विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा/जुनी चर्चा २
महाराष्ट्रातील रस्ते अपघातात
[संपादन]महाराष्ट्रात झालेल्या रस्ते अपघाताची यादी असे पान बनवावे का.? -- . Shlok talk . १८:१५, १८ जून २०१३ (IST)
- माझ्या मते आधी महाराष्ट्रातील रस्ते अपघात असा लेख बनवून त्या अनुषंगाने यादी बनवावी म्हणजे प्रत्येक किरकोळ (विश्वकोशीय अनुल्लेखनीयता या अर्थाने) अपघाताची यादी न बनता विश्वकोशीय उल्लेखनीयता असलेल्या अपघातांची यादी बनेल.
- विषय निघालाच आहेतर विश्वकोशीय उल्लेखनीयता अथवा संदर्भ मूल्य असलेल्या याद्यांकरता, यादी अथवा सूची असे वेगळे नामविश्व मराठी विकिपिडियावर असावे का ? या अनुषंगाने चर्चा व्हावी असे वाटते.
- सध्या याद्या बनवणे विकिपीडियाच्या अधिकृत धोरणास धरून नाही. पण या धोरणात विचार विनीमय होऊन सुयोग्य संकेता सहीत काही लवचिकता आणता येईल का हे पहावे किंवा कसे ?
- सर्वच याद्यांना विश्वकोशीय मूल्य नसते. याद्यांच्या विरोधातली सर्वात मोठी बाब म्हणजे लोक याद्या बनवून सोडून देतील आणि परिच्छेद लेखन हा मुख्य विश्वकोशीय हेतू मागे पडेल. दुसरी बाब विश्वकोशीय वाचन करताना मध्येच केवळ यादीची पाने हाती लागणे हातात काही वेळा रिकामा लेख हाती आल्या प्रमाणे होऊन वाचकाचा हिरमोड होतो. असे मला वाटते.
- विश्वकोशीय उल्लेखनीयता असलेल्या याद्यांबद्दल जमेच्या बाजू पुढील प्रमाणे
- काही याद्यांना विश्वकोशीय मूल्य असू शकते.
- भावी लेखांकरता संदर्भ मूल्य असलेला कच्चा मजकूर उपलब्ध होतो.
- विकिपीडिया लेख प्रकल्पांना अप्रत्यक्ष पणे माहितीचा पुरवठा होतो.
- आपणास माहित आहे का ? (आमाआका?) या मुखपृष्ठ /दालन सदरास सहाय्य भूत होऊ शकते.
इतर भाषी विकिपीडियांना पण पूर्णत: यादी हा प्रकार टाळता आलेला नाही.जी गोष्ट पूर्णत: टाळणे शक्य नाही ती वस्तुस्थिती म्हणून स्विकारावी आणि वेगळे नामविश्व बनवावे किंवा कसे? विषय निघालाच तर या संदर्भाने चर्चेची केवळ प्राथमीक स्वरूपाची चर्चा करावी असे वाटते.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:०१, १८ जून २०१३ (IST)
विकिपीडिया विशेष धूळपाटी पानांवर इनपुट मेथड्स डिफॉल्ट स्वरूपात उपलब्धते करता सहमती विनंती
[संपादन]- सदर चर्चा विकिपीडिया:चावडी/विकिपीडियात कळपट हवा येथे स्थानांतरीत केली
Defaultsort मराठी शब्दावर सहमत व्हा
[संपादन]यथादृश्यसंपादकातून Defaultsort नमूदकरताना केवळ शब्द नमुद करावे लागतात Defaultsort :अमुकतमूक यथादृश्यसंपादकातून Defaultsort शब्द आपोआप येतो यथादृश्यसंपादकाने Defaultsort शब्दा एवजी मराठी शब्द वापरावा म्हणून नेमक्या एका शब्दाची निवड सदस्यांनी करावी अशी विनंती आहे.निवड झाल्या नंतर, आधी जादुईशब्दांमध्ये तो नोंदवावा लागेल त्यानंतर बगझीलावर बग नोंदवून Defaultsort चा पर्यायी मराठी शब्द कोणता वापरावा हे सांगावे लागेल. इतर जादुई शब्दपर्याय मॅन्युअली वापरण्याकरता पुढेही चालू रहातील पण यथादृश्यसंपादकाकरता एकाच शद्बावर सहमती हवी आहे.
