विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा/जुनी चर्चा ७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विकिपीडिया वेबसाईट वर इंग्लिश पेज इतकी माहिती का नसते....या साठी कुणी का काही करत नाही?[संपादन]

प्रिय मराठी बांधवांनो, चला एक चळवळ सुरु करू या....विकिपीडिया मराठी पेज समृद्ध करूया...पुढील पिढ्यांसाठी....मराठी जपण्यासाठी...

विकिपीडिया तांत्रिक प्रशिक्षण कार्यशाळा : टप्पा १ – गणित विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ[संपादन]

मराठी विकिमीडिया प्रकल्पांसाठी तांत्रिक मदत मिळण्याच्या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गणित विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यांनी CIS-A2K कडे पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यासाठी प्रस्ताव दिला होता. त्यानुसार दि.२७ व २८ नोव्हेंबर रोजी गणित विभागात कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यात ज्यांना सहभागी व्हावयाचे असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा व खाली नोंदवावे. येताना आपापला संगणक आणणे आवश्यक आहे. सदस्यांनी सध्या जाणवणाऱ्या तांत्रिक गरजा / अडचणीही खाली नोंदवाव्यात.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:३६, २३ नोव्हेंबर २०१७ (IST)

सहभाग[संपादन]

 1. मी सहभागी होऊ इच्छितो. सुशान्त देवळेकर (चर्चा) ११:२५, २३ नोव्हेंबर २०१७ (IST)

तांत्रिक गरजा[संपादन]

माझ्या मती प्रस्तुत तांत्रिक गरजा आहेत.

 • मराठी विकिपीडियावर एक ऑटोमॅटिक आर्काइव्ह सांगकाम्या असणे योग्य वाटते.
 • मराठी विकिपीडियावर एक ऑटोमॅटिक sign bot (हस्ताक्षर करणारे सांगकाम्या) असणे आवश्यक वाटते.
 • सदस्य:DatBot सारखे सांगकाम्या Resizes non-free images per the criteria मराठी विकिपीडियावर भविष्यात काम येऊ शकते.
 • AWB/अन्य सेमी ऑटोमॅटिक कार्य करणारे संधान फक्त सदस्य गटप्रस्तावित करू शकतील असे प्रयत्न (सुरक्षा वतीने).

--टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:०२, २३ नोव्हेंबर २०१७ (IST)

वाचले.विचार करून व अभ्यासून सांगतो.--वि. नरसीकर , (चर्चा) २०:२०, २३ नोव्हेंबर २०१७ (IST)

मला जाणवणाऱ्या तांत्रिक गरजा पुढीलप्रमाणे आहेत.

 1. संदर्भ देण्यासाठी पुरेसा सुटसुटीत साचा असावा. सध्या मराठी विकिपीडियावर संदर्भ देताना जो साचा वापरावा लागतो त्यात प्रत्येक वेळी पृष्ठक्रमांक देताना पूर्ण संदर्भाची नोंद परत करावी लागते. म्हणजे एकाच पुस्तकातील १० वेगवेगळ्या पृष्ठांचे संदर्भ वापरायचे असतील तर संदर्भसूचीत १० संदर्भ दिसतात. पण प्रत्यक्षात ते एकच संदर्भसाधन असते. उदाहरणासाठी त्र्यंबक शंकर शेजवलकर ही नोंद पाहावी. हे टाळण्यासाठी इंग्लिश विकिपीडियावरील Template:sfn हा साचा वापरला. पण त्यात काही भागांचे मराठीकरण झालेले नाही. तर काही गोष्टी नीट दिसत नाहीत. उदा. संकेततस्थळ केव्हा पाहिली त्याची नोंद इ. उदाहरणासाठी नारायण गोविंद कालेलकर ही नोंद पाहावी.
 2. साच्यात बदल कसा करावा; त्यासाठीची सामग्री कुठे असते ह्याविषयी मार्गदर्शन व्हावे. तांत्रिक ज्ञान नसलेल्या व्यक्तींना हे साचे वापरता येण्यासाठी पुरेसे मार्गदर्शन मराठीत उपलब्ध व्हावे.

सुशान्त देवळेकर (चर्चा) ११:४६, २३ नोव्हेंबर २०१७ (IST)

कृपया वर्ग:संदर्भ साचे हा वर्ग बघावा. त्यात संदर्भासाठी लागणारे विविध संदर्भ साचे आहेत.त्यातील विशेषत: 'स' या अक्षरांतर्गत असणारे साचे बहुतेक वेळेस संदर्भासाठी वापरले जातात हे आपणास माहितच असेल.मला वाटत आहे कि साचा:स्रोत पुस्तक हा साचा आपण म्हणतात तसा आपणास आवश्यक आहे.आपली परवानगी असेल तर मी त्र्यंबक शंकर शेजवलकरनारायण गोविंद कालेलकर या दोन्ही लेखात मी काही संपादन करू इच्छितो. म्हणजे नेमके काय घडत आहे ते कळेल.अर्थातच आपली परवानगी असेल तरच.--वि. नरसीकर , (चर्चा) २०:३५, २३ नोव्हेंबर २०१७ (IST)

नमस्कार, विकिपीडिया हा मुक्तच आहे त्यामुळे परवानगीचा प्रश्नच उद्भवत नाही. आपण त्या नोंदी पाहून मला काही सूचना करू शकलात तर बरेच होईल. आपण सुचवलेला स्रोत पुस्तक हा साचा मी आधी पाहिला होता. पण त्यात मला हवे असलेले बदल कसे करायचे हे मला कळले नाही. उदा. साच्यात पृष्ठ/ पृष्ठे अशी नोंद आहे. पण साचा वापरल्यावर संदर्भनोंदीत पान/ पाने अशा संज्ञा दिसतात. तसेच एखादे पुस्तक अनेक भागांत वा खंडांत असेल तर ती माहिती कशी द्यायची हे मला कळले नाही. सुशान्त देवळेकर (चर्चा) १३:४४, २४ नोव्हेंबर २०१७ (IST)

