Raj0102 हा सदस्य संतोष गोरे या सदस्याला त्याच्या पोस्ट एडिट न करण्याविषयी धमकीयुक्त भाषा वापरत आहे. पण दुर्दैवाने विकिची पायाभरणीच एकमेकांच्या पोस्ट एडिट करण्याच्या कल्पनेतून झालेली असल्यामुळे अशा धमक्यांचा काहीही फायदा होणारा नाही. ह्या युजरला तात्पुरते ब्लॉक करणे माझ्या मते गरजेचे आहे. Shantanuo (चर्चा) १३:४७, ४ डिसेंबर २०२१ (IST)[reply]
Shantanuo आपल्या सावध भूमिकेबद्दल धन्यवाद. विकिपीडियावर असेच सर्वांनी सावध असायला हवे, जेणेकरून कोणत्याही सदस्यास जर कुणी चुकीच्या पद्धतीने त्रास देत असेल तर इतरांनी यात लक्ष घातल्यास सक्रिय सदस्यांची निश्चितच संख्या वाढेल. असो.
मी मुद्दामच त्या सदस्याकडे दुर्लक्ष केले.. आणि त्याचा परिणाम चांगला झाला, तो सदस्य काहीवेळात गप्प बसला. दुर्लक्ष करण्याचे मुख्य कारण म्हणजे, तो निष्क्रिय सदस्य आहे. तो कुठेही संपादने करत नाही. जर सक्रिय असता तर त्याचा उपद्व्याप वाढण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आपण सक्रिय सदस्यांना पहिले सूचना देतो, नाही ऐकले की अजून एक दोन सूचना किंवा ताकीद देणे आवश्यक असते, आणि यानंतर ही जर उपद्व्याप थांबले नाहीत तर मग कारवाईची विनंती करतो. बरोबर ना... - संतोष गोरे ( 💬 ) १६:३०, ४ डिसेंबर २०२१ (IST)[reply]
@Shantanuo:, ही बाब लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. संबंधित सदस्याला संदेश दिलेला आहे. पुन्हा अशी संपादने आढळल्यास येथे किंवा थेट मला संदेश द्यावा.
@संतोष गोरे:, या खोडसाळपणाकडे दुर्लक्ष करणे हा आपला मोठेपणा आहे परंतु याची नोंद द्यावी म्हणजे सतत असा व्यत्यय आणणाऱ्या कृतींची दखल घेता येईल.
KiranBOT हे सांगकाम्या (Bot) खाते आहे. त्याला बॉटफ्लॅग दिल्यावर त्याचे बदल अलीकडील बदल मध्ये दिसणार नाहीत. परंतु सध्याच तयार झाल्यामुळे हा फ्लॅग अजून देण्यात आलेला नाही. आपण सहसा १४ दिवस थांबतो परंतु या खात्यासाठी अपवाद करता येईल. त्यासाठी सूचना देत येथे आहे.
माझ्या मते असा अपवाद न करता १४ दिवस थांबण्याचा नियमच रद्द करावा. बॉट फ्लॅग देण्याचा किंवा काढून घेण्याचा निर्णय प्रचालकांकडून लगेच अमलात यायला हवा. निवडणुका / मतदान वगैरे गोष्टी महत्त्वाच्या असतात, पण कधी? जेव्हा सदस्यसंख्या मोठी असेल तेव्हा. लहान विकींनी त्वरित निर्णय घेणे आवश्यक असते. ज्यांना निर्णय पटणार नाही त्यांना इथे म्हणजे चावडीवर अपील करण्याची सोय आहेच. Shantanuo (चर्चा) १३:३८, ७ डिसेंबर २०२१ (IST)[reply]
लवकरात लवकर botflag मिळावा अशी मीपण विनंती करतो. botflag मिळेपर्यंत मी bot account मधून काम थांबवतो. तोपर्यंत मी माझ्या खात्यातून bot साठी असणारी काही edits करतो.
इंग्रजी विकिपीडियावर botflag साठी वेगळी प्रक्रिया आहे. त्यामध्ये bot ची सर्वसाधारण कार्यप्रणाली विचारल्या जाते, व bot चालकाला तांत्रिक ज्ञान किती आहे ते बघितल्या जाते. ह्या नंतर ५० ते २०० एडिट्स ची चाचणी होते. ह्या दरम्यान कोणाला काही आक्षेप असेल तर त्यावर चर्चा केल्या जाते. सर्वकाही व्यवस्थित असेल तर ताबडतोब botflag मिळतो. तरीसुद्धा पूर्ण प्रक्रियेस कमीतकमी २ ते ३ दिवसांचा कालावधी लागतो. पण तिथे "waiting period"/थांबण्याचा कालावधी नाही. Shantanuoनी म्हटल्याप्रमाणे नंतर काही अडचण आल्यास चावडीवर आक्षेप/चर्चा करता येतेच. —usernamekiran (talk)२०:१६, ७ डिसेंबर २०२१ (IST)[reply]
अलीकडील बदल या विभागात मोठ्या प्रमाणावर यादी येत आहे ती चेक करणे संपादकांना झेपत नाही म्हणून एखाद्याने आपले काम स्थगित ठेवावे हा विरोधाभास झाला. इंग्रजी विकीवर तर एखाद्या मिनटात शेकडो पाने बदलत असतात. मोठ्या विकीशी तुलना होऊ शकत नाही याची मला कल्पना आहे. पण मोठे व्हायचेच नाही याची कल्पना नव्हती. Shantanuo (चर्चा) ०९:५४, ८ डिसेंबर २०२१ (IST)[reply]
होय, तुमचं म्हणणं काही अंशी बरोबर आहे. पण इंग्रजी विकिपीडियावर १२०+ प्रचालक, २०० च्या जवळपास द्रुत्मघारकार तसेच इतर काही अकाउंट आहेत जे सतत सक्रिय असतात.
आणि काल मराठी विकिपीडियावर बहुतेक कुणीतरी कुठेतरी कार्यशाळा आयोजित केली असावी, त्यामुळे संपदनांची रांग लागली होती. याकरिता मराठी विकिपीडियावरील सक्रिय सदस्य गाफील राहिले होते. याच बरोबर मराठी विकिपीडियावर कडक नियम नसून सुद्धा उत्पात मानावेत अशी संपादने वाढली होती. त्यामुळे काहीकाळ तरी येथील संपादने काटेकोरपणे तपासणे आवश्यक आहे असे मला वाटते. बाकी १४ दिवसांचा waiting period नसावा हेही तितकेच खरे आहे - संतोष गोरे ( 💬 ) १४:५९, ८ डिसेंबर २०२१ (IST)[reply]
?? असे का वाटले? आपले बरेच नियम, संकेत अनेक महिन्या, वर्षांपूर्वी केलेले होते. तेव्हा मराठी विकिपीडिया उदयोन्मुख होता. जरी तो आजही उदयोन्मुख असला तरीही आकार नक्कीच वाढला आहे (४-५ पट!). आपले नियम बदलता येत नाहीत असे मुळीच नाही परंतु त्यावर साधकबाधक चर्चा व्हावी ही अपेक्षा.
तुमच्या वरील संदेशाशी मी सहमत आहे आणि त्यानुसार मी बॉट विनंती पानावर संदेश दिला आहे. तेथे १-२ दिवस थांबण्याचे कारण "'प्रचालक मनमानी करतात अशी निरर्थक आवई उठू नये हे. असे पूर्वी अनेकदा झाल्याने ताकही फुंकुन पीत आहे :-)
असो. सध्या KiranBOT खात्यास बॉटफ्लॅग द्यावा व थांबण्याचा नियम काढण्याबद्दल चावडीवर प्रस्ताव घालावा असे सुचवतो.
नमस्कार, एक शंका होती, ती तुम्हाला विचारतो आहे. न्यूझीलंड की न्यू झीलॅंड या पैकी कोणता शब्द योग्य आहे? म्हणजे समजा न्यू झीलॅंड असा वापरला तर मग इंग्लंडचे पण इंग्लॅंड व्हायला पाहिजे. आयर्लंडचे आर्यलॅंड असायला पाहिजे. माझ्यामते न्यूझीलंड हा शब्द ठिक वाटतो. उच्चार करताना देखील आपण न्यूझीलंड म्हणतो, न्यू झीलॅंड नाही. आपला अभिप्राय कळवा. Aditya tamhankar (चर्चा) ७ फेब्रुवारी २०२२, ११:३४
@Aditya tamhankar: नमस्कार. New Zealand चे योग्य नाव "न्यू झीलंड" असे आहे. हे मला आधीच माहीत होते, पण त्यादिवशी गडबडीत मला लक्षात नाही आले. न्यू झीलंड चे इंग्रजी भाषेतील अधिकृत नाव "New Zealand" (मध्ये space) असे आहे. इतर उदाहरणे तुम्ही आधीच वर दिलेली आहेत. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. मी आत्ता लेख योग्य नावावर हलवतो, व इतर लेखातील नाव उद्या बरोबर करतो. —usernamekiran (talk)२२:२८, ७ फेब्रुवारी २०२२ (IST)[reply]
कृपया, न्यू झीलॅंड चे न्यू झीलंड हा बदल करण्या अगोदर प्रचालक तसेच चावडीवर बोलून घ्यावे. कारण १०० हून अधिक लेखांचे नाव न्यू झीलॅंड येथे स्थलांतरित केले गेले आहेत. Khirid Harshad (चर्चा) ००:१२, ८ फेब्रुवारी २०२२ (IST)[reply]
@Khirid Harshad: प्रतिसाद देण्यास उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्या पानावर १०० पेक्षा अधिक दुवे जोडलेले होते. पण ते दुवे मी AWB वापरून दुरुस्त केले :-) —usernamekiran (talk)२३:३२, १० फेब्रुवारी २०२२ (IST)[reply]
@Khirid Harshad आणि Aditya tamhankar: तुम्ही म्हटल्याप्रमाणे स्थानांतर व बदल करता येतील. पण त्याआधी क्रिकेट व देश संदर्भातील लेखांची वर्गवारी करायला हवी. त्यानंतर लेखांचे स्थानांतर करणे सोपे जाईल. देशांचे वर्ग मी हाताळू शकतो, पण क्रिकेट च्या वर्गांसाठी मला थोडीफार मदत/मार्गदर्शन लागेल. संदर्भासाठी तुम्ही इंग्रजी विकिपीडियावर हि category व वर्ग:क्रिकेट बघू शकता. आपण सध्या फक्त महत्वाच्या वर्गांपासून सुरुवात करू. जर काही दिवस इथे कोणी आक्षेप/विरोध नाही दर्शवला तर आपण काम सुरु करू. जर कोणाला काही सल्ला द्यायचा असेल, तर द्यावा हि विनंती. —usernamekiran (talk)०२:१३, १२ फेब्रुवारी २०२२ (IST)[reply]
Does Marathi Wikipedia want the Sandbox link enabled?
