विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे
![]() जुनी चर्चा |
---|
|
(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) |
||||||
---|---|---|---|---|---|---|
चर्चा (विपी इतर चर्चा) इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा वादनिवारण वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा |
![]() साहाय्य | मदतकेंद्र नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा |
![]() दूतावास (Embassy) नवी चर्चा जोडा (Start new discussion) |
![]() प्रचालकांना निवेदन प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा
|
![]() तांत्रिक तांत्रिक मुद्दयांवर चर्चा. विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा. नवीचर्चा जोडा | वाचा |
![]() ध्येय आणि धोरणे सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा |
![]() प्रगती मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा नवीचर्चा जोडा | वाचा सोशल मीडिया मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा |
![]() | |
चावडी (सुचालन) | |
---|---|
स्थापना | |
स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा | |
इतर चावडी/चर्चा विभाग (संपादन)
| |
विदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)
| |
विदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)
| |
मराठी बंधुप्रकल्पातील चावड्या (संपादन)
| |
०. खालील मुद्दे फक्त या पानासाठी लागू आहेत. या मुद्दांतील संकेतांनुसार या पानाचे काम चालेल.
- हे सुद्धा पहा
- विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
- प्रस्ताव मांडण्या पुर्वी उपरोक्त सुचनां आणि संकेत नजरे खालून घाला.
- आपले प्रस्ताव सुयोग्य विभागातच असा === तिहेरी उपविभाग करून जोडा.
- जुन्याचर्चा विदागार पानावर हलवताना मुख्य विभागांची रचना बदलली जाणार नाही याची दक्षता घ्या.
- विकिपीडिया:तर्कशास्त्र
- विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/जुनी चर्चा १
- महत्वपूर्ण प्रस्ताव रेटण्यासाठी एक आठवड्यासाठी हे पान प्रशासकांनी सुरक्षीत केले आहे.
नवीन नामविश्व: मसुदा
[संपादन]नमस्कार,
मराठी विकिपीडिया १,००,००० लेखांच्या टप्प्याच्या अगदी जवळ आलेला आहे, परंतु त्यावरील मजकूराचा दर्जा पाहिजे तितका चांगला नाही. काही ठिकाणी तर अगदीच निकृष्ट (किंबहुना टाकाऊ) आहे.
आत्तापर्यंत आपण सर्वसमावेशक धोरण ठेवलेले आहे, ज्यायोगे सगळ्यांचे योगदान थेट लेखांमध्येच होते. यामागचा हेतू विकिपीडियात भर पडत राहून त्याबरोबरच दर्जाही सुधारत रहावा असा आहे.
यात आता बदल सुचवित आहे, ज्यायोगे मजकूर आणि दर्जा यांच्यात थोडा समतोल येईल.
प्रस्ताव -- मराठी विकिपीडियावर मसुदा हे नवीन नामविश्व तयार करावे.
हेतू -- मराठी विकिपीडियावरील लेखसंख्या, मजकूर आणि त्यांचा दर्जा यात समतोल साधणे.
तपशील -- मसुदा नामविश्व हे इंग्लिश (व अनेक इतर) विकिपीडियांवरील Draft या नामविश्वाप्रमाणे असेल. परंतु तेथील प्रमाणे प्रत्येक नवीन लेख मसुदा नामविश्वात आपोआप न जाता संपादकांच्या परीक्षणानंतर विशिष्ट लेख या नामविश्वात घातले जातील. यायोगे नवीन योगदानाला आळा बसणार नाही, संपादकांचा उत्साहही खच्ची होणार नाही. त्याचबरोबर अद्वातद्वा लिखाण, ज्यात बेछूट मशीन ट्रान्सलेशन शामिल आहे, याला आवर बसेल. असे स्थानांतरण ऑटोकन्फर्म्ड सदस्यांनाच करता येईल. हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसले तरच हा अधिकार प्रचालकांपुरता मर्यादित असेल.