Gnome-edit-redo.svgसुशान्त देवळेकर:,
संदर्भ देताना वेगवेगळ्या पृष्ठांवर संदर्भ असतील तर त्यांसाठी त्या-त्या ठिकाणी वेगवेगळे संदर्भच द्यावे. असे केल्याने वाचकाला नेमका संदर्भ लगेच मिळेल. एखादा संदर्भ शोधण्यासाठी वाचकाने पूर्ण संदर्भसाधन पिंजून काढण्याची अपेक्षा ठेवणे बरोबर नाही. शेजवलकरांच्या उदाहरणात तेराव्या पानावर ते संस्थापकांपैकी एक असल्याचा संदर्भ/पुरावा आहे आणि पदवी का मिळाली नाही याची मिमांसा ७८व्या पानावर आहे. जर मला दोनपैकी एकाचाच पाठपुरावा करायचा असेल तर वेगवेगळ्या संदर्भांमुळे ते सोपे होते.
तरीही एकच संदर्भ (किंवा संदर्भसाधन) लेखात अनेक ठिकाणी वापरायचे असेल तर संदर्भाला नाव द्यावे आणि इतर ठिकाणी वापरावे. उदा. संदर्भाच्या पहिल्या वापराच्या ठिकाणी - <ref name="संदर्भसाधन">{{स्रोत पुस्तक|दुवा=.....}}</ref> आणि मग नंतरच्या वापराला फक्त <ref name="संदर्भसाधन"> इतके वापरले तरी पुरे.
एकाच ठिकाणी अनेक पृष्ठांचा संदर्भ द्यायचा असेल तर त्यासाठी पृष्ठे प्राचलात (पॅरामीटर) पृष्ठे=१४-१६, ७८, ८०-८९ असे द्यावे.
 
साचे हा थोडा क्लिष्ट प्रकार आहे. त्यातही अनेक साच्यांमध्ये वापरले जाणारे साचे हे जास्त, कारण एका बदलाने अनेक पानांचा बेरंग होण्याची शक्यता असते.
असे असताही तुम्ही याबद्दल शिकून घेण्याची तयारी दाखविल्याबद्दल धन्यवाद. मराठीत ही माहिती पाहिजे हे खरे आणि पाहिजे तितकी सध्या नाही हे सुद्धा मान्य. ती आणण्यास कोणी मिळाले तर पाहिजेच. नरसीकरजींनी यात थोडा प्रयत्न केला आहेच.
मी स्वतः इंग्लिश विकिपीडियावरील साच्यांबद्दलच्या नोंदींवरुन शिकलो आहे. मराठीत ही माहिती आणेपर्यंत इंग्लिश विकिपीडियावरील या नोंदीपासून सुरुवात करावी.
याबद्दल अधिक प्रश्न असले किंवा मी इतर काही माहिती पुरवू शकलो तर येथे किंवा थेट माझ्या चर्चा पानावर संपर्क साधावा. चर्चापानावरील संदेश लगेच कळतात उत्तर लगेच देता येते.
अभय नातू (चर्चा) ०८:४८, १ डिसेंबर २०१७ (IST)
Gnome-edit-redo.svgअभय नातू:, आपण सुचवलेल्या दुव्याबद्दल आभारी आहे. मी ह्या दुव्यावरूनच सुरुवात केली आहे. इतर व्यवधानांमुळे पुरेसा वेळ देता येत नाही. पण जमेल तितके करण्याची इच्छा आहे. मला काही अडले तर आपल्याला त्रास देणारच आहे.सुशान्त देवळेकर (चर्चा) ०१:०८, ३ डिसेंबर २०१७ (IST)

प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा २०१८:सहभागासाठी आवाहन[संपादन]

द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी - अॅक्सेस टू नाॅलेज (CIS-A2K)च्या वतीने २०१८ मधील कार्यशाळा २६ ते २८ जानेवारी या कालावधीत म्हैसूर येथे आयोजित केली आहे.

प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा - ट्रेन द ट्रेनर (TTT) कशासाठी?
ट्रेन द ट्रेनर हा निवासी प्रशिक्षण वर्ग आहे.विकिपीडिया सदस्यांमध्ये विविध कौशल्ये व नेतृत्व विकसित करणे हे उद्दिष्ट आहे.२०१३, २०१५, २०१६ व २०१७ मध्ये असे वर्ग आयोजित केले गेले.

कोणासाठी?

 • कोणताही विकिमिडिया सदस्य,कुठल्याही भाषेत काम करणारा
 • ज्यांची ५००+ संपादने झाली आहेत
 • पूर्वी अशा कार्यशाळेत सहभागी न झालेले

सदस्यांनी पुढील लिंकवर असलेला गुगल फॉर्म भरावा. प्रवास, निवास व इतर खर्च CIS तर्फे केला जाईल.
आपणही अधिक तपशील पहा व सदस्यांना जाण्यासाठी प्रेरित करा.
मेटावरील लिंक - CIS-A2K/Events/Train the Trainer Program/2018

काही शंका अथवा स्पष्टीकरण हवे असल्यास जरूर संपर्क करा.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:०५, ३० नोव्हेंबर २०१७ (IST) प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेसाठी जरूर नक्कीच येईन. अशा प्रशिक्षणाची नक्कीच गरज आहे. त्यामुळे नव नवीन माहिती मिळती. आणि त्यामुळे चागल्या प्रकारे लेखन करू शकतो.

 1. --117.200.208.145 १५:२६, १८ जानेवारी २०१८ (IST)

भारतीय भाषा विकिपीडिया सहकार्य प्रकल्प[संपादन]

नमस्कार,
सदर प्रकल्पाचे निवेदन पूर्वी विकिपीडिया:चावडी/प्रगती वर इथे प्रकाशित केले आहे. भारतीय भाषांमधील विकिपीडियामध्ये उत्तम ज्ञाननिर्मिती होण्यासाठी विकिमिडिया प्रतिष्ठान व गुगल यांनी CIS-A2K, Wikimedia India Chapter आणि विकिपीडिया सदस्य गट यांच्या सहकार्याने हा पथदर्शी प्रकल्प आखला आहे. यामध्ये सक्रीय संपादकांना संगणक,इंटरनेट इ. साहित्य सुविधा पुरविणे तसेच लेखन स्पर्धा आयोजित करणे अशा उपक्रमांचा समावेश आहे. सध्या असणाऱ्या अडचणी व गरजा यांची माहिती संकलित करण्यासाठी सर्वेक्षण प्रश्नावली तयार केली आहे. आपण पुढील दुव्यावर क्लिक करून ही प्रश्नावली अवश्य भरावी व इतरांना प्रवृत्त करावे ही विनंती.