If there is consensus for enabling that on Marathi Wikipedia, I will do that as part of the global settings. But if Marathi Wikipedia does not want that, I can simply omit the Marathi Wikipedia from my proposal. No hard feelings at all :) I have personally not found Sandbox links harmful in any way, shape, or form. Thanks 4nn1l2 (चर्चा) ०८:३७, १९ फेब्रुवारी २०२२ (IST)[reply]
As a general guideline, w:mr strives to stay in sync with other wikimedia projects and to that end, I would expect that the w:mr community would want this enabled. I will let individual members express their opinions as well but unless there's any opposition, you may plan on enabling sandbox link for w:mr
जोडाक्षरात ल पूर्वपदावर असल्यास त्याचे 'ल्य' असे लिखाण न होता 'ल्य' असे होत आहे. विंडोज – क्रोम, फायफॉक्स दोन्हीत ही समस्या आली तर लिनक्स प्रणालीत ते जोडाक्षर योग्य दिसते. उदाहरण म्हणून हे चित्र पहा. हा टंकाचा विषय आहे हे उघड आहे, पण मला जर विंडोजमध्ये योग्य 'ल्य' हवा असेल तर काय करावे लागेल? Shantanuo (चर्चा) १०:५१, १३ मार्च २०२२ (IST)[reply]
ही समस्या खाली दिलेल्या विंडोज प्रणालीत दिसून आली.
Windows 10 Home Single Language
Windows server 2019
ही समस्या खाली दिलेल्या विंडोज प्रणालीत दिसून आली नाही.
windows 7 ultimate
विंडोज ७ अल्टिमेट किंवा लिनक्स वापरणे हा पर्याय आहे पण मला विचारायचे आहे की कल्याण हा शब्द फक्त मलाच कल्याण असा दिसतो आहे की असे बरेच लोक आहेत?
आय. पी. ऍड्रेस 157.35.1.213 वरून कोणीतरी स्वतःचा फोन नंबर दिलेला दिसतो. हा ऍड्रेस बिहारमधील असून तो कायमचा ब्लॉक केला तरी मराठी विकीला फारसा फरक पडणार नाही. एक/ दोन आय. पी. ऍड्रेस ब्लॉक करूनही उत्पात सुरुच राहीला तर पाने सुरक्षित करावीत असे मला वाटते. Shantanuo (चर्चा) ११:५१, १४ जून २०२२ (IST)[reply]
रुपी_कौर या लेखाला सुमारे २५ वर्ग जोडले गेले आहेत. “पंजाबी वंशाचे कॅनेडियन लोक”, “ब्रॅम्प्टनमधील लोक”, “वॉटरलू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी” अशा वर्गात आणखी किती लेख येणे अपेक्षित आहे? "चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला" अशी स्थिती आहे. वर्गांची संख्या अगदी मोजकी हवी आणि ते एकमेकांशी आतून जोडले गेलेले असावेत. Shantanuo (चर्चा) ०९:५३, ३१ मार्च २०२२ (IST)[reply]
वर्गांची योग्य वर्गवारी करून केवळ एकच योग्य वर्ग ठेवण्यात आला तर हे टळू शकते. उदा: "भारतीय कवयित्री > पंजाबी भाषेतील कवयित्री" व "भारतीय स्त्रीवादी > भारतीय स्त्रीवादी लेखिका" अशाप्रकारे वर्गांची रचना असल्यास वर्ग आपोआप कमी होतील. ह्या लेखाव्यतिरिक्त उदाहरण द्यायचे झाल्यास, "भारत > महाराष्ट्र > विदर्भ > यवतमाळ > वणी > वणीमधील कोळश्याच्या खाणी" अशी वर्गवारी असल्यास "कोळशाची खाण, वणी" ह्या लेखामध्ये केवळ "वणीमधील कोळश्याच्या खाणी" ह्या एका वर्गाची गरज असते, फार तर "वणी" हा वर्ग टाकता येऊ शकतो. भारत/महाराष्ट्र/विदर्भ ह्या वर्गांची गरज नाही. इंग्रजी विकिपीडियावर "over categorised", आणि "under categorised" अशे सुद्धा वर्ग आहेत. —usernamekiran (talk)१३:०१, ३१ मार्च २०२२ (IST)[reply]
बऱ्याच बाबतीत मार्गदर्शक तत्वे असण्याची गरज आहे, पण लेखांची एकूण संख्या, आणि ऍक्टिव्ह एडिटर्स कमी असल्यामुळे कधी कधी त्याची गरज नाही वाटत. मला वाटते जर जास्तच मार्गदर्शक तत्वे असतील, तर नवीन संपादक येण्याची शक्यता कमी होते. सध्या तरी मला फक्त विकिपीडिया:उल्लेखनीयता चे पालन व्हावे असे वाटते. PR कंपन्यांनी मराठी विकिपीडिया वर नुसता धुमाकूळ घातलाय. नवीन चित्रपट/मालिका येताच त्यावर लेख लिहितात. —usernamekiran (talk)१३:०१, ३१ मार्च २०२२ (IST)[reply]
Irawati_Karve या पानाचे पुनर्निर्देशन इरावती कर्वे या पानाकडे केले होते. ते काढू नये. कारण विकीसोर्सवरील tinyurl.com/irawatikarve या पानावरील नेव्हिगेशन बार वरून मराठी विकीवर येण्यासाठी हे बनविले होते. नेव्हिगेशन बारच्या लिंक्स आपोआप बनतात. त्या मराठीत लिहिता येत नाहीत. Shantanuo (चर्चा) १०:४८, १२ एप्रिल २०२२ (IST)[reply]
विकीसोर्सवरील साहित्यिक:इरावती_कर्वे या पानावरील "sister projects” विभागातील दुवा जर कोणी मराठी करू शकला तर मग विकीवर इंग्रजी पानाची आवश्यकता राहणार नाही. Iravati karve in EnglishShantanuo (चर्चा) ०९:११, १३ एप्रिल २०२२ (IST)[reply]
"जवळपासची गावे" या विभागात काही नावे दोनदा आलेली दिसतात. प्रत्येक नाव एकदाच (unique) ठेवून अकारविल्हे (sort) मांडणी करण्यासाठी खाली दिलेली जावा-स्क्रिप्ट सुविधा वापरली.
मोबाईलचे माहीत नाही. मी डेस्कटॉपवरून वापरतो. ती लिंक क्लिक-ड्रॅग करून ब्राऊजरच्या लिंक्स टूलबारवर आणून ठेवायची. मग पान संपादन करताना त्यावर क्लिक केली की त्यातील जावा-स्क्रिप्ट कोडमुळे दोन बाण दिसू लागतात. या चित्रात दाखविल्याप्रमाणे. अकारविल्हे (ascending) किंवा उलट (descending) सॉर्ट करता येतात गावांची नावे. Shantanuo (चर्चा) १६:०९, २९ एप्रिल २०२२ (IST)[reply]
उदाहरणार्थ "माळी" या लेखात नागपूरमध्ये आढळणारी आडनावे अशी दिली आहेत.
यात "चिमोटे", "वानखडे" दोनदा तर "हराळे" तिनदा आले आहे आणि ते "हजारे" या नावालगत यायला हवे होते. मी ही जावास्क्रीप्ट सुविधा वापरून अकारविल्हे असे लिहिले असते.
माझ्यामते प्रमाण लेखनात सुधारणा करण्यासाठी फक्त एकच बॉट वापरावा. उदा. सांगकाम्या या बॉटने केलेले दोन बदल (उदा. "सर्वोतम → सर्वोत्तम" किंवा "स्त्रोत → स्रोत") KiranBOT_II द्वारे करून घ्यावेत. तो बॉट चालवणाऱ्या किरण यांना यासाठी वेळ नसेल तर दुसऱ्या कुणीतरी ती स्क्रिप्ट कशी चालवायची ते शिकून घेणे आवश्यक आहे. जर त्यासाठी कुणी तयार नसेल तर विकिपीडियाचा आणखी प्रचार आणि प्रसार होईपर्यंत थांबावे लागेल! Shantanuo (चर्चा) ०९:५५, ३ जून २०२२ (IST)[reply]
असे का? जर शुद्धलेखन प्रमाणलेखनाप्रमाणे होत असेल तर कोणासही ते करण्यास हरकत नसावी परंतु आपली कारणे जाणून घेण्यास उत्सुक आहे.
किरण बॉटची स्क्रिप्ट रोज चालते. इतर बॉट चार सहा महिन्यातून एकदा चालतात. तोपर्यंत त्या चुका तशाच राहतात.
किरण बॉटमध्ये शब्दांचे विभाग पाडले आहेत. उदा. "योग्य रकार" "नियम x.x" ते समजायला सोपे पडते.
प्रोग्रॅम लिहून किरण बॉटच्या बदलांचा मागोवा घेता येतो. तसा इतर बॉटचा घेता येत नाही. उदाहरणार्थ खालील कमेंटमधील "म्युचुअल फंड" आणि (१२) याला काहीतरी विशेष अर्थ असेल जो फक्त त्या बॉटच्या कर्त्यालाच माहीत आहे. /* म्युचुअल फंड */शुद्धलेखन, replaced: स्त्रोत → स्रोत (12) using AWB पण त्यामुळे पायथॉन किंवा इतर भाषेत कोड लिहता येत नाही.
