सदस्य चर्चा:Khirid Harshad
![]() |
Khirid Harshad, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
Khirid Harshad, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ८४,३३३ लेख आहे व १५८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
![]() दृश्यसंपादकात़़ दुवे देण्याची सुविधा उपलब्ध करणारे चिन्ह
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
पानं स्थानांतरित करणे[संपादन]
नमस्कार, आपल्याला Tejas_Parte या खात्यावर पूर्वीच सूचना दिली होती की, कृपया पान स्थानांतरित केल्यावर wikidata वर जाऊन इंग्रजी आणि मराठी पानांचे दुवे परत जोडावेत म्हणून.
विनंती आहे की, नवीन स्थानांतर करण्या ऐवजी बिघडलेले आंतरविकिदुवे प्रथम दुरुस्त करावेत. - संतोष गोरे ( 💬 ) १४:४२, ८ डिसेंबर २०२१ (IST)
- नमस्कार, विनंती आहे की एक पान दुसऱ्या पानात विलीन करताना, त्यातील उपयुक्त मजकूर सुद्धा नवीन पानात स्थानांतरित करावा ही विनंती.- संतोष गोरे ( 💬 ) १८:४४, २ जानेवारी २०२२ (IST)
सदस्यपाने[संपादन]
नमस्कार. user:KiranBOT/Task 2 मधे edits केल्याबद्दल धन्यवाद. मी माझ्या नोंदीसाठी ठेवतो. Userpages शक्यतो त्या user च्या परवानगीशिवाय edit करू नये. कृपया user:KiranBOT/Task 2 नको, पण तुम्ही user:usernamekiran/typos मोकळ्या मनाने edit करा :-) धन्यावाद. —usernamekiran (talk) १८:१५, ६ जानेवारी २०२२ (IST)
एकठोक बदल[संपादन]
नमस्कार,
सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद. अलीकडे तुम्ही अनेक लेखांतून विशिष्ट प्रकारचे बदल करीत असल्याचे दिसले. असे बदल एकठोक करण्यासाठी सांगकाम्याकरवे एडब्ल्यूबी किंवा तत्सम उपकरणे वापरुन करावेत. अशाने तुमचा वेळ इतर, अधिक उपयोगी बदलांत देता येईल.
तुम्हाला सांगकामे वापरण्याचा अनुभव नसल्यास मला किंवा Usernamekiran: यांना कळवावे.
पु्न्हा एकदा धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २३:२१, १६ जानेवारी २०२२ (IST)
अभय नातू: धन्यवाद, तुमची प्रतिक्रिया कळवल्याबद्दल. मी
Usernamekiran: यांस आधी दोन कामे सांगितली होती. परंतु अजून काही कारणास्तव ते काम करण्यास सध्या तरी अक्षम आहेत. तरी मी इतर बदल करण्यास सुरुवात केली. तसेच तुम्ही सांगितल्याप्रमाणे एका विशिष्ट प्रकारचेच बदल मी करत आहेत यासाठी सांगकामे कसे वापरतात याचा मला अनुभव नाही याबद्दल तुम्ही सहकार्य केल्यास मला मदत होईल. Khirid Harshad (चर्चा) २३:२७, १६ जानेवारी २०२२ (IST)
- तुम्हाला काय बदल अपेक्षि आहे हे कळविल्यास ते सांगकाम्याकडून करुन घेतो.
- वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू यास जोडण्यात आलेली सर्व पाने वर्ग:वेस्ट इंडीजचे क्रिकेट खेळाडू या वर्गास जोडणे.
- खेड पानावरील खेड तालुक्यातील गावे विभागातील सर्व पाने वर्ग:खेड तालुक्यातील गावे हा वर्ग काढून वर्ग:खेड (रत्नागिरी) तालुक्यातील गावे या नव्या वर्गास जोडणे. Khirid Harshad (चर्चा) २३:४६, १६ जानेवारी २०२२ (IST)
- ठीक. हे करतो. वेस्ट इंडीज बरोबर कि वेस्ट इंडीझ याबद्दल मला शंका आहे परंतु एके ठिकाणी वर्गीकरण केलेले बरे. चूक असल्यास पटकन बदलता येईल.