विनीत, सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:००, १८ डिसेंबर २०१७ (IST)

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी विकिपीडिया संपादन प्रशिक्षण कार्यशाळा २०१८[संपादन]

दि.१ जानेवारी २०१८ ते १५ जानेवारी २०१८ ह्या कालावधीत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवढ्यानिमित्ताने राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध ठिकाणची महाविद्यालये आणि विद्यापीठे ह्या ठिकाणी मराठी विकिपीडिया संपादन प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी काही कार्यशाळा सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी संस्थेच्या (सीआयएस) संयुक्त विद्यमाने घेण्यात येणार आहेत. तपशील कार्यशाळा या दुव्यावर दिलेले आहेत.सहभागी व्हायची इच्छा असल्यास संपर्क व्यक्तींशी बोलून निश्चिती करावी.
-सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:१५, १ जानेवारी २०१८ (IST)

कार्यशाळा[संपादन]

नमस्कार, आज दिनांक ९ जानेवारी रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्यशाळेत सहभागी सदस्य म्हणून कार्यरत होतो. अजून विद्यार्थ्यांना खाते उघडणे, सनोंद प्रवेश करणे यात अडचणी येत होत्या. आपण सदस्य खाते प्रवेश अधिकाधिक युजर फेंडली का करु शकत नाही असे वाटले. तसेच क्यापचा हा अत्यंत आवश्यकच आहे का तेही कळले नाही. मुलांना सदस्य होणे यातच खूपच वेळ जातो हे मी पूर्वीही सांगितले आहे. त्यात अडचणी येतात या कडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे वाटते. --प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 21:19, 9 January 2018‎

Gnome-edit-redo.svgअभय नातू: Gnome-edit-redo.svgV.narsikar:Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी: यासाठी काय उपाय म्हणून करू शकतो? --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 २१:५९, ९ जानेवारी २०१८ (IST)
कॅपचा हा ऑनलाइन सुरक्षिततेसाठीचा बेसिक उपाय आहे आणि माझ्या माहितीनुसार तो मीडियाविकी यंत्रणेतच आहे. हे काढायला डेव्हलपर लागेल व तेही सोपे नाही.
युझर फ्रेंडली करण्यासाठी काय काय अडचणी आल्या यांची नोंद घेतली तर त्यासाठीचे उपाय करता येतील. किमानपक्षी सहाय्य पाने, पॉवरपॉइंट तयार करता येतील.
सदस्य होण्याच्या प्रॉसेसबद्दल व्हिडीयो तयार करुन होउ पाहणाऱ्या सदस्यांना हे दाखवले तर या अडचणी निम्म्याने कमी होतील असा माझा कयास आहे. हेच नेहमी येणाऱ्या अडचणींबद्दलही करता येईल.
अभय नातू (चर्चा) २३:१०, ९ जानेवारी २०१८ (IST)


खाते उघडणे, सनोंद प्रवेश करणे यात अडचणी येण्याचे मुख्य कारण म्हणजे, एका आयपी वरून साधारणतः (एके दिवशी) ५ (क्वचित ६) खाते तयार केल्यास, संचेतन त्यास विरोध करते. यामागे विकिची सुरक्षा व स्पॅमिंग टाळणे हा उद्देश आहे. मला वाटते विकिपेक्षा जास्त यूजर फ्रेंडली असे कोणतेही संकेतस्थळ नसावे. संगणकाद्वारे/हॅकर्सद्वारे होणारी नकली खाती तयार करण्यापासून वाचविण्यासाठी कॅप्चा एक प्रभावी माध्यम आहे. यात उपाय नाही असे नाही. थोडा त्रास जास्त घ्यावा लागतो इतकेच.

यासाठी खालील पर्याय असू शकतात: पूर्वतयारी:

 • कार्यशाळेत प्रचालक उपस्थित असल्यास, तो अशी खाती तयार करून देऊ शकतो.
 • आदल्या दिवशी किंवा बरेच आधीही अशी खाती तयार करून ठेवता येतात.त्याचा वापर सुरू मात्र कार्यशाळेच्या दिवशीच सोयीप्रमाणे करावा.
 • विजपुरवठा/पर्यायी विजपुरवठा अबाधित आहे काय/राहील काय याचीही पूर्वतयारी बघणे आवश्यक आहे.
 • स्वतंत्र आंतरजाल जोडणी असणारे (कार्यशाळेतील जोडणी नव्हे- टेलिकॉम कंपन्यांचे इंटरनेट डोंगल वापरणारे) वेगळे २-३ लॅपटॉप वापरून, त्यावरून अशी नविन खाती तयार करता येतात.
 • सदस्यांकडे असणारे/कार्यशाळेची धुरा सांभाळणाऱ्याकडे असणारा/रे स्मार्ट फोन वापरून त्यावरून खाती तयार करता येतात.
 • सहसा, संगणक प्रयोगशाळेत बीएसएनएलची आंतरजाल जोडणी असते. ती सशक्त असणे आवश्यक आहे. कारण संगणक प्रयोगशाळेत, एकदम सर्व संगणक सुरू झाल्यावर, त्या प्रणालीवर येणारा दाब त्या जोडणीस पेलता यावयास हवा.तसे नसल्यास, सर्व संगणक हळू चालतात/प्रतिसाद देत नाहीत व त्याचा कार्यशाळेवर परिणाम होतो. सहसा,तेथे लिज्ड लाईन असते.पूर्वीच संबंधित पुरवठादारास विनंती केल्यावर त्यावर काही प्रमाणात नियंत्रण राखता येऊ शकते काय हेही तपासणे आवश्यक आहे.
 • कमी सदस्य संख्येच्या कार्यशाळा वेगवेगळ्या दिवशी घेणे असाही त्यातील एक उपाय आहे.यातही प्रत्येकवेळी कुशल मनुष्यबळाची उपलब्धता नसणे ही एक अडचण आहे.
 • कार्यशाळेतील संगणकांवर अद्ययावत् ऑपरेटिंग सिस्टीम असणे आवश्यक आहे. त्याने धीम्या गतीने चालण्यावर प्रतिबंध येतो.
 • स्मार्टफोनचा वापर राउटर (router) म्हणून करून (इंटरनेट कनेक्शन शेअरिंग) लॅपटॉप चालविता येऊ शकतात.
 • साधारणतः सकाळी ९.३० आधी इंटरनेटची गती चांगली राहते. त्यानंतर,दुपारी १.३० ते ३ (क्वचित ३.३०) या वेळीही पण ती बरी राहते, असा माझा अनुभव आहे.
 • कार्यशाळेच्या आधी तेथिल स्थितीची पाहणी आवश्यक आहे असे माझे मत आहे.
 • कोणतेही नविन काम सुरू करतांना अडचणी येतातच.त्यावर मात करून व पर्याय शोधूनच पुढे जात रहायचे असते, असे यात सुचवावेसे वाटते.कारण सहसा, सर्व गोष्टी प्रत्येक वेळी सुरळीत व अनुकुल मिळतीलच याची खात्री नाही.--वि. नरसीकर , (चर्चा) ०८:४५, १० जानेवारी २०१८ (IST)इचलकरंजी येथे घेण्यात आलेल्या कार्यशाळेत एकाच आय.पी. वरून अनेक खाती उघडण्यात येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी सुरूवातीला सहभागी सदस्यांनी आपापल्या मोबाईलवरील इंटरनेटचा वापर करून खाती उघडली. त्यामुळे या प्रक्रियेत अडचण आली नाही, फारसा वेळही गेला नाही. पुढची संपादने संगणकावरून केली गेली. ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ०९:४१, १० जानेवारी २०१८ (IST)

