुतांना ||"<ref name=dasganu>लोक त्यांना अजन्मा अथवा अयोनिसंभवा असेसुद्धा म्हणतात{{संदर्भ हवा}}. [[श्री गजानन विजय]] या ग्रंथामधे त्यांचे चरित्र [[दासगणू महाराज]] यांनी लिहून ठेवले आहे.</ref> जसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्याने त्यांचे महत्त्व ओळखले. त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे, "दंड गर्दन पिळदार | भव्य छाती दृष्टी स्थिर | भृकुटी ठायी झाली असे ||." जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या (जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणगे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहजसमाधि असे म्हणतात) अवस्थेत होते. महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्याची बंकटलालला तत्काळ आणि मनोमन खात्री पटली. त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले. जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास, ह्या उक्तीप्रमाणे, "बंकटलालाचे घर | झाले असे पंढरपूर | लांबलांबूनीया दर्शनास येती | लोक ते पावती समाधान ||,"
श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण होते अशी एक वदंता होती. त्याचे कारण म्हणजे श्री बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने "आंध्रा योगुलु" नावाच्या पुस्तकात श्री महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे. परंतु २००४ साली प्रकाशित झालेल्या "श्री गजानन महाराज चरित्र कोश" ह्या श्री दासभार्गव नावाच्या लेखकाने (हे शेगावात राहणारे असून आठ वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनानंतर त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केले) लिहिलेल्या पुस्तकात ह्या वदंतेचे व्यवस्थित स्पष्टीकरण दिले आहे. इ.स. २००३ मध्ये ह्या लेखकाची मुलाखत १२९ वर्षे वयाच्या श्री शिवानंद सरस्वती नावाच्या सत्पुरुषाशी नाशिकक्षेत्री झाली. त्यावेळी श्री सरस्वतींनी त्यांना १८८७ साली अगदी तरुणपणी श्री महाराजांची आणि त्यांची नाशिकक्षेत्रीच भेट झाल्याचे सांगितले. हे सत्पुरुष मूळचे तमिळनाडूमधिल तिरुनेलवेल्लीहून आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी स्पष्ट केले की श्री महाराज जेव्हा शेगावी प्रकट झाले त्यानंतरही ते २५-३० वेळा महाराजांना भेटावयास गेले होते. प्रत्येक वेळी ते अमरावती येथील श्री खापर्डे ह्यांच्या घरी राहात. कालांतराने हे सत्पुरुष तपश्चर्येकरिता हिमालयात निघून गेले आणि त्यानंतर ते प्रदीर्घ काळी कोणासही दिसले नाहीत. ह्याच सत्पुरुषाचा उल्लेख श्री बा.ग. खापर्डे ह्यांनी "श्री गजानन विजय" ह्या प्रख्यात ग्रंथाच्या प्रस्तावनेत केला आहे. हा सर्व तपशील वर उल्लेखिलेल्या पुस्तकात पृष्ठ ३६२-३६५ वर वाचकांना वाचून पडताळून पहाता येईल. ह्यावरून एक गोष्ट मात्र निश्चित होते आणि ती म्हणजे की श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण नव्हते. परब्रह्म, परमात्म्याला कोणती जातगोत, कुलगोत्र, जन्मगाव, देशविदेश जोडता येते का? महाराज कोण होते, कोठून आले?. (कारण ते उत्तम प्रकारे वेदपठण करीत, तसेच त्यांना वेदश्रवणदेखील फार आवडे.) <ref name=dasganu />. माघ वद्य ७ शके १८०० , २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते [[शेगांव]] जि. [[बुलढाणा]] येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले<ref>http://neelkant.wordpress.com/</ref> . त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या [[पत्रावळ|पत्रावळीतील]] शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात [[दासगणू महाराज|दासगणूंनी]] लिहिले आहे, "कोण हा कोठीचा काहीच कळेना | ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती | आलीसे प्रचिती बहुतांना ||"<ref name=dasganu>लोक त्यांना अजन्मा अथवा अयोनिसंभवा असेसुद्धा म्हणतात{{संदर्भ हवा}}. [[श्री गजानन विजय]] या ग्रंथामधे त्यांचे चरित्र [[दासगणू महाराज]] यांनी लिहून ठेवले आहे.</ref> जसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्याने त्यांचे महत्त्व ओळखले. त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे, "दंड गर्दन पिळदार | भव्य छाती दृष्टी स्थिर | भृकुटी ठायी झाली असे ||." जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या (जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणजे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहजसमाधि असे म्हणतात) अवस्थेत होते. महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्याची बंकटलालला तत्काळ आणि मनोमन खात्री पटली. त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले. जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास, ह्या उक्तीप्रमाणे, "बंकटलालाचे घर | झाले असे पंढरपूर | लांबलांबूनीया दर्शनास येती | लोक ते पावती समाधान ||,"
बंकटलालाचे घर भक्तांनी दुमदुमून गेले. जरी पहिले काही महिने श्री गजानन महाराज बंकटलालाकडे राहिले तरीदेखिल सच्च्या परमहंस संन्याशाप्रमाणे काही कालानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून बदलून गावातील मारुतीच्या मंदिरात स्थिर केले. संत हे उपाधिरहित असल्याकारणाने गजानन महाराजदेखिल उपाधिपासून दूर राहण्याकरिता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात.
बंकटलालाचे घर भक्तांनी दुमदुमून गेले. जरी पहिले काही महिने श्री गजानन महाराज बंकटलालाकडे राहिले तरीदेखिल सच्च्या परमहंस संन्याशाप्रमाणे काही कालानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून बदलून गावातील मारुतीच्या मंदिरात स्थिर केले. संत हे उपाधिरहित असल्याकारणाने गजानन महाराजदेखिल उपाधिपासून दूर राहण्याकरिता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात.


{{बदल}}
{{बदल}}
अक्कलकोटचे [[श्री स्वामी समर्थ ]] आणि श्री गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे साम्य आढळते.
अक्कलकोटचे [[श्री स्वामी समर्थ ]] आणि श्री गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे साम्य आढळते.
दोघेही परमहंस सन्यासी होते, दोघेही अजानबाहू होते, दोघेही अत्यंत गूढ बोलत ज्याचा समोरच्यांना अर्थ कळत नसे. साधारणपणे गजानन महाराज स्वामी समर्थांच्या समाधी घेण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रगट झाले. या दोन महापुरुषांची भेट झाली असे अनेकांचे मत आहे. काहींच्या मते स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे गुरु असावेत मात्र असे म्हणणे चूकीचे होईल, कारण श्री गजानन महाराजांची सर्व लक्षणे स्वामी समर्थांप्रमाणेच पूर्ण अवताराची आहेत, तसेच श्री गजानन महाराज हे योनी वाचून प्रगटले असण्याची शक्यता असल्यामूळे ते स्वंयसिध्द होते. कदाचित त्यांनी स्वामींची भेट घेतली असेल मात्र श्री स्वामी समर्थ त्यांचे गुरु नक्कीच नव्हते.
दोघेही परमहंस सन्यासी होते, दोघेही अजानबाहू होते, दोघेही अत्यंत गूढ बोलत ज्याचा समोरच्यांना अर्थ कळत नसे. साधारणपणे गजानन महाराज स्वामी समर्थांच्या समाधी घेण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रगट झाले. या दोन महापुरुषांची भेट झाली असे अनेकांचे मत आहे. काहींच्या मते स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे गुरु असावेत. मात्र असे म्हणणे चुकीचे होईल, कारण श्री गजानन महाराजांची सर्व लक्षणे स्वामी समर्थांप्रमाणेच पूर्ण अवताराची आहेत, तसेच श्री गजानन महाराज हे योनी वाचून प्रगटले असण्याची शक्यता असल्यामूळे ते स्वंयसिध्द होते. कदाचित त्यांनी स्वामींची भेट घेतली असेल मात्र श्री स्वामी समर्थ त्यांचे गुरु नक्कीच नव्हते.


हरीभाऊ (स्वामीसूत), नाना रेखी (नाना इनामदार), दादाबुवा महाराज या स्वामींच्या शिष्यांनी "श्री स्वामी समर्थ" या नाम मंत्राचा प्रचार केला, मात्र गजानन महाराजांनी कधीच "श्री स्वामी समर्थ" या मंत्राचा जप केला नाही यावरुन ते स्वामी समर्थांचे शिष्य नव्हते असेच म्हणावे लागेल.
हरीभाऊ (स्वामिसुत), नाना रेखी (नाना इनामदार), दादाबुवा महाराज या स्वामींच्या शिष्यांनी "श्री स्वामी समर्थ" या नाम मंत्राचा प्रचार केला, मात्र गजानन महाराजांनी कधीच "श्री स्वामी समर्थ" या मंत्राचा जप केला नाही. यावरून ते स्वामी समर्थांचे शिष्य नव्हते असेच म्हणावे लागेल.