यावर तुमचे मत हवे आहे. खाली ते नोंदवावे. सही नसलेली किंवा फक्त आयपी अंकपत्त्यांची मते ग्राह्य धरली जाणार नाहीत.
साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात मत पाहून मीडियाविकी/स्ट्युअर्डकडे अधिकृत विनंती केली जाईल.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०७:१०, २८ मे २०२५ (IST)
मते
[संपादन]मंजूर
[संपादन]मंजूर : प्रस्तावक -- अभय नातू (चर्चा) ०७:१०, २८ मे २०२५ (IST)
मंजूर Khirid Harshad (चर्चा) १९:२३, २८ मे २०२५ (IST)
मंजूर : -संतोष गोरे ( 💬 ) ०८:१०, २९ मे २०२५ (IST)
मंजूर --Tiven2240 (चर्चा) ०८:३९, ३० मे २०२५ (IST)
मंजूर: विक्रांत कोरडे (चर्चा) १४:०३, २ जून २०२५ (IST)
मंजूर: नितीन कुंजीर (चर्चा) ११:११, ५ जून २०२५ (IST)
मंजूर. धन्यवाद. MilindKolatkar (चर्चा) ०८:५५, ८ जून २०२५ (IST)
नामंजूर
[संपादन] नामंजूर
-- उदाहरणादाखल
तटस्थ
[संपादन]
तटस्थ
-- उदाहरणादाखल
टिप्पणी
[संपादन]७-० असे मतदान झालेल्या या प्रस्तावासाठी मेटा वर विनंती केलेली आहे -- https://phabricator.wikimedia.org/T396551
धन्यवाद.
@संतोष गोरे, @Khirid Harshad, @Tiven2240, @नरेश सावे, @Aditya tamhankar, अभय नातू (चर्चा) ०७:१०, २८ मे २०२५ (IST)
- शंका -
- स्वयंशाबीत (ऑटो कन्फर्म) सदस्य असण्याचे निकष फार मोठे नाहीत. तसेच स्वयंशाबीत सदस्य थेट लेख निर्मिती करू शकत असतील तर, अवघड आहे. त्यांचेच लिखाण अद्वत्तद्वत असतात.
- स्वयंशाबीत सदस्यांना मसुदा (ड्राफ्ट) मुख्य नामविश्वात स्थानांतरित करणे सहज सुलभ राहील. ज्यामुळे लेख कोणीही सहज स्थानांतरित करेल. -
- संतोष गोरे ( 💬 ) ०७:५३, २८ मे २०२५ (IST)
- तुमची शंका रास्त आहे. प्रस्तावित नियम पूर्णपणे गचाळ लेखन बंद करणार नाही पण थोडा तरी आळा बसेल. हे पहिले पाउल आहे.
- याचा परिणाम/प्रतिसाद पाहून नियम पुढे अधिक घट्ट करावे कि नाही हे ठरवता येईल.
- अभय नातू (चर्चा) ०९:२८, २८ मे २०२५ (IST)
- नमस्कार, एक बाळबोध शंका -
- ऑटोकन्फर्म्ड सदस्य कोणाला म्हणतात? आणि त्यांचे निकष काय आहेत ते कळू शकेल का? Ketaki Modak (चर्चा) ११:५५, २९ मे २०२५ (IST)
- ऑटोकन्फर्म्ड म्हणजे येथे सदस्यत्व घेतलेले आणि त्यानंतर काही काळ आणि/किंवा संपादने केलेले सदस्य. Meta:Autoconfirmed users - Meta मेटाविकीवरील व्याख्या येथे आहे. त्यानुसार तुम्ही आणि नेहमी संपादने करणारे सगळे सदस्य ऑटोकन्फर्म्ड आहेत :-)
- मी वर टॅग करताना निवडक सक्रिय सदस्यांचे नाव घेतले. त्यात तुमचे राहून गेले. क्षमस्व!
- अभय नातू (चर्चा) १२:३०, २९ मे २०२५ (IST)
- उत्तराबद्दल धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १३:५१, २९ मे २०२५ (IST)
- प्रस्तावाबद्दल धन्यवाद.