आपण सर्वांनी सांगितलेले उपाय योग्यच आहेत, अडचणी दूर करून त्यापुढे गेले पाहिजे आणि जातोही. एकाच आयपीवरुन खाते उघडण्यात येणा-या अडचणी दूर करण्यासाठी अगोदर मोबाइल वर खाते उघडून मग सनोंद प्रवेश हेही ठीकच आहे. परंतु कार्यशाळेत ही मुख्य आणि प्रमुख अड़चण असतेच आणि आज जरी बायपास वापरून ही अडचण दूर करता येत असली तरी त्यावर भविष्यात एकदा यूजर संगणकावर बसला की त्याला विनाअडथळा सदस्य होऊन संपादन करता आलेच पाहिजे इतकेच एक आग्रही कायम मत आहे. आभार. (हा मजकूर दिलीप बिरुटे यांनी घातला.)

कार्यशाळेत नसताना नवीन संपादक संगणकावर बसल्यावर कोणत्या अडचणी येतात? कॅपचा घालवणे योग्य नाही. त्याने प्रणालीसुरक्षेशी तडजोड होते तसेच स्वयंचलित सांगकामे येउन ढीगभर पाळीव खाती निर्माण करण्याची शक्यताही निर्माण होते. तुम्ही या अडचणी कळविल्यात तर उपाय शोधता येतील किंवा नवीन उपाय करता येतील.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २३:४०, १० जानेवारी २०१८ (IST)


प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा - ट्रेन द ट्रेनर (TTT)[संपादन]

नमस्कार !

प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा - ट्रेन द ट्रेनर (TTT) कार्यशाळेमद्धे सहभागी होण्याची अनेकांची प्रचंड इछ्या होती परंतु काही कारणांनी अनेकांची निवड होऊ शकली नाही, त्यामुळे अशी विनंती आहे की जर अशी कार्यशाळा महाराष्ट्रात आयोजित केली तर अधिक संपादक भाग घेऊ शकतील, मराठी भाषा आणि त्यातील मजकूर वाढवण्यासाठी अनेक तरुण पुढे येताना दिसत आहेत, त्यामुळे प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली तर अनेक संपादक प्रशिक्षण देऊ शकतील पर्यायाने अधिक संपादक तयार होऊ शकतील, त्यामुळे माझी अशी विनंती आहे की कृपया प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा - ट्रेन द ट्रेनर (TTT) शक्य तेवढ्या लवकर महाराष्ट्रात आयोजित करावी आणि अधिकाधिक इच्छुक संपादकांना त्याचा लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावा. श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी २२:१८, ११ जानेवारी २०१८ (IST)


अशा प्रशिक्षणाची नक्कीच गरज आहे. मला विशेषतः मराठी विक्शनरी या प्रकल्पात सध्या फारसे काम चालू नाही. ते चालू होण्याच्या दृष्टीने त्यात नवीन भर कशी घालावी. इंटरनेटवर आधीच उपलब्ध असलेल्या शब्दकोशांचा समावेश कसा करावा व जी मराठी पुस्तके विकिपिडीयामध्ये युनिकोड स्वरूपात समाविष्ट आहेत त्यांचा समावेश विक्शनरीत कसा करता येईल या संदर्भात मदत हवी आहे. सुनीला विद्या (चर्चा) १४:००, १८ जानेवारी २०१८ (IST)


मराठी विकास संस्था आणि दयानंद महाविद्यालय,सोलापूर यांनी पुढाकार घेऊन, मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा बुधवार दि. ३ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १२ ते ५ या वेळेत संपन्न झाली होती. विकिपीडिया संपादन मार्गदर्शक म्हणून CIS-A2K चे सुबोध कुलकर्णी सर उपस्थित होते. या मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळेमध्ये दयानंद महाविद्यालय मधील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. तरी त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मला या प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेची मदत होईल. Dr. Balkrishna Hari Mali (चर्चा) १५:५३, १८ जानेवारी २०१८ (IST)

हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल विशेषतः विविध साचे कसे वापरायचे, वर्गीकरणात भर कशी टाकायची, काही शब्द मराठीमध्ये टंकलिखित कसे करायचे या बद्दल प्राथमिक स्वरूपाच्या शंका आहेत त्या दूर होऊ शकतील. विकिपीडियाच्या इतर पप्रकल्पात सह्हाभागी कसे व्हायचे ते सुद्धा कळेल --सुबोध पाठक (चर्चा) १६:०५, १८ जानेवारी २०१८ (IST)

कार्यशाळा कशी हवी?[संपादन]

मराठी विकिपीडियावर अनेक कार्यशाळा चालली आहे. अशी काही वैशिष्ट्ये आहेत ज्यांची आम्हाला कमतरता आहे आम्ही एक यशस्वी कार्यशाळा कशी तयार करू शकतो याबद्दल मराठी विकिपीडिया सदस्य व कार्यशाळा आयोजक त्यांच्या सूचना देऊ शकाल?. मराठी विकिपीडियावरील प्रभावी कार्यशाळे तयार करण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरेल. कृपया खालीलप्रमाणे तुमच्या सूचना / हरकती / शिफारशी लिहा.