- अभय नातू (चर्चा) २३:५१, १६ जानेवारी २०२२ (IST)
आयर्लंड १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा ध्वज[संपादन]
सर्वप्रथम आपण जे योगदान करत आहात त्याबद्दल आभार. आपणाकडे अशी विनंती आहे ही क्रिकेट मध्ये आयर्लंडचा ध्वज आहे तो १९ वर्षांखालील दुव्याला येत नाही. म्हणजे cr19|IRE असे लिहिले तर पानामध्ये आयर्लंड असे दिसते. जे योग्य नाही. कारण आयर्लंडचा जो क्रिकेट संघ आहे ते क्रिकेट बोर्डाचा ध्वज वापरतात. ह्याच साच्यात जर ध्वज उजवीकडे घेतला (cr19-rt|IRE केला तर बरोबर आयर्लंड
असे दिसते. फक्त डावीकडे ध्वज वेगळा दिसतोय. ही त्रुटी फक्त १९ वर्षांखालीलच्या दुव्याला येत आहे, आपणास जर जमले तर यात लक्ष्य घालून सुरळीत केले तर बरं होईल. धन्यवाद. Aditya tamhankar (चर्चा), २६ जानेवारी २०२२, भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२ वाजून २६ मिनिटे
Aditya tamhankar: धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मी नक्कीच हा बदल करण्याचा प्रयत्न करीन. परंतु त्याकरिता तुम्ही एखादा बदल करुन दाखविल्यास मला नीट समजून घेता येईल आणि त्यानुसार निश्चित असे बदल करता येतील. Khirid Harshad (चर्चा) १२:४३, २६ जानेवारी २०२२ (IST)
इंग्लिश शीर्षके[संपादन]
नमस्कार,
तुम्ही येथील सगळ्या इंग्लिश शीर्षके असलेल्या लेखांवर पानकाढा साचा लावल्याचा दिसतो. यातील बरीचशी पाने काढण्याजोगी आहेत. पैकी ५०-६० काल मी काढली.
हे करताना सरसकट साचा लावू नये. पान कोठे वापरले गेलेले आहे हे पाहून पान काढल्यास इतरत्र उपद्रव होणार नाही ना याची खात्री करुन मगच साचा लावावा. सरसकट पाने काढल्यास अनेक इतर साचे व पाने निरुपयोगी होतील. साचा लावल्यानेही ती झालेली आहेतच.
ही शहानिशा करुन मग पानकाढा साचा लावल्यास तुमचा (सरसकट साचे लावण्यात) आणि माझा (प्रत्येक पानाची शहानिशा करुन मग पान काढण्याचा) वेळ वाया जाणार नाही.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २१:१९, १ फेब्रुवारी २०२२ (IST)
अभय नातू:
ओके, आता ही बाब लक्षात ठेवेन माझा हेतू फक्त मराठी शीर्षके मराठी विकिपीडियावर असावीत हीच अपेक्षा होती. तसेच मी काही चर्चा पाने तसेच तुम्ही आणि किरण यांनी सांगितलेली बाब लक्षात घेतली तेव्हा कळले की काही इंग्रजी शीर्षकांची पाने जरी पुनर्निर्देशित असली तरी गरजेची आहेत कारण इतर भाषिक आणि नवीन सदस्यांना ते शोधण्यास सोपे जावे यासाठी ठेवण्यात आले आहे हे समजले आणि ते मला पटलेही. परंतु एकदा खरेच नको असलेली इंग्लिश शीर्षकांची वगळली जावीत याकरिता मी पान काढा साचा लावला, धन्यवाद. Khirid Harshad (चर्चा) २१:२३, १ फेब्रुवारी २०२२ (IST)
- Irawati_Karve या पानाचे पुनर्निर्देशन इरावती कर्वे या पानाकडे केले होते. ते काढू नये. कारण विकीसोर्सवरील tinyurl.com/irawatikarve या पानावरील नेव्हिगेशन बार वरून मराठी विकीवर येण्यासाठी हे बनविले होते. नेव्हिगेशन बारच्या लिंक्स आपोआप बनतात. त्या मराठीत लिहिता येत नाहीत. Shantanuo (चर्चा) ०९:४४, ७ फेब्रुवारी २०२२ (IST)
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२[संपादन]
प्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोर ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा आज २ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२२ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल, पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत कोणत्याही मदतीसाठी, ज्युरी सदस्यांच्या Rockpeterson किंवा Sandesh9822 यांच्या चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा.