ज्यांना विकीपीडियातील बदल पहायचे आहेत पण शुद्धलेखनात इंटरेस्ट नाही, ते KiranBOT_II वगळून इतर सर्व बदल पाहू शकतात. तर ज्यांना फक्त शुद्धलेखन हा एकच विषय अभ्यासायचा असेल ते फक्त त्याच बॉटवर नजर ठेवू शकतात.
अनपेक्षित बदल तपासणे, बदलांच्या संख्येची नोंद ठेवणे, कोणते शब्द बदलले त्याचा बॅकअप ठेवणे वगैरे कारकुनी स्वरूपाची कामे एक दोन सदस्यांवर सोपविता येतात.
उत्तराबद्दल धन्यवाद. तुमची काही कारणे पटत असली तरी सगळी कारणे पटत नाहीत.
१, २ -- किरणबॉट रोज चालत असल्यास त्याद्वारे बदल करुन घेणे चांगलेच परंतु त्यासाठी इतरांना मज्जाव का करावे हे नाही कळले. जेव्हा चुका लक्षात येतात तेव्हा ते सुधारण्यास दोन-तीन मार्ग आहेत -- स्वतः हाताने बदल करणे, किरणबॉट, स्वतःचा बॉट. यांपैकी कोणताही मार्ग निवडल्यास निकाल एकच आहे -- सुधारलेले शुद्धलेखन. असे असता एकाच प्रकारे हे बदल व्हावेत असा आग्रह करू नये.
३ -- असा मागोवा घेतल्याने काय निष्पन्न होईल? तसेच हाच मागोवा इतरांनी केलेल्या बदलांवरही थोड्या प्रयत्नाने करता येईल. यात हाताने केलेले बदलही असावेत.
४ -- इतर बॉटद्वारे झालेले बदल किरणबॉटप्रमाणेच अलीकडील बदलमध्ये दिसत नाहीत. दोन बॉटमध्ये या बाबतील फरक काय असेल हे नाही कळले.
५ -- हे बरोबर असले तरी इतरांनी केलेले बदल पूर्णपणे कधीच रेग्युलेट करता येणार नाहीत कारण कोणीही येथे लेखन करावे असा आपला संकेत आहे.
तरी शुद्धलेखनाचे बदल शक्यतो किरणबॉटकडून करुन घ्यावे पण इतरांना मज्जाव करू नये असा संकेत असावा. यासाठी हे बदल करुन घेण्यासाठीची प्रक्रिया काय आहे हे लिहून ठेवल्यास त्याला अधिक प्रसिद्धी देउयात म्हणजे अधिकाधिक लोक किरणबॉट वापरण्यास प्रवृत्त होतील.
मला वरील एकूण चर्चा पूर्णपणे समजली नाही, पण जेवढी समजली त्यावर/त्यासंदर्भात मी काही विचार मांडू शकतो:
एखादेवेळेस माझी सक्रियता कमी-जास्त होऊ शकते, पण काही दिवसानंतर मी विकिपीडियावर रोजच सक्रिय असेल.
मी bot ह्या हेतूने बनवलाय कि यदा कदाचित भविष्यात जर माझी येथील सक्रियता कमी झाली किंवा पूर्णपणे थांबली तरी ह्या bot ची संपादने व शुद्धलेखन अवितरतपणे चालतील.
KiranBOT II पूर्णपणे स्वयंचलित आहे, व तो toolforge server वरून चालतो. समजा मी काही कारणांमुळे दोन महिने ऑनलाईन येऊ शकलो नाही तरी bot रोज ठरलेल्या वेळेवर त्याचं काम करेल.
AWB मधून संपादने करताना लेखांची यादी बनवणे थोडं त्रासदायक आहे, व एकावेळेस जास्तीत जास्त २५,००० पानांची यादी तयार होऊ शकते. यादी तयार झाल्यावर सुद्धा शुद्धलेखनाचे काम AWB पेक्षा KiranBOT द्वारे सोयीस्कर राहील. (AWB आपल्या संगणकावरून चालते, तर KiranBOT server वरून चालतो). आणि KiranBOT एकदा सुरु झाल्यास लेख नामविश्वातील जेवढी पाने आहेत तेवढी सगळी (आपोआप) वाचतो/संपादित करतो.
AWB मार्फत शुद्धलेखन करायचे असल्यास संपादकाचा वेळ व ताकद वाया जाते, आणि ते संपादन एकदाच व काही ठराविक पानांवरच होते. त्यापेक्षा बदल करायचे शब्द मला सांगितल्यास ते kiranbot च्या यादीत नेहेमीसाठीच राहतील व रोज त्याप्रमाणे बदल होत राहतील.
मराठी नसणाऱ्या एखाद्या शब्दाचे प्रमाण लेखन काय असावे हा थोडा अवघड विषय आहे (उदा: सोविएत/सोव्हिएत, एरलाईन/एअरलाईन). अशा साशंक शदांबद्दल चर्चा होऊन एकमत होणे गरजेचं आहे, नाहीतर एक bot एक शब्द, तर दुसरा bot वेगळा शब्द टाकेल.
सध्या KiranBOT च्या प्रत्येक edit summary मध्ये सदस्य:KiranBOT II/typos ला दुआ देण्यात आलेला आहे. मी तिथे लिहिलंय कि "जर तुम्हाला काही शब्द बदलायचे असतील तर त्याबद्दल सदस्य चर्चा:KiranBOT II/typos वर चर्चा करणे योग्य राहील." bot ची संपादने "अलीकडील बदल" मध्ये दिसत नाहीत, पण निरीक्षण सूचीमध्ये दिसतात. जर मला कोणी काही बदल सुचवले तर ते स्वागतार्हच आहे. —usernamekiran (talk)०१:१३, ५ जून २०२२ (IST)[reply]
Khirid_Harshad या सदस्याचे विशेष:योगदान पाहिले तर त्यावर This account is globally locked. अशी पाटी येत आहे. त्यांच्या चर्चापानावर त्यांनी नक्की काय उत्पात केला याचा उल्लेख नाही. माझा त्या सदस्याशी काही संबंध नाही पण नेमक्या कोणत्या कारणाने हद्दपारी झाली हे जाणून घ्यायचे आहे. Shantanuo (चर्चा) १२:१४, १२ जून २०२२ (IST)[reply]
@Shantanuo: कृपया हे पहा yeu aga maj, tejas parte आणि khirid harshad ह्या एकच व्यक्ती असल्याचे मागेच समजले होते. तसेच yeu aga maj हे खाते वैश्विक पातळीवर प्रतिबंधित असल्याचे देखील पूर्वीच दिसून आले होते. परंतु मराठी विकिपीडियावर khirid harshad या खात्याचे योगदान चांगले होते. त्यामुळे आपण त्यांना कधी प्रश्न केला नव्हता. परंतु आज हे खाते देखील वैश्विक पातळीवर प्रतिबंधित झाल्याचे समजले.- संतोष गोरे ( 💬 ) १३:४३, १२ जून २०२२ (IST)[reply]
तुम्ही दिलेला दुवा मी पाहिला. मला त्यांच्या स्वतःच्या किंवा त्यांच्या इतर अकाउंटमधून इंग्रजी विकीवर केलेला एकही उत्पात दिसला नाही. इंग्रजी विकीवर हजारो एडिटर्स आहेत. मराठी विकीवर गेल्या ३० दिवसात १० पेक्षा जास्त संपादनं करणारे (बॉट आणि संपादकांशिवाय) किती सदस्य आहेत? कोणत्याही चर्चेशिवाय, कसलीही पूर्वकल्पना न देता, लहान सहान कारणावरून सदस्यांना काढून टाकण्याची इंग्रजीसारखी चैन मराठीला परवडणार आहे का? ते जाऊ द्या. मी दुसरे उदाहरण देतो PradipsBhosale या सदस्याला फक्त दोन एडिटनंतर ग्लोबली बॅन केले गेले. "स्वातंत्र्य दिन (भारत)" आणि "रक्षाबंधन" या दोन लेखाखाली त्याच्या स्वतःच्या ब्लॉगची लिंक दिली हे खरे, पण ती पोस्ट रक्षाबंधन याच विषयावर होती हे लक्षात घेतले पाहिजे. लहान मूल एका दिवसात चालायला/ धावायला सुरुवात करत नाही. तसे नवीन सदस्य एका दिवसात तुमच्या विकीची नियमावली शिकत नाहीत. मी ९ डिसेंबरच्या पोस्टमध्ये याच चावडीवर "मोठे व्हायचेच नाही याची कल्पना नव्हती." असे म्हटले तर कोणीतरी "असे का वाटले?" असे विचारले. मराठी विकीला मोठे व्हायचे असेल तर सदस्यांना सांभाळून घेणे गरजेचे आहे. क्रियाशील सदस्य हीच विकीची खरी ताकद आहे. Shantanuo (चर्चा) १५:०८, १२ जून २०२२ (IST)[reply]
मेटावर काहीही प्रतिक्रिया दिली तरी ते प्रथम लोकल विकीवर याची चर्चा झाली आहे का? असे विचारतात. “हा ब्लॉक मराठी विकिपीडियाच्या प्रचालकांनी घातलेला नाही” या स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद. हा ब्लॉक प्रचालकांच्या (किंवा त्यांच्या प्रतिनिधीच्या अथवा मराठी विकीवरील सदस्याच्या) विनंतीवरून घालण्यात आला आहे का? की AmandaNP यांनी आपल्या फावल्या वेळेचा सदुपयोग करून अचानक निर्णय घेतला? Shantanuo (चर्चा) ०९:२८, १३ जून २०२२ (IST)[reply]
बरोबर आहे. हा ब्लॉक मराठी विकिपीडियावरील नसून, "ग्लोबल" आहे. म्हणजे ते खाते एकाच फटक्यात विकिमीडियाच्या १५०-२०० विकिपीडिया व इतर वेबसाइट्स वर ब्लॉक झाले आहे. AmandaNP ह्यांनी checkuser टूल वापरून user:Yeu aga maj व user:Khirid Harshad हे दोन्ही एकाच व्यक्तींचे खाते असल्याची खातरजमा केली आहे. खात्री असलेले इतर खाते en:Category:Wikipedia sockpuppets of Yeu aga maj तर संशयित en:Category:Suspected Wikipedia sockpuppets of Yeu aga maj इथे आहेत. इंग्रजी विकीपेडियावर TV मालिका, व त्यातील अभिनेत्यांचे लेख लिहण्यासाठी पैसे घेऊन संपादन करणाऱ्यांची संख्या खूप आहे. Khirid Harshad त्यातील एक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचे येथील बहुतांश संपादने चांगली असली, तरी काही संशयास्पद बाबी होत्या. त्या मला काही दिवसांपूर्वी लक्षात आल्या होत्या, पण मी माझा गैरसमज समजून दुर्लक्ष केले होते. —usernamekiran (talk)२१:३५, १२ जून २०२२ (IST)[reply]