स्वामी समर्थांच्या भेटीस आलेल्या एका १८-१९ वर्षाच्या मूलास त्यांनी गणपती असे म्हंटले आणि नंतर कपिलधारेला तपश्चर्या करण्यास पाठवले. जर ते गजानन महाराज होते असे गृहित धरले तर १२ वर्षाच्या तपश्चर्येनंतर त्यांचे वय ३० व्हायला हवे होते मात्र गजानन महाराज प्रथम प्रगट झाले तेंव्हा त्यांचे वय १८ वर्षेच होते. त्यामूळे श्री स्वामी समर्थांनी गणपती म्हंटलेला मूलगा निश्चितपणे श्री गजानन महाराज नव्हते.
स्वामी समर्थांच्या भेटीस आलेल्या एका १८-१९ वर्षाच्या मुलास त्यांनी गणपती असे म्हटले आणि नंतर कपिलधारेला तपश्चर्या करण्यास पाठवले. जर ते गजानन महाराज होते असे गृहीत धरले तर १२ वर्षाच्या तपश्चर्येनंतर त्यांचे वय ३० व्हायला हवे होते मात्र गजानन महाराज प्रथम प्रगट झाले तेंव्हा त्यांचे वय १८ वर्षेच होते. त्यामुळे श्री स्वामी समर्थांनी गणपती म्हटलेला मुलगा निश्चितपणे श्री गजानन महाराज नव्हते.


श्री स्वामी समर्थांच्या शिष्यांनी स्वामींचे मठ स्थापून त्यांचा त्या त्या प्रांतात प्रचार केला, स्वत: स्वामी मात्र सर्वत्र फिरत असतानादेखील कधीच स्वत:चा प्रचार करीत नव्हते, त्याचप्रमाणे श्री गजानन महाराज देखील सदैव सर्वत्र फिरत असत मात्र त्यांनी स्वत:चा प्रचार कधीच केला नाही. दोघांचे चरित्र वाचल्यावर त्यांच्यातील साम्य प्राकर्षाने लक्षात येते आणि हे दोघे भौतिक दृष्ट्या दोन दिसले तरी प्रत्यक्षात एकच असावे असे वाटते.
श्री स्वामी समर्थांच्या शिष्यांनी स्वामींचे मठ स्थापून त्यांचा त्या त्या प्रांतात प्रचार केला, स्वत: स्वामी मात्र सर्वत्र फिरत असतानादेखील कधीच स्वत:चा प्रचार करीत नव्हते, त्याचप्रमाणे श्री गजानन महाराज देखील सदैव सर्वत्र फिरत असत मात्र त्यांनी स्वत:चा प्रचार कधीच केला नाही. दोघांचे चरित्र वाचल्यावर त्यांच्यातील साम्य प्रकर्षाने लक्षात येते आणि हे दोघे भौतिक दृष्ट्या दोन दिसले तरी प्रत्यक्षात एकच असावे असे वाटते.


===उल्लेखित नावे===
===उल्लेखित नावे===
श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते (आहेत) आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच म्हणावे लागेल. ते विदेही स्थितित वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जातात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जातात, असा सर्व भक्तांचा अनुभव आहे. सर्व भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करतात असा सर्व भक्तांचा अनुभव आहे. "गण गण गणात बोते," हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड ते जप करित. किंबहुना, त्यामुळेच त्यांना 'गिणगिणेबुवा' 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वर्‍हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे, "मना समजे नित्य | जीव हा ब्रह्मास सत्य | मानू नको तयाप्रत | निराळा त्या तोचि असे ||." ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.
श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते (आहेत) आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच म्हणावे लागेल. ते विदेही स्थितित वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जातात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जातात, असा सर्व भक्तांचा अनुभव आहे. सर्व भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करतात असा सर्व भक्तांचा अनुभव आहे. "गण गण गणात बोते," हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड ते जप करित. किंबहुना, त्यामुळेच त्यांना 'गिणगिणेबुवा' 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वऱ्हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे, "मना समजे नित्य | जीव हा ब्रह्मास सत्य | मानू नको तयाप्रत | निराळा त्या तोचि असे ||." ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.


===शरीरयष्टी===
===शरीरयष्टी===
सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्र विहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात यातून साकारते ती श्रीगजानन महाराजांची देह चर्या. लांब लांब पावले टाकीत सदान्‌कदा घाईघाईत धावल्या प्रमाणे भासणारी चाल गती, पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व तिला छापी (कपडा) गुंडाळलेली असे..<ref name="maharashtratimes.indiatimes.com">http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2821071.cms</ref>
सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात यातून साकारते ती श्रीगजानन महाराजांची देह चर्या. लांब लांब पावले टाकीत सदान्‌कदा घाईघाईत धावल्याप्रमाणे भासणारी चालगती, पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व तिला छापी (कपडा) गुंडाळलेली असे..<ref name="maharashtratimes.indiatimes.com">http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2821071.cms</ref>


===अन्नसेवन===
===अन्नसेवन===
ओळ १०८: ओळ १०८:
===नोंदी===
===नोंदी===
[[श्री गजानन विजय]] या ग्रंथामधे त्यांचे चरित्र [[दासगणू महाराज]] यांनी लिहून ठेवले आहे. हा ग्रंथ महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. त्याचे भक्तिभावाने पारायण केल्यास इच्छीत मनोरथ पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे.
[[श्री गजानन विजय]] या ग्रंथामधे त्यांचे चरित्र [[दासगणू महाराज]] यांनी लिहून ठेवले आहे. हा ग्रंथ महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. त्याचे भक्तिभावाने पारायण केल्यास इच्छीत मनोरथ पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे.

==साहित्य संमेलन==

संत गजानन महाराज साहित्य संघाच्यावतीने ’गजानन महाराज साहित्य संमेलन’ भरते.

*रिसोड येथे असे तिसरे गजानन महाराज साहित्य संमेलन १५ नोव्हेंबर २००९ रोजी भरले होते. अध्यक्षस्थानी डॉ. बलभीमराज गोरे होते.


===बाह्य दुवे===
===बाह्य दुवे===

१४:५५, ४ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

चित्र:Gajanan.png
गजानन महाराज

आधुनिक महाराष्ट्रातील एक संत.

महाराज कोण होते, कोठून आले?

