विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Welcome to Administrators' Noticeboard

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

Chavdi-main.PNG
चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा
Help-browser.svg
साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा
Wikipedia-logo-v2.svg
दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)
Edit-find-replace.svg
प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा

Preferences-system.svg
तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा
Dheya-beta.PNG
ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा
Dialog-information on.svg
प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
Suggest.jpg
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा०. खालील मुद्दे फक्त या पानासाठी लागू आहेत. या मुद्दांतील संकेतांनुसार या पानाचे काम चालेल. • प्रचालकांना विनंती करण्यापुर्वी उपरोक्त सुचनां आणि संकेत नजरे खालून घाला.
 • आपल्या विनंत्या सुयोग्य विभागातच असा === तिहेरी उपविभाग करून जोडा.
 • जुन्याचर्चा विदागार पानावर हलवताना मुख्य विभागांची रचना बदलली जाणार नाही याची दक्षता घ्या.
प्रचालकांना नोंद[संपादन]

या तिन्ही सदस्यांना दिनांक २१ जुलै २०१८ रोजी यांच्या वादामुळे अंतिम निर्णय चर्चा:बाबासाहेब अांबेडकरवर दिला आहे. याचा अंतर्गत जर हे सदस्य कुठल्याही संदर्भात एक दुसऱ्यावर वाद/व्यक्तिगत हल्ला किव्हा विकिपीडियाचे तत्कालीन धोरण विरुद्ध काम केल्यास अनंत काळपर्यंत तडीपार केले जाईल. याची नोंद प्रत्येक प्रचालकांनी घ्यावी व उल्लंधन करण्यास एकही ताकीद न देता तिन्ही सदस्यांना वाद घालण्यास तडीपार करावे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:०२, २१ जुलै २०१८ (IST)

तांत्रिक प्रचालक अधिकार[संपादन]

मराठी विकिपीडियावर तांत्रिक प्रचालक असे नवीन सदस्य गट तयार करण्यात आले आहे. सद्या प्रचालक काही महत्वपूर्ण पाने संपादन करू शकत नाही. मराठी विकिपीडियावर हा अधिकार मिळवण्यास मी Tiven2240 (चर्चा योगदान ब्लॉक यादी संरक्षण हटवलेले योगदान स्थानांतराची नोंद अधिकार अधिकार बदल) विनंती करत आहे. प्रशासक Gnome-edit-redo.svgअभय नातू: यांनी २४ तास ही विनंती धरून ठेवा. जर कोणतेही गंभीर आक्षेप सापडले नाहीत तर मला अधिकार द्या. तोपर्यंत मराठी विकिपीडिया समुदाय आपले मत नोंदवू शकतो. धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २१:३३, २८ ऑगस्ट २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgअभय नातू, V.narsikar:, तांत्रिक प्रचालक या प्रस्तावित धोरण पानावर एकाच ओळ आहे. याची आधी स्पष्टता समुदायाला येणे आवश्यक आहे असे वाटते. शिवाय ही महत्वपूर्ण पाने कोठली? तसेच २४ तास कालावधीत समुदाय आपले मत नोंदवू शकतो हे विधान आपणास योग्य वाटते का? तात्पुरत्या प्रचालकाला हा अधिकार शक्यतो देऊ नये असे मला वाटते.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:३६, २९ ऑगस्ट २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgअभय नातू, V.narsikar:

 • समुदायाचे मत घेतल्याशिवाय कोणत्याही महत्त्वाच्या पदाचे वाटप करणे हाच मुळात गोंधळ आहे, ही विनंती कुठे द्यायची हेच जिथे टायविन यांना समजलेले नाही त्यावरून ही विनंती फ़ेटाळली जाणेच योग्य आहे, शिवाय आधीच्या कामाचे(तात्पूरत्या प्रचालक पदाचे) योग्य मूल्यांकन झाल्याशिवाय कोणतेही नविन अधिकार देण्यात येणे चुकीचे आहे.
 • शिवाय २४ तासात द्यायला एवढी काय घाई आहे. तांत्रिक प्रचालक रिकामे राहिले तरी चालते त्याने कोणतेही आकाश सध्या कोसळत नाही. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ११:४४, २९ ऑगस्ट २०१८ (IST)
नमस्कार सुरेश व सुबोध,
कदाचित आपल्याला या अधिकार बदल माहिती नसावी व कदाचित माहिती असून सुद्धा काही प्रश्न विचारण्यास वाटले असेल असे आपल्या मतातून दिसत आहे. असो, आपल्याला त्याची माहिती असण्याची गरजेचे आहे. मराठी विकिपीडियावर या अधिकार बाबत चर्चा नेहमी मी व फौंडेशनची कर्मचारी आपल्याला देत असत. कदाचित आपली नजर त्यावर गेली नाही असेल. आपल्याला याबाबत चर्चा पहायचे असेल तर आपण विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/जुनी चर्चा ३#Technical administrators पाहावे. कर्मचारी यांनी पाठवलेले संदेश आपल्याला इथे, इथे आणि इथे भेटेल. जर आपल्याला इंग्लिश मजकुर समजत नाही आपण मशीन भाषांतर किव्हा प्रचालक नारसिकर याना सांगून मराठीत भाषांतर घेऊ शकता.
आपल्या माहितीसाठी: तांत्रिक प्रचालक हे मूळ प्रचालक अधिकाराचे एक भाग आहे. मी नेहमी मराठी विकिपीडियावर तांत्रिक कामे करत आहे. याची माहिती आपल्याला आहे व प्रशासक याना सुद्धा आहे. हे अधिकार मी विदमान प्रचालक असल्यामुळे इथे (प्रशासकांचे चावडीवर(bureaucracts noticeboard)) विनंती करण्यास योग्य आहे व हे इथले नाही तर सर्व विकिपीडियाचे औपचारिकता आहे आणि अनुभवी सदस्यांना यांची माहिती आहे. इतर सदस्य ज्यांना तांत्रिक माहिती आहेत व जे .css आणि .js बाबत माहिती ठेवतात ते विकिपीडिया:अधिकारविनाती यावर आपले नामनकन करू शकतात.
आपल्या माहितीसाठी: हे अधिकार मिळवण्यास प्रचालकांना कौल किव्हा समुदायाचे मत घेण्यासाठी गरजेचे नाही कारण प्रतिपालक ते प्रचालक जे तांत्रिक काम करतात त्यांना विनंती केल्यावर देत आहे आणि ते जास्त ते प्रचालकांना हे अधिकार देतात जे यावर काम करत आहेत. हे अधिकार मला प्रशासक देतील यात शंका नाही परंतु मराठी विकिपीडियावर प्रशासक सक्रिय आहे आणि हे औपचारिकता आहे की ते अधिकार बदलाची जबाबदारी घेतात. मी २४ तास फक्त आपले मत बाबत पाहण्यास प्रतीक्षेत होतो आणि ते आलेले आहे. नोंद घ्यावी नवीन अधिकार देण्यास विदमान अधिकाराची मूल्यांकन बाबत नवीन गैरसमज निर्माण करू नये. प्रशासकांना अधिकार आहे ते माझ्यातून हे तात्पुरता प्रचालक अधिकार काढण्यास, त्यासाठी काही वेळ किव्हा वाट पाहण्याची गरज नाही आणि हे जेव्हा हा पद संपेल तेव्हा विदमान प्रचालकांना ते मूल्यांकन करण्यास अधिकार आहे आणि समुदाय नाही तर प्रचालक मंडळी त्यावेळी निर्णय घेतील की यापुढे हा अधिकार देण्यात येईल का नाही. त्यावेळी त्याबाबत सुद्धा आपल्याला काही महिन्यात शंका येईल. कृपया विकिपीडिया:प्रचालक हे पूर्वीच वाचून ठेवा कारण मी आता जास्त चर्चेत नाही तर कामात विश्वास ठेवत आहे. आपल्या मत दिल्याबद्दल धन्यवाद. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १४:१९, २९ ऑगस्ट २०१८ (IST)
वाचले.--वि. नरसीकर , (चर्चा) १६:२०, २९ ऑगस्ट २०१८ (IST)
Gnome-edit-redo.svgTiven2240:,
लगेचच हव्या असलेल्या बदलांचे काही नमूने येथे द्यावे ज्याने तुमचा मुद्दा स्पष्ट होईल.
Gnome-edit-redo.svgSureshkhole, सुबोध कुलकर्णी:,
हे अधिकार प्रचालकांचेच अधिकार आहेत आणि आता वेगळे केले गेले आहेत हे Tiven2240चे म्हणणे खरे आहे. असे असताही त्यांनी उदाहरणे दिल्यावर हा मुद्दा स्पष्ट होईल. समर्पक उदाहरणे मिळे पर्यंत किंवा अजून २४ तास यांपैकी जे आधी होईल तोपर्यंत हे अधिकार Tiven2240 यांना देत नाही आहे. त्यानंतर ७ दिवसांसाठी तात्पुरते अधिकार दिले जातील. दरम्यान Tiven2240 हा मुद्दा अधिक विषद करतील ही अपेक्षा.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १९:२६, २९ ऑगस्ट २०१८ (IST)


