निर्गुण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

परमार्थ क्षेत्रात भक्तीचे सगुण व निर्गुण असे दोन प्रकार मानले जातात. त्यात सगुण म्हणजे हात, पाय, कान नाक, डोळे, मन (देह) आहे असे गुण असलेला साकार देव तो सगुण. या प्रकारच्या देवाजी पूजा-भक्ती करणे सामान्य माणसांना सहज जमते. केवळ प्रकाशमान आणि दिव्य अशा निराकार अवयवरहित शक्तीला निर्गुण म्हणतात. अशा निर्गुण देवाची आराधना करणे ही सामान्य भक्तीची पुढील पायरी समजली जाते.

इस्लाम धर्मातील अल्ला आणि ख्रिश्चन धर्मातील गॉड हे निर्गुण देव आहेत. यांच्या मूर्ती नसतात.