व्यापार चक्र
व्यापार चक्र हा अर्थव्यवस्थेतील चढउतारीचा एक परिणाम आहे. काही वेळा किमतीत वाढ होत असताना उत्पादनातही वाढ होत असते. कामगारांची मागणी वाढत असते, आर्थिक उत्पादन वाढत असते व सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण होत असते. यालाच तेजीची अवस्था असे म्हणतात. याउलट वस्तुच्या किमती कमी होतात, उत्पादन घटते, नफा घटतो व उत्पादन घटल्यामुळे कामगारांची बेकारी निर्माण होते या परिस्थितीला मंदी असे म्हणतात, अर्थव्यवस्थेत तेजी नंतर मंदी आणि मंदीनंतर तेजी असा क्रम चालु राहतो. यालाच तेजी मंदी चक्र किंवा व्यापार चक्र असे म्हणतात.[१]
व्यापारचक्राचा मागोवा
[संपादन]व्यापारचक्र ही अल्पकालावधीची व दिर्घकालावधीची असतात. व्यापार चक्रांचा शास्त्रशुद्ध अभ्यास प्रथमतः क्लेमेंद व जुगलर यांनी केला, त्यानंतर निचेल हॉट्रे हायेक रॉबर्टसन, शुम्पिटर, केन्स इत्यादींनी व्यापार चक्राचे सिद्धांत मांडले. अर्थव्यवस्थेत असलेल्या गतिमान शक्ति वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक चढउतार किंवा स्थित्यंतरे निर्माण करतात. त्यांच्या ठळक वैशिष्ट्यांनुसार त्यांचे दीर्घकालीन प्रवृत्ती, हंगामी चढउतार, चक्रीय चढउतार आणि यादृच्छिक चढ-उतार असे एकूण चार प्रकारात वर्गीकरण केले जाते. यातील चक्रीय चढ-उतारांना व्यापार चक्रे असे म्हणतात. ते अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीत अनेक अडथळे निमार्ण करतात. त्यामुळे व्यापार चक्रांच्या अभ्यासास अधिक महत्व आहे.
व्यापार चक्राचे सिद्धांत
[संपादन]लॉर्ड केन्सचा व्यापार चक्राचा सिद्धांत
[संपादन]लॉर्ड केन्स यांनी व्यापार चक्राचा सिद्धांत याआधी असा कोठेही मांडलेला नाही. केन्स यांनी रोजगारीच्या अनुषंगाने जे विचार मांडले आहेत, त्यावरून त्यांचे व्यापार चक्राविषयीचा दृष्टिकोन कळून येतो. काहीजण यालाच केन्सचा 'बचत गुंतवणुक सिद्धांत' असेही म्हणतात. त्यांच्यामते, “व्यापार चक्र म्हणजे वाढत्या किंमती व अल्प बेकारीचे प्रमाण वैशिष्टये असलेली उत्तम व्यापाराच्या स्थितीचे स्थित्यंतर घटत्या किंमती व उच्च बेकारीचे प्रमाण वैशिष्टय असलेल्या वाईट व्यापार स्थितीत होणे होय. "[२]
शुंपीटरचा व्यापार चक्राचा सिद्धांत
[संपादन]जोसफ ए. पीटर यांनी आपल्या "Business Guide" या ग्रंथात व्यापार चक्राविषयी नवोन्मेष सिद्धांत मांडला. हा सिद्धांत नवप्रर्वतन सिद्धांत म्हणूनही ओळखला जातो. शुंपीटर यांच्यामते, औद्योगिक व व्यापारी क्षेत्रातील नाविन्याचा अवलंब केल्यामुळे चक्रीय बदल घडून येतात भांडवलशाही अर्थव्यवस्थेत सतत विकास होत असतो. हा विकासाचा मार्ग सरल नसुन तो अनेक धक्क्यांनी भरलेला असतो. संयोजक घटकांना एकत्र आणण्याचे कार्य करत नसून उत्पादनात नाविन्यता आणण्याचे कार्य करतो. यालाच नवप्रवर्तन असे म्हणतात. नवीन शोध लावले जाऊन त्यांचा उपयोग व्यापार क्षेत्रात केल्याने अर्थव्यवस्थेत चक्रीय चढ-उतार होतात.[३]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "चलनवाढीचे मौद्रिक आणि अमौद्रिक सिद्धांत व स्थिरीकरण धोरण" (PDF). unishivaji.ac.in (Marathi भाषेत). 18 October 2022. 18 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 18 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "The General Theory of Employment, Interest and Money". maexists.org (English भाषेत). 18 October 2022. 18 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "JOSEPH SCHUMPETER AND THE BUSINESS CYCLE: AN HISTORICAL SYNTHESIS" (PDF). tcd.ie (English भाषेत). 18 October 2022. 18 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 18 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)