श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण होते अशी एक वदंता होती. त्याचे कारण म्हणजे श्री बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने "आंध्रा योगुलु" नावाच्या पुस्तकात श्री महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे. परंतु २००४ साली प्रकाशित झालेल्या "श्री गजानन महाराज चरित्र कोश" ह्या श्री दासभार्गव नावाच्या लेखकाने (हे शेगावात राहणारे असून आठ वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनानंतर त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केले) लिहिलेल्या पुस्तकात ह्या वदंतेचे व्यवस्थित स्पष्टीकरण दिले आहे. इ.स. २००३ मध्ये ह्या लेखकाची मुलाखत १२९ वर्षे वयाच्या श्री शिवानंद सरस्वती नावाच्या सत्पुरुषाशी नाशिकक्षेत्री झाली. त्यावेळी श्री सरस्वतींनी त्यांना १८८७ साली अगदी तरुणपणी श्री महाराजांची आणि त्यांची नाशिकक्षेत्रीच भेट झाल्याचे सांगितले. हे सत्पुरुष मूळचे तमिळनाडूमधिल तिरुनेलवेल्लीहून आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी स्पष्ट केले की श्री महाराज जेव्हा शेगावी प्रकट झाले त्यानंतरही ते २५-३० वेळा महाराजांना भेटावयास गेले होते. प्रत्येक वेळी ते अमरावती येथील श्री खापर्डे ह्यांच्या घरी राहात. कालांतराने हे सत्पुरुष तपश्चर्येकरिता हिमालयात निघून गेले आणि त्यानंतर ते प्रदीर्घ काळी कोणासही दिसले नाहीत. ह्याच सत्पुरुषाचा उल्लेख श्री बा.ग. खापर्डे ह्यांनी "श्री गजानन विजय" ह्या प्रख्यात ग्रंथाच्या प्रस्तावनेत केला आहे. हा सर्व तपशील वर उल्लेखिलेल्या पुस्तकात पृष्ठ ३६२-३६५ वर वाचकांना वाचून पडताळून पहाता येईल. ह्यावरून एक गोष्ट मात्र निश्चित होते आणि ती म्हणजे की श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण नव्हते. परब्रह्म, परमात्म्याला कोणती जातगोत, कुलगोत्र, जन्मगाव, देशविदेश जोडता येते का? महाराज कोण होते, कोठून आले?. (कारण ते उत्तम प्रकारे वेदपठण करीत, तसेच त्यांना वेदश्रवणदेखील फार आवडे.) []. माघ वद्य ७ शके १८०० , २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगांव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले[] . त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे, "कोण हा कोठीचा काहीच कळेना | ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती | आलीसे प्रचिती बहुतांना ||"[] जसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्याने त्यांचे महत्त्व ओळखले. त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे, "दंड गर्दन पिळदार | भव्य छाती दृष्टी स्थिर | भृकुटी ठायी झाली असे ||." जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या (जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणजे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहजसमाधि असे म्हणतात) अवस्थेत होते. महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्याची बंकटलालला तत्काळ आणि मनोमन खात्री पटली. त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले. जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास, ह्या उक्तीप्रमाणे, "बंकटलालाचे घर | झाले असे पंढरपूर | लांबलांबूनीया दर्शनास येती | लोक ते पावती समाधान ||," बंकटलालाचे घर भक्तांनी दुमदुमून गेले. जरी पहिले काही महिने श्री गजानन महाराज बंकटलालाकडे राहिले तरीदेखिल सच्च्या परमहंस संन्याशाप्रमाणे काही कालानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून बदलून गावातील मारुतीच्या मंदिरात स्थिर केले. संत हे उपाधिरहित असल्याकारणाने गजानन महाराजदेखिल उपाधिपासून दूर राहण्याकरिता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात.

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि श्री गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे साम्य आढळते. दोघेही परमहंस सन्यासी होते, दोघेही अजानबाहू होते, दोघेही अत्यंत गूढ बोलत ज्याचा समोरच्यांना अर्थ कळत नसे. साधारणपणे गजानन महाराज स्वामी समर्थांच्या समाधी घेण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रगट झाले. या दोन महापुरुषांची भेट झाली असे अनेकांचे मत आहे. काहींच्या मते स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे गुरु असावेत. मात्र असे म्हणणे चुकीचे होईल, कारण श्री गजानन महाराजांची सर्व लक्षणे स्वामी समर्थांप्रमाणेच पूर्ण अवताराची आहेत, तसेच श्री गजानन महाराज हे योनी वाचून प्रगटले असण्याची शक्यता असल्यामूळे ते स्वंयसिध्द होते. कदाचित त्यांनी स्वामींची भेट घेतली असेल मात्र श्री स्वामी समर्थ त्यांचे गुरु नक्कीच नव्हते.

हरीभाऊ (स्वामिसुत), नाना रेखी (नाना इनामदार), दादाबुवा महाराज या स्वामींच्या शिष्यांनी "श्री स्वामी समर्थ" या नाम मंत्राचा प्रचार केला, मात्र गजानन महाराजांनी कधीच "श्री स्वामी समर्थ" या मंत्राचा जप केला नाही. यावरून ते स्वामी समर्थांचे शिष्य नव्हते असेच म्हणावे लागेल.

स्वामी समर्थांच्या भेटीस आलेल्या एका १८-१९ वर्षाच्या मुलास त्यांनी गणपती असे म्हटले आणि नंतर कपिलधारेला तपश्चर्या करण्यास पाठवले. जर ते गजानन महाराज होते असे गृहीत धरले तर १२ वर्षाच्या तपश्चर्येनंतर त्यांचे वय ३० व्हायला हवे होते मात्र गजानन महाराज प्रथम प्रगट झाले तेंव्हा त्यांचे वय १८ वर्षेच होते. त्यामुळे श्री स्वामी समर्थांनी गणपती म्हटलेला मुलगा निश्चितपणे श्री गजानन महाराज नव्हते.

श्री स्वामी समर्थांच्या शिष्यांनी स्वामींचे मठ स्थापून त्यांचा त्या त्या प्रांतात प्रचार केला, स्वत: स्वामी मात्र सर्वत्र फिरत असतानादेखील कधीच स्वत:चा प्रचार करीत नव्हते, त्याचप्रमाणे श्री गजानन महाराज देखील सदैव सर्वत्र फिरत असत मात्र त्यांनी स्वत:चा प्रचार कधीच केला नाही. दोघांचे चरित्र वाचल्यावर त्यांच्यातील साम्य प्रकर्षाने लक्षात येते आणि हे दोघे भौतिक दृष्ट्या दोन दिसले तरी प्रत्यक्षात एकच असावे असे वाटते.

उल्लेखित नावे

श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते (आहेत) आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच म्हणावे लागेल. ते विदेही स्थितित वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जातात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जातात, असा सर्व भक्तांचा अनुभव आहे. सर्व भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करतात असा सर्व भक्तांचा अनुभव आहे. "गण गण गणात बोते," हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड ते जप करित. किंबहुना, त्यामुळेच त्यांना 'गिणगिणेबुवा' 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वऱ्हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे, "मना समजे नित्य | जीव हा ब्रह्मास सत्य | मानू नको तयाप्रत | निराळा त्या तोचि असे ||." ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.

शरीरयष्टी

सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात यातून साकारते ती श्रीगजानन महाराजांची देह चर्या. लांब लांब पावले टाकीत सदान्‌कदा घाईघाईत धावल्याप्रमाणे भासणारी चालगती, पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व तिला छापी (कपडा) गुंडाळलेली असे..[]

अन्नसेवन

महाराजांची अशी मूर्ती लगबगीने एखाद्याच्या घरात घुसत असे किंवा अंगणात ओसरीवर मुक्काम ठोकीत असे. मग घरधन्याने भाकरतुकडा दिला तर खावे अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे, अशी त्यांची बालसुलभ वृत्ती होती.

महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा , हिरव्या मिरच्या , पिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन - चार दिवस उपाशी राहावे . भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने त्याचेही सेवन करावे. गरीबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणूनच आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वांनांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहोळातच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी, असे त्यांचे वर्तन असे.

मुळ्याच्या शेंगा , हिरव्या मिरच्या , पिठीसाखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात. मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहान लहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये ते गुंग होऊन जात . महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते . चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत,[]

भक्तगण

हरी पाटील, बंकटलाल आगरवाल, पितांबर, बाळाभाऊ प्रभू, बापुना काळे, भाऊसाहेब कवर, पुंडलीक भोकरे, बायजाबाई, भास्कर पाटील हे महाराजांचे काही श्रेष्ठ भक्त होते. बंकटलालाच्या घरून ते वेगाने निघून गेल्याने, बंकटलालाचे मन गुरुमहाराजांच्या भेटीकरिता तळमळू लागले. महाराज त्याला पुन्हा शिवमंदिराजवळ भेटले.