- DEFAULTSORT करता सध्याचे उपलब्ध जादूईशब्द पर्याय: अविचलवर्ग:, अविचलवर्गकळ:, अविचलवर्गवर्गीकरण
- नवीन सुचवलेले आपसूकविल्हेवारी, पूर्वसिद्धवर्गवारी ,पूर्वसिद्धविल्हेवारी
सदस्य जे यांच्या चर्चा पानावरील आधीची चर्चा संदर्भा करीता
[संपादन]Defaultsort जुन्या शब्दकोशांत आपसुख हा शब्द दिला आहे. काही थोड्यांनी आपसुक हाही बरोबर मानला आहे. हल्लीचे शुद्धलेखनतज्ज्ञ ’आपसूक’ बरोबर समजतात. मला वाटते बहुसंख्यांना मान्य असलेला आपसुख वापरावा. पण आपसूक चुकीचा नाही. आपसुख म्हणजे automatic, आपखुशीने, स्वतःहून, स्वयमिच्छित. हे खरे. पण आपसुख हा शब्द Defaultसाठी कितपत योग्य आहे, ते माहीत नाही. संगणक शब्दावलीतील Default म्हटले की आपल्याला A value or setting or method automatically assigned by an operating system, program etc असे काहीतरी जाणवते. जे घडते आहे ते आपसुख घडते आहे, या दृष्टिकोणातून ’आपसुख’ बरोबर आहे. परंतु By default असलेली गोष्ट खरोखर automatic आहे का? की कुणीतरी अगोदरच set करून ठेवली आहे? तसे समजले तर तर पूर्वसिद्ध, पूर्वरचित, सुनिश्चित असे काहीतरी डोळ्यासमोर येते.
विल्हेवारी हा शब्द छान आहे, पण त्याऐवजी वर्गवारीसुद्धा चालेल.
संस्कृतोत्पन्न शब्द हवा असेल तर ’पूर्वसिद्ध वर्गवारी’ हा वापरावा, अर्थात आपण निवडलेला ’आपसूक विल्हेवारी’ देखील चालेल....J (चर्चा) २०:१२, २१ जुलै २०१३ (IST)
विकिपीडीयावरील DEFAULTSORT मध्ये , 'defaultsorting होताना त्याकरीता आपण निर्देशीत केलेल्या शब्दांनुसार(किवर्ड)अनुसार by default क्रमवारी लावण्याची कृती' असे काहीसे अभिप्रेत आहे.....action by default या अर्थछटेमुळे आपसूक हा शब्द उपयोगात आणण्याचा विचार केला.
DEFAULTSORT करता यापुर्वी अविचलवर्ग:, अविचलवर्गकळ:, अविचलवर्गवर्गीकरण: असे शब्द उपयोगात आणले आहेत पण मराठी विकिपीडियावर ते फारसे प्रचलीत होऊन वापरात आले नाहीत.वर्गीकरण शब्द एकदा वापरून होत असल्यामुळे आणि सॉर्टला जवळचा असल्यामुळे दुसऱ्यांदा अनुवाद करताना आपसूक विल्हेवारी असा केला. पण DEFAULTSORT हि बाब मी स्वत: फारशी वापरत नसल्यामुळे चावडीवर वापरणाऱ्यांना उपयोगात आणण्यास कोणता अधीक सहजसुलभ आहे ते विचारावे लागेल असे दिसते.
आपसूकची आपसुख हि व्युत्पत्ती माहित नव्हती. मार्गदर्शना बद्दल धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:२७, २२ जुलै २०१३ (IST)
माहितीचौकट शाहीर साचा बनवून हवा
[संपादन]नमस्कार,
वर्ग:शाहीर मध्ये आंतर्भूत होणाऱ्या शाहीरांकरता विशेष माहितीचौकट शाहीर बनवून मिळाल्यास हवा आहे. सध्या {{माहितीचौकट साहित्यिक अथवा "{{माहितीचौकट व्यक्ती" हे साचे वापरले जात आहेत असे दिसते. बऱ्याच शाहीरांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणि स्वांतत्र्य चळवळीत मोलाचे योगदान राहीले आहे. त्यांच्या योगदानाची नीटशी व्यवस्थीत दखल घेऊ शकेल असा माहिती चौकट साचा बनवण्यास कुणी सवड काढू शकल्यास स्वागत आहे.
धन्यवाद
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:५२, १० ऑगस्ट २०१३ (IST)
विकि पी.आर.