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:०१, १३ जानेवारी २०१८ (IST)

ही चर्चा ध्येय आणि धोरणे चावडीवर हलवित आहे. विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#कार्यशाळा कशी हवी?
अभय नातू (चर्चा) १०:०६, १३ जानेवारी २०१८ (IST)

कार्यशाळेत विकिपीडिया मराठी वरील सर्व प्रकल्पांची सोप्या भाषेतील पुस्तिका दिली तर सर्व नवागतांना सोइचे होइल. ज्यानी मराठी विकिपीडियावर आपले खाते उघडले नाही त्याच्यापर्यंत या माहिती पुस्तकाद्वारे पोहचता येईल.

सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (CIS-A2K) या संस्थेच्या कामाचा सहामाही अहवाल (जुलै २०१७ ते डिसेंबर २०१७)[संपादन]

मराठी विकिमीडिया प्रकल्पांच्या विकासासाठी केलेल्या विविध कामांचा सहामाही अहवाल (जुलै २०१७ ते डिसेंबर २०१७) मेटा प्रकल्पाच्या या पानावर मांडण्यात आला आहे. आपला प्रतिसाद अवश्य नोंदवावा.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:०८, २९ जानेवारी २०१८ (IST)

प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा, पुणे - दि.२४ व २५ फेब्रुवारी २०१८[संपादन]

नमस्कार,
सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी संस्थेतर्फे दरवर्षी विविध भाषांसाठी अखिल भारतीय पातळीवर प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा - ट्रेन द ट्रेनर (TTT) आयोजित केली जाते. प्रत्येक भाषेसाठी २-३ संपादक निवडले जातात. यावर्षी अनेकांनी संपर्क करून तसेच चावडीवर निवेदन देऊन अशा प्रकारचे प्रशिक्षण महाराष्ट्रात घेण्याविषयी इच्छा व्यक्त केली. त्यामुळे संस्थेने अशी कार्यशाळा दि.२४ व २५ फेब्रुवारी रोजी पुणे येथे घेण्याचे योजले आहे. ही कार्यशाळा अनुभवी व सक्रीय संपादकांसाठी असून प्रशिक्षण विस्तारासाठी लागणारी विविध कौशल्ये विकसित करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. इच्छुक सदस्यांनी subodhkiran@gmail.com वर विपत्र पाठवावे. तसेच या पानावर नाव नोंदवावे. काही शंका अथवा स्पष्टीकरण हवे असल्यास जरूर संपर्क साधावा.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा)

नाव नोंदविण्याचा कालावधी दि.१८ फेब्रुवारी, सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे. इच्छुक सदस्यांनी वेळेत नोंदणी करावी.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:५७, १७ फेब्रुवारी २०१८ (IST)

मराठी विकी समाजाच्या गरजा आणि अपेक्षा - एक सर्वेक्षण[संपादन]

प्रिय सहकारी,सस्नेह नमस्कार.

CIS-A2K ही संस्था मराठी विकिमिडिया प्रकल्पांच्या वृद्धीसाठी कार्यरत आहे, हे आपण जाणताच.वर्ष २०१८-२०१९ या कालावधीसाठी कृती कार्यक्रम बनविण्याची प्रक्रिया आम्ही सुरु केली आहे. नवीन प्रकल्प वर्ष जुलै २०१८ मध्ये सुरु होईल. आपल्या प्रतिक्रिया व सूचना आमचे काम अधिक चांगले होण्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. अधिक नियोजनबद्ध आणि अर्थपूर्ण काम आपल्यासोबत करण्याची इच्छा आहे. यासाठी सोबत दिलेल्या गूगल फॉर्ममध्ये आपला प्रतिसाद अवश्य नोंदवावा. आपण मराठी व इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत उत्तरे नोंदवू शकता.

पुढील दुवा उघडा आणि लिहा : मराठी विकी समाजाच्या गरजा आणि अपेक्षा - एक सर्वेक्षण
शक्यतो १० मार्च पर्यंत प्रतिसाद नोंदवावा. तसेच काही शंका असल्यास जरूर संपर्क साधावा ही विनंती.
-सुबोध कुलकर्णी (चर्चा) २१:४३, २ मार्च २०१८ (IST)


जागतिक महिला दिन (८ मार्च) च्या निमित्याने महिला संपादनेथॉन- २०१८ [संपादन]

Women-edithoan-18.png

८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो. ह्या दिवसाचे अवचीत्य साधून मराठी विकिपीडिया शनिवार दिनांक १० मार्चला एक दिवसीय "महिला संपादनेथॉन- २०१८ " चे आयोजित करीत आहे.

महिला संपादनेथॉन- २०१४, महिला संपादनेथॉन- २०१५,महिला संपादनेथॉन २०१६ आणि महिला संपादनेथॉन २०१७' प्रमाणेच महिला संपादनेथॉन- २०१८ ला मराठी विकिपीडिया महिला संपादकांचा उत्तुंग प्रतिसाद लाभेल ह्यात शंकाच नाही.