  • हरी पाटील - हरी पाटील हे महाराजांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि अंतरंगातील भक्त होते असे म्हणणेच सार्थ ठरेल; कारण महाराजांची गूढ भाषा केवळ त्यांनाच समजत असे. हरी पाटलांची भक्ती रांगडी होती, परिपूर्ण शुद्धता, पूर्ण समर्पण आणि अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रेमाने गाढ अशी ती भक्ती होती, तिथे दांभिकता आणि खोटेपणा ह्या गोष्टींना किंचितही थारा नव्हता. परंतु ह्या सर्व गोष्टी काही एका क्षणात घडल्या नाहीत. महाराज शेगांवात प्रकट झाल्यावेळी सर्वच पाटील बंधु अत्यंत मग्रूर आणि धनशक्तीने बेधुंद झालेले होते, सर्व प्रकारचे वैभव, धनसंपत्ती, गिरण्या पेढ्या व दुकाने असल्याकारणाने ते कोणालाही हवे ते बोलत आणि लोकही त्यांच्याशी शक्तीत तुल्यबळ नसल्याने सर्व गोष्टी शांतपणे सहन करीत. महाराजांचीही ते सर्वजण पुष्कळ चेष्टामस्करी व निंदानालस्ती करीत, परंतु महाराज अत्यंत कृपाळू असल्याने ह्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत. एकदा हरी पाटलांनी जेव्हा महाराजांना तालमीत येऊन स्वतःसोबत कुस्ती खेळण्याचे आवाहन केले त्यावेळी महाराज तालमीत जाऊन बसले आणि त्यांनी हरी पाटलाला त्यांना उठविण्यास सांगितले. नानाप्रकारचे पेच आणि सर्व ताकद वापरुनही जेव्हा हरी महाराजांना उठवू शकला नाही त्यावेळी त्याचा अहंकार नष्ट झाला आणि त्या दिवसापासून तो महाराजांना पूर्णपणे शरण गेला. जेव्हा महाराजांनी स्वतःच्या समाधीची जागा स्वतःच ठरविली त्यावेळी ते सर्व भक्तांना सोडून त्या जागी (ज्या जागेला त्यावेळी गाढवभुंकी असे म्हणत कारण त्या जागेवर कुंभारांची सर्व गाढवे चरण्यास जात असत) अचानक जाऊन बसले. भक्तांना काय करावे हे सुचेना व महाराज तर ती जागा सोडून येईनात. शेवटी त्यांनी हरी पाटलांना बोलावले. हरी पाटील जवळ जाऊन प्रेमळपणे महाराजांना म्हणाले, "महाराज, ही जागा अशुद्ध आहे, आपण मठात चलावे." त्यावर सदगुरु म्हणाले, "येथे राहील रे!" त्यावर हरी पाटलांना समजले की महाराजांनी स्वतःच्या समाधीकरिता ती जागा निवडली आहे. समाधी घेण्यापूर्वी महाराज एकदा हरी पाटलांना घेऊन पंढरपुरास गेले असता, त्यांनी स्वतःच स्वतःच्या समाधिदिनाबद्दल त्याला माहिती दिली. महाराजांच्या समाधिनंतर हरी पाटलांच्या दु:खाला पारावार राहिला नाही, म्हणूनच "श्री गजानन विजय" ह्या पोथीमध्ये छापलेल्या त्यांच्या फोटोमध्येसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर शोककळा दिसून येते. महाराजांच्या समाधिनंतर त्यांनी काही वर्षांतच म्हणजे १९१७ साली देह विसर्जित केला.
  • बाळाभाऊ प्रभु - महाराजांच्या आवडत्या भक्तगणांमधील एक. बाळापुरातील आत्माराम भिकाजी ह्यांचा भाचा म्हणजेच महाराजांचे परमभक्त श्री बाळाभाऊ प्रभु होत. "उपास्यापदी भाव उपासके ठेवावा" ह्या उक्तीप्रमाणे त्यांनी त्यांचे उपास्य दैवत म्हणून गजानन महाराजांचे चरणी पूर्ण श्रद्धाभाव अर्पण केला व ते मुंबई व तेथील त्यांच्या समस्त कुटुंबीयांना सोडून कायमचेच सद्‌गुरूंच्या चरणी सेवेस सादर झाले. स्वतः महाराजांनी त्यांचा भक्तिभाव शुद्ध असल्याचे शाबीत करून भास्कर पाटील ह्याचा संशय दूर केला आणि बाळाभाऊंना स्वत़:च्या अंतरंगातील एकनिष्ठ भक्ताची जागा दिली. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी स्वतः बाळाभाऊंचा हात धरून त्यांना स्वतःच्या गादीवर बसविले. महाराजांच्या समाधिनंतर, ज्या जागी बसून महाराजांनी संजीवन समाधि घेतली त्याच जागेवर बसून ते श्रीमद्भगवद्गीतेवर प्रवचने करीत असत, त्यावेळी देहभान हरपल्याने त्यांना देहावरील वस्त्राचेदेखिल भान राहात नसे. परंतु बाळाभाऊ हे महाराजांचे सच्चे भक्त असल्याकारणाने महाराजांच्या समाधीनंतर त्यांना ह्या भौतिक जगात आनंद वाटेना, त्यामुळे ते हळूहळू खंगू लागले आणि १९१२ साली त्यांनी कृश होऊन देह सोडला.
  • पितांबर - शेगांवीचाच रहिवासी असलेला पितांबर हा महाराजांचा अत्यंत प्रेमळ, भोळा आणि कपटरहित अशा मनाचा भाविक भक्त होता. बंकटलालाने सांगितलेल्या महाराजांच्या थोरवीवर त्याचा चट्कन विश्वास बसला. इथेच त्याच्या आध्यात्मिक प्रगतिची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर जुन्या शिवमंदिरात जेव्हा टाकळीकरांचे कीर्तन होते त्यावेळी अचानक महाराजांची भेट होऊन त्याचा विश्वास अधिकच गाढ झाला. महाराजांचे सदैव ध्यान आणि नामस्मरण ह्याची फलश्रुति म्हणूनच की काय एकदा महाराजांची त्याच्यावर कृपा झाली आणि परिणामी महाराजांनी त्यास पर्यटनाला जाण्यास सांगितले. त्यानंतर अकोलीच्या शिवारातील वठलेल्या आंब्याला जेव्हा पितांबराच्या सद्गुरुभक्तीच्या प्रभावाने सर्वांदेखत हिरवी पाने फुटली तेव्हा मात्र सर्वांना त्याच्या थोरवीचा प्रत्यय आला. अजूनही अकोलीत पितांबराचा मठ आहे आणि सद्गुरूंच्या कृपेने पल्लवित झालेला आंबा अजूनही तसाच हिरवागार असून त्यास इतर आंब्यांच्या झाडांपेक्षा जास्ती फळे येतात. पितांबराचा अंतदेखील अकोलीतच झाला. पितांबराच्या जीवनाचा आढावा घेता असे दिसून येते की सद्गुरूंची आज्ञा पालन करणे हेच त्याच्या श्रेष्ठ गुरुभक्तीचे मुख्य लक्षण होते.
  • श्रीधर गोविंद काळे - श्रीधर गोविंद काळे हे मॅट्रिकनंतर इंटरला नापास झाल्याने वर्तमानपत्रे वाचीत वेळ घालवीत असताना त्यांनी टोगो आणि यामा ह्या जपानी व्यक्तींच्या जीवनचरित्राविषयी वाचले. आपणही मायदेश सोडून विलायतेला जाऊन नाव आणि पैसा कमवावा असे त्यांना वाटू लागले. परंतु पैशाची व्यवस्था होईना त्यामुळे ते निराश झाले आणि कोल्हापूरला जाताना वाटेवर शेगांवला थांबून महाराजांना भेटायला गेले असताना सर्वज्ञ असलेल्या महाराजांनी त्यांचे मनोगत जाणले आणि परदेशी जाण्यापासून त्यांना परावृत्त केले. सरतेशेवटी महाराज त्याला म्हणाले, "कोठे न आता जाई येई|." त्यानंतर महाराजांच्या कृपेने त्याची उत्तम भौतिक प्रगति झाली. त्याचवेळी महाराजांनी त्यांना बहुमोल उपदेश दिला की अतिशय पुण्य केल्याखेरीज भारतात जन्म होत नाही आणि योगापेक्षा अध्यात्मविचार श्रेष्ठ आहे. महाराजांच्या आशीर्वादाने ते बी.ए.एम्.ए. झाले आणि त्यांना शिंद्यांच्या राज्यातील शिवपुरी कॉलेजमध्ये प्रिन्सिपालच्या जागी नेमले गेले.