[संपादन]इंग्रजी विपी वरील हा लेख वाचनात आला. मराठी विपी वर अशी संपादने होताना दिसत नाहीत, परंतु असे काही अढळल्यास मराठी विपी समुदायाने देखील अश्या सदस्या खात्यांना प्रतिबंधीत करवे. सर्व सदस्यांना याची माहीती असावी याकरीता हा विषय येथे मांडत आहे. - प्रबोध (चर्चा) ०८:१५, २८ ऑक्टोबर २०१३ (IST)
Short-term Assignment at CIS-A2K
[संपादन]नमस्कार! मराठी माहित नाही, माफ करा. Apologies for not posting in your language. At CIS-A2K we are looking to engage an experienced Wikimedian on a short-term assignment. Please see this notice for more details. All queries may please be sent over e-mail given in the notice.--Visdaviva (चर्चा) १५:३४, २८ ऑक्टोबर २०१३ (IST)
- Please note that CIS-A2K is extending the last date of submitting the application to 5th November 2013. Nitika.t (चर्चा) १३:२६, ३१ ऑक्टोबर २०१३ (IST)
विश्वविज्ञान - मराठी विज्ञान अनियतकालिक
[संपादन]विज्ञानसाहित्य प्रसाराला वाहिलेल्या ‘सुनील प्रकाशन’ या संस्थेचे ‘विश्व विज्ञान’ हे विज्ञान अनियतकालिक www.vishwavidnyan.in या संकेतस्थळावर ४ नोव्हेम्बर २०१३ रोजी विज्ञान लेखक सुनील जोगळेकर यांच्या स्मृतीदिनी सुरु झाले आहे.
CIS-A2K Grant Report September 2012-June 2013
[संपादन] (Apologies for writing in English. You are welcome to translate this message)
Greetings! As many of you know that the Wikimedia Foundation approved a 22 month grant to the CIS-A2K. The aim of the grant is to support the growth of Wikimedia movement in India.
Please find the Grant Report for the first 10 months period here.
CIS-A2K will be happy to receive your feedback. Please let us know if you have any suggestions, questions and concerns about the report and our work. We would be glad to have this feedback here.
We are thankful to the Wikimedia community in India, Wikimedia India Chapter and the Wikimedia Foundation for actively engaging with our work. We will continue to work upon our deficiencies, failures and successes. Thanks! --Hindustanilanguage (चर्चा) १२:४२, ६ नोव्हेंबर २०१३ (IST)
चुकलेला दुवा
[संपादन]कृपया वाक्यरचना ही पान Sentence (linguistics) या इंग्रजी पानाला जोडावे. सध्या ते Syntax यापानाला जोडले गेले आहे. मी ते दुरुस्त करण्याचा वरवर प्रयत्न केला पण जमले नाही.... निनाद ०५:५१, १० डिसेंबर २०१३ (IST)
चित्र सुधारण्यात सहभाग /साहाय्य हवे
[संपादन]नमस्कार, डावीकडे दर्शविलेले चित्र:ULS LangSet mr-wiki help 3.png हे चित्र, मराठी विकिपीडियावरची मराठी लेखन सुविधा वापरली जाणाऱ्यांकडून सर्वाधीक हिट्स मिळणारे चित्र आहे.फिल्ड स्टडीमधून लक्षात आलेली दुर्दैवाची गोष्ट म्हणजे चित्रावर क्लिक केले म्हणजे मराठी लेखन सुविधा सुरू होते असा समज नवागतांचा होतो आहे.
या चित्रातील मजकुरातच बदल करण्याची गरज आहे, की जेणे करून लोक चित्रावर टिचकी मारणार नाहीत तर ते एडीट विंडो मध्ये टिचकी मारून मग प्रॉपर आयकॉनवर टिचकी मारून मराठी लेखन सुविधा ॲक्टीव्हेट करतील.
या चित्रात सुधारणा सुचवणे अथवा नव्या पर्यायी चित्रे /फ्लॅश अथवा मुक्त व्हिडीओ सादरीकरण करून मिळण्याचे स्वागत असेल.
या चित्र:मराठी भाषांतर प्रकल्प चिञ.gif चित्रात एका नंतर एक फ्लॅश सादरीकरण येते तसे मराठी लेखन सुविधांच्या संदर्भाने कुणी बनवून दिल्यास तसे सुद्धा हवे आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:४९, १५ डिसेंबर २०१३ (IST) .
guru