अभिषेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
New Mayapur - 30.jpg

एखाद्या गोष्टी अथवा व्यक्तीच्या आदरार्थ, सन्मानार्थ, स्मरणार्थ, अथवा एखाद्या मनोकामने बद्दल इच्छापुर्ती झाली आहे अथवा व्हावी म्हणून, अथवा समाधान आणि मागंल्याचे प्रतीक म्हणून, मूर्तीपूजेतील प्राणप्रतिष्ठा विधीच्यावेळी अथवा एखाद्या विशीष्ट गोष्टीच्या आरंभ करण्यासाठी मांगल्य पूर्वक केल्या जाणाऱ्या विशीष्ट विधींना अभिषेक असे म्हणतात. विशिष्ट देवतेचे स्त्रोत्र मंत्र म्हणत असताना देवतेच्या मूर्तीवर अथवा प्रतिकावर दूध, उसाचा रस किंवा पाण्याची संततधार धरणे, याला अभिषेक पूजा असे म्हणतात. सामान्यत: पाण्याची संततधार धरली जाते. त्यासाठी अभिषेक पात्र्/गळती लावली जाते. शंकराच्या मंदिरात गळती लावलेली असते. वसंत ऋतुत्/चैत्रात आंब्याच्या रसाचा अभिषेक देखील करतात.[१] अभिषेक पूजेत षोडशोपचारांचा समावेश असतो. अभिषेक पूजा पद्धतींचा वापर हिंदू, जैन, बौद्ध धर्मांमध्ये दिसून येतो. एखाद्या गोष्टीचा आरंभ करताना समकक्ष आरंभ विधी इतरही धर्मांमध्ये दिसून येतात. राज्याभिषेक हे एक समकक्ष आरंभ विधीचे उदाहरण आहे.

विविध ऐहिक अथवा पारमार्थिक कामना मनात धरून तसे संकल्प करून अभिषेक पूजा करता येतात. यामध्ये स्वास्थ्यलाभ , नोकरीसंबंधित बाबी , लग्न जुळणेसाठी ,तसेच बाधा निवारण इत्यादि अनेक उद्दिष्टे मनात धरून अभिषेक पूजा केल्या जातात.[२]

व्युत्पत्ती[संपादन]

'अभि' या उपसर्गाची सिञ्च् धातुशी सन्धि होऊन अभिषेक शब्द तयार होतो. [ दुजोरा हवा]

इतिहास आणि प्राचीन साहित्यातील उल्लेख[संपादन]

मुर्तीपूजा अभिषेकांचे प्रकार[संपादन]

35 big.jpg

केतकर ज्ञानकोशानुसार प्रतिष्ठेच्या वेळीं सणावारीं, प्रसंगविशेषीं किंवा नित्य मूर्त्यभिषेक करण्याची भारतांतील हिंदूलोकात व नेपाळांतील बौद्धलोकात पद्धत आहे. त्याविषयीं पूजाविधि, प्रतिष्ठाविधि या ग्रंथांत नियम दिले आहेत. यापूर्वीचे उल्लेख हर्षचरितात सांपडतात. या विधीत योजण्यांत येत असलेलें मुख्य द्रव्य म्हणजे दूध ; पण निरनिराळ्या ठिकाणचें पाणी, गोमय, वारुळाची मृत्तिका इत्यादि दुसरे अनेक पदार्थहि यांत योजतात.[३] अभिषेक विधींची माहिती अग्निपुराणात येते.[ संदर्भ हवा ]

विशिष्ट देवतांसाठी विशिष्ट संख्येने स्त्रोत्रे म्हणून निरनिराळे अभिषेक करता येतात. अभिषेक करताना रुद्र - ११ वेळा, श्रीसूक्त - १६ वेळा, अथर्वशीर्ष - २१ वेळा म्हटले जातात.[४]. रुद्र मंत्र चे 11 पाठ करून दूध शिवपिंडी वर संततधार धरणे याला रुद्रएकादशिनी असे म्हणतात, तर याच संख्येत बदल करून लघुरूद्र, महारुद्र, अतिरुद्र वगैरे अभिषेक होतात, अर्थात महारुद्र, अतिरुद्र यामध्ये हवन याग समाविष्ट आहे. तसेच श्री गणेश अथर्वशीर्षाचे एकदा पठन करून दुधाची संततधार धरल्यास अभिषेक , 21 वेळा केल्यास एकादशिनी व 1000 वेळा केल्यास सहस्रावर्तन असे म्हणतात.[५] अशाच पद्धतीने देवीसाठी श्रीसूक्त (१६ वेळा), सूर्यासाठी सौरसूक्त , विष्णुसाठी पवमान पंचसूक्त किंवा पुरुषसूक्त अशी स्त्रोत्रे वापरतात. पवमानाचा अभिषेक गोकुळाष्टमीला कृष्णजन्माची पूजा करताना पण करतात. विष्णु सहत्रनाम आणि पवमानाचा अभिषेक झाला की मग कृष्णजन्माची आरती होते.[६]

शिवमंदिरात रूद्राभिषेक सोमवारी /महाशिवरात्र / प्रदोष / श्रावणी सोमवार इत्यादी दिवशी. गणपती मंदिरात एकादशिनी संकष्टी चतुर्थी / माघी गणेश जयंती अथवा भाद्रपद गणेशोत्सवाच्या वेळी घरोघरी केले जातात.

देवीवर श्रीसूक्ताने अभिषेक शक्यतो नवरात्रात केले जातात. विष्णु /लक्ष्मीकांत /लक्ष्मीकेशव /विठ्ठल /व्यंकटेश बालाजी यांच्यावर पवमान पंचसूक्त अभिषेक आषाढी व कार्तिकी एकादशी दिवशी ,तसेच वैकुंठ चतुर्दशी ला अभिषेक केले जातात . रुद्रसूक्त हे शंकराखेरीज हनुमान तसेच दत्तसांप्रदायातील अवतारी महात्म्यांच्या समाधी /पादुकांच्या वर अभिषेकप्रसंगी देखील केले जातात. दत्त तसेच दत्तावतारांसाठी रुद्र आणि पवमान,पुरुषसुक्त दोन्ही म्हटले जाते.[७]

याखेरीज अनेक मंदिरात अथवा घरीदेखील असे अभिषेक अन्य दिवशीदेखील यजमानाच्या इच्छेनुसार पुरोहिताच्या मदतीने करता येतात .

शंकराचे विविध संख्यावाचक अभिषेक[संपादन]

  • रुद्र एकादशिनी अभिषेक :- (रुद्र - संख्या) - ११ आवर्तने[८]
  • लघुरुद्र अभिषेक :- (११ एकादशिनी) -१२१ आवर्तने
  • महारुद्र अभिषेक:- (११लघुरुद्र) - १३३१ आवर्तने
  • अतिरुद्र अभिषेक :- (११ महारुद्र) - १४६४१ आवर्तने

जैन धर्मातील अभिषेक[संपादन]

बाहुबलीच्या मुर्तीला दर बारा वर्षांनी महामस्तकाभिषेक करतात.[९]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]