Gnome-edit-redo.svgअभय नातू:
जर आपल्याला इंग्लिश मजकुर समजत नाही आपण मशीन भाषांतर किव्हा प्रचालक नारसिकर याना सांगून मराठीत भाषांतर घेऊ शकता.
आणि हे जेव्हा हा पद संपेल तेव्हा विदमान प्रचालकांना ते मूल्यांकन करण्यास अधिकार आहे आणि समुदाय नाही तर प्रचालक मंडळी त्यावेळी निर्णय घेतील की यापुढे हा अधिकार देण्यात येईल का नाही. त्यावेळी त्याबाबत सुद्धा आपल्याला काही महिन्यात शंका येईल. कृपया विकिपीडिया:प्रचालक हे पूर्वीच वाचून ठेवा कारण मी आता जास्त चर्चेत नाही तर कामात विश्वास ठेवत आहे.
तांत्रिक प्रचालक हा मुद्दा समजला आणि जुना झाला, पण माझे मत हे आहे की, जर सध्या साध्या प्रचालकाच्या अधिकार कपात होऊन जर हे वेगळे तांत्रिक प्रचालकाचे अधिकार येत असतील तर ते टायवीन यांना दिले गेले जाऊ नयेत. त्यांचे अधिकार कमी आहेत तेच बरे आहे. उपरोक्त स्पष्टीकरणातच त्यांची उद्दाम भाषा स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे अधिकार कमी झाले असतील तर ते उत्तमच आहे. मी फ़क्त टायवीन यांना दिल्या गेलेल्या सहा महिने मुदतीचा मान राखून त्या आधी त्यांचे पद काढण्याचा प्रस्ताव मांडत नाहीये एवढचं.
माझ्या उपरोक्त विधानाची कारणमिमांसा टायवीन यांच्या प्रचालकीय योगदानाच्या मूल्यांकनात करूयात. सध्या समुदायातला एक सक्रिय सदस्य म्हणून माझा टायवीन यांना कसलेही नविन अधिकार मग ते नव्या नावाने त्यांच्याकडे असलेले जुने अधिकारच का असेनात द्यायला पाठींबा देऊ शकत नाही. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! २०:१२, २९ ऑगस्ट २०१८ (IST)
Gnome-edit-redo.svgअभय नातू: सद्या तर {{Ambox}} हा साचा योग्यपने चालत नाही. त्यासाठी आवश्यक बदल करायचे आहे. विशेष/तांत्रिक माहिती असलेले सदस्यांना संदेश टाकला आहे आणि जवाब अपेक्षित आहे. काही नवीन गॅजेट/स्क्रिप्ट विकीवर आणायचे आहेत त्यात .json/css ची संपादने अपेक्षित असू शकते. सद्या यावर घाई नाही. परंतु लवकर अधिकारी लोक या सदस्य अधिकारात नवीन बदल करतील ते असं की प्रचालक सुद्धा संपादन इतिहास पाहू शकत नाही. अधिक माहिती आपल्याला इथे भेटेल. त्यावेळी अजून तांत्रिक संपादन करण्यास त्रास होईल अशी अपेक्षा आहे. यावर आपले विचार मान्य केले जाईल. जर मी हा अधिकार चालवण्यास पात्र नाही तर ही विनंती आपण बंद करावे. आवशक असल्यावर आपल्याला पुन्हा चर्चापानावर कोड देईल कारण आपण प्रशासक आपल्यामुळे फक्त खाली ती संपादने तुम्ही करू शकता. कदाचित पेट्रोलर व संपादन गाळणी संपादक अधिकार त्यांना भेटले नाही तर ते हडबडले आहेत, पूर्वी महिलांची वकिली व आता २३५ सक्रिय सदस्यांचे वतीने बोलणाराने सदस्यांवर मला काहीही स्पष्टीकरण देण्याचे नाही. ते आपले काम करतील व मी माझे. धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २१:१४, २९ ऑगस्ट २०१८ (IST)
 • कदाचित पेट्रोलर व संपादन गाळणी संपादक अधिकार त्यांना भेटले नाही तर ते हडबडले आहेत, पूर्वी महिलांची वकिली व आता २३५ सक्रिय सदस्यांचे वतीने बोलणाराने सदस्यांवर मला काहीही स्पष्टीकरण देण्याचे नाही.
 • हा माझ्यावर वैयक्तिक आरोप आहे आणि ही जर प्रचालकाच्या पदावर असलेल्याची भाषा असेल तर, अधिकार न मिळाल्याने कोण आपली पायरी सोडतयं ते स्पष्ट दिसतयं. मला कसल्याही पदाची किंवा अधिकाराची भूक नसून काम करायला जे पाहिजे ते मागितले होते, आता ते देण्याची सध्याच्या काही प्रचालकांची इच्छा नसल्यास मी काय करणार त्याला?
 • मी सक्रिय सदस्य म्हणुन बोललोय सगळ्यांच्या वतीने नाही. प्रचालक पदासाठी आवश्यक गांभिर्य आणि परिपक्वता टायवीन यांच्याकडे बिलकूल नाही हे वरील विधांनांवरून स्पष्ट होते.