सर्व महिला सदस्यांना ह्या उपक्रमात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन ..! - राहुल देशमुख १७:४६, ८ मार्च २०१८ (IST)

== मुलीला फक्त जन्म देऊ नका तर सुरक्षित ठेवा एक चळवळ जाणीव संस्थेची == आरती वाढेर, विरार

पालघर जिल्हा आणि महाराष्ट्र पोलीसांबरोबर १२ ते १८ वयोगटातील मुलींसाठी मी महाराष्ट्रात भय, स्पर्श, विचार, संस्कार, प्रलोभन, व्यसन, प्रभाव आणि करियर या विषयावर दिड तासाचे जनजागृतीपर व्याख्यान देत आहे. पालघर जिल्हा पोलीसांसमवेत सादर व्याख्यान घेतले जात असून आत्तापर्यंत ३५० शाळा - महाविद्यालयातील १,८५,००० मुलींपर्यत मी पोहोचले आहे. आजपर्यंत ४००० हुन अधिक मुलींचे प्रश्न सोडवण्यात संस्थेच्या माध्यमातून मला यश आले आहे. आजकाल वर्तमानपत्रामध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या बातम्या सर्रास वाचायला मिळतात. समाजाला काळिमा फासणाच्या या घटना असतात या घटना ऐकून संवेदनशीलता, मानवी मन सुन्न होते. कधी कधी या घटना जनतेसमोर येत नाहीत पण दोन वर्षांपूर्वी विरारमध्ये अशीच एक दुर्देवी घटना घडली होती व त्या वाईट घटनेतून एका चांगल्या घटनेचा जन्म झाला. अल्पवयीन मुलीवर अत्याचार होऊ नये याची मला जाणीव झाली. आपल्याला झालेली ही जाणीव समाजात विशेषतः सर्वच मुलींना व्हावी, यासाठी माझी धडपड सुरु झाली त्यात मला मिलिंद पोंक्षे यांचे पाठबळ मिळाले. समाज यायच्या आधीच कधीकधी लहान मुलींना अत्याचाराचा सामना करावा लागतो. हे अत्याचारी समाजात सहजसहजी ओळखून येत नाहीत, कारण बऱ्याचदा ते त्या मुलीच्या कुटुंबातील नातेवाईक, शेजारी असेच असतात. घराबाहेर मुलीवर अत्याचार होतात पण घरीदेखील नातेवाईक मुलींचे शोषण करतात. या मुलीवर एकदाच नव्हे तर संधी मिळाल्यावर वारंवार अत्याचार होतात पण भीतीमुळे त्या बोलत नाहीत. अशा मुलींनी ना घाबरता निर्भयपणे पुढे येत अत्याचारायला तोंड द्यायला हवे, त्यांनी आवाज उठवला पाहिजे. त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठीच आहे ही जाणीव संस्था. केवळ दोन वर्षात या संस्थेने आपल्या कामाचा अफलातून ठसा उमटवला आहे. ज्यावेळी मी मुलींमध्ये जाणीव निर्माण सुरुवात केली, त्यावेळी माझी खिल्ली देखील उडवली गेली पण मिन डगमगली नाही. मी माझे व्रत सुरुच ठेवले. प्रथम व्याख्यानात मी भय, स्पर्श, विचार, संस्कार, प्रलोभन, आकर्षण, प्रभाव आणि व्यसन असे विषय मांडले हे सारे विषय मुलींना नवे होते पण त्यांना या विषयावर मार्गदर्शन हवेच होते, कारण त्यांची मानसिक कोंडी होत होती. पहिल्याच व्याख्यानात मला हा प्रश्न किती गहाण आहे याची जाणीव झाली, जाणीव म्हणजे मन मोकळे करण्याची एक हक्काची जागा.जाणीव म्हणजे समाजामध्ये घडत असणाऱ्या घटनांकडे डोळसपणे पाहायला शिकणे. लहान मुलींना कोणकोणते संभाव्य धोके असतात याची जाणीव करून दिली जाते. चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखावा, कोणती प्रलोभने दाखवली जाऊ शकतात, त्यापासून दूर कसे राहावे याबाबत मी आणि मिलिंद पोंक्षे शाळाशाळांत जाऊन मुलींना मार्गदर्शन करतात. समाजाचा दुसरा चेहरा किती कुरूप आहे ते दिसते. पण त्यासाठी पाळ्या पालक सुसंवाद, शिक्षक पालक सुसंवाद महत्वाचा आहे, पण तोच आज हरवला आहे म्हणून " स्वतः:ला ओळखा, सावध राहा आणि पुढे चला" असा मंत्र जाणीव संस्था देऊन यासाठी माई मुलींशी संवाद साधत असते. पालघर जिल्हा पोलिसांनी ही हा अनोखा उपक्रम उचलून धरला. त्यात त्यांनीं सक्रिय सहभाव घेतला. पोलीस अधीक्षक शारदा राऊत, मंजुनाथ सिंगे, अपर पोलीस अधीक्षक योगेशकुमार, राज टिलक रोशन हे अधिकारी जातीने व्याख्यानाला उपशीत असतात. व्याख्यानदरम्यान मुलींनी तक्रार केल्यावर तक्रारीनंतर मुलींच्या समस्या ४८ तासाच्या आत पोलिसांतर्फे सोडवल्या जात आहेत. त्यामुळे मुलींना फार मोठा दिलासा मिळतो. आम्ही NOT ONLY SAVE THE GIRL PROTECT THE GIRL आणि चुप्पी तोडो आंदोलन चालवाट असून त्यात महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही यासाठी सोलापूर, रत्नागिरी, जैतापूर, औरंगाबाद, कुडाळ, लातूर, अमरावती, अधिवासी पट्टा, विक्रमगड, तलासरी, डहाणू तसेच नाशिक येथे विनामूल्य शाळा कॉलेजमध्ये जाऊन याचा प्रचार करत आहोत.

लेखिका - आरती वाढेर, विरार

दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

सध्या येथे दूरचित्रवाहिनी मालिका असा वर्ग आहे. त्याऐवजी दूरचित्रवाणी मालिका असा वर्ग पाहजे असे वाटते.

तुमचे मत कळवा.