--Rockpeterson (चर्चा) ११:०१, ३ फेब्रुवारी २०२२ (IST)
एक शंका: न्यूझीलंड की न्यू झीलॅंड?[संपादन]
नमस्कार, एक शंका होती, ती तुम्हाला विचारतो आहे. न्यूझीलंड की न्यू झीलॅंड या पैकी कोणता शब्द योग्य आहे? म्हणजे समजा न्यू झीलॅंड असा वापरला तर मग इंग्लंडचे पण इंग्लॅंड व्हायला पाहिजे. आयर्लंडचे आर्यलॅंड असायला पाहिजे. माझ्यामते न्यूझीलंड हा शब्द ठिक वाटतो. उच्चार करताना देखील आपण न्यूझीलंड म्हणतो, न्यू झीलॅंड नाही. आपला अभिप्राय कळवा. Aditya tamhankar (चर्चा) ७ फेब्रुवारी २०२२, ११:३४
Aditya tamhankar: तुमचा प्रश्न योग्य आहे, परंतु सध्या तरी न्यू झीलॅंड हा शब्द सर्व पानांवर वापरला जात आहे. तसेच प्रचालकांनी देखील कित्येक पानांचे न्यू झीलॅंड पानाकडे स्थलांतरण केले आहे. म्हणून न्यू झीलॅंड हा शब्द योग्य आहे, परंतु न्यूझीलंड हा शब्द अयोग्य नसून तो प्रमाणभाषेत जास्त प्रचलित शब्द आहे. ही शंका वेस्ट इंडिझ बाबात देखील होती. त्यामध्ये सुद्धा वेस्ट इंडीज हा योग्य शब्द आहे. Khirid Harshad (चर्चा) १४:४७, ७ फेब्रुवारी २०२२ (IST)
संदर्भ[संपादन]
नमस्कार, आपण अनेक पानांवरील मृत दुवे उडवलेत. परंतु हे करताना कृपया विदा (archived) आवृत्ती (http://web.archive.org/ येथे) उपलब्ध आहे का ती शोधावी आणि उपलब्ध असल्यास ती जोडावी. नसेल तर किमान नवीन दुवा तरी जोडावा. आपल्याला माहीत आहे की संदर्भाविना मजकूर उडवला जाऊ शकतो.- संतोष गोरे ( 💬 ) ०८:१९, १७ फेब्रुवारी २०२२ (IST)
संतोष गोरे: ठीक आहे. कृपया नकल डकव शोधण्यासाठी कोणती लिंक उपलब्ध आहे का? Khirid Harshad (चर्चा) १७:१५, १६ मार्च २०२२ (IST)
नकल डकव शोधण्यासाठीची लिंक तुम्हाला माहित आहे ना...- संतोष गोरे ( 💬 ) २१:०४, १६ मार्च २०२२ (IST)
संतोष गोरे: हो माहीत आहे फक्त एकदा खात्री करुन घेतली तीच लिंक आहे ना म्हणून. Khirid Harshad (चर्चा) २३:२५, १६ मार्च २०२२ (IST)
मराठी विश्वकोश वरून ची नकल डकव[संपादन]
नमस्कार, कृपया vishwakosh.marathi.gov.in वरून केलेली नकल डकव हटवू नये, असे माहीत झाले आहे. त्या ऐवजी त्या लेखात वर्ग:मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट मजकूर जोडावा.- संतोष गोरे ( 💬 ) ०७:४५, १६ मार्च २०२२ (IST)
संतोष गोरे: यामागचे प्रयोजन अथवा हेतू समजू शकेल काय? कारण आतापर्यंत येथील नकल डकव हटवली जात होती म्हणून विचारले. Khirid Harshad (चर्चा) १७:१४, १६ मार्च २०२२ (IST)
कॉपीपेस्टमवि या दुव्या नुसार ४००० बाईट्स पर्यंतची मराठी विश्वकोषावरील माहिती कॉपी पेस्ट करता येईल. ही परवानगी फक्त संस्थळ दुवा या नियमाखाली marathivishwakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळा करीता आहे. संतोष गोरे ( 💬 ) २१:०९, १६ मार्च २०२२ (IST)
आपली संपादने[संपादन]
नमस्कार, कृपया नोंद घ्यावी की कोणत्याही सदस्याच्या वैयक्तिक सदस्य पानावर शक्यतो संपादने करू नये. तुम्ही बऱ्याच सदस्य पानावर संपादने उलटवली आहेत. तसेच स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२/नोंदणी ही ३१ मार्च च्या रात्री १२ पर्यंत आहे, त्यामुळे कृपया तेथील नवीन नाव नोंदणी देखील उलटवू नये.- संतोष गोरे ( 💬 ) १८:३६, ३१ मार्च २०२२ (IST)
संतोष गोरे: माफ करा, परंतु जाहिरातसदृश सदस्य पानांवरची संपादने फक्त उलटवलीत आणि नोंदणीबद्दल माझ्या ध्यानात आले नाही. चुका सुधारण्याचा प्रयत्न करीन, धन्यवाद. Khirid Harshad (चर्चा) १९:०५, ३१ मार्च २०२२ (IST)
copy-paste विरुद्ध पान स्थानांतरण[संपादन]
नमस्कार. तुम्ही आत्ता ज्याप्रमाणे एका पानावरुन दुसऱ्या पानावर मजकूर copy-paste केला व नंतर पुनर्निर्देशन केले, तर त्या पानाचा संपादन इतिहास जुन्या पानावरच राहतो. अशा वेळेस पानांचे स्थानांतर (page move) करायला पाहिजे :-) बहुतेक सर्वसाधारण खात्यातून ते होणार नाही (केवळ प्रचालक व bot करू शकतात). जर माझ्या खात्यातून झाले नाही, तर bot च्या खात्यातून करतो.
- स्थानांतर झाले. तुमच्या खात्याला ई-मेल जोडून घेण्याची विनंती करतो. —usernamekiran (talk) २२:५९, ७ एप्रिल २०२२ (IST)