यापूढे मला आता मूल्यांकनाच्या दिवशीच बोलायाचे आहे, तेव्हा हवा तो गोंधळ घाला सद्भावनेच्या नावानी टायवीन यांनी घालावा सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! २२:०१, २९ ऑगस्ट २०१८ (IST)

ता. क. टायविन यांचा उताविळपणा एवढा वाढला आहे की, त्यांनी मी लावलेले साचे कुठलेही कारण न देता किंवा चर्चा न करता फ़क्त काढलेच नाही तर Athletics abbreviations Bot Bombay या पानांवर संपादन युद्ध सुरू केले आहे. त्यामुळे सत्ता न मिळाल्यास चवताळणे कोणी केले आहे हे उघड आहे. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! २२:२०, २९ ऑगस्ट २०१८ (IST)

येथे दोन-तीन गोष्टी स्पष्ट करीत आहे
१. काम करण्याच्या आड प्रक्रिया कधीही येऊ देऊ नका. हा फॉर्म भरला का? तिथून शिक्का मारला का? या साहेबांची सही आणली का? ही असली थेरे करायला आपण सरकारी कार्यालय नाही आहोत.
काम करणे सुरळित होण्यासाठी प्रक्रिया गरजेची आहे पण प्रक्रिया हेच काम नाही. <-- हे येथेच नाही, इतर ठिकाणीही लक्षात घ्या. खूप फायदा होईल.
२. काम करण्यासाठी प्रक्रियेत फेल-सेफ[मराठी शब्द सुचवा] आणि मर्यादित कालावधीसाठी बदल करणे हितावह आहे. प्रक्रियेकरता काम अडून पडले आणि मग सदस्यांचा इंटरेस्ट गेला किंवा सदस्यच गेला तर काम तसेच राहणार. फुकटची कामे करणाऱ्यांना नसत्या प्रक्रिया पार पाडायला न लावता त्यांच्याकडून अधिकाधिक काम करुन घेणे हेच येथे पाहिजे.
३. प्रक्रियेतील बदलांचा कोणी गैरफायदा घेतला तर त्यावर कडक कार्यवाही करावी आणि पुढे असे प्रक्रियाबदल जपून करावे. अझ्यूम गुड फेथ या तत्त्वाचा पुरस्कार करावा आणि ट्रस्ट बट व्हेरिफाय हे तत्त्वही लावावे.
वरील एक उदाहरणातील बदल करण्यासाठी Gnome-edit-redo.svgTiven2240: यांनी माहिती गोळा करावी आणि नंतर मला संदेश द्यावा त्यात बदलांचा आराखडा (बदल नव्हेत) द्यावा. त्यानंतर २४ तासांसाठी हा अधिकार त्यांना दिला जाईल. जर असा अधिकार (२४ तासंसाठीही) न देता वरील बदल घडवून आणणे कोणाला शक्य असल्यास कळवावे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १९:१२, ३० ऑगस्ट २०१८ (IST)

पुन्हा एकदा[संपादन]

वैयक्तिक हमरीतुमरी सुरू झालेली आहे. किती वेळा हे चालणार? यापुढे वैयक्तिक हेवेदावे दिसल्यास लगेचच काढून टाकण्यात येतील याची नोंद घ्यावी.

Gnome-edit-redo.svgSureshkhole:, जर मूल्यांकनाच्या वेळी लिहायचे असेल तर ते येथे दोन-तीनदा लिहून पुन्हा नंतर बोलेन असे लिहिण्यात काय हशील? हे म्हणजे काम करुन पुन्हा नामानिराळे होण्याचा प्रकार आहे. जर मूल्यांकन करायचे तर करा पण करीत नसल्याचा आव नको. याशिवाय, इतर ठिकाणी चाललेल्या संपादनयुद्धाचा तांत्रिक प्रचालक अधिकाराशी संबंध नाही. मुद्दे एकमेकात घोळू नयेत.

Gnome-edit-redo.svgTiven2240:, कोणत्या सदस्याने कोणाची वकिली केली याचा येथील मुद्द्याशी काय संबंध? येथे त्याचा उल्लेख कशाला?

येथे शब्दाने शब्द वाढतो आहे. हे अनेकदा झाले आहे. लगेचच थांबवा.

अभय नातू (चर्चा) १९:१२, ३० ऑगस्ट २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgअभय नातू: आपले मत दिल्याबद्दल धन्यवाद. या चर्चेत फक्त २ लोक आहेत आणि ज्यांच्या संदर्भात हे आहे त्यांना त्याबद्दल ठाऊक आहे. ही विनंती तांत्रिक प्रचालक या संदर्भात होती आणि पुन्हा नेहमी प्रमाणे त्याची दिशाभूल केले गेले आहे. असं नाही की त्यांना तांत्रिक प्रचालक काय आहे व त्यांनी काय फायदा विकिपीडियाला होईल याबद्दल माहिती नाही, परंतु टायविन हे तांत्रिक प्रचालक नाही झाले पाहिजे हे त्यांचे स्पष्ट मत आहे.(इतना प्यार😊) असो सर्वांचे वेगळे वेगळे मत असते. माझे मते २ वेळी त्यांनी गंभीर परस्तीती त्यांनी निर्माण केले आहे आणि त्यांना मी ताकीद सुद्धा दिली आहे आणि गंमत अशी की ते मला धमकी देतात की ते माझ्यावर कारवाही करतील. तरीही त्यांच्यात अझुम गुड फाइथ मी ठेवले आहे. या पुढे त्यांना गुड फेथच्या नावांनी मी तर आसरा देणार नाही याची आपण माहिती घ्यावी. असते; एका वेळी, दोन वेळी, परंतु हे तर चालू आहेत आणि आपली समुदायाच्या नावांनी फक्त मोठे मोठे बोलतात. (पेट्रोलर हे तर मुख्य उधारण आहे). ते विकिपीडियावर संपादन नाही तर दुसर्यांना त्रास देण्यासाठी आहेत. आणि त्यांचे मनाप्रमाणे झाले नाही तर मग त्याचे खेळ चालू. (पुढे कारवाही करण्याची धमकी). ते प्रचालकांना आपले गुलाम समजतात की ते जसे बोलतील तसे प्रचालक करतील. जे सदस्याला Bot या पानाचे मराठी मध्ये पुनर्निर्देशन का केले आहे याची जाणीव नाही त्यांच्याबद्दल अझुम गुड फेथ ठेवून काय फायदा हे तर मूर्खपणा आहे असे मला वाटते. मूल्यांकनाच्या वेळ येईल तेव्हा पाहूया परंतु त्यांना घाई झाली आहे की त्यांना त्याची संधी/भाव कधी भेटेल. साईटोईड शिवाय त्यांनी मराठी विकिपीडियाला काहीही तांत्रिक बाबतीत मदत केली नाही परंतु मी तांत्रिक प्रचालक नाही झाले पाहिजे यासाठी समुदायाचे सर्वात सक्रिय सदस्यांच्या वतीने बोलण्यास ते प्रथम उभे आहे. ते सक्रिय फक्त चर्चेत आहेत, टायविनला चर्चापानावर इंग्लिश मध्ये धमकी देण्यास आणि त्याचे पुरावे शोधणे ज्याचे आतापर्यंत काहीही फायदा झाले नाही. ते फक्त सुरेश आहेत त्यामुळे मराठी विकिपीडियावर ३ सक्रिय सदस्य कंटाळून संपादने सोडली आहेत आणि याला पुरावेची गरज नाही ते प्रचालक आणि प्रशासक सर्वांना माहीत आहे. मला आता पर्यंत समजले नाही की ते मराठी विकिपीडियाचे प्रचालक टायविनला इंग्लिश शिकवतात की चाचणी घेण्यात की त्याला इंग्लिश येते की नाही? असो व्यक्तिगत तर बोलायचे नाही परंतु नेहमी प्रमाणे गुड फेथ च्या नावाने चर्चा बंद करूया नेहमी पुन्हा काही नवीन मुद्यावर हे तर चालू राहील. त्यांची सवय मी तर बदलू शकत नाही परंतु सगळ्या गोष्टींत त्यांचे फुकट सल्ला घेण्यास शोभा देत नाही. त्यांचे असे बोलणे आहे की प्रचालकला मराठी चांगली येत नाही त्यामुळे ते तांत्रिक प्रचालक बनण्याचे लायक नाही हे तर स्पष्ट मूर्खपणा आहे. असो त्यांना प्रचालकपद हे मुकुट वाटते परंतु जबादारी त्यांच्या स्वभावात दिसत नाही. असो जसे मी म्हटले की मी त्यांचे मन तर बदलू शकत नाही परंतु माझे प्रचालकीय कामात अडथळा निर्माण केली तर त्यांना मी बक्षणार नाही. धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २१:३५, ३० ऑगस्ट २०१८ (IST)
Gnome-edit-redo.svgअभय नातू, V.narsikar:

पुन्हा वैयक्तिक आरोप केला जातोय आणि अनावश्यक मुद्दे समोर आणले जात आहेत जसेकी,

 • माझे योगदान काय? आपण प्रचालक आहात तपासून पहा काय योगदान दिले आहे मी? वैयक्तिक आरोप नकोत!
 • मी सक्रिय सदस्यांपैंकी आहे की नाही? - वैयक्तिक आरोप!
 • प्रताधिकार भंग आणि उत्पाती सदस्यांवर कारवाईची मागणी - त्रास देणे म्हणून? - वैयक्तिक आरोप!
 • माझी इंग्रजी - पुन्हा वैयक्तिक आरोप?
 • मी प्रचालक होण्याची इच्छा कधीच व्यक्त केलेली नाही, तरीही टायवीय यांना मला प्रचालक व्हायचे आहे असे का वाटते आहे? तसे असते तर मी सोज्वळ राहिलो असतो आणि गोडगोड बोललो असतो. - वैयक्तिक आरोप आहे.
 • मला माझे प्रताधिकार भंग आणि निरिक्षकाचे काम करण्यात जास्त रस आहे. - - वैयक्तिक आरोप!
 • माझ्यासाठी दोनदा मुर्ख हा शब्द टायवीनने वापरलेला आहे - शिविगाळ

माझ्यावर सूडबुद्धीने आरोप केल्याबद्दल, टायवीन यांनी अपमानास्पद वागणूक केल्या बद्दल आणि प्रचालक पदाचा गैरवापर करून मला धमक्या दिलेल्या आहे, हे सूड-सत्रच सूरू केलेले आहे, ह्याबद्दल टायविन यांनाच अवरुद्ध करण्यात यावे आणि अशी मी विनंती करत आहे.

 • तांत्रिक प्रचालकाची विनंती फ़ेटाळण्यासाठीची योग्य पार्श्वभूमी टायविन यांनी स्वत:चा उद्दामपणा दाखवून पुन्हा एकदा केलेली आहे. वरील टायवीन यांच्या उपरोक्त विधानानंतर माझा त्यांच्याबद्दल असलेला उरला सुरला सगळा विश्वास संपलेला आहे. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! २२:३७, ३० ऑगस्ट २०१८ (IST)


टायवीन खरे आहे.केवळ आणि केवळ सुरेश खोले यांच्यामुळेच मी मराठी विकिपीडिया संपादन थांबवले आहे. मी लेखावर काम करत असतांना त्यात व्यत्यय आणून मला मुद्दाम उकसवण्याचा प्रयत्न केला. व प्रशासकांनी काम चालू साचा लावून मी संपादन करत असताना खोले यांनी मला संपादनात आडथळा आणला तरी खोले यांनाच मोकळे रान दिले.
सदर सदस्यानी मराठी विकिपीडियाचे खूप नुकसान केले आहे. अनेक लोक त्यांना कंटाळले आहेत.चर्चा आणि तीही नेहमीच भांडणाच्या आवेशाने यामुळे सदस्य कंटाळले आहेत.
खोले यांना कायम ब्लॉक करणे हे मराठी विपि साठी हितावह आहेच. तो सुदिन लवकर येवो.. सत्य परेशान हो सकता है पराजीत नही. परंतु तो पर्यंत आनेकार्थी नुकसानच..
मी तरी खोले आहेत तो पर्यंत संपादन इच्छा असूनही बंद ठेवाणार आहेच. प्रसाद साळवे (चर्चा) ०६:४९, ३१ ऑगस्ट २०१८ (IST)
खोलेंमुळे मराठी विकिपीडियाला नुकसान होतेय व होत राहिल, हे मी अनेकदा नोंदवलेय. ते आपली मते सतत भांडखोर वृत्तीनेच मांडतात, त्यामुळे अनेक सदस्य त्यांना परेशान झालेले आहेत. "त्यांची चूकी झाल्यावर त्याबद्दल माफी मागायला ते कमी करत नाही..." असे काहीतरी त्यांनी लिहिले होते, पण प्रत्यक्षात वारंवार चूका करूनही त्यांनी माफी मागितली तर नाहीच पण त्या चूका केल्याचेही अमान्य करत राहिले!! सध्या सहीसोबत "संदर्भ द्या" वगैरै लिहिलयं, पण इथेही ही तीच समस्या, संदर्भ देऊनही खोले त्यांना खरे मानायला तयार नसतात!! त्यामुळे ह्या त्यांच्या दोन्ही बाबीं पुरत्या फसव्या आहेत. स्वत:ला गैरसोयीची वाटणारी पण योग्य असणारी अनेक मजकुरे त्यांनी लेखांतून काढली आहे, व त्यावर स्पष्टिकरण मात्र दिलेले नाही (मी सिद्ध केले आहे). या सर्वांमुळे खोलेंना विकिपीडियावर ब्लॉक करने आवश्यक आहे.--संदेश हिवाळेचर्चा ०९:२४, ३१ ऑगस्ट २०१८ (IST)
Gnome-edit-redo.svgअभय नातू, V.narsikar, सुबोध कुलकर्णी: इथे परत शिष्टमंडळाची हमरातुमरी झालेली चुकली बहुधा अरेच्या दुःख होतंय ! आणि एवढं सगळं होऊन मनमानी कारभार सुरूच आहे! अभय नातू तुमच्यासारखा देव मनुष्य तुम्हीच! एवढ कसा सहन करता तिकडे सुबोध काहीतरी नीट बोलला तर नेसरीकर ने ते फक्त प्रचालकांना प्रबांधित केलं हीच का ती कलयुगातली लोकशाही! अभय अजब तुझं सरकार आणि लोकांना दिलेलं अभय !!!! ( https://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया_चर्चा:कौल/माजी_प्रचालक ) सत्य जर अस्तित्वात असेल व जनाची नाही आणि मनाची असेल तर अशा लोकांनी पदाचा त्याग करावा. अभय रावांनी व नेसरकारांनी याना अभय दिलंच आहे. आता सत्याचा चेहरा दाखवीला म्हणून मला कदाचित बॅन करतील पण अर्वाच्य भाषा वापरणारे असेच पदांची मजा घेतील या पानांचे स्क्रिनशॉट घेतलेले आहेच हे जर नीट घडला नाही व हि लोक कारवाईस पात्र ठरली नाहीत तर हे लवकरच विविध वृत्तपत्रास पाठविलं जाईल हे लक्षात ठेवा. विकिपीडिया हि कोणाचीही वैयक्तिक जहागिरी , मालमत्ता, जाहिरात किंवा वाद घालण्याचे ठिकाण नाही, हे चांगल्या गोष्टी, कार्य , घटना, जतन करण्याची जागा आहे ! यावर लेखी उत्तर व त्वरित कारवाईची अपेक्षा करत आहे, तसेच ती केल्यास जाहीर करावे हि विनंती करीत आहे ! या टायवेनं व खोलेनी वैयक्तिक द्वेषाने माझा आय डी बॅन केल्याने हा मेसेज नवीन खोटा आय डी ना बनविता टाकला असे. (103.51.153.82 ११:०२, १४ ऑक्टोबर २०१८ (IST))