माझे काही प्रश्न आहेत ते खाली प्रमाणे नोंदवतो:
- याचा अर्थ असा आहे का की सर्व नवीन लेख प्रथम मसुद्यावर तयार केले जातील आणि नंतर मुख्य नेमस्पेसमध्ये हस्तांतरित केले जातील?
- मुख्य नेमस्पेसमध्ये लेख हलवण्याचे निकष काय असतील?
- त्यांचे पुनरावलोकन कोण करेल, प्रशासक?
- पुनरावलोकन प्रक्रिया असेल का?
प्रथम एक स्पष्ट धोरण बनवूया आणि नंतर नवीन सामील होणाऱ्यांना विचारात घेऊन नवीन नेमस्पेस तयार करण्यास सुरुवात करूया आणि हे विकिपीडियाच्या मुख्य मूल्यांच्या हिताचे कसे बसेल यावर चर्चा करूया. --Tiven2240 (चर्चा) ११:५४, २९ मे २०२५ (IST)
- @Tiven2240,
- नमस्कार,
- १. नाही. नवीन लेख किंवा पाने तयार करण्याच्या आत्ताच्या वर्कफ्लो मध्ये फारसा फरक नाही. लेख/पाने आत्ताप्रमाणेच मुख्य (किंवा योग्य त्या) नामविश्वातच तयार होतील.
- २. यांतील निकृष्ट दर्जा असलेले लेख मसुदा नामविश्वात हलविले जातील. यांत बदल न केलेले मट्रा लेख, इतर भाषेत लिहिलेले लेख तसेच व्याकरण, शुद्धलेखनाच्या मोठ्या प्रमाणात चुका असलेले लेख मुख्यत्वे असतील.
- ३. ऑटोकन्फर्म्ड सदस्य यांचे पुनरावलोकन करू शकतील. जर याचा दुरुपयोग होतो आहे असे दिसले तर हा हक्त प्रचालकांकडे (admin) हस्तांतरित केला जाईल. आशा आहे असे करावे लागणार नाही.
- ४. पुनरावलोकनाची प्रक्रिया क्लिष्ट नसावी. स्थानांतरण करणे पुरेसे होईल. जर दुरुपयोग होत असेल तर एका सदस्याने स्थानांतरणाचा प्रस्ताव लावल्यावर मगच दुसऱ्या सदस्याने स्थानांतरण करावे असा संकेत लावावा. प्रचालकांना यातून अपवाद असेल.
- या प्रस्तावाचा उद्देश नवीन लेख निर्माण करण्यात अडथळे तयार करण्याचा नसून निकृष्ट दर्जाच्या लेखांवरील मजकूर वाचवण्याचा आणि तरीही मराठी विकिपीडियाच्या गुणवत्तेची राखणी करण्याचा आहे. याचा दुसरा पैलू म्हणजे यासाठी क्लिष्ट प्रक्रिया नसावी, ज्याकरवे केलेल्या नियमांचा उपयोग होण्याऐवजी निरर्थक वाद निर्माण होतील.
- हे विकिपीडियाच्या मूल्यांमध्ये नक्कीच बसते.
- अधिक प्रश्न असल्यास कळवावे.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) १२:३८, २९ मे २०२५ (IST)
- ता.क. असे निकृष्ट दर्जाचे लेख काढून टाकणे हाच सध्याचा उपाय आहे. या प्रस्तावित नियमामुळे अशा लेखांतील उपयुक्त मजकूर वाचवता येईल. क्वचित अशा मजकूरामागे लिहिणाऱ्याने मोठी मेहनत घेतल्याचेही दिसून येते, तरी ती वाया जाऊ नये याचीही काळजी आपोआपच घेतली जाईल.