  • त्र्यंबक उर्फ भाऊ कवर - त्र्यंबकला घरी भाऊ असे प्रेमाने म्हणत असत, परंतु ही गोष्ट फक्त जवळच्या माणसांव्यतिरिक्त अन्य कोणालाही माहिती नव्ह्ती. जेव्हा महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरली तेव्हा कवरला त्यांना भेटण्याची तीव्र तळमळ लागली. त्याप्रमाणे त्याने तीनवेळा शेगांवला भेटी दिल्या परंतु तिन्ही भेटींमध्ये सदगुरुमहाराजांनी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले; कवर मनोमनी दु:खी झाला. अखेरची एक भेट घ्यावी म्हणून कवर शेगांवला गेला आणि भक्तांच्या गर्दीत जाऊन बसला. थोड्या वेळात महाराज सरळ त्याच्याकडेच आले आणि म्हणाले, "काय भाऊ, एकटाच चिकण सुपारी खातोस होय? तुझ्या खिशातली सुपारी दे बरं मला थोडी!" कवराला आश्चर्याचा धक्काच बसला. ह्यांना माझे नाव कसे कळले, ह्यांना कसे कळले की माझ्या खिशात चिकण सुपारी आहे? ह्या घटनेतूनच भाऊ कवराला महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली आणि त्याची महाराजांवर असीम श्रद्धा जडली. त्या क्षणापासून् भाऊ कवर त्यांच्या श्रेष्ठ भक्तांपैकी एक झाला. तो त्यावेळी हैदराबादमध्ये डॉक्टरी शिकत होता. सुटीमध्ये घरी आला असता त्याला वाटले की महाराजांचे आवडीचे पदार्थ करून घेऊन त्यांना जेवण नेऊन द्यावे. त्याप्रमाणे त्याने भाकरी, अंबाडीची भाजी, हिरव्या मिरच्या, कांदे, लोणी असे पदार्थ बरोबर घेतले; पण तो स्टेशनवर येण्याअगोदर गाडी निघून गेली. कवराला अतोनात दु:ख झाले, गुरुमहाराज जेवून घेतील आणि आपण आणलेली शिदोरी वाया जाईल या विचाराने तो व्यथित होऊन स्टेशनवर तसाच बसून राहिला. परंतु भक्तवत्सल महाराज त्या दिवशी आलेले सर्व नैवेद्य बाजूला सारून तसेच उपाशी बसले होते. शेवटी जेव्हा कवर चार वाजता शेगांवच्या मठात आला, तेव्हा महाराज म्हणाले, "तुझ्या भाकेत गुंतलो | मी उपाशी राहिलो | आण तुझी शिदोरी||." त्यावेळी कवराला काय वाटले असेल ह्याची कल्पना एक भक्तच करू शकेल. इतर भक्त म्हणाले, "भाकरीवर गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे."
  • बापुना काळे - बापुना काळे हे पाटलांच्याकडे हिशेबनीस म्हणून काम बघत होत कारण ते आकडेमोड आणि तोंडी हिशोबात तरबेज होते. त्यांनी उपनिषदांचा अभ्यासही केलेला होता. जेव्हा महाराज बापुना काळे आणि अन्य भक्तांसोबत आषाढी एकादशीला पंढ‍रीला गेले तेव्हा स्नानाला गेलेल्या बापुनाला दर्शनाला जायला उशीर झाल्याकारणाने सबंध दिवसभर दर्शन मिळू शकले नाही. बापुनाचे विठ्ठलाकडे लागलेले मन, इतर भक्तांनी त्याची केलेली चेष्टा हे सर्व पहात असलेल्या महाराजांनी त्याला विठ्ठलाचे दर्शन करविले. बापुना खरोखर धन्य झाला. दासगणू म्हणतात, "संत आणि भगवंत | एकरूप साक्षात | गुळाच्या त्या गोडीप्रत | कैसे करावे निराळे?||." ह्या विठ्ठलदर्शनावे फळ म्हणूनच की काय बापुनाला एक मुलगा झाला त्याचे नाव त्याने नामदेव ठेवले. पुढे हा मुलगा प्रख्यात कीर्तनकार बनला. बापुना दररोज न चुकता एक शेर धान्य दान करीत. अशा ह्या महाराजांच्या थोर भक्ताने १९६४ला देह सोडला.[] मरणाच्या दारात असलेल्या कवठे बहादूरच्या वारकऱ्याला मरीच्या रोगापासून वाचविले. सोवळे ओवळे पाळणे, घडाघडा मंत्र म्हणून बराच वेळ देवपूजा करणे (एकंदरीत सांप्रदायिक कर्मकांडे करणे) म्हणजेच देवभक्ती करणे असे समजणाऱ्या एका कर्मठ ब्राह्मणाचा, एक प्रहरापूर्वी मेलेल्या कुत्र्याला केवळ स्वतःच्या पदस्पर्शाने त्याच्या समोर जिवंत करून, त्याचा कर्माभिमान गलित केला. दासगणू म्हणतात, "समर्थ साक्षात भगवंत | ऐसी प्रचिती आली तया ||."[]
  • श्रीमंत गोपाळराव बुटी - श्रीमंत गोपाळराव बुटी हे नागपूरचा कुबेर म्हणवून घेण्याइतपत धनवंत होते; तेही महाराजांचे भक्त होते. नागपुरच्या सिताबर्डी ह्या भागात त्यांचा ५२ खोल्यांचा आलिशान आणि भव्य असा वाडा होता. त्यांच्या श्रीमंतीविषयीच्या अनेक कथा सांगितल्या जातात. ते सावकारी करीत. त्यामुळे दर महिन्याला त्यांना व्याज अथवा मुद्दलरूपात मिळणाऱ्या धनाने भरलेल्या गोण्या लादलेल्या बैलगाड्यांची रांग त्यांच्या घरापासून कित्येक किलोमीटर दूरपर्यंत असे. अर्थात त्यांनी त्यांच्या पैशाचा संतसेवेकरिता योग्य असा विनियोग केला हेही तितकेच खरे आहे. त्यांच्या आग्रहामुळे महाराज १९०८ला नागपूरच्या सीताबर्डी भागात त्याच्या आलिशान वाड्यात त्याच्या भावनांचा मान राखण्याकरिता गेले. महाराज त्याच्या वैभवाला भुलून मुळीच गेले नव्हते, ते तर अनेक भक्तांचा उद्धार करण्याकरिता तेथे गेले होते. महाराजांना तो महालात कोंडून ठेऊ शकला नाही; महाराज नागपुरात सर्वत्र हिंडून लोकोद्धार करीत. शेवटी मनगटाच्या बळावर[ संदर्भ हवा ] हरी पाटलांनी त्यांना परत शेगांवी आणले.
  • धार कल्याणचे रंगनाथ महाराज - धार कल्याणचे रंगनाथ महाराज त्यांना भेटायला आले, परंतु त्यांचे सांकेतिक भाषण समजण्यास कोणीच समर्थ नव्ह्ता. या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे, "धार कल्याणचा साधु रंगनाथ|आला शेगावासी भेटावया|उभयतांमाजी ब्रह्मचर्चा झाली|ती ज्यांनी ऐकली तेच धन्य||." "श्रीवासूदेवानंद सरस्वती | जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती | ऐशा जगमान्य विभूती | आल्या आपल्या दर्शना ||,"[] असे दासगणूंनी सार्थच म्हंटले आहे. "तुम्हा दोघांचा मार्ग वेगळा असूनही तुम्ही दोघे भाऊ कसे?" ह्या बाळाभाऊच्या प्रश्नाला उत्तर देतानाच महाराजांनी 'ज्ञानाच्या गावी' जाण्याचे तीन मार्ग कोणते, त्या त्या मार्गांचे पालन कसे केले जाते आणि त्या मार्गाने जाऊन संतत्व प्राप्त केलेल्या आजवरच्या थोर विभूतींची नावे इत्यादि गोष्टींवर सुंदर आणि रसाळ विवेचन केले. सरतेशेवटी महाराज म्हणाले, "जो माझा असेल | त्याचेच काम होईल | इतरांची ना जरूर मला ||." महाराजांचे म्हणणे आहे की व्यर्थ धार्मिक वादविवादात पडू नका, ते म्हणतात, "कोणी काही म्हणोत | आपण असावे निवांत | तरीच भेटे जगन्नाथ | जगदगुरु जगदात्मा ||."