विकिपीडिया चर्चा:कौल/माजी प्रचालक इथे जवाब दिले आहे --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:१४, १४ ऑक्टोबर २०१८ (IST)

विकिपीडिया चर्चा:कौल/माजी प्रचालक इथे उत्तर (जबाब नाही !) दिलेले आहे! गेट वेल सून महाशय!!! (103.51.153.82 १८:४०, १४ ऑक्टोबर २०१८ (IST))

Discussion regarding bot[संपादन]

Since I can read and understand (a little bit) Marathi but can't talk. So, I am writing my message in English only. I got a message on my hiwiki user talk page. In that message, it is said that bot accounts with no activity from a long time should be removed from bot flag. I think this is a very good decision if those bots are not working on any wiki because that account can be hacked and can make destructive work. But if bot and bot user both are active on some wikiprojects shouldn't come in this category. Even if your policy is saying that flag should be removed from such accounts, I don't have any problem. Since, my bot is also inactive on mrwiki from long time. I can do the from my bot if you have something for me. If you don't have any work for my bot, you can remove the bot flag, I don't have any problem. (Bot account: user:sanjeev_bot)☆★संजीव कुमार (बातें) ००:३६, २९ सप्टेंबर २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgसंजीव कुमार: Thank you for your reply regarding inactive bot that I had added on your talk page. As I look forward your bot has done constrictive edits to this wiki and we hope that it will continue. Our motive is to remove out all the unnecessary flags on this wiki and as said in the message if the bot owner needs to continue it may inform the administrators/bureaucrats here and you have done so. Please provide us a consent that you want to continue your bot operation on this wiki so we may retain your flag. Again thanks for your contributions. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०७:३७, २९ सप्टेंबर २०१८ (IST)
Gnome-edit-redo.svgTiven2240: I am not saying to continue flag. Since, my bot can do few things:
 1. Can fix redirect (there is also other bot is doing the same, so my bot is not required for this.)
 2. Can mark for deletion the pages which are redirected on non-existing/deleted pages. (If you wish, but for this, I need your permission, as I have seen that your wiki don't want delete suggestions from the people who don't know Marathi.
 3. Can do anytype of replacements. (Since, I don't know Marathi so this can be done if someone ask for.) I think you have such bots, if yes, my bot doesn't need flag.
 4. Can remove non-required templates (as did in past) and add few required templates (as I did yesterday).
 5. Can fix redirected categories. Since, your wiki is also have bots for that.
So, according to above, my bot can do only one thing (point 2) which is pending on your wiki. If you wish, I can do that otherwise, it is better to remove bot flag. If I will need in future, I shall ask for it again.☆★संजीव कुमार (बातें) १५:१५, २९ सप्टेंबर २०१८ (IST)

मराठी विकिपीडियावर प्रचालकांची आवश्यकता व त्यांची कौशल्ये[संपादन]

सादर नमस्कार !

मी प्रथमच असे काही निवेदन येथे देते आहे, परंतु २०१६ पासून सातत्याने सक्रिय सहभाग देत असल्याने आपणही काही नोंदवू शकतो आणि इतर संपादक प्रगल्भतेने आणि वैचारिक अधिष्ठान असलेल्या पातळीवरून याकडे पाहतील अशी अपेक्षा आहे. हे निवेदन प्रचालकांना आहे तरीही विकीच्या पारदर्शकतेमुले सर्वजण हे वाचू शकतील. मला इंग्रजी विकीवरची धोरणे माहिती नाहीत तथापि मराठीचा वाढता वाचकवर्ग पाहता येथे आपण हे करू शकू काय असे वाटते-

१.अशा निर्णय प्रक्रियांमध्ये सर्वांना सहभागी करण्यापेक्षा जे नियमित सक्रिय आहेत अशा संपादकांच्या मतांचा विशेष आदर केला जावा कारण ते येथे रोज अनुभव घेत असतात, योगदान देत असतात. या विकीवरील अनेक नावे मी बाहेर ऐकते पण ही मंडळी मला अडीच वर्षात एकदाही इथे फिरकलेली दिसलेली नाहीतंं. असे असताना नियमित सहभाग देणया व्यक्तींच्या मतांचा आदर हा व्हायलाच हवा असे वाटते.

२. एकूणातच तांत्रिक कौशल्ये आणि संपादकीय कौशल्ये असलेल्या अधिक व्यक्ती येथे लागणार आहेत असे जाणवते आहे, नव्हे ती गरज निर्माण झालेली आहे.

३. त्यामुळे या विकीवरील वैविध्यपूर्ण संपादक पाहता त्यांची त्यांची बलस्थाने ओळखून त्यांनी प्रचालक पदासाठी अर्ज करावेत आणि त्यांना आपल्या बलस्थानाव्यतिरिक्त आवश्यक असलेल्या पण येत नसलेल्या बाबी अन्य सदस्यांनी शिकविण्यात मदत करावी किंवा परस्पर पूरक होऊनही हे काम करता येणे येथे कठीण अजिबात नाही. आणि इतर सदस्यनी कुरघोडीच्या भूमिकेतून बाहेर येत अशा सदस्यांना निवडून द्यावे.कंपूशाहीचे राजकारण फार अनुभवाला येते आहे दुर्दैवाने!

४. सर्वच प्रचालकांनी परस्परांना मदत करत आणि संपादकांशी अनाठायी भांडणे न करता हा विकी समृद्ध करणयास हातभार लावावा.

मी थोडे स्पंष्ट आणि परखड लिहिले आहे पण त्याशिवाय माझया अनुभवाच्या अंती तयार झालेले मत नेमक्या शब्दात मांडणे मला शक्य झाले नसते.

