Jump to content

२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७ या पानावरून पुनर्निर्देशित)
२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमान इंग्लंड