एखाद्या धर्मादाय संस्थेने (किंवा कंपनीने/ व्यक्तीने) पैसे देऊन विकीवर काम करून घेतले तर अशा व्यक्तीला (पैसे घेणाऱ्या - देणाऱ्या नव्हे) १५०/ २०० विकीवरून कायमचे हद्दपार करावे असा संकेत मला विकीवर कुठे वाचायला मिळेल? समजा "झी मराठी” या कंपनीत काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीने त्याला माहीत असलेल्या विषयावर कंपनीच्या वेळेत किंवा संध्याकाळी / रात्री विकीचे सर्व नियम सांभाळून लिखाण केले तर त्याला तुमची हरकत आहे का? एखाद्या सदस्याबद्दल काही संशय असेल तर तो सदस्य ॲक्टीव्ह असतानाच चर्चा करायला हवी. तो सदस्य बॅन झाल्यावर तो आपली बाजू इथे मांडू शकणार नाही हे नक्की झाल्यावर संशय व्यक्त करणे नैतिकतेला धरून होत नाही. Shantanuo (चर्चा) १०:०२, १३ जून २०२२ (IST)[reply]
@Shantanuo:, कृपया आपण मेटा वर चर्चा सुरू करून आम्हाला देखील साद घालावी. आपण तेथे हे नोंदवू शकतो की Khirid Harshad चा मराठी विकिपीडियावर कोणत्याही प्रकारचा उत्पात झालेला नाहीये, त्यामुळे त्यांच्या प्रतिबंधाची पातळी वैश्विक वरून केवळ इंग्रजी विकिपीडियासाठीची करावी. Khirid Harshad चे मराठी आणि इंग्रजी व्यतिरिक्त इतर विकिपीडियावर योगदान जवळपास नाहीये.- संतोष गोरे ( 💬 ) १२:१३, १३ जून २०२२ (IST)[reply]
संपादने कोणीही केली तरी त्यात आक्षेपार्ह्य काहीच नाही. माझे म्हणणे फक्त एवढेच आहे कि संपादने विकिपीडियाच्या धोरणास अनुसरून असावी, ती एकतर्फी किंवा छुप्या पद्धतीने प्रचारात्मक/जाहिरातबाजीची नसावीत. सध्या Khirid_Harshad चे मराठी विकिपीडियावरील प्रतिबंध उठवण्यासाठी Shantanu, व संतोष ह्यांचा होकार दिसतोय, माझासुद्धा आहे. मी आत्ता meta वर निर्बंध उठवण्याची विनंती करतो, व त्यानंतर आपल्याला Khirid_Harshad सोबत चर्चा करता येईल. —usernamekiran (talk)१५:००, १३ जून २०२२ (IST)[reply]
मी AmandaNP ला meta वर विनंती केली, व येथील चर्चेचा दुवा सुद्धा दिला. त्यांचे उत्तर आल्यावर मी इथे कळवेल. तिथे टिप्पणी करण्याची सध्यातरी गरज वाटत नाही. —usernamekiran (talk)१५:३६, १३ जून २०२२ (IST)[reply]
@Khirid Harshad: किरण यांनी केलेल्या प्रयत्नामुळे तुमच्यावरील ब्लॉक काढण्यात आला आहे. पण त्याचबरोबर तुम्ही "Desai Aditya", "Sweetu Appu Deepu", "Sidhu Shubh Shash" अशा वेगवेगळ्या नावांनी इंग्रजी विकीवर वावरत आहात असा आरोप मेटावरील संबंधित प्रचालकांनी केला आहे. एकाच नावाने (सर्व ठिकाणी) लॉग-इन करून तुम्हाला काम करायचे आहे. परत पकडले गेलात तर मी (आणि बहुधा इतर कुणीही) तुमचा कैवार घेणार नाही. Shantanuo (चर्चा) ०९:१९, १५ जून २०२२ (IST)[reply]
@Shantanuo: मी मराठी विकिपीडियावर Khirid Harshad याच नावाने संपादने करीत होतो. परंतु हे अकाऊंट ब्लॉक केल्यावर फक्त Desai Aditya याने संपादने केली होती. बाकीच्या दोन अकाऊंटचा उल्लेख केला आहे त्याने मी कधीच येथे संपादने केली नाहीत. तसेच इंग्रजी विकिपीडियावर माझी अकाऊंट ब्लॉक असल्यामुळे मी तेथे आता कोणत्याच अकाऊंटने संपादने करीत नाही फक्त मराठी विकिपीडियावर योगदान देत आहे. Khirid Harshad (चर्चा) ११:०७, १८ जून २०२२ (IST)[reply]
@Khirid Harshad:, कृपया आपले म्हणणे मांडावे. प्राथमिक दृष्ट्या तुम्ही चुकल्याने दिसत आहे.-संतोष गोरे ( 💬 )
@संतोष गोरे, अभय नातू, आणि Usernamekiran: माझ्याकडून लॉग आऊट संपादने झाली आहेत. परंतु ती मुद्दाम जाणीवपूर्वक किंवा नासधूस करावी म्हणून नाही. काही कारणे अशी
१) मी खात्यात लॉग इन केले त्यानंतर ते लॉग इन देखील झालेले दिसत होते म्हणून संपादने सुरु केल्यावर काही संपादनांनंतर अचानक खात्यातून लॉग आऊट झाल्याचे समजले तेही लॉग आऊट न करता आपोआप झाल्याचे आढळून आले.
२) काही वेळा लॉग इन करताना त्या बटणावर डबल क्लिक झाले की ते लॉग इन व्यवस्थित होत नाही आणि बॅक ऑप्शन वर क्लिक केले की लॉग इन दाखवतात परंतु संपादन केल्यावर लॉग आऊट संपादन आहे असे दिसून येते.
३) काही बाहेरच्या ठिकाणी गेल्यावर नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे लॉग इन प्रॉब्लेम येत होती म्हणून लॉग आऊट संपादने झाली आहेत.
मी अजून एक पाहिले सदस्य:QueerEcofeminist कायम इतर विकिपीडियावर प्रतिबंधित आहे म्हणून बाकीच्या विकिपीडियावर सुद्धा त्या सदस्यांना कायम ब्लॉक करण्याचा पवित्रा घेतात. प्रत्येक प्रतिबंधित व्यक्ती सर्वीकडे नासधूस करेलच असे नसते हे जणू त्यांना ठाऊकच नाही. तसेच द्रुतमाघारकार हे पद मला टायवेन यांनी स्वतःहून दिले. मी कोणत्याही पदासाठी नामांकन दिले नव्हते. मी इंग्लिश विकिपीडियावर अनेक खाती वापरली म्हणून प्रतिबंधित आहे म्हणून मराठी विकिपीडियावर कोणतेही पद घेऊन विकिपीडियाची नासधूस करत असेल असं त्यांना वाटत असेल तर हे पद माझ्याकडून काढून घेतले तरी चालेल, धन्यवाद. Khirid Harshad (चर्चा) १६:३७, ४ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]
Dear @AmandaNP with respect to your email to one of our admins this discussion has been started on Marathi Wikipedia. @Khirid Harshad has provided a valid reason up for their logged out edits. Its because of their technical glitches that they face while editing. They have never been indulged in Vandalism on this Wikipedia and because of their constructive edits on this Wikipedia I had granted them Rollback rights and they have never misused it. Wikipedia works on principles of Assuming Good faith and Khirad Harshad has not been indulged in any Vandalism on this wiki. There is a huge misrepresentation and targeted harassments on specific users which we have observed and we will take necessary actions as per wiki policies to make Marathi Wikipedia free from targeted harassments and take steps for educating local policies to users on this wiki. Also making wiki safe for all fellow volunteers. Tiven2240 (चर्चा) १४:२४, ५ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]
@Tiven2240 I was emailed first asking if I could check if they were still socking. I replied on October 8th that they were still logged out editing (in the count of hundreds upon hundreds of edits). I won't take any action based on this, but will leave it to this community. I'm just informing you that a large amount of edits can't be reviewed because this user is editing logged out in heavy numbers. AmandaNP (चर्चा) १९:०३, ५ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]
@संतोष गोरे, अभय नातू, आणि Tiven2240: AmandaNP ह्यांच्या म्हणण्यानुसार Khirid Harshad ह्यांचे logged out संपादने खूप जास्त आहेत. तसेच login नसताना संपादन करण्याचा प्रयत्न केला असता सावधानः तुम्ही विकिपीडियाचे सदस्य म्हणून प्रवेश (लॉग-इन) केलेला नाही. आपला सध्याचा सहभाग अंशतःच 'अनामिक' स्वरूपाचा राहतो, या पानाच्या संपादन इतिहासात तुमचा आय.पी. ऍड्रेस नोंदला जाईल.येथे टिचकी मारून अनामिक लेखकांकरिता उपलब्ध अधिक सहाय्याचा सुविधांचा लाभ घ्या. असा सावधानतेचा इशारा येतो. त्यामुळे Khirid ह्यांनी वर दिलेले उत्तर विश्वासार्ह्य वाटत नाही. माझी Khirid कडून केवळ एकच अपेक्षा होती/आहे कि त्यांनी एकच खाते वापरावे, आणि logged out संपादने करू नयेत. बाहेर ठिकाणी किंवा कोणत्याही कारणामुळे login नसल्यास संपादने करू नये. —usernamekiran (talk)१४:४०, ७ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]
माझ्या मते, प्रत्येक सदस्याची अडचण ही त्याची वैयक्तिक बाब आहे. सर्वप्रथम त्याला स्वतःला संबंधित अडचणीचा सामना करावयाचा असतो. माणुसकीच्या भावनेतून एखाद्या विशिष्ट परिस्थितीत आपण त्याला सहकार्याच्या भावनेतून मदत करावी. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण सतत त्याची साथ देत राहावी. Khirid Harshad हे पुढील अडचण सोडवतील अशी आशा बाळगूया. जर ते परत परत चुकत गेले तर मग आपण देखील यात असमर्थ ठरतो.-संतोष गोरे ( 💬 ) २१:१९, ७ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]
बाहेर ठिकाणी किंवा कोणत्याही कारणामुळे login नसल्यास संपादने करू नये.