  • बायजा माळीण - मुंडगावच्या बायजा माळिणीचे लग्न एका नपुंसकाशी झाले होते, तिच्या थोरल्या दिराने तिला स्वतःच्या पापवासनेला बळी पाडायचे ठरविले.[ संदर्भ हवा ] परंतु सच्छील बायजाबाई त्याच्या वासनेला बळी पडली नाहीच उलट तिने महाराजांना सदगुरु मानून अखंड भक्तीत उर्वरीत आयुष्य घालविले. मुंडगावचाच आणखी एक परमभक्त, पुंडलीक भोकरे सोबत बायजा शेगावच्या वाऱ्या करू लागली, तेव्हा समाजकंटकांनी तिच्या चारित्र्यावर शंका घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्यावर आलेले चारित्र्यहननाचा बालंट दूर् करून महाराजांनी तिला, 'जशी नामदेवाची जनी, तशीच माझी बायजा' असे सांगून तिच्या भक्तीचा आणि पावित्र्याचा गौरव केला. तसेच महाराजांनी पुंडलिकाला सांगितले की बायजा ही त्याची पूर्वजन्मीची बहीण होती आणि त्याने तिला अंतर देऊ नये. महाराजांचे शब्द पुंडलिकाने अखेरपर्यंत पाळले. बायजाबाईच्या मृत्यूनंतर २८ वर्षांनी (म्हणजे १९६८ मध्ये) पुंडलिकाचे मुंबईत जरी निर्वाण झाले तरीदेखील त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार त्याची समाधी मुंडगावी बायजाबाईच्या समाधीजवळच बांधली आहे. जिच्या आयुष्याचे महाराजांनी सोने केले त्या बायजाबाईने १९४० मध्ये पुण्यदिनी देह ठेविला. आज मोठ्या आदराने तिचा "सती बायजाबाई" असा उल्लेख करतात.
  • बंकटलाल अगरवाल - पातुरकरांच्या घरामधील भेटीनंतर महाराज तेथून वेगाने निघून गेल्याने, बंकटलालाचे मन गुरुमहाराजांच्या भेटीकरिता तळमळू लागले. महाराज त्याला पुन्हा शिवमंदिराजवळ भेटले. तोवर बंकटलालाने वाटेमध्ये भेटलेल्या पितांबरासारख्या भोळ्याभाबड्या मित्राला महाराजांच्या थोरवीची कहाणी ऐकविल्याने तोही महाराजांना भेटावयाला उत्सुक आला होता. तो प्रसंग होता टाकळीकरांच्या कीर्तनाचा. भागवताच्या एकादश स्कंधातील ज्या श्लोकाचा पूर्वभाग कीर्तनकार बोलले त्याचा उत्तरार्ध महाराज दूर लिंबाच्या झाडाखाली बसून उच्चारते झाले; कीर्तनकारबुवा थक्कच झाले. त्यानंतर बंकटलाल मोठ्या सन्मानाने महाराजांना स्वगृही घेऊन गेला व त्यांना मोठ्या प्रेमादराने त्यांना तेथे ठेवून घेतले. परंतु महाराज स्वतः सच्चे परमहंस संन्यासी असल्याकारणाने काही कालावधीनंतर त्यांनी बंकटलालाचे घर सोडून दिले व ते गावातील मारुतीच्या मंदिरात विसावले. महाराजांच्या समाधीनंतर जेव्हा समाधीसमोर अनेक धार्मिक कार्यक्रम झाले त्यांत बंकटलालाच्या सुपुत्राने केलेला शतचंडीचे अनुष्ठान अथवा यज्ञ प्रख्यात झाला. त्या समयी बंकटलालाचा देहान्त होण्याचा प्रसंग उद्भवल्याने सर्वच चिंतीत झालेले पाहून बंकटलालाने सर्वांना सांगितले, "अरे, माझा तारक समाधीमध्ये बसला असताना तुम्ही कशाला काळजी करता!" त्यांच्या भक्तीनुसार त्यांच्या जिवावरचे संकट टळले आणि यज्ञसांग झाला. बंकटलालाचे सदन आजही शेगांवला पहावयास मिळते; सर्व भक्त्तांनी ते अवश्य जाऊन पहावे.
  • पुंडलिक भोकरे - महाराजांच्या भक्तरत्नांमध्ये श्री पुंडलीक भोकरेंचे नाव आवर्जून घेतले जाते. अतिशय लहान असतानाच पुंडलिकाला भक्तिचे बाळकडु पूर्वभाग्याने लाभले होते. आईवडिलांचा एकुलता एक असल्याने तो फारच लाडावलेला होता. एकदा लहानपणी एका सणाच्या दिवशी पुरणपोळीऐवजी त्याने तांदूळडाळीची खिचडी खाण्याचा आग्रह धरल्याने त्याला आईकडून मार मिळाला; त्याच तिरमिरीत तो काही वारकऱ्यांसोबत सरळ शेगावला निघून आला. वारकरी रांगेतून एकएक करून श्री महाराजांचे दर्शन घेत होते, जेव्हा पुंडलिकाची पाळी तेव्हा श्री महाराजांनी त्याला जवळ बसवून घेतले आणि साळूबाईला "गरम गरम खिचडी आणि तूप" आणायला सांगितले. त्याचक्षणी पुंडलिकाची त्याच्या सद्गुरुमाऊलिशी ओळख पटली. समोर बसलेल्या त्रिकालज्ञ देवाला पाहून भारावलेला पुंडलीक जन्मोजन्मींकरिता त्यांचा भक्त झाला. त्यानंतर त्याने वद्यपक्षात मुंडगाव ते शेगाव ही पायी वारी करण्याचा नियम केला आणि तो अविरतपणे पाळला. सद्गुरुमाऊलींनी त्याला स्वतःच्या पादुका दिलेली घटना सर्वांना विदितच आहे. त्यानंतरही आश्चर्यकारक घटना घडली ती अशी. झ्यामसिंगाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पुंडलिकाने स्वतः जवळच्या पादुका त्याच्या घरी ठेवण्याकरिता दिल्या; प्रतिवर्षी उत्सवामध्ये पादुकांची पालखी उचलण्याचा पहिला मान पुंडलिकाला दिला जात असे. परंतु, झ्यामसिंगाच्या मृत्युनंतर इतर भक्तांनी त्या पद्धतिस आक्षेप घेतला व पुंडलिकास तो मान दिला नाही. तेव्हा व्यथित झालेल्या पुंडलिकाने आमरण उपोषण आरंभले. त्याच्या आईला भयंकर चिंता वाटू लागली. सरतेशेवटी, मध्यरात्री धाङ्कन दरवाजा उघडला आणि आश्चर्य म्हणजे साक्षात श्री महाराज सरळ दरवाजातून आत प्रवेशले. ते म्हणाले, "वेड्या पादुका गेल्याचे दु:ख कशाला करतोस? मी तर प्रत्यक्ष तु़झ्या हृदयातच स्थित आहे," असे म्हणून ते त्याच्या छातीवर उभे राहिले आणि नंतर अंतर्धान पावले. ही गोष्ट श्री महाराजांनी समाधी घेतल्यानंतर कित्येक वर्षांनंतर घडलेली आहे. श्री महाराजांची कृपा झाल्याने पुंडलिकाला अंतर्ज्ञान प्राप्त झाले. त्यांच्या तोंडून बाहेर पडलेले कित्येक शब्द अक्षरश: खरे झाल्याच्या कितीतरी घटना मुंडगावच्या पंचक्रोशीतील लोक आजही सांगतात. श्री महाराजांनी त्यांना, "बायजा तुझी पूर्वजन्मिची बहिण असून, ह्या जन्मीही तू तिला अंतर देऊ नकोस," ही आज्ञा त्यांनी तंतोतंत पाळली. शेवटी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना औषधपाण्याकरिता मुंबईला जावे लागले. तेथेच त्यांचा मृत्यु झाला (सन १९६८). स्वतःच्या मृत्युची त्यांना पूर्वकल्पना असल्याकारणाने त्यांनी सती बायजाबाईच्या कुटुंबियांना मुंबईला जाण्यापूर्वी "अक्काजवळच थोडी जागा द्याल का?" अशी विनंती केली होती. त्यांच्या विनंतिला मान देवून त्यांचा पार्थीव देह मुंबईहून मुंडगावला वाजतगाजत आणला गेला. सती बायजाबाईंच्या समाधिशेजारीच तिच्या लाडक्या धाकट्या भावाची समाधिदेखिल बांधली गेली.