पुनश्च एकदा विनंती ज्यांना हे वाचून यातील मतितार्थ लक्षात येईल त्यांनीच नोंदवावे काही. मला अनाठायी वाद करण्यात वेळ घालविण्यापेक्षा अनेक लेख संपादन करण्यासाठी समोर दिसत आहेत. धन्यवाद! आर्या जोशी (चर्चा) १६:३६, १६ ऑक्टोबर २०१८ (IST)

सदस्य:संदेश हिवाळे यांना कायमचे अवरुद्ध करण्याबाबत[संपादन]

Gnome-edit-redo.svgV.narsikar, अभय नातु:

 • मी आधीही अनेकदा हिवाळे यांच्या बद्दल तक्रार केलेली आहे अनेक इतर सदस्यांनीही अशी तक्रार केलेली आहे. हिवाळे यांच्या उत्पाती, न ऐकण्याच्या स्वभावामूळे अनेकदा अनेक सदस्यांना मनस्ताप झालेला आहे. शिवाय त्यांनी केलेला प्रताधिकार भंग इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की अजुनही तो पूर्णपणे काढला गेलेला नाही.
 • सध्या विनोदी निबंधावर हिवाळे यांनी केलेला उत्पात आणि इतर विकींवर हिवाळे कळसूत्री खाते चालवण्यासाठी आणि उत्पातासाठी कायमचे अवरुध्द केले गेलेले आहे.
 • मराठीवर सगळ्यात जास्त वादग्रस्त केलेला आंबेडकरांचा लेख श्री हिवाळेंच्या उपकारामुळेच अडकलेला आहे. तेव्हा त्यांना ताबडतोब अवरुध्द करण्यात यावे. यापूढे आपल्याला त्यांचा त्रास सहन करण्याचे मला एकही कारण दिसत नाही. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १७:२०, १६ ऑक्टोबर २०१८ (IST)

Tiven2240 यांना कायमचे अवरुद्ध करावे[संपादन]

Gnome-edit-redo.svgअभय नातू, V.narsikar:

 • सांगकाम्या Narayanbot1 शी माझ्या सदस्यखात्याचा कोणताही संबंध नसताना Tiven2240 यांनी मी Narayanbot1चा चालक असल्याचे विकिसमुदायासमोर लिहिले असल्याचे मी आज येथे पाहिले. मी त्याचा चालक नाही हे त्यांना समजावण्याचा येथे प्रयत्न केला परंतु तरीही मीच त्याचा चालक असल्याचे जाणीवपूर्वक ते विकिसमुदायाला भासवत असल्याचे दिसत असून माझी विकिपीडियावर मानहानी करत आहेत तरी यासाठी त्यांना अवरुद्ध केले जावे. -- संतोष दहिवळ (चर्चा) २२:२५, २२ नोव्हेंबर २०१८ (IST)
तुम्ही येथे समजावण्याचा प्रयत्न केलेला दिसत नसून मानभावीपणे ताशेरे ओढलेले दिसत आहेत. तुम्हाला बदल करण्याचे आवाहन केल्यावरही तुम्ही ते न करता अधिक चर्चाच चालून ठेवली. याशिवाय यात मला गोवण्याचा प्रयत्नही केलेला दिसत आहे.
तुम्ही तेथे सरळ शब्दांत संवाद साधावा. प्रस्तुत विषयवस्तु सोडून इतर गोष्टी मध्ये आणू नयेत. असे झाल्यावरही सहकार्य न झाल्यास तेथे संदेश द्यावा.
तेथील संवादावरुन कोणाला अवरुद्ध करावे हे सध्या नेमके ठरविता येत नसल्याने अवरुद्ध करण्याचे पाउल उचलत नाही आहे.
अभय नातू (चर्चा) २३:४८, २३ नोव्हेंबर २०१८ (IST)

तपासणी[संपादन]

प्रचालक, कृपया २००३ नोम पेन्ह दंगलीसिंगापूरमधील संस्कृती हे विकिपीडिया आशियाई महिन्यात तयार झालेले लेख गुण मिळवण्यास पात्र आहेत की तपासा. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) ०७:४४, १३ डिसेंबर २०१८ (IST) (आयोजक व आंतरराष्ट्रीय गटातील सदस्य)

Gnome-edit-redo.svgअभय नातू, V.narsikar:,यामागची पूर्ण पार्श्वभूमी न मांडता आपल्याला तपासणी करण्यास आवाहन केले आहे. आपण हे जाणून घेण्याकरता माझ्या चर्चा पानावरील हा विभाग पहावा ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:३९, १३ डिसेंबर २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgTiven2240: मला वैयक्तिकरित्या लेख बरोबर वाटत आहेत.Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी: मला मोबाईलवरून सखोल तपास शक्य नाही. दुसरे असे कि आपण वर दिलेला दुवा उघडत नाही.Gnome-edit-redo.svgTiven2240, सुबोध कुलकर्णी: हा वाद शक्यतो आपले दोघांचे स्तरावरच सोडवावा.यात प्रचालकानी/प्रचालकांनी दिलेला निर्णय दोन्ही बाजूस मान्य राहील काय हा वादाचा मुद्दा आहेच.निर्णय काहीही असला तरी विरूद्ध बाजूस पटेल काय? कोणत्याही वादात हा प्रश्न असतोच.मग काय जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, अत्यूच्च न्यायालय सुरू.Gnome-edit-redo.svgअभय नातू: माहितीस्तव.वि. नरसीकर , (चर्चा) १६:४८, १३ डिसेंबर २०१८ (IST)

संदर्भाशिवाय लेख न लिहिण्याचे आवाहन[संपादन]

सादर नमस्कार ! मधल्या काळात सर्व सामाजिक माध्यमांवर एक चित्रफीत फिरत होती, येथील सर्वानी ती पाहिली असेलच. विकिपीडियाच्या संस्थापकाना ज्ञानकोशाची आवश्यकता काजाणवली आणि त्यासाठी त्याने केलेले प्रयत्न असा हा प्रवास मांडला गेला आहे. असे असताना मराठी विकीवर अनेक संपादक नुसताच मजकूर चढवून ठेवतात जो विनासंदर्भ असतो. मी स्वतः अशा अनेक लेखात फक्त योग्य संदर्भ जोडण्याचे काम केले आहे, करीत असते. आपण नव्या जुन्या सर्वच संपादकांना यासाठी आग्रह धरणे आवश्यक वाटते आहे. आता संदर्भ जोडण्याचे साधनही आपल्याकडे आहे. google books चे संदर्भ शोधणे आणि जोडणे कठीण नाही. जरा सर्वानीच सकारात्मक दृष्टीने पाहूया. ज्ञानकोशाचे संपादक म्हणून अभिमान बाळगताना आपण योग्य पद्धतीने आणि जबाबदारीने जगाला ज्ञान पोचवतो आहोत की केवळ स्वतःचे हौस म्हणून हे करीत आहोत याकडे प्रत्येकाने लक्ष द्यायलाच हवे. धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा)`

If we look at the guidelines about references, they tell clearly about what needs to be referenced. If I am not wrong, what needs to be referenced is following - "the information which is challenged or which is likely to be challenged, needs to be referenced." So if one challenges some information and a secondary reference cannot be provided, that information can be and should be removed. For medical articles, tertiary source needs to be cited like review articles. Kindly feel free to discuss about it. Thanks. -- डॉ. अभिजीत सफई १४:४४, ५ जानेवारी २०१९ (IST)

हे पानही पहा,QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ००:१५, ७ जानेवारी २०१९ (IST)

रोलबॅक अधिकाराबाबत[संपादन]