अभय नातू (चर्चा) ००:३२, १४ एप्रिल २०१८ (IST)

सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (CIS-A2K) संस्थेचा जुलै २०१८- जून २०१९ या वर्षासाठीचा कृती आराखडा आणि प्रस्ताव[संपादन]

वरील आराखडा तयार करण्यासाठी मार्च महिन्यात मराठी विकी समाजाच्या गरजा आणि अपेक्षा सर्वेक्षणाद्वारे जाणून घेण्यात आल्या. एकूण १३ सक्रीय संपादकांनी गूगल फॉर्ममध्ये आपला प्रतिसाद नोंदवला. इतर २० जणांनी मेल व फोनवर सूचना दिल्या. या प्रक्रियेतून तयार झालेला कृती आराखडा येथे मांडला आहे. तसेच विकिमिडिया फाउंडेशनला सादर केलेला प्रस्ताव येथे आहे. आपला प्रतिसाद अवश्य कळवावा ही विनंती.
-सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:४२, २६ एप्रिल २०१८ (IST)

प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा[संपादन]

विकिमीडिया फाऊंडेशन आणि गुगल सन २०१७-२०१८ मध्ये सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (सीआयएस), विकिमीडिया इंडिया चॅप्टर (डब्ल्युएमआयएन) आणि यूजर ग्रुप्स यांच्या सहकार्याने विकिपीडिया समुदायांना भारतीय भाषांमध्ये स्थानिक विषयांशी संबंधित ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी प्रोजेक्ट टायगर हा प्रोत्साहन प्रकल्प राबवत आहे. भाषा आधारित लेखन स्पर्धा मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत होत आहे. प्रमुख योगदानकर्त्यांसाठी वैयक्तिक पुरस्कारांव्यतिरिक्त, विजयी समुदायाला विकिपीडियाला योगदान देण्यासाठी त्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी विशेष क्षमता निर्माण प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्थसहाय्य दिले जाईल.

स्पर्धेसाठी पात्र लेखांची यादी[संपादन]

पुढील दुव्यांवर विविध याद्या दिलेल्या आहेत - संभाव्य मराठी विषय व याद्या
यामध्ये खालील याद्या आहेत :

 1. वैश्विक विषय - प्रत्येक विकिपीडियात असलेच पाहिजेत असे लेख पुढील दुव्यावर - List of 10,000 articles every Wikipedia should have
 1. भारतीय विषय - प्रत्येक भारतीय भाषिक विकिपीडियात असलेच पाहिजेत असे लेख पुढील दुव्यावर - List of articles each Indian language Wikipedia should have
 1. इंग्रजी विकिपीडिया वाचक पसंती/प्राधान्य लेख - विशिष्ठ विषय/संकल्पना यावर आधारित लेख (Thematic Topics) आणि लोकप्रिय लेख (Popular Topics)
 1. स्थानिक विषय - वरील याद्या समोर ठेवून आणि इतर स्थानिक विषयांची भर घालून मराठी विकी समुदायाने बनविलेल्या ५०० लेखांची यादी

सक्रीय संपादकांनी यात सहभागी व्हावे ही विनंती. इतर भाषिक समुदाय उत्साहाने काम करत आहेत. आयोजक म्हणून आणि परीक्षक म्हणून पुढाकार घेण्याचीही गरज आहे.
आपले योगदान नोंदविण्यासाठी Fountain Tool उघडून लॉग इन करावे आणि लेख नोंदवावा.

-सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:०४, २७ एप्रिल २०१८ (IST)

सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (CIS-A2K) संस्थेच्या वतीने संपादक सक्षमीकरण कार्यशाळा[संपादन]

वरील कार्यशाळा रांची येथे दि.२९ जून ते १ जुलै या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. नियमितपणे कार्यरत असणाऱ्या तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणे, इतर भाषांमधील चांगल्या प्रक्रियांचा परिचय करून देणे, भविष्यातील विकिपीडियाचे बदलते वैश्विक स्वरूप समजून घेवून आपला समुदाय बांधणे, विकी ग्रंथालय सारख्या अभियानात सहभाग वाढविणे इ. उद्दिष्टे समोर ठेवली आहेत. अधिक माहिती मेटा वरील या पानावर आहे. दि.३० एप्रिल २०१८ अखेर किमान २००० वैश्विक संपादने झालेले सदस्य अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची अखेरची तारीख ९ जून आहे. उत्सुक सदस्यांनी अवश्य नोंदणी करावी.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:५८, २ जून २०१८ (IST)

भारतीय स्वातंत्र्यलढा या विषयावर संपादन अभियान (दि.१० ते २० ऑगस्ट २०१८)[संपादन]

मराठी समुदाय आणि सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीच्या वतीने दि.१० ते २० ऑगस्ट २०१८ या कालावधीत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्यलढा या विषयावर संपादन अभियान राबविण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. सदर अभियानात भारतातील अनेक भाषा समुदाय त्या त्या विकिपीडियामध्ये एकाच वेळी सहभागी होत आहेत. आपण भारतीय स्वातंत्र्यलढा या वर्गात लेखांची भर घालणे, लेख सुधारणे, योग्य ते उपवर्ग तयार करणे, चित्रांचा समावेश करणे, विकीडेटा कलमे इ. कामे करावीत असे वाटते. याविषयी आराखडा तयार करण्यासाठी विकिपीडिया:भारतीय स्वातंत्र्यलढा संपादन अभियान २०१८ हे प्रकल्पपान तयार केले आहे. येथे सहभागी सदस्यांनी नावे नोंदवावीत आणि आपले विचार मांडावेत.एकूण प्रक्रिया सुसूत्रपणे होण्यासाठी काही जणांनी समन्वयक म्हणून पुढाकार घ्यावा असे आवाहन करीत आहे.योगदान नोंदविण्यासाठी आऊटरीच डॅशबोर्ड या साधनाची मदत घ्यावी असे वाटते. चांगले योगदान करणाऱ्या सदस्यांचे कौतुक,गौरव कसा करावा हेही सुचवावे.आपण चर्चेने याचा निर्णय घेवू. स्वातंत्र्यलढ्यात असंख्य लोकांनी दिलेल्या योगदानाचे नम्र स्मरण करत या निमित्ताने आपण उत्तम दर्जाचे लेख निर्माण करुया.
-सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:५२, २९ जुलै २०१८ (IST)

अभियानात सहभागी सदस्यांचे अभिनंदन![संपादन]

नमस्कार! भारतीय स्वातंत्र्यलढा संपादन अभियानात सहभागी सर्व सदस्यांचे आभार आणि अभिनंदन. या अभियानात सर्वांनी नियोजनात आणि प्रत्यक्ष लेख संपादनात मोलाची कामगिरी केली आहे. या निमित्ताने एकूण ३५ लेख नव्याने तयार झाले तर १२२ लेख संपादित केले गेले. पहा - अभियानाचा संपादन नोंद फलक. यामुळे [[:वर्ग::भारतीय स्वातंत्र्यलढा]] हा समृद्ध झाला. आता उपवर्ग नीट करणे, माहितीचौकट/संदर्भ इ. भर घालून हे लेख उत्तम करण्याचा प्रयत्न करु. हे अभियान तेलुगु, हिंदी, मल्याळम व ओडिया या भाषा समुदायांनी पण उत्साहाने राबविले. दरवर्षी हे होत राहावे असे वाटते. सर्वांनी अवश्य आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:११, २३ ऑगस्ट २०१८ (IST)