भक्तिमार्ग

उपदेश

महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे व्यवस्थित सांगितले. त्यांनी गोविंदपंत टाकळीकर ह्या कीर्तनकारास उपदेश दिला की त्याने पोटभऱ्या कीर्तनकार होऊ नये.

अद्वैत आणि मंत्रदीक्षा

जेव्हा मुंडगावच्या भागीने भोळ्या पुंडलिकाला गजानन महाराजांनी त्याला कानमंत्र दिला नसल्याने ते योग्य सदगुरु नव्हेत असे सांगून् भ्रमित केले त्यावेळी गजानन महाराज त्याच्या स्वप्नात गेले आणि त्याला स्वतःच्या पादुका देऊन दुसऱ्या दिवशी पूजा करण्यास सांगितले. आश्चर्य हे की दुसऱ्या दिवशी महाराजांनी त्याला झ्यामसिंगाहस्ते पादुका पाठवून देऊन त्याला पथभ्रष्ट होऊ दिले नाही. महाराज हे अद्वैत सिध्दांतवादी असल्याने त्यांनी कोणालाही कधिच मंत्रदीक्षा दिल्याचा पुरावा नाही.

दांभिकतेचा तिरस्कार

गजानन महाराज हे ब्रह्मज्ञानी, महान योगी, भक्तवत्सल होते.[ संदर्भ हवा ] परंतु दांभिकतेचा मात्र त्यांना खरोखरच फार तिरस्कार होता. विठोबा घाटोळ नावाच्या त्यांच्या सेवेकऱ्याने जेव्हा महाराजांच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना घुमारे घालणे, अंगात आल्याचे नाटक करून फसविणे असे प्रकार सुरू केले तेव्हा महाराजांनी त्याला धरून काठीने चांगलेच बदडून काढले, जेणेकरून त्याने मठ कायमचाच सोडून् दिला. अखेर सदगुरूचे पाय लाभून देखील त्याच्या दुर्दैवाने [ अपूर्ण वाक्य] दूर झाले. असेच लाडकारंज्याचा लक्ष्मण घुडे ह्यास गजानन महाराजांनी पोटदुखीच्या मरणप्राय वेदनांपासून मुक्त केल्यानंतर त्याने श्रींना स्वतःच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले; तेथे जरी त्याने श्रींचे उत्तमपणे स्वागत केले तरी "सारी संपत्ती आपलीच आहे, मी देणारा कोण?" असे म्हणत असताच ताटात काही रुपयेदेखील ठेवले होते; त्याचे हे दांभिकपणाचे वागणे महाराजांना मुळीच आवडले नाही. त्यावेळी त्याची परीक्षा पहाण्याकरिता गजानन महाराजांना त्यास "तिजोरीचे दरवाजे फेकून दे!" असे म्हणताच घुडे चमकला आणि त्याला खूप आग्रह केल्यानंतर त्याने तिजोरीचा दरवाजा उघडला आणि स्वतःच त्याच्या उंबरठ्यावर जाऊन बसला आणि महाराजांना म्हणाला, "महाराज यावे | वाटेल ते घेऊन जावे ||" तेव्हा त्याचे ते दांभिक वर्तन पाहून महाराज तिथून उपाशी निघाले व म्हणाले, "माझे माझे म्हणशी भले | भोग आता त्याची फळे ||". श्री महाराज म्हणाले, "मी येथे येऊन तुला दुप्पट धनसंपत्ती देणार होतो, परंतु ते तुझ्या प्रारब्धात नाही." असे म्हणून श्री गजानन महाराज तिथून निघून गेले. त्यानंतर सहा महिन्यात लक्ष्मण घुडे कंगाल झाला आणि त्याच्यावर भीक मागण्याची पाळी आली.

लोकमान्य टिळकांच्या कैदेबद्दलची भविष्यवाणी

लोकमान्य टिळकांनीही त्यांची भेट घेतली होती. अकोल्यात शिवजयंतीसंदर्भात झालेल्या एका सभेला, टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते. लोकमान्य आणि अमरावतीचे दादासाहेब खापर्ड्यांसमवेत ते अकोल्यातील रामाच्या मंदिरात दर्शनालाही गेले होते.[] जेव्हा लोकमान्य टिळकांना कैद झाली त्यावेळी महाराजांनी कोल्हटकरांच्या हातून त्यांच्याकरिता भाकरीचा प्रसाद पाठविला आणि भविष्य वर्तवले की टिळकांना शिक्षा अटळ आहे, तसेच त्यांना खूप दूरही जावे लागेल, परंतु ते तुरुंगात मोठी कामगिरी करणार आहेत. महाराजांच्या भविष्यवाणीनुसार ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी 'गीतारहस्य' ही भगवदगीतेवर टीका लिहिली. "गीतेचा अर्थ कर्मपर| लावी बाळ गंगाधर| त्या टिळकांचा अधिकार| वानाया मी समर्थ नसे," अशा स्तुतिपर शब्दात दासगणूंनी टिळकांचा गौरव केला आहे.

विरक्ती

देवीदास पातुरकरांच्या अंगणात पक्वांनाचे ताट समोर आल्यावर महाराजांनी सर्व पदार्थ एकत्र करून खाल्ले, आणि दाखवून दिले की ज्याने ब्रह्मरसाची माधुरी चाखली आहे त्याला पक्वांनाची काय चव? ह्याच ठिकाणी महाराजांनी सांगितले की शुध्द ब्रह्म हे निर्गुण असते आणि त्याच्यापासूनच हे जग निर्माण झालेले आहे.

भक्तांकडून साग्रसंगीत षोडशोपचारे पूजा करून घ्यावी तर कधी आंघोळीशिवाय कित्येक दिवस राहावे , तर कधी गळ्यात पडणारे हारही भिरकावून द्यावे अशी बालोन्मतपिशाच्च वृत्ती .

महाराज हे शुध्द ब्रह्म होते, एक परमहंस संन्यासी होते. ज्याला ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान झालेले आहे, जेथे जीव-शिवाचे मिलन झालेले आहे अशा जीवनमुक्तांना देहाचे भान राहात नाही असे असताना तो देह कपड्यात गुंडाळण्याकडे लक्ष त‍री कुठे असणार? महाराज अशा पराकोटीचे जीवनमुक्त संत होते म्हणूनच ते बहुश: दिगंब‍र अवस्थेतच असत. नग्न राहतात अशा आरोपाखाली जेव्हा जठारसाहेबांनी त्यांना त्यांच्या दिगंबर अवस्थेबद्दल विचारताच महाराज म्हणाले, "तुला काय करणे यासी|चिलिम भरावी वेगेसी|नसत्या गोष्टीशी|महत्त्व न यावे निरर्थक||." महाराजांना कपड्याचे आकर्षण वा सोस असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही . कोणी अंगावर शाल पांघरली तर मनात असेल तोपर्यंत ठेवत नाहीतर ती फेकून देत असत . पादुका , पादत्राणे त्यांनी कधी वापरलीच नाहीत . बरेचसे भक्त विकत आणलेल्या पादुका महाराजांच्या पायाला लावत आणि मग घरी त्यांची स्थापना करीत . मात्र महाराजांच्या नित्य वापरातल्या वस्तूंमध्ये पादुका नव्हत्या . इतकंच काय त्यांना चिलीम ओढण्याचीही फारशी सवय नव्हती . क्वाचितच ते चिलीम ओढीत असत . पण ३२ वर्षांच्या कालखंडात त्यांनी फार कमीवेळा चिलिमीला स्पर्श केला .

भ्रमंती

आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगांवमध्ये व्यतीत केला असला तरीही कारणपरत्वे महाराजांची भ्रमंती अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव , रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे . उन्हापावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरश: धावावे लागे .

महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत . त्याचप्रमाणे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात . नाशिक येथील कुशावर्त तीर्थाजवळील निलांबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मागिरी पर्वतावरही ते आवर्जून जात असत. ब्रह्मागिरी पर्वताची उंची छाती दडपून टाकणारी आहे . सर्वसामान्य माणसास तिथे जाण्यापूर्वी दहावेळा विचार करावा लागतो . शे-सव्वाशे वर्षांपूर्वी तर ही स्थाने फारच दुर्गम होती. महाराज मात्र हा संपूर्ण पर्वत चढून जात असत. ब्रह्मागिरी पर्वतावरील गहिनीनाथांची गुंफा आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराला महाराज आवर्जून भेट देत व तिथे काही क्षण घालवत. नाथसंप्रदायात नवनाथांनी जे चमत्कार केले त्यातलेच काही गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात केलेले दिसतात. []

अलौकिक शक्ती

चर्चा पानावर सुचवल्याप्रमाणे हा विभाग गजाननमहाराजांचे चमत्कार येथे नवीन लेखात स्थानांतरित केला.

समाधि

जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतारसमाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे, त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हणाले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविला[ संदर्भ हवा ]. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले, "आम्ही आहोत येथे स्थित | तुम्हा सांभाळण्याप्रति सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||" लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती. सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते. सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले. भक्तांना आकाश फाटल्यासारखे झाले, सर्वत्र दु:खाश्रूंचा पूर लोटला. त्यावेळी स्वतः श्री महाराजांनी त्यांच्या समाधीची वार्ता कित्येक भक्तांना स्वप्नात जाऊन कळविली.{POV}

त्याचवेळी डोणगावच्या गोविंद शास्त्रींनी निर्वाळा दिला की जोपर्यंत महाराजांचे सर्व भक्त दर्शन घेऊन जात नाही तोपर्यंत महाराज त्यांचे प्राण मस्तकी धारण करतील. महाराजांच्या समाधीचा सोहळा हा अवर्णनीय असा झाला. लाखोंच्या गणनेने भक्त समाधीच्या मिरवणुकीत भागीदार झाले. लोकांनी शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या पुण्यमय देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून फिरुन पहाटे ती मंदिरात आली; तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला.