- अभय नातू (चर्चा) १२:३९, २९ मे २०२५ (IST)
- @अभय नातू माझे मत असे आहे की ऑटोकन्फर्म्ड सदस्य ऐवजी रोलबॅकर यांना ही जबाबदारी दिली पाहिजे. अशी परिस्थिती कल्पना करा जिथे एक नवीन सदस्य सामील होतो. तो अगदी मूलभूत पद्धतीने लेख बनवतो आणि चार दिवसांनी तो ऑटोकन्फर्म होतो आणि नंतर त्याचे लेख स्वतः मुख्य नेमस्पेसमध्ये हलवतो. मग अशी परिस्थिती येऊ शकते जिथे पेज हलवण्याचे उल्लंघन होते. तरीही आपण अनुभवी वापरकर्त्यांना रोलबॅक अधिकार देत आहोत, म्हणून जर तसे असेल तर रोलबॅकर्स या उद्देशासाठी सर्वोत्तम असतील. आपणहे मर्यादित वापरकर्त्यांसाठी ठेवण्याची योजना करू शकतो आणि इतर सामान्यपणे संपादित करू शकतात. मी नवीन मसुदा नेमस्पेस तयार करण्याच्या बाजूने आहे परंतु भविष्यात गोंधळ आणि समस्या टाळण्यासाठी आपल्याकडे धोरणे स्पष्ट असणे आवश्यक आहे. Tiven2240 (चर्चा) १२:५८, २९ मे २०२५ (IST)
- @Tiven2240,
- नवीन सदस्यांची नवीन पाने मुख्य नामविश्वातच तयार होतील. हे आजही होते आणि त्यात बदल नाही. फरक हाच आहे की येथील ऑटोकन्फर्म्ड सदस्य मुख्य नामविश्वातील (गचाळ) लेख मसुद्यात घालू शकतील.
- पाने मुख्य नामविश्वातून हलविण्याचा अधिकार आज जवळजवळ सगळ्या सदस्यांना आहे. यातही काही फरक प्रस्तावित नाही.
- असा अधिकार रोलबॅकर्सपुरता मर्यादित करणे हे थोडे अ-लोकशाही वाटते. तरीसुद्धा हे करण्यास हरकत नाही, जर असा अधिकार मोजून-मापून न देता जाणत्या, जुन्या सदस्यांना दिला जाऊ शकेल.
- इतर सदस्यांचे व प्रचालकांचेही मत जाणून घेण्यास उत्सुक आहे.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) १३:०९, २९ मे २०२५ (IST)
- साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात मत पाहून मीडियाविकी/स्ट्युअर्डकडे अधिकृत विनंती केली जाईल.
- एक आठवडा होऊन गेला.-संतोष गोरे ( 💬 ) १०:०७, ९ जून २०२५ (IST)
- आठवणीकरता धन्यवाद.
- ७ मंजूर आणि ० नामंजूर/तटस्थ मते आल्याने या हे धोरण आपण स्वीकारत आहोते.
- पुढील १-२ दिवसांत ही विनंती करीत आहे.
- अभय नातू (चर्चा) १०:२३, ९ जून २०२५ (IST)
- @Tiven2240,
- एखाद्या नामविश्वाला विशिष्ट अधिकार देता येत नाहीत असे मेटा वर सांगण्यात आले आहे.