 • Gnome-edit-redo.svgअभय नातू:, मराठीवर उत्पाताशी लढण्यासाठी रोलबॅक अधिकार नाहीत, तसा सदस्य गटच कधी तयार केला गेला नाही. किंवा कुणाला तसे अधिकार दिले गेलेले नाहीत. तेव्हा, असा गट निर्माण केला जावा आणि तो अनुभवी सदस्यांना दिला जावा ही विनंती.
 • मला सध्या हिंदी, विकिडाटा, आणि इंग्रजीवर हे अधिकार कायमस्वरुपी मिळालेले आहेत, त्यामुळे मला हे अधिकार वापरण्याचा निटसा अनुभव आहे.
 • मराठीवर हेच काम मी ट्विंकल वापरून करतो, त्याची ही माहिती
 • Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी:Gnome-edit-redo.svgआर्या जोशी:Gnome-edit-redo.svgPooja Jadhav:Gnome-edit-redo.svgज्ञानदा गद्रे-फडके:Gnome-edit-redo.svgसुशान्त देवळेकर: यांनी यावर आपली मते द्यावीत, उत्पात परतवणे आणि लेख त्याच्या उत्तम आवृत्तीला परतवणे ही कामे करण्यासाठी हे अधिकार सर्रास इतर विकिंवर वापरले जातात. मराठीवर असा सदस्य गटही तयार केला गेलेला नाही व असे अधिकार तर कधीच दिले गेलेले नाहीत. तेव्हा यावर पुढील चर्चा होऊन हा सदस्य गट व अधिकार निर्माण करण्यात यावेत ही विनंती.
 • सध्या हेच काम ट्विंकलच्या सहाय्याने करता येते, त्याचे स्थानिकीकरणही मी केलेले आहे. पण मुळत: रोलबॅकर अधिकार असल्याने ते इतर अनेक अवजारांच्या सहाय्याने वापरता येतात व सहज हेच काम करता येते. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] २०:०२, २२ जून २०१९ (IST)

पाठींबा - Gnome-edit-redo.svgअभय नातू: सध्या मोबाईलवर नुसत्या आयपीवरून अनेक चुकीची संपादने केली जात आहेत. तसेच एकच सक्रीय प्रचालक आणि अपुरे सजग संपादक असल्याने व्यवस्थापन मनुष्यबळ तयार करणे आवश्यक आहे. तरी सहा महिन्यांसाठी QueerEcofeminist यांना हे काम करण्याची संधी दिली जावी असे माझे मत आहे.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:३५, ९ जुलै २०१९ (IST)

पाठींबा - Gnome-edit-redo.svgअभय नातू:QueerEcofeminist हे चांगल्या पद्धतीने नवनवीन सन्कल्पना शिकून घेत मराठी विकीच्या व्यासपीठावर सुधारणा करण्यास उत्सुक आहेत. त्याना अशी संधी देण्यात यावी असे मला वाटते. --आर्या जोशी (चर्चा) १४:४४, ९ जुलै २०१९ (IST)

Gnome-edit-redo.svgQueerEcofeminist, सुबोध कुलकर्णी, आर्या जोशी:
नमस्कार,
रोलबॅक करणे हा पटकन होणारी क्रिया आहे. हे करताना चुकून एखादे वेळेस नको असलेले (अथवा हवे असलेले) बदलही रोलबॅक होऊ शकतात. अर्थात ही चूक लक्षात आल्यावर सुधारताही येते परंतु या प्रक्रियेत संपादकांचे गैरसमज होउन अनेकदा नसते वादविवाद होण्याची मोठी शक्यता आहे.
सदस्य QueerEcofeminist यांचे पूर्वी अनेकदा अनेक सदस्यांशी तंटे झालेले आहेत. यात खरे कोण, खोटे कोण याची शहानिशा न करताही QueerEcofeminist यांचा पवित्रा अनेकदा टोकाचा असल्याचे दिसलेले आहे. यात इतर सदस्यांनी तेल ओतून हे वाद पराकोटीलाही नेण्याचीही उदाहरणे आहेत.
असे असताही त्यांनी हा अधिकार दिल्यावर असे वाद झाल्यास ते चिघळू नयेत यासाठीची हमी दिल्यास आणि खबरदारी घेतल्यास हा अधिकार द्यावा असे मला वाटते.
यासाठी एक सजेशन आहे की असा वाद उद्भवल्यावर जर काही जुन्या सदस्यांनी विनंती केली, तर QueerEcofeminist यांनी एखादा दिवस रोलबॅक करणे थांबवणे आणि वादास स्वल्पविराम (तरी) द्यावा असे वाटते.
हे लिहिण्यामागे मराठी विकिपीडियावर कमीतकमी घर्षण होउन महत्तम काम व्हावे हीच इच्छा आहे.
काही दिवसांनी सदस्यगट तयार करुन इतर सदस्यांनाही त्यात शामिल करुन घेता येईल.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०७:३६, १० जुलै २०१९ (IST)
Gnome-edit-redo.svgअभय नातू:
* परत एकदा आठवण म्हणून, माझ्याकडे इतर चार विकिंवर रोलबेकर अधिकार आहेत, शिवाय मी मराठीवर अनेकदा ट्विकलच्या मदतीने उत्पात उलटवत असतो त्यामुळे मराठीसारख्या ढिसाळ कारभार असलेल्या विकिच्या तुलनेत इंग्रजी विकिवरही मला रोलबेकर अधिकार न मागता न्यु पेज रिव्हूवरबरोबर मी त्याचा उपयोग करू शकतो असा अंदाज करून, म्हणून दिले गेले आहेत. (हे माझ्यावर घेतल्या गेलेल्या आक्षेपाला आणि आपल्या काळजीला उत्तर म्हणून लिहित आहे.)
* मी इंग्रजीवर तेच काम केले आहे जे मी मराठीवर करतो, किंबहुना मी मराठीपेक्षा कितीतरी जास्त प्रताधिकार भंग इंग्रजी आणि कॉमन्सवरून काढायला मदत केली आहे, मी कॉमन्सवर फक्त डिलिशन रिक्वेस्टच केल्या आहेत. त्यामुळे माझे तुम्हाला आग्रही आणि अतिरेकी वाटलेले काम वास्तविक इतर विकिंवर मला विश्वासू म्हणून प्रस्थापित करते. तेव्हा, नक्की इतर सदस्य आणि तंटे आणि रोलबेक कसा? कुठे वापरायचा ह्याची माहिती मला आहे की नाही? या प्रश्नांची उत्तरे आपण मला रोलबेक अधिकार देताना इतर विकिंवर प्रचालकांनी किती वेळ घेतला आणि काय प्रश्न विचारले आहेत, हे प्रत्यक्ष पाहून मिळवावीत.
* आपल्या माहितीसाठी इतर ठिकाणी मला हे अधिकार देताना इतर विकिवरच्या प्रचालकांनी काय प्रश्न विचारले किंवा किती वेळ घेतला हे आपणच बघावे. आपली काळजी नक्की कुठे आहे हे मला कळते. पण इतर चार विकिवरचे प्रचालक काय बघतात आणि हे अधिकार कसे दिले जातात हे पहाणे येथे आवश्यक आहे असे मला वाटते.
* इंग्रजीवर, हिंदीवर, विकिडेटावर, कॉमन्सवर धन्यवाद QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] २०:०८, १२ जुलै २०१९ (IST)
If a user has userrights on a particular Wikimedia project means he should get it on Marathi Wikipedia? Where is the usergroup community consensus for making this new usergroup and where is the requirements to be met for the same? There is no such demand of such userright as I see that there is only one person asking for it and if it is being created only for a benefit of just a certain user than I think this is unfair. It clearly smells hatcollecting. Thanking you. --Tiven2240 (चर्चा) २२:३३, १२ जुलै २०१९ (IST)
Gnome-edit-redo.svgQueerEcofeminist:
इतर विकिपीडियावर अधिकार दिले गेले ते तुमचे तेथील काम पाहून. ते तुम्हाला मिळाले यात आनंदच आहे. माझे लिहिणे हे तुमच्या मराठी विकिपीडियावरील इतरांशी झालेले वाद आणि त्यातील तुमचे इतरांशी संवाद न साधता थेट हमरीतुमरीवरे येणे याबद्दल आहे. त्याचा तुमच्या इंग्लिश किंवा इतर विकिपीडियांवरील अधिकारांशी संबंध नाही. इंग्लिश (किंवा इतर) विकिपीडियांवर येथील वाद याच प्रकारे झाले असते तर त्याचे पर्यवसान तेथे काय झाले असते याची कल्पना करता येते परंतु ते येथे आणण्यात हशील नाही.
तुमचे काम आग्रही, अतिरेकी आहे हे हे मी लिहिलेले नाही. उगीचच माझ्या तोंडी काहीबाही शब्द घालू नका. वाद झाल्यावर किंवा तुमच्या लिखाणावर साधा आक्षेप आला असता त्यावर तुमची उत्तरे काय असतात हे पाहून हे लिहिलेले आहे. लिखाणावर नाही. तुमची विश्वासार्हता इतर विकिंवर आहे हे वाचून आनंद वाटला परंतु मराठी विकिपीडियावर ही विश्वासार्हता परत मिळविण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ आणि प्रयत्न खर्ची घालावा लागेल, हे नक्की.
मी इतर विकिंच्या प्रचालकांचे काय पहावे याच्या सूचना दिल्याबद्दल धन्यवाद. यात मी हे पाहिले नाही हे तुम्ही गृहित धरत आहात. इतर विकिंवर काय होते याचे अंधानुकरण मराठी विकिपीडियावर केले जात नाही.
विकिपीडियावरील घटनांबद्दल न बोलता तुम्ही तुमची मागणी कशी self-evident आहे हेच तुम्ही सांगत आहात. तुम्हाला मी दिलेले सजेशन मान्य नाही आणि त्यात तडजोड करणेही मान्य नाही असे दिसते. त्याचा खेद वाटतो.
आपण येथे ट्विंकल आणि इतर प्रकारे मराठी विकिपीडियावर योगदान करीत आहात याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि हे चालूच ठेवाल ही आशा.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०९:१८, १४ जुलै २०१९ (IST)
Gnome-edit-redo.svgअभय नातू:
 • मुद्दा एक - मी हे नाकारात नाहीये कि, या अटींची मी पुर्तता करत नाहीये, मुळात मी हेच सांगतोय की, मला या अटीं आणि इतरही अनेक अटीं पुर्णपणे माहित आहेत.