ही अट घालणे वाजवी नाही. एखाद्या सदस्याला रिकामा/फावला वेळ मिळाल्यास तो कोणत्याही ठिकाणाहून मराठी विकिपीडियासाठी वापरला तर तो येथे उपयोगीच ठरेल. लॉग-इन केले तर उत्तमच. असे असताही या सदस्याकडून पूर्वी पानांची हलवाहलव झालेली आहे जी उपद्रवकारक ठरली. यामुळे यांनी लॉग्ड आउट असताना कोणत्याही प्रकारची हलवाहलवी करणे कटाक्षाने टाळावे. इतर छोटेमोठे बदल केल्यास हरकत नाही. असे त्याना माझे सूचनावजा विनंती आहे.
मराठी विकिपीडिया हा एक ज्ञानकोश आहे. सध्या मालिकेचे लेख निव्वळ टाइम-टेबल आणि जाहिराती झालेले आहेत. en:Template:Infobox_television#Parameters मध्ये "preceded_by" (आपल्या साच्यातील "आधी") ची माहिती दिली आहे: This parameter should not be used to indicate a program that preceded another in a television lineup (i.e. the 8pm show vs the 8:30pm show), or to indicate what show replaced another in a specific time slot (ex: Temperatures Rising held the 8pm time slot before being replaced by Happy Days).
थोडक्यात सांगायचे झाले तर ८ नंतर ८:३० चा कार्यक्रम असं टाकू नये, आणि ८ वाजताचा "अ" कार्यक्रम संपल्यानंतर त्याच्या जागेवर ८ वाजता "ब" कार्यक्रम सुरु झाला असंही टाकू नये. देवमाणूस संपल्यानंतर देवमाणूस २ हा कार्यक्रम सुरु झाला, केवळ हे योग्य आहे.
इंग्रजी विकिपीडियाची नक्कल म्हणून नाही, तर "मालिकांचा प्रसारणाचा वेळ" हा मुद्दा मुळातच ज्ञानकोशीय नाही. एखादी मालिका बंद झाल्यावर १० वर्षानंतर त्याच्या वेळेचा कोणाला काही फरक पडत नाही. voot, netflix, zee5 असे वेग-वेगळे app असल्यामुळे प्रसारण वेळेची आता कोणाला जास्त किंमत नाहीये. आणि टीव्ही चॅनल्स सुद्धा त्यांची वेळ सारखी बदलत असतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वेळा आपण अद्ययावत करणेपण बरोबर नाही. एखादी मालिका सुरु झाली तेव्हा तिची पहिली वेळ टाकली तरी पुरे असावं. उदाहरण द्यायच झालं, तर वादळवाट ह्या मालिकेची वेळ बदलली होती, आणि वादळवाट या लेखावर दोन साचे सोडले तर जास्त माहिती नाहीये. {{झी मराठी रात्री ९च्या मालिका}} व {{झी मराठी रात्री ८.३०च्या मालिका}} हे साचे सुद्धा निव्वळ जाहिरातबाजीचा प्रकार आहेत.
वरील मुद्द्यांना अनुसरून, व TV माध्यमांकडून मराठी विकिपीडियाचा जाहिरातबाजी साठीचा होणारा उपयोग टाळण्यासाठी "माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम" साच्यातून "आधी" व "नंतर" काढण्याची मी विनंती करतो. ह्यावर आपले समर्थन/विरोध नमूद करून, किंवा नवीन काही कल्पना/सल्ला असेल तर त्याप्रमाणे चर्चा करून साच्यात काय ठेवावे व काय ठेवू नये हे औपचारिकरीत्या ठरवावे हि विनंती. —usernamekiran (talk)२२:३६, १२ जून २०२२ (IST)[reply]
माझे मत असे आहे की, आधी आणि नंतर हे दोन्ही असावे कारण जरी मालिकांच्या लेखांमध्ये ८ नंतर ८.३० किंवा ८ आधी ७.३० च्या मालिकांचा उल्लेख करण्यात आला असला तरी बिग बॉस मराठी च्या पानांवर त्याचा योग्य पद्धतीने वापर केला गेला आहे असे दिसून येते जसे की बिग बॉस मराठी २ वर आधी बिग बॉस मराठी १ आणि नंतर बिग बॉस मराठी ३ असा वापर केला गेला आहे. म्हणजेच नवीन / जुन्या पर्वाच्या पानांकरिता त्याचा वापर केला गेला आहे. याचा रात्रीस खेळ चाले २ या पानावर सुद्धा रात्रीस खेळ चाले आणि रात्रीस खेळ चाले ३ असा वापर होऊ शकतो. परंतु तेथे तो केला गेलेला दिसत नाहीये. म्हणून या बाबींचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा. Khirid Harshad (चर्चा) ११:२०, १८ जून २०२२ (IST)[reply]
@अभय नातू आणि Tiven2240:, नमस्कार गेल्या काही दिवसांपासून आकाश भडसावळे, अभिजात नाट्यसंस्था, प्रदीप दळवी तसेच टिळक आणि आगरकर (नाटक) या लेखांची निर्मिती, पानावरील सुचालन साचे काढणे असे खोडसाळ प्रकार होत आहेत. यात 2401:4900:560e:a83c:31a1:8a97:7b2a:7318, 2401:4900:5609:cfca:7577:8f7:38a:fd10, 2401:4900:5195:6BD6:1:0:9196:5EDE, 2401:4900:1988:98cc:1:2:211f:dc94, या व अशाच मिळत्याजुळत्या अनोंदनिकृत अंकपत्त्याचा सहभाग आहे. यापैकी एका अंकपत्त्याच्या चर्चापानावर मी हा संदेश टाकला होता. कृपया पुढील योग्य तो निर्णय आपण घ्यावा ही विनंती.- संतोष गोरे ( 💬 ) १२:०९, १६ जून २०२२ (IST)[reply]
दखल घेतली.
उत्पात सध्या थांबलेला दिसत आहे. पुन्हा झाल्यास कारवाई केली जाईल.
@अभय नातू:, @Tiven2240:, @Usernamekiran:, @Sandesh9822:, @Rockpeterson:, @Omkar Jack:, @अमर राऊत:, @Omega45:, @Khirid Harshad:, @आर्या जोशी:, @ज्ञानदा गद्रे-फडके:, @Aditya tamhankar:, @Katyare:, @Nitin.kunjir: नमस्कार, वरील साद घातलेली सदस्यांची नावे ही केवळ माहीत असलेली आहेत म्हणून येथे टाकलेली आहेत. मुळात ही साद सर्वच नवीन जुन्या मराठीप्रेमी सदस्यांसाठी आहे. आपण सर्व जण मराठी विकिपीडियावर सक्रिय असून आपल्या प्रत्येकाचे विविध आवडते विषय आहेत. त्याशिवाय 'चित्रपट', 'आपला धर्म', 'राजकीय नेते' आणि 'चालू विषय' यावर सहसा आपण नवीन लेख निर्मिती करत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या लक्षात आलेली गोष्ट म्हणजे छोटी पाने, रिकामी पाने, सगळ्यात कमी बदल असलेले लेख तसेच अत्याधिक काळ संपादने न झालेली पाने येथील लेख हे थोडे दुर्लक्षित असल्यासारखे आहेत. यामुळे या लेखांवर पान काढा चा साचा लावला जातो/जाऊ शकतो. असे झाल्यास मराठी विकिपीडियावरील लेख संख्या ९९,२६१ वरून पुढे पुढे जाण्याऐवजी मागे पडत जाईल. यामुळे विकिपीडियाच्या जागतिक क्रमवारीत मराठी विकिपीडिया, जो की वेगाने पुढे जात होता तो अजून मागे पडेल आणि इतर भाषिक विकिपीडिया आपल्या पुढे जातील. तेव्हा वरील विभागातील लेखात आपल्याला जमेल तसे आणि जमेल तेव्हा किमान एक दोन परिच्छेदाची भर घातली तर हे संकट काहीसे दूर होईल असे मला वाटते. कृपया यावर आपापली मते व्यक्त करावीत ही विनंती.- संतोष गोरे ( 💬 ) १७:५५, १३ जुलै २०२२ (IST)[reply]
मला वाटते काही काळ नवीन लेख तयार करण्याऐवजी आहेत त्या लेखांचा दर्जा सुधरवण्यावर भर द्यायला हवा. प्रसिद्धीमाध्यमात (वृत्तपत्रांत किंवा तत्सम) सध्या मराठी विकिपीडियाबद्दल काय मत आहे याची मला कल्पना नाही, पण माझ्या मित्रपरिवारामध्ये मराठी विकिपीडियाची प्रतिमा/इमेज तेवढी चांगली नाही (मी फक्त लेखांबद्दल बोलतोय). जर सर्वसाधारण वाचकांचीसुद्धा हीच भावना असेल तर वाचक परत येण्याची शक्यता कमी आहे. जर लेख चांगल्या स्थितीत असतील तर वाचक संख्या, व त्या योगाने संपादक वाढण्याची शक्यता आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे. ह्या कारणामुळे मी ख्रिश्चन नाही तरी "बायबल" लेख सुधरवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या त्या लेखात भरपूर नकल-डकव व वैयक्तिक विचार आहेत. —usernamekiran (talk)१८:५४, १३ जुलै २०२२ (IST)[reply]
आपण या समस्येकडे लक्ष वेधले याचा आनंद आहे, मी विद्यमान लेखांमध्ये नक्कीच योगदान देईन कारण आपला मुख्य उद्देश विकिपीडियावर दर्जेदार सामग्रीसह (अधिक माहिती) लेखांची संख्या वाढवणे आहे. Rockpeterson (चर्चा) १८:५५, १३ जुलै २०२२ (IST)[reply]
मला असे वाटते की, मराठी वाचकांना धरुन लेख बनवले गेले पाहिजेत, कारण मी पाहतोय की बरेच लेख हे मराठी वाचकांच्या परिघाबाहेर आहेत, महाराष्ट्राविषयीचे लेख (व्यक्ती, स्थान, ऐतिहासिक लेख) सुद्धा फार अपुर्ण आहेत, त्यांचा दर्जा सुधारायला हवा, मी ही त्यामुळे हल्ली नवीन लेख खूप कमी बनवत आहे, त्यापेक्षा मी जास्त वाचक संख्या असलेले लेख सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जर लेख वारंवार अपडेट होत राहिला तर तो गुगल शोधांमध्येही वरच्या स्थानी येतो. Omega45 (चर्चा) २३:०६, १३ जुलै २०२२ (IST)[reply]
चर्चेचा विषय पाहून अतिशय आनंद झाला. खरोखरच जे लेख वाढवणे शक्य त्यांना जरुर वाढवायला हवे. या विषयावर मी आधीही काम केले आहे, आणि छोटी पाने व रिकामी पाने अंतर्गत येणारे अनेक लेख मी विस्तृत केलेले आहेत. नंतरच्या काळात हे काम मागे पडले. किमान ५००० लेख या दोन श्रेणींत येत असतील. पण सर्वांच्या सहकार्याने शक्य तेवढे लेख सुधारले जातील आणि विस्तारले जातील, यात शंका नाही. सदस्यांनी आपल्या आवडीचे आणि आपल्याला ज्ञात असणारे छोटे व रिकामे लेख समृद्ध करायला हवे. मी सुद्धा नक्कीच योगदान देईल. --संदेश हिवाळेचर्चा००:११, १४ जुलै २०२२ (IST)[reply]
१००% सहमत.