- तु(मच्या)मा(हिती)सा(ठी) अभय नातू (चर्चा) ११:४०, १२ जून २०२५ (IST)
- @अभय नातू माहितीसाठी धन्यवाद Tiven2240 (चर्चा) १४:२६, १२ जून २०२५ (IST)
- @अभय नातू माझे मत असे आहे की ऑटोकन्फर्म्ड सदस्य ऐवजी रोलबॅकर यांना ही जबाबदारी दिली पाहिजे. अशी परिस्थिती कल्पना करा जिथे एक नवीन सदस्य सामील होतो. तो अगदी मूलभूत पद्धतीने लेख बनवतो आणि चार दिवसांनी तो ऑटोकन्फर्म होतो आणि नंतर त्याचे लेख स्वतः मुख्य नेमस्पेसमध्ये हलवतो. मग अशी परिस्थिती येऊ शकते जिथे पेज हलवण्याचे उल्लंघन होते. तरीही आपण अनुभवी वापरकर्त्यांना रोलबॅक अधिकार देत आहोत, म्हणून जर तसे असेल तर रोलबॅकर्स या उद्देशासाठी सर्वोत्तम असतील. आपणहे मर्यादित वापरकर्त्यांसाठी ठेवण्याची योजना करू शकतो आणि इतर सामान्यपणे संपादित करू शकतात. मी नवीन मसुदा नेमस्पेस तयार करण्याच्या बाजूने आहे परंतु भविष्यात गोंधळ आणि समस्या टाळण्यासाठी आपल्याकडे धोरणे स्पष्ट असणे आवश्यक आहे. Tiven2240 (चर्चा) १२:५८, २९ मे २०२५ (IST)
- क्षमा असावी, काही खाजगी कारणांमुळे मी भरपूर दिवस उपलब्ध नव्हतो. माझ्या मोबाईलवरून मराठी लिहिता येत नाही त्यामुळेसुद्धा बऱ्याच मर्यादा येतात. वरील चर्चेबाबत, आणि इतर विकिपीडियाच्या कार्यप्रणालीबाबत काही निरीक्षणे:
- इंग्रजी विकिपीडियावर अंकपत्ते, आणि बिगर-स्वयंशाबीत सदस्य केवळ आपल्या नामविश्वात नवीन पाने तयार करू शकतात (सदस्य, आणि सदस्य चर्चा).
- अभय यांनी म्हटल्याप्रमाणे एखाद्या नामविश्वाला विशिष्ट अधिकार देता येत नाहीत.
- जर आपण इंग्रजी विपीचे अनुकरण केले तर संपादकांच्या मानसिकतेचे खच्चीकरण होण्याची दाट शक्यता आहे.
- इंग्रजी, आणि काही इतर विपीवर ह्या कामासाठी विशेष/वेगळे सदस्य गट आहेत (new page reviewer)
- सक्रिय अनुभवी संपादकांची कमी संख्या हि मराठी विपीची मोठी अडचण आहे.
- आपल्याकडे सध्या दोनच पर्याय आहेत - १: जे लेख उल्लेखनीय/विश्वकोशीय नाहीत, ते सरसकट वगळणे (delete करणे), सुधारण्याजोग्या लेखावर काम करणे. २: वगळण्यालायक लेख वगळावे, आणि सुधारण्याजोगे लेख मसुदा नामविश्वात हलवून त्यावर काम करणे.
- वरील पैकी दुसरा पर्याय निवडल्यास (कमी दर्जाचे) सगळेच लेख वगळण्याची गरज पडणार नाही, लेखांची गुणवत्ता वाढण्यास नक्कीच मदत होईल.
- ह्या चर्चेस थेट संबंधित नसणारे, पण थोडेफार संबंधित निरीक्षण: "अलीकडील बदल" दिवसातून कधीही बघितले असता कमीत कमी ३० ते ५० टक्के बदल हे दूरचित्रवाहिनी मालिका, त्यातील कलाकार, आणि संबंधित विषयावर असतात. ह्या विषयांची उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्वे बदलण्याची नितांत आवश्यकता आहे. —usernamekiran (talk) ०८:२३, १५ जून २०२५ (IST)
- @अभय नातू, नमस्कार, गेले दोन दिवसात या अंकपत्यावरून मुख्य नामविश्वात नवीन लेख निर्मिती झालेली दिसत आहे. अपेक्षित असे होते की हे लेख स्वतःहून मसुद्यात निर्माण व्हायला हवे होते, बरोबर ना?--संतोष गोरे ( 💬 ) १०:१४, २६ जून २०२५ (IST)
- नाही. नवीन लेख नेहमी मुख्य नामविश्वातच तयार होतात. त्यांतील जे दर्जाहीन असतील ते मसूदा नामविश्वात हलवले जावेत.