विकीडेटा:विकीप्रकल्प भारत आयोजित स्वातंत्र्यदिन २०१८ लेबल-ए-थॉन[संपादन]

विकीडेटा:विकीप्रकल्प भारत यांच्यातर्फे दि.१५ ते १९ ऑगस्ट २०१८ या कालावधीत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्यदिन २०१८ लेबल-ए-थॉन हे संपादन अभियान राबविले जात आहे. या अभियानात अवश्य सहभागी होवून स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित लेबले मराठीत आणावीत असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:०७, १५ ऑगस्ट २०१८ (IST)

महिलांचे आरोग्य व स्वास्थ्य यावर संपादन अभियान:ऑक्टोबर २०१८ (Wiki Women for Women Wellbeing)[संपादन]

Gnome-edit-redo.svgअभय नातू:Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी:Gnome-edit-redo.svgआर्या जोशी:Gnome-edit-redo.svgकल्याणी कोतकर:Gnome-edit-redo.svgSureshkhole:Gnome-edit-redo.svgज्ञानदा गद्रे-फडके: जसे कि आपण व्यक्तिगत जीवनात पाहतो कि स्त्रिया त्यांच्या गरजा आणि आरोग्यविषयक चिंतांना टाळत असतात.आणि नेहमी स्वतःच्या कुटुंबासाठी जगत असतात.अश्या सगळ्या महिलांसाठी मराठी समुदाय वतीने ऑक्टोबर २०१८ या कालावधीत महिलांच्या आरोग्य व स्वास्थ्य या विषयावर संपादन अभियान राबविले जात आहे.सदर अभियानात भारतातील अनेक भाषा समुदाय त्या त्या विकिपीडियामध्ये एकाच वेळी सहभागी होत आहेत.तिथे त्या त्या विभागातील महिला एकत्र येऊन महिलांच्या आरोग्य व स्वास्थ्य यावर लेख तयार करून त्याबद्दल जागरुकता वाढवण्याचे कार्य करेल.तसेच लेखात भर घालणे, लेख सुधारणे, योग्य ते उपवर्ग तयार करणे, चित्रांचा समावेश करणे, विकीडेटा कलमे इ.कामे करावीत. काही सदस्यांनी मेटा पेज वर स्वाक्षरी करून आपली मदत दर्शविली आहे.तसेच तुम्हीही तिथे तुमची स्वाक्षरी participant मध्ये करून तुमचे योगदान द्यावे.

आभार..--Pooja Jadhav (चर्चा) १२:३३, २७ ऑगस्ट २०१८ (IST)

जागतिक भाषांतर दिवस[संपादन]

Gnome-edit-redo.svgअभय नातू: Gnome-edit-redo.svgV.narsikar:,Gnome-edit-redo.svgआर्या जोशी:,Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी:,Gnome-edit-redo.svgSureshkhole:,Gnome-edit-redo.svgमृणाल शार्वेय धोंगडे:,Gnome-edit-redo.svgSonalijawale:,Gnome-edit-redo.svgधनश्री भाटे:,Gnome-edit-redo.svgमोनाली पाटील:,Gnome-edit-redo.svgशीतल नामजोशी: आणि सर्वच सदस्य,

३० सप्टेंबर रोजी असलेल्या जागतिक भाषांतर दिवसाच्या निमित्ताने काही लेखांचे भाषांतर करून ते मराठी विकिपीडियावर आणावेत, यासाठी सर्वांना आवाहन करत आहे. या निमित्ताने मराठी विकिपीडियावर काही नवीन लेखांची भर पडावी आणि विकीवर काही नवीन सदस्य सुद्धा जोडले जावेत, असा हेतू आहे. धन्यवाद!

छान उपक्रम हाती घेतला आहे याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा. काही मदत लागली तर, जरूर कळवालच.इतर प्रलंबित कामांमुळे सध्या सहभागी होता येणार नाही.
माहितीस्तव दुसरी एक गोष्ट: {{साद}} या साच्यात एका वेळी पाच सदस्यांना साद घालता येते.त्या पानावरचे साचा दस्तावेजीकरण वाचावे (१.२ अनेक संदेशप्राप्त कर्ते याखालील मजकूर). धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) २०:०४, २८ सप्टेंबर २०१८ (IST)

अतिशय गरजेचा उपक्रम निवडल्याबद्दल अभिनंदन! या अभियानाचे प्रकल्पपान करावे. तिथे नोंदणी, सूचना, यादी इ. करता येईल. या निमित्ताने हे अभियान ३० सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर करण्याचा विचार करावा. म्हणजे नवीन सदस्यांचा सराव होईल. विकी-ट्रान्सलेट हे साधन वापरून बघता येईल. तसेच संपादन फलक बनवावा.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २१:३५, २८ सप्टेंबर २०१८ (IST)


मराठी विकिपीडिया वाचन प्रेरणा सप्ताह[संपादन]

नमस्कार,

प्रगल्भ आणि सुदृढ विचारांचा समाज निर्माण करण्यासाठी वाचन संस्कृती चिरकाल टिकवणे हि काळाची गरज ठरली आहे. वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासन १५ ऑक्टोबर, भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन, हा वाचन प्रेरणा दिन म्हणून गेल्या तीन वर्षांपासून साजरा करते. ह्या अनुषंगाने मराठी विकिपीडिया २०१५ पासून दरवर्षी वाचन प्रेरणा सप्ताह आयोजित करीत आहे. ह्या वर्षीपण मराठी विकिपीडियावर दि १५ ते २२ ऑक्टोबर २०१८ या दरम्यान " मराठी विकिपीडिया वाचन प्रेरणा सप्ताहाचे " आयोजन करण्यात येत आहे.

सर्व मराठी विकिपीडिया वाचकाचा/संपादकांचा ह्यास उत्तुंग प्रतिसाद लाभेल ह्यात शंकाच नाही.

धन्यवाद

राहुल देशमुख २३:२२, १४ ऑक्टोबर २०१८ (IS