त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा, अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला, "जय गजानना |ज्ञानांबरीच्या नारायणा | अविनाशरुपा आनंदघना | परात्परा जगत्पते ||," आणि शिळा लावून समाधिची जागा बंद केली. त्यानंतर दासगणूंनी म्हंटले आहे की सार्वभौम राजाचाही त्यांच्यापुढे पाड नाही. {POV} त्यांचे विश्वप्रेम, बंधुत्व आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणे तसेच अतर्क्य असे चमत्कार करून त्यांना संकटातून सोडवून, त्यांच्या चुका त्यांच्या पदरात घालून अत्यंत प्रेमाने त्यांना मोक्षमार्गावर घेऊन जाण्याच्या लीला पहाताच सर्वच भक्त धन्यतेने नतमस्तक होतात. आज गजानन महाराज आपल्यात फक्त देहाने नाहीत, परंतु ते जगदाकार असल्याने ते नाहीत अशी जागाच अखिल ब्रह्मांडात नाही. म्हणूनच त्यांना "अनंतकोटी ब्रह्मांडनायाक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय!!!" असे प्रेमादराने संबोधले जाते. ज्या भक्तांना त्यांचे पुनीत चरणकमल लाभले ते खरोखरच धन्य होत. अशा सर्वच भक्तांच्या जीवननौका श्री महाराज भवसागराच्या पैलतीरी लावतील यात शंकाच नाही. अशा सदगुरुंविषयी परमपूज्य श्री कलावतीदेवी ह्यांनी स्वतः लिहिलेल्या 'गुरुस्तुति'मध्ये सांगितले आहे, "अगा! निर्गुणा, निश्चला, सच्चिदानंदा | अगा! निर्मला, केवला आनंदकंदा || स्थिरचररुपी नटसी जगी या | नमस्कार माझा तुला गुरुराया ||१|| अगा! अलक्षा, अनामा, अरूपा | अगा! निर्विकारा, अद्वया, ज्ञानरुपा || कृपाकरोनी अक्षयपद दे दासा या | नमस्कार माझा तुला गुरुराया ||२||" सदगुरूच्या स्वरूपाचे खरे वर्णन ह्या ओळींमध्ये सामावलेले आहे, गजानन महाराजांना हे वर्णन किती चपखल बसते आहे हे तर सर्वांना विदितच आहे.{POV}

त्यांनी अनेक लोकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. ते एक परमहंस संन्यासी तसेच उच्च कोटीचे विदेही संत होते. आज शेगावात त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या असंख्य भक्तजनांना पाहून ह्या गोष्टीची नक्कीच खात्री पटते.

०८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली आणि त्यांचे समस्त भक्तगण दु:खसागरात बुडाले.

अंतिम संदेश

देहत्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले, "मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करू नका | कदा मजलागी विसरु नका | मी आहे येथेच ||." याव‍रून महाराजांचे भक्तांवरील अपरंपार प्रेमच दिसून येते. महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे वचन दिले आहे; ते समाधि घेण्यापूर्वी म्हणाले, "दु:ख न करावे यत्किंचित | आम्ही आहोत येथेच | तुम्हा सांभाळण्यापरी सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||." देह त्यागून महाराज ब्रह्मीभूत झाल्याकारणाने ते आता जगदाकार झाले आहेत. त्यायामुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे.

/ {POV}

श्री गजानन महाराजांच्या पश्चात

संत गजानन महाराज समाधी सोहळा २०१० मध्ये साजरा होणार आहे.[]. १९६७ पासून् श्री गजानन महाराज पालखी माध्यमातून श्री गजानन महाराज खेड्या पाड्यापर्यंत पोहोचले[] श्री विठ्ठलाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते.देहू ,आळंदीनंतर याच पालखीला सर्वाधिक महत्त्व आहे. शेगावची पालखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालखीसोबत विदर्भ , खानदेश , मराठवाड्याचे असंख्य वारकरी वारीला निघतात. यावर्षीही हे वारकरी परंपरेनुसार , नामस्मरण करत भगव्या पताका खांद्यावर घेऊन वारीमध्ये सहभागी होतात.पालखी अश्व , गज , अंबारीसह निघते []

मंदिरे

महाराष्ट्रात सर्वत्र गजानन महाराजांची मंदिरे स्थापन झालेली आहेत.

श्री गजानन महाराजांचे मंदिर, ओंकारेश्वर

श्री गजानन महाराज संस्थान मठ

महाराजांची कीर्ती वाढत गेल्यानंतर त्यांनी स्वतःच आपल्या शिष्यांना ट्रस्ट स्थापन करायला सांगितला. त्यानंतर मग गजानन महाराज संस्थान या नावाने १९०८ मध्ये ट्रस्ट स्थापन झाला.[].शेगावात नवीन मठ स्थापित झाला आणि महाराजांच्या श्रेष्ठतेचे आणि संतत्वाचा महिमा सर्वदूर पसरला. भौतिक आणि आध्यात्मिक ग‍रजा पूर्ण क‍रुन घेण्याकरिता लोक शेगावला अमाप गर्दी करू लागले. महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, सेंट्रल रेल्वेच्या मुंबई-नागपूर मार्गावर आहे. गीतांजली एक्सप्रेस सोडून इतर सर्व रेल्वेगाड्या येथे थांबतात. स्टेशनच्या बाहेरून मंदिरापर्यंत पायी गेल्यास फक्त १५ मिनिटांचा रस्ता आहे. स्टेशनपासून मंदिरापर्यंत येण्या-जाण्यास मोफत बससेवा उपलब्ध आहे. महाराष्ट्रातून येथे १७२ बसेस येतात. त्या व्यतिरिक्त देवास-उज्जैन, पैठण, पंढरपूर या स्थानकांहूनही बसेस चालतात. श्री गजानन महाराजांचे मंदिर शहराच्या मधोमध आहे. मंदिराच्या महाद्वाराच्या खिडक्या रात्रभर उघड्याच असतात. श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत आहे. मंदिर परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असते. रोज सकाळी पाच वाजेपासून रात्री ९.३० पर्यंत पूजा-अर्चना विधिवत चालते. काकड आरती ते शयन आरतीपर्यंत नियमित रूपाने विविध कार्यक्रम चालतात.

संदर्भ

  1. ^ a b c d e लोक त्यांना अजन्मा अथवा अयोनिसंभवा असेसुद्धा म्हणतात[ संदर्भ हवा ]. श्री गजानन विजय या ग्रंथामधे त्यांचे चरित्र दासगणू महाराज यांनी लिहून ठेवले आहे.
  2. ^ http://neelkant.wordpress.com/
  3. ^ a b http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2821071.cms
  4. ^ .http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2821071.cms
  5. ^ a b http://ajayguruji.blogspot.com/2009/02/blog-post_15.html
  6. ^ http://beta.esakal.com/2009/03/16232106/vidarbha-nagpur-shevgaon-devel.html
  7. ^ http://www.loksatta.com/daily/20070209/nv08.htm
  8. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3096110.cms

नोंदी

श्री गजानन विजय या ग्रंथामधे त्यांचे चरित्र दासगणू महाराज यांनी लिहून ठेवले आहे. हा ग्रंथ महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. त्याचे भक्तिभावाने पारायण केल्यास इच्छीत मनोरथ पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे.

साहित्य संमेलन

संत गजानन महाराज साहित्य संघाच्यावतीने ’गजानन महाराज साहित्य संमेलन’ भरते.

  • रिसोड येथे असे तिसरे गजानन महाराज साहित्य संमेलन १५ नोव्हेंबर २००९ रोजी भरले होते. अध्यक्षस्थानी डॉ. बलभीमराज गोरे होते.

बाह्य दुवे

चित्र:Shree Sant Gajanan Maharaj.png
गजानन महाराज

गजानन महाराजांचे भक्तिगीत[ संदर्भ हवा ]

ǁजीवनात खूप काही करण्याजोग असतंǁ संकटाला कधी कंटाळायच नसतं आपलं चांगलं काम रेटायच असतं अपयशाने कधी खचायचं नसतं कुणी नावं ठेवली तरी थाबांयच नसतं जिद्दिचं बल वाढवायच असतं नाराज मुळीच व्हायचं नसतं चैतन्य सदा फुलवायच असतं पाय ओढल म्हणून परतायच नसतं आपलं सामथ्र्यं दाखवायचं असतं जीवनात खूप काही करण्याजोगं असतं आपलं फक्त त्याकडे लक्ष नसतं