मला वाटते काही काळ नवीन लेख तयार करण्याऐवजी आहेत त्या लेखांचा दर्जा सुधरवण्यावर भर द्यायला हवा.
मी गेले काही महिने यावर अधिकाधिक वेळ दिला आहे. यासाठी दोन प्रकारे प्रयत्न करता येतील
हे करताना जे लेख वाचविता येण्यासारखे नसतील ते घालविणे. परंतु यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. सरसकट लेख काढण्यापेक्षा ज्या लेखांना पुढे भविष्य नाही (उदा. - लेखक मिळणार नाहीत, वाचक मिळणार नाहीत असे किंवा असंबद्ध विषयांवरील लेख) असे लेख काढावेत. सदस्य पाने, चर्चा पाने यांचे पुनरावलोकन करण्यात व काढण्यात सध्या वेळ घालवू नये.
याशिवाय जे लेख मशीन ट्रान्सलेशन वापरुन तयार केले गेले आहेत त्यांत व्याकरण व शुद्धलेखनाच्या अनेक चुका आहेत. हे लेख सुधारणेही गरजेचे आहे. यासाठी {{मट्रा}} साचा असलेले लेख पहावेत.
हे सगळे करीत असताना संतोष गोरे यांनी म्हणल्याप्रमाणे घटत्या लेखसंख्येकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, तरी मला वाटते ८५,००० च्या आसपास लेखसंख्या सध्या कायम राखून पुढील काही आठवडे दर्जा सुधारण्याकडे लक्ष द्यावे व त्यानंतर १,००,००० लेखसंख्येकडे एल्गार करावा!
तुम्हा सर्व (आणि इतरही!) मंडळीनी याकडे लक्ष घालून मराठी विकिपीडियाचा दर्जा व आवाका वाढविण्यास पुढाकार घेतल्याबद्दल अनेकदा धन्यवाद!
Omega45 ह्यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. सध्या "विशेष:छोटी पाने" मध्ये असणारे बहुतांश लेख हे अमराठी विषयांसंदर्भात आहेत. अशा लेखांचे विस्तारीकरण सुद्धा अवघड आहे. मीपण ह्याच मताचा आहे कि सध्या आपण मराठी/महाराष्ट्राविषयी लेखांना किंवा अशा लेखांना प्राधान्य द्यायला पाहिजे कि ज्यामध्ये सर्वसाधारण मराठी वाचकाला रस असावा. सध्या मी {{भौतिकशास्त्र}} मधील लेखांचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतोय, पण विकिपीडियासाठी म्हणावा तेवढा वेळ मिळत नाहीये.
काही वर्षांपूर्वी मराठी विकिपीडियावर मासिक सुरु झाले होते, पण ते नंतर बंद पडले. इंग्रजी विकिपीडिया वर एक उपक्रम/विकिप्रोजेक्ट आहे, त्यामध्ये ते एका आठवड्यात कोणता लेख सुधरवायचा हे ठरवतात. त्या धर्तीवर आपण जर प्रत्येक महिन्याला कोणत्या लेखांना प्रधान्य द्यायचं हे ठरवून त्या लेखांवर काम केलं तर? उदाहरण द्यायचं झालं तर मे महिन्यात महिन्यात महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचं राजकारण, भूगोल इत्यादी विषयांवर काम करता येईल. ऑगस्ट महिन्यात भारताचा इतिहास, तर ऑक्टोबर महिन्यात दिवाळी व महाराष्ट्रातील सर्व सणांवर काम करता येईल. थोडक्यात सांगायचे तर, प्रत्येक महिन्यात काही व्यापक विषय ठरवून त्यावर काम केले तर एकमेकांच्या मदतीने सहजपणे जास्त काम होईल, व नवीन लेखसुद्धा तयार होतील. येणाऱ्या महिन्यात कोणत्या विषयावर काम करायचं आहे हे प्रत्येक शेवटच्या आठवड्यात ठरवता येईल, व नंतर इच्छुक मंडळींना नियतकालिकामार्फत ते कळवता येईल. साहजिकच, कोणत्या लेखावर काम करावे व करू नये याला कोणी बांधील नाही. ज्याला जे काम करायचे आहे ते करता येते. पण जर भरपूर संपादकांचा ओघ/लक्ष काही ठराविक लेखांकडे असेल तर आपोआपच भरीव संपादने होतील. तुम्हा सर्वांचा काय विचार आहे? —usernamekiran (talk)१२:५७, १४ जुलै २०२२ (IST)[reply]
काही वर्षांपूर्वी मराठी विकिपीडियावर मासिक सुरु झाले होते
आपण हे मासिक सदर या नावाखाली करतो. गेले अनेक महिने मुखपृष्ठावर लावण्यासारखा लेख झालेला नाही. उमेदवार लेख येथे आहेत. त्यांत सुधारणा केल्यास, किंवा नवीन लेख उमेदवार करुन त्यांत भर घातल्यास हे पुढे चालविता येईल.
त्यामध्ये ते एका आठवड्यात कोणता लेख सुधरवायचा
हा ही उपक्रम आपण राबविला. प्रत्येक आठवड्याला एक प्रमाणे वर्षाला ५२ लेख सुधारण्याचा हा प्रयत्न होता.
याशिवाय उदयोन्मुख लेख हे सदर सुद्धा पुढे चालविल्यास लेख सुधारण्यास (आणि मुखपृष्ठ ताजे राहण्यास) मदत होईल. वस्तुतः सध्या अनेक लेख या वर्गात मोडतात. त्यांपैकी एक या पानावर निवडावा.
@संतोष गोरे: उद्या या चर्चेला १ वर्ष पूर्ण होईल, परंतु या वर्षभरात जवळपास ८०००+ लेखांची भर पडली आणि मराठी विकिपीडियाची आशयघनता जी मागच्या वर्षी ४० होती, ती आज ३७ पर्यंत खाली आली आहे. नवनवीन लेखांच्या निर्मितीबरोबर आशयघनतेकडे जरा दुर्लक्षच झाले आहे, तर वर्ग:रिकामी पाने यात जे खरोखरच दीर्घकाळ रिकामे, अनावश्यक अथवा असंबद्ध लेख आहेत ते वगळावेत, तसेच ज्याला जसे जमेल तसे उर्वरित लेख वृद्धिंगत करण्यास हातभार लावावा. Khirid Harshad (चर्चा) १६:५६, १२ जुलै २०२३ (IST)[reply]
आशय घनता कमी होत चाललीय हे मला पूर्वीच लक्षात आले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आशय घनता कमी झाली आहे, याचा अर्थ, मराठी विपी वर उपलब्ध असलेला मजकूर कमी होत आहे. याला अनेक कारणे आहेत, जसे की पूर्वीचे लेख उडवणे, सदस्य पान, सदस्य चर्चा पान तसेच लेखाचे चर्चा पान व इतर ठिकाणचा मजकूर उडवणे. लक्षात घ्यावे की केवळ आक्षेपार्ह भाषेतील मजकूर तसेच विपी च्या नियमा विरुद्ध चे लिखाण/चर्चा उडवणे अपेक्षित आहे. अनावश्यक चर्चा/जुनी चर्चा किंवा वादविवाद असले तरी त्याला अकारण उडवू नये असे मला वाटते. याच सोबत एखाद्या सदस्याने जर काही लिखाण केले तर ते सरळ उडवू नये. यामुळे अनेक जण संपादने करणे टाळतात. यामुळे नवीन सदस्य वाढत नाहीत, नवीन लेख वाढत नाहीत तसेच उपलब्ध लेखांची दुरुस्ती करण्याचे प्रमाण देखील कमी होते. लक्षात घ्यावे की, विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असते. आपल्याला याबाबत @अभय नातू योग्य ते मार्गदर्शन करतील असे अपेक्षित आहे.-संतोष गोरे ( 💬 ) ०८:४७, १३ जुलै २०२३ (IST)[reply]
मराठी विकिपीडियावर (किंबहुना सगळ्याच छोट्या विकिप्रकल्पांवर) लेखसंख्या आणि आशयघनता यांच्या नैसर्गिक ताण असतो. एकीकडे लक्ष केंद्रित केले तर दुसरे कमी होते हे गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरुन दिसते.