- इंग्लिश विकिपीडियावर उलट होते. अभय नातू (चर्चा) १०:१९, २६ जून २०२५ (IST)
- @अभय नातू आणि संतोष गोरे: मी विकिपीडिया:मसूदा हे नवीन पान तयार केले. पण योग्य काय? मसुदा कि मसूदा? —usernamekiran (talk) २१:५१, २६ जून २०२५ (IST)
- मी फारसे लक्ष दिले नव्हते, तसेच व्याकरणाच्या बाबतीत तुम्ही आणि @Shantanuo तज्ज्ञ आहात. असो, गुगल केले असता वेगवेगळ्या dictionary वर draft साठी मसुदा हाच शब्द अचूक येतोय. तसेच भारताची संविधान सभा लेखात मसुदा हा शब्द तब्बल १४ वेळेस येतोय.-संतोष गोरे ( 💬 ) २२:०९, २६ जून २०२५ (IST)
- हे बदलून घेण्यासाठी मेटावर विनंती करावी लागेल. अभय नातू (चर्चा) ०७:५८, २७ जून २०२५ (IST)
- If you use any one of these four options, you will get the correct word "मसुदा"
- 1) Google Android Mobile App called "Marathi Spell check" 2) Telegram Bot called @MarathiSpellbot 3) Firefox Extension called "Marathi Dictionary" 4) Libreoffice Extension called "GaMaBhaNa" Shantanuo (चर्चा) १५:१२, २९ जून २०२५ (IST)
- @अभय नातू मसुदा असे शुद्धलेखन अजून झाले नाही? तसेच मसुदा या नामविश्वातील लेखांकरिता एक स्वतंत्र वर्ग:मसुदा असा वर्ग असावा का? संतोष गोरे ( 💬 ) १२:१९, ७ जुलै २०२५ (IST)
- वर दिलेल्या चार पैकी कोणताही पर्याय वापरण्याइतका वेळ नसेल तर ऊंझा पद्धत वापरून र्हस्व / दीर्घ लिहा. म्हणजे उकार आला तर शक्यतो र्हस्व लिहायचा आणि ईकार आला तर दीर्घ. त्यामुळे मसुदा मधील सु पहिला आणि मसीहा मधील सी दुसरा. हा मराठीतील अधिकृत नियम नाही. ही आपत्कालीन व्यवस्था आहे!! Shantanuo (चर्चा) १०:२१, ८ जुलै २०२५ (IST)
- तुम्ही लिहिलेले कळले नाही. बदल झालेला आहे. -- अभय नातू (चर्चा) ११:४८, ८ जुलै २०२५ (IST)
- विनंती केलेली नाही. मी करु का?
- वर्ग करण्याची गरज नाही. नामविश्वातील सगळे लेख हे मसुद्यात आहेत.
- मी फारसे लक्ष दिले नव्हते, तसेच व्याकरणाच्या बाबतीत तुम्ही आणि @Shantanuo तज्ज्ञ आहात. असो, गुगल केले असता वेगवेगळ्या dictionary वर draft साठी मसुदा हाच शब्द अचूक येतोय. तसेच भारताची संविधान सभा लेखात मसुदा हा शब्द तब्बल १४ वेळेस येतोय.-संतोष गोरे ( 💬 ) २२:०९, २६ जून २०२५ (IST)
- @अभय नातू आणि संतोष गोरे: मी विकिपीडिया:मसूदा हे नवीन पान तयार केले. पण योग्य काय? मसुदा कि मसूदा? —usernamekiran (talk) २१:५१, २६ जून २०२५ (IST)
-- अभय नातू (चर्चा) १२:४३, ७ जुलै २०२५ (IST)
- होय, केल्यास बरे होईल.-संतोष गोरे ( 💬 ) १३:१६, ७ जुलै २०२५ (IST)
- https://phabricator.wikimedia.org/T398792 अभय नातू (चर्चा) १३:४६, ७ जुलै २०२५ (IST)
- "Spelling is now revised, but the internal links using मसूदा:xxx are void now and should be replaced to मसुदा:xxx manually (or by bot), you have to tell your community update them."
- -- अभय नातू (चर्चा) १९:१९, ७ जुलै २०२५ (IST)
- https://phabricator.wikimedia.org/T398792 अभय नातू (चर्चा) १३:४६, ७ जुलै २०२५ (IST)