चावडी सुचालन साचाचे अद्ययावतीकरण माझ्या मनात बराच काळ पासन रेंगाळत होते,ते तुम्ही चावडी ध्येय धोरणेचे प्रकरण धसास लावण्याचे मनावर घेतल्यामुळे पूर्ण झाले ,पिच्छापुरवऊन काम धसास लावणे अशा स्वरूपाचा बार्नस्टार आहे का माहित नाही चित्र स्वरूपात नाही लेखी स्वरूपात मात्र बहाल करतो.
बाकी हि सुरवात आहे पुढचे मराठी जनता जनार्दनाच्या चरणी अर्पण माहितगार १९:५५, १३ जुलै २०११ (UTC)
नमस्कार राहुल ! मराठी विकिपीडियावर मराठीतून ग्राफिक संकल्पनात बजावलेले मोलाचे योगदान गौरवण्यासाठी खालील बार्नस्टार तुम्हांला देण्यात येत आहे. हा बार्नस्टार गौरव (अर्थात, त्यातील साचा), तुम्ही तुमच्या सदस्यपानावर लावू शकता. :)
ग्राफिक संकल्पकाचा बार्नस्टार
Rahuldeshmukh101, मराठी विकिपीडियावर केलेल्या ग्राफिक संकल्पनविषयक (अर्थात ग्राफिक डिझाइनविषयक) महत्त्वपूर्ण योगदानाची कदर म्हणून मराठी विकिपीडियाच्या वतीने तुम्हांला हा गौरव प्रदान करण्यात येत आहे.
विकिवर कायम नव-नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा झपाटा दाखवल्याबद्दल निनाद ०७:०५, ६ ऑगस्ट २०११ (UTC)
नमस्कार राहुल ! मराठी विकिपीडियावर मराठीतून ग्राफिक संकल्पनात बजावलेले मोलाचे योगदान गौरवण्यासाठी खालील बार्नस्टार तुम्हांला देण्यात येत आहे. हा बार्नस्टार गौरव (अर्थात, त्यातील साचा), तुम्ही तुमच्या सदस्यपानावर लावू शकता. :)
ग्राफिक संकल्पकाचा बार्नस्टार
Rahuldeshmukh101, मराठी विकिपीडियावर केलेल्या ग्राफिक संकल्पनविषयक (अर्थात ग्राफिक डिझाइनविषयक) महत्त्वपूर्ण योगदानाची कदर म्हणून मराठी विकिपीडियाच्या वतीने तुम्हांला हा गौरव प्रदान करण्यात येत आहे.
सध्या मराठी विकिपीडिया मध्ये लेखांची एकूण संख्या ७२,०५२ आहे. मराठी विकिपीडियाला ६०,००० लेखांचा टप्पा पूर्ण करण्यास अजून फक्त −१२,०५२ लेख हवे आहेत. आपल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद.
जून्या चर्चेतुन कही मह्त्वचे
मराठी विकिपीडियावर आपण अनेकदा लेखसंख्या वि गुणवत्ता ही चर्चा केलेली आहे. आपल्यात या दोन्हीपैकी कोणता निकष जास्त महत्त्वाचा याबद्दल मतभेद असले तरीही दोन्ही महत्त्वाचे असल्याचे एकमत आहे. लेखसंख्या आपल्या सांख्यिकी पानावर कळते पण गुणवत्ता कशी कळावी याबद्दल साशंकता असणे साहजिक आहे.
विकिमीडियावरील विकिपीडियांच्या तुलनात्मक सांख्यिकी पानावर एकूण लेख, पाने, संपादने, इ. बरोबरच आशयघनता (depth) हेही एक परिमाण मोजले जाते. यात विकिपीडियावरील मजकूराची गुणवत्तेचा अंदाज घेण्याचा प्रयत्न असतो. यासाठी एक किचकट असे समीकरण ठरवण्यात आलेले आहे जे येथे दिले आहे
आशयघनता - (Edits per Article*(Pages - articles)/Articles * (1 - Articles per Page)): 19.051503859447
वर उल्लेखलेल्या पानावर हा आकडा पूर्णांकाच्या स्वरुपात दाखवला जातो व दर काही दिवसांनी तो तपासून (बदल असल्यास) बदलला जातो. हा आकडा आपल्याला लगेच उपलब्ध असला तर त्याकडे रोजचेरोज लक्ष देणे सोपे जाईल व गुणवत्तेकडे (कधीकधी) होणारे दुर्लक्ष कमी होईल या हेतूने मी हे समीकरण आपल्या सांख्यिकी पानाच्या तळाशी घातलेले आहे. तेथील आकडा अद्ययावत तसेच १/१०० अब्ज (१x१०-१२)इतका अचूक असेल.
तरी अधूनमधून या आकड्याकडे लक्ष ठेवून गुणवत्ता घसरते आहे असे दिसल्यास आपण लेखसंख्या वाढवण्याचा वेग किंचित कमी करून गुणवत्ता वाढवण्याकडे लक्ष द्यावे ही विनंती.