यावर प्रस्तुत चर्चेच्या आधीही अनेकवेळा चर्चा झालेली आहे.
छोटे लेख उडवणे हा यावरील उपाय नाही. अशा लेखांचे अनेक उपयोग आहेत.
असे लेख दिसल्यावर भविष्यातील (दोन दिवस, दोन महिने, दोन वर्षे...) लेखक यातून स्फुर्ती घेउन ते वाढवितात. यासाठी त्यांना पहिल्यापासूनची मांडणी करावी लागत नाही
लेख छोटे जरी असले तरी त्यावरील किमान मांडणी -- साचे, वर्गवारी, प्रस्तावना असल्यास त्या लेखासच नव्हे तर त्याच्या आसपासच्या विषयालाही स्ट्रक्चर आपोआप मिळते, उदा. एखाद्याला एखाद्या विमानाबद्दल लिहावेसे वाटल्यास त्यात कोणते साचे वापरावे, वर्गवारी कशी करावी याचे उदाहरण समोरच असल्याने त्यांचा विरस होत नाही.
लेखसंख्या वाढल्याने विकिपीडियाला वजन येते. ५,००० लेखांचा विकिपीडिया (यांत ४,५०० उत्तम आणि ५०० कमी दर्जाचे, आणि बहुधा शिळे झालेले) आणि २०,००० लेखांचा विकिपीडिया (३,००० उत्तम आणि १७,००० कमी दर्जाचे लेख) यांची लेखकाच्या दृष्टीने तुलना करायची झाल्यास दुसरा प्रकार अधिक भावतो यास दोन (तरी) कारणे आहेत --
अशा विकिपीडियावर योगदान करण्यास संधी आहे असे वाटते
असे योगदान करण्यासाठी प्रकांडपंडित असणे आवश्यक नाही हे सुद्धा लक्षात येते
आशयघनतेवर अधिकाधिक लक्ष दिल्याने विकिपीडियाची क्रेडिबिलिटी नक्कीच वाढते. असे विकिपीडिया वाचकांना अधिक भावतात परंतु नवीन लेखक येथे काम करण्यास कचरतात.
तरी विकिपीडिया हा लेखकांसाठी का वाचकांसाठी असा हा प्रश्न मग पडतो.
यावर बरोबर आणि चूक असे कोणतेच उत्तर नाही. विकिपीडिया हा वाचकांसाठी आणि लेखकांसाठी असायला पाहिजे.
नुसतेच लेखकांसाठी हवे असल्यास अनुदिनी/ब्लॉग, इ. योग्य आहे. नुसतेच वाचकांसाठी हवे असल्यास विश्वकोश किंवा तत्सम साधने उपयोगी आहेत.
विकिपीडिया हा सतत वाढत विकसित होणारा कोश आहे. याला पूर्णत्व कधीच येणार नाही. असे असता उत्तम लेख आणि छोटे/अपुरे लेख दोन्ही प्रकारांना येथे स्थान आहे.
आता येथे नमूद करतो की अपुरे लेख ठेवणे आवश्यक आहे. चुकीचे, खोडसाळ, भडकिवणारे लेख येथे मुळीच असू नयेत.
एकूण विचार केल्यास विकिपीडियाने ८,००० लेख वाढवितानाही आशयघनता ~४० पासून ~३७ पर्यंत कायम राखली आहे हे आपणा सर्वांसाठी कौतुकाचीच गोष्ट आहे. इतर विकिपीडियांच्या सांख्यिकीवर नजर घातली असता लक्षात येते की --
लेखसंख्येत :मराठी विकिपीडिया ७३व्या स्थानावर आहे.
१०,०००-आशय घनतेत मराठी विकिपीडिया २२व्या स्थानावर आहे
मराठी विकिपीडियापेक्षा जास्त लेख असणाऱ्या ७२ विकिपीडियांपैकी ३६ विकिपीडियांची आशयघनता मराठी विकिपीडियापेक्षा कमी आहे. यांपैकी १०ची आशयघनता १०पेक्षा कमी आहे.
हे विचारात घेतल्यास मराठी विकिपीडियाची आशयघनता टाकाऊ नाही हे नक्की. अर्थात लिखाणातील आशय वाढविण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले पाहिजेच!
@Khirid Harshad: नुकतेच तुम्ही विष्णु सहस्रनाम वरील एक संपादन उल्टविले होते. ते मी परत आणले. यामागे दोन मुख्य कारणे आहेत. कृपया केवळ अशुद्ध लेखन किंवा छोटा मोठा कॉपी पेस्ट मजकूर असल्यास त्याला उलटवण्या ऐवजी त्यात थोडी बहुत दुरुस्ती करावी. काही बहुत अशुद्ध लेखन असल्यास तसेच राहुद्यावे, जेणे करून नवीन सदस्य यात दुरुस्ती करतील आणि प्रोत्साहित होतील. जर आपण चुकीची संपादने म्हणून हर छोट्या मोठ्या संपादनास दृतमाघार चा वापर केला तर ते सदस्य नाराज होतील किंवा विकिपीडियावर संपादने करणे अवघडच आहे, ते आपल्याला जमत नाही अशा भावनेने दूर जातील. सबब दृतमाघार थोडे कमी प्रमाणात वापरावे.-संतोष गोरे ( 💬 ) २१:२८, १ ऑगस्ट २०२३ (IST)[reply]
नमस्कार, नियमित वापरातील काही सुचालन साचे, जसे की {{पान काढा}}, {{बदल}}, {{उल्लेखनीयता}} हे व इतर काही साचे, जे लावल्यावर त्यातील मोठा मजकूर सदरील पानावर प्रदर्शित होतो आणि त्या पानाचे विद्रुपीकरण होते असे मला वाटते. यात निश्चितच बदल करणे आवश्यक आहे. हिंदी व इंग्रजी विकिपीडियावर संबंधित साचे collapsible आहेत, म्हणजे त्यात फक्त मोजक्याच ओळी प्रदर्शित होतात. पुढे learn more वर टिचकी दिली की अतिरिक्त माहिती वाचकांना दिसून येते. मराठी विकीवरील एक उदाहरण म्हणजे, {{संदर्भ कमी}} हा साचा होय. हा साचा जोडला असता वरीलप्रमाणेच छोटा मजकूर दिसून येतो आणि learn more वर टिचकी दिली असता पुढील माहिती प्रदर्शित होते. यामुळे संबंधित पानाचे विद्रुपीकरण होणे थांबेल असे मला वाटते. कृपया असा बदल आपण करावा का?- संतोष गोरे ( 💬 ) ११:१३, ३ ऑगस्ट २०२२ (IST)[reply]
मी संतोष गोरे यांच्या मताशी सहमत आहे. विकिपीडिया लेखांमध्ये केवळ माहिती दर्जेदार असून चालत नाही तर तिची मांडणी सुद्धा सुंदर असावी लागते. विकिपीडिया लेखांमध्ये बरेच साचे मोठा मजकूर दाखवत असल्याने लेखांचे विद्रुपीकरण होते हे निश्चित. {{बदल}} आणि {{उल्लेखनीयता}} या साच्यांचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी मी {{संदर्भ कमी}} हा साचा केला होता. @Tiven2240: कृपया, संतोष गोरे म्हणत आहेत तसा बदल करण्यास आपण पुढाकार घ्यायला हवा. शिवाय यावर इतर सदस्यांची मते जाणून घेणेही आवश्यक आहे. --संदेश हिवाळेचर्चा२१:०२, ३ ऑगस्ट २०२२ (IST)[reply]
@अभय नातू:, @टायविन:, गेले काही महिन्यांपासून सदस्य:Azifast Andhra हे आंध्र प्रदेश व त्यासंबंधित लेखात चुकीचे बदल करत होते. यात मुख्यत्वे आंध्र प्रदेशच्या राजधानीचे नाव बदलणे आणि तेही तेलुगू वगळता इतर सर्व भाषेतील विकिपीडयावर हा पराक्रम चालू होता. सध्या हे सदस्य वैश्विक पातळीवर प्रतिबंधित आहेत. परंतु काल पासून हेच सदस्य:Golden India नावाने मराठी सह इतर भाषेत परत तेच कार्य करत आहेत. हे कळसूत्री बाहुले गृहीत धरून कृपया याची आपण दाखल घ्यावी ही विनंती.-संतोष गोरे ( 💬 ) ०९:३४, ८ ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]
दोन प्रकारे लिहिले जाणारे शब्द या लेखात जे शब्द दिले आहेत त्यांना काही आधार आहे की आम्ही संदेश हिवाळे यांच्या परवानगीने असे शब्द वापरायला सुरुवात करायची? की स्रोत म्हणून विकीचे नाव पुढे करायचे? उदाहरणार्थ या यादीत इत्यादी हा शब्द 'इत्यादि' असा लिहिला तरी चालेल असे म्हटले आहे. पण राज्य शासनाच्या १९७२ च्या १८ नियमातील शुद्धलेखनाचे_नियम#नियम_१७ सतराव्या नियमाप्रमाणे 'इत्यादी' व 'ही' हे शब्द दीर्घांन्त लिहावेत असे स्पष्ट निर्देश आहेत. Shantanuo (चर्चा) १०:४३, २१ ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]
लेखात दिलेल्या शब्दांना काही आधार आहे कि नाही माहित नाही. पण महाराष्ट्र सरकारने जे नियम प्रस्थापित केले आहेत, आपण त्यांचेच पालन केले पाहिजे. ह्याला दोन कारणे आहेत, एक म्हणजे विकिपीडिया विश्वसनीय संदर्भात/स्रोतात जी माहिती आहे त्यानुसार लेख तयार करते. विकिपीडिया स्रोत नाही. दुसरे म्हणजे आपण (महाराष्ट्र शासनाच्या) केंद्रीकृत - व्याकरणाच्या दृष्टीने परिपूर्ण रचनेपासून भरकटलो तर प्रत्येकजण "आमचीच मराठी योग्य" असे म्हणेल. (उदा. "काय करायला?": "काय करतोयस", "काय करून रायलास", "काय करलाव"...) थोडक्यात, आपण महाराष्ट्र सरकारच्या नियमांचे पालन केले पाहिजे. —usernamekiran (talk)०९:५३, २२ ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]
प्रचालकपदाचे नामांकन जाहीर केल्यानंतर संदेश हिवाळे यांनी तयार केलेले हे पान म्हणजे बेजबाबदारपणाचा उत्तम नमुना आहे. त्या पदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वीच त्यांनी विकीच्या आणि भाषेच्या नियमांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. हा मुद्दा महत्त्वाचा ठरत नाही तोवर त्याकडे "विरोधकांची कोल्हेकुई” असे म्हणून दुर्लक्ष केले जाईल. मुद्दा अडचणीचा ठरला तर संदेश साहेब "असे काही नियम असतात हे माहीत नव्हते” असे म्हणणार आणि विकीचे पदाधिकारी "आम्ही ही चर्चा वाचलीच नाही. अन्यथा कारवाई केली असती.” असे म्हणणार! मांजर डोळे मिटून दूध पीत असते. पण सर्व जग बघत असते. Shantanuo (चर्चा) १३:४८, २३ ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]
Sandesh9822 उत्तर देतीलच परंतु हा लेख प्रथमदर्शनीच अविश्वकोशीय असल्यामुळे तो वगळला आहे. ही माहिती धूळपाटी, सदस्यपान किंवा व्याकरणाबद्द्लच्या योग्य त्या लेखात (हवी असल्यास) घालावी.