असे असताही त्यांनी हा अधिकार दिल्यावर असे वाद झाल्यास ते चिघळू नयेत यासाठीची हमी दिल्यास आणि खबरदारी घेतल्यास हा अधिकार द्यावा असे मला वाटते. यासाठी एक सजेशन आहे की असा वाद उद्भवल्यावर जर काही जुन्या सदस्यांनी विनंती केली, तर QueerEcofeminist यांनी एखादा दिवस रोलबॅक करणे थांबवणे आणि वादास स्वल्पविराम (तरी) द्यावा असे वाटते.

* मुद्दा दोन - जर आपण माझी संपादने तपासलीत तर मी मराठीवर आधीच हे ट्विंकलच्या सहाय्याने हे काम करतो हे आपण आधीच जाणणे अपेक्षित होते, ते तसे मला तुमच्या आक्षेपात दिसलेले नाही. शिवाय, इतर सदस्यांशी मी कसा वागेन याचे आधीच आडाखे बांधणे यात काय हाशिल आहे हे मला कळत नाही.
* आपल्या अटींची आणि इतरही अनेक अटीशी बांधील राहूनच मी ट्विंकल वापरतो हेही माझ्या संपादन इतिहासावरून कळते. आपण माझा इतिहास तपासला आहे, असा आपला दावा आहे तरीही आपल्या हेही लक्षात आले नाही, याबद्दल खंत वाटते. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] ११:०३, १४ जुलै २०१९ (IST)
इतर सदस्यांशी मी कसा वागेन याचे आधीच आडाखे बांधणे यात काय हाशिल आहे
वर सांगितलेच आहे तरी पुन्हा सांगतो - आत्तापर्यंतचे वागणे पाहून आडाखे नाही तर असे होऊ नये ही आशा आणि झालेच तर त्यातून तुमचा वेळ, इतर सदस्यांचा वेळ वाया जाउ नये आणि मुख्यत्वे मराठी विकिपीडियावरील एकंदर वातावरण कलुषित होऊ नये यासाठीचा उपाय सुचवला आहे. याला आडाखे म्हणू नयेत.
इतिहास उघडच आहे. तुमचा ट्विंकल किंवा इतर उपकरणे वापरुन केलेली संपादने हा त्याचा एक भाग. इतरांशी झालेले वितंडवाद आणि त्यातील तुमचे लिहिणे/वागणे हा दुसरा. हा दुसरा होणार नाही ही आशा/अपेक्षा बाळगूनच तुम्हाला हा अधिकार देण्यासही माझी तयारी आहे (इतर सदस्यांना हे हॅट कलेक्शन वाटत आहे हा वेगळा विषय आहे.) परंतु तुम्ही तुमचा निवडक इतिहास नाकारित आहात. त्याहीपेक्षा त्यातून घालविलेला विश्वास परत मिळविण्यासाठीचे सजेशन दिलेले असताना त्यावर बोलणे सोडून माझ्यावर घसरत आहात. यातून पुन्हा एकदा तसलेच वाद घालीत वेळ घालविण्याची तुमची प्रवृत्ती दिसते आहे.
माझे अजून एक सजेशन आहे. माझ्या म्हणण्यावर दोन दिवस विचार करुन मग उत्तर द्यावे. आपण हा अधिकार मिळविण्यासाठी दोन पावले पुढे येणे आवश्यक आहे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ११:२२, १४ जुलै २०१९ (IST)

विरोध सदस्य QueerEcofeminist याच्यामुळे मराठी विकिपीडियाचा दर्जा अतिशय खालावलेला आहे तसेच भांडखोर वृत्तीमुळे विकिपीडिया संपादने कमी होत आहेत. दर्जा सुधारण्याच्या बहाण्याने सदर सदस्य दर्जा खालावत आहेत. अशा सदस्याला विकिपीडिया मराठीवरून कायम तडीपार केले जावे. तरी रोलबॅक अधिकार मिळण्यास मी तीव्र विरोध करतो. प्रसाद साळवे (चर्चा) १२:५३, १४ जुलै २०१९ (IST)