मी बनवलेल्या लेखाबद्दल येथे चर्चा सुरू असल्याचे पाहून जरासे आश्चर्य वाटले. संतोष गोरे यांनी जर मला साद दिली नसती तर कदाचित ही चर्चा माझ्या नजरेत लवकर आली नसती. @Shantanuo: आणि @Usernamekiran: आपण दोघेही मराठी भाषेचे उत्तम जाणकार आहात, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांबद्दल माझी हरकत असण्याचे कारण नाही, मात्र ही चर्चा थेट चावडीवर सुरू केल्यामुळे माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहे.
जर सदर लेखाबद्दल, त्यातील मजकुराबद्दल तुम्हाला काही शंका होत्या तर तुम्ही लेखामध्ये वेगवेगळे सुचालन साचे लावू शकत होतात.
जर तुम्हाला लेख उल्लेखनीय वाटला नसेल तर तुम्ही सदर लेखाच्या चर्चा पानावर तसे नोंदवू शकत होतात, अगर उल्लेखनीयता साचा जोडू शकत होतात.
जर तुम्हाला लेखातील मजकूर अयोग्य वाटला होता, तर तुम्ही याविषयी एकदातरी लेख निर्माणकाशी चर्चा करायला हवी होती.
सर्वात महत्त्वाचे हे की तुम्ही येथे एका विशिष्ट लेखाबद्दल चर्चा करत असताना, त्यावर मत-मतांतरे मांडत असतानाच त्या लेखाच्या निर्मात्याला सुद्धा साद द्यायला हवी होती, म्हणजे तुमच्या शंकेचे निरसन झाले असते. मात्र तुम्ही हेही टाळले.
विकिपीडिया हा विश्वसनीय संदर्भ/स्रोत नाही हे विकिपीडिया मान्य करतो. त्यामुळे एखाद्या लेखात चूक आढळल्यास त्यामध्ये सुधारणा करण्यास आपण सदैव प्रयत्नशील असले पाहिजे.
विकिपीडियामध्ये पूर्णसत्य असे काही नसते. आवश्यक त्या लेखांमध्ये आवश्यक ती माहिती वाढवावी, सुधारावी, बदलावी, वा काढावी लागते. सदर लेख सुद्धा याच मार्गांतून जायला हवा, असे मला वाटते. मी दिवाळीनिमित्त शहरातून गावाकडे आलोय, त्यामुळे तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांना परत शहरामध्ये गेल्यानंतरच उत्तर देऊ शकेल. तूर्तास कृपया धीर धरावा. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा२३:३१, २९ ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]
@Saudagar abhishek: नुकतंच काही दिवसापूर्वी बखर पान मध्ये सुधारणा करून संदर्भ जोडलेले होते. त्याच्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या काही बखरांची लिस्ट ची नवीन पान तयार करण्यात आलेले आहेत. त्या सर्व पानांमध्ये संदर्भ आणि माहितीची कमतरता आहे. मला वाटतं तुम्हाला जी माहिती आणि संदर्भ आहेत तेच पान तुम्ही तयार करावे. फक्त पान तयार करतच पुढे नका जाऊ त्याच्यामध्ये पूर्ण संदर्भ आणि माहिती जोडण्याचा प्रयत्न करा. चिटणीसाची बखर, ९१ कलमी बखर, चित्रगुप्ताची बखर, शिव दिग्विजय ~ AShiv1212 (चर्चा) १८:४८, १ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]
@अभय नातू:, @Tiven2240:, @Usernamekiran:, @संतोष गोरे:, @Sandesh9822: सहज सांगकाम्यांची यादी पाहिली असता असे लक्षात आले की मराठी विकिपीडियावर सध्या ७७ सांगकामे असून त्यातील फक्त EmausBot, InternetArchiveBot, KiranBOT, KiranBOT II, Sanjeev bot, Xqbot आणि सांगकाम्या हे ७ सांगकामे कार्यरत आहेत, तसेच याव्यतिरिक्त JJMC89 bot, CommonsDelinker कार्यरत असून त्यांच्याकडे फक्त "सांगकाम्या"चे पद नाहीये. याआधी काही अकार्यरत सांगकाम्यांचे पद काढून टाकले आहे, मग उर्वरित ६८ अकार्यरत सांगकाम्यांचे पद प्रचालकांनी काढावे की नाही? त्यातील काही सांगकामे वैश्विक प्रतिबंधित आहेत, काहींनी मराठी विकिपीडियावर संपादनेच केली नाहीत, तर काहींचे विकिडेटा आल्यानंतर काम संपुष्टात आले. माझे असे मत आहे की ज्या कार्यरत सांगकाम्याकडे पद नाही त्यांना ते द्यावे व अकार्यरत सांगकाम्यांचे पद काढावे. मराठी विकिपीडियाच्या आवश्यकतेनुसार आणखी काही इंग्लिश विकिपीडियावरील InternetArchiveBot यांसारखे सांगकामे येथे आल्यास उत्तम होईल. कृपया आपली मते मांडावी, धन्यवाद. Khirid Harshad (चर्चा) २२:२९, ५ डिसेंबर २०२२ (IST)[reply]
मराठी विकिपीडियावर अजून २ सांगकामे यायला हवेत असे मला वाटते. एक सांगकाम्या, जो नवीन तयार झालेली पाने विकिडाटा कलमांशी जोडेल आणि दुसरा सांगकाम्या, जो मराठी विकिपीडियावर असलेल्या लेखांमधील लिंट त्रुट्या, संदर्भ त्रुटी दुरुस्त करेल. हे दोन सांगकामे इंग्लिश विकिपीडियावर आहेत तर ते येथे आलेत बरं होईल. Khirid Harshad (चर्चा) ११:४२, ३० डिसेंबर २०२२ (IST)[reply]
वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा या वर्गात भारतीय स्वातंत्र्य याविषयी विविध वर्ग आणि लेख उपलब्ध आहेत. १५ ऑगस्ट निमित्ताने यावर सर्व संपादक सदस्यांनी जरूर काही लेखन करावे असे आवाहन.
Note: Apologies for cross-posting and sending in English. Wikimedia Technology Summit (WTS) 2024 is focused on using technology to enhance inclusivity across Wikipedia and its associated projects. We aim to explore strategies for engaging underrepresented communities and languages while also strengthening the technical foundation. By fostering collaboration between developers, users, and researchers, we can unite our efforts to create, innovate, and advance the technology that drives open knowledge.
We invite community members residing in India who are interested in attending WTS 2024 in person to apply for scholarships by July 10, 2024. The summit will be held at IIIT Hyderabad, India, in October 2024. To apply, please fill out the application form by clicking this link]. On behalf of the WTS 2024 Scholarship Committee : Kasyap (चर्चा) १३:५३, ११ जून २०२४ (IST)[reply]
We are excited to announce the release of Wikifile-transfer v2, an enhanced tool to streamline media transfers across Wikimedia projects. Wikifile-transfer supports users in moving non-free images across wiki projects. This tool is helpful for contributors managing media across multiple language wikis.
We invite you to join our second community call on November 10, 2024, at 18:00 IST (6:00 PM). This meeting is an opportunity to discuss the new features, share feedback, and connect with us.
Since this is a major new release, some bugs may still exist. We encourage you to report any issues you encounter to help us improve the tool further. We're looking forward to your feedback as we continue refining WikiFile-Transfer to meet the needs of our community.
देशांची नावे (व इतर विशेषनामे) ही मूळ, स्थानिक उच्चारानुसारच असावी. काही वेळा हे शक्य नसल्यास मूळ उच्चाराच्या शक्य तितक्या जवळची असावीत.
या नावाचा मूळ अरबी उच्चार बहरैन किंवा बाहरैन असा होतो. त्यानुसार लेखाचे नाव बहरैन असावे व बहारिन, बहारीन, बाहरिन, इ. इतर उच्चारांची पुनर्निर्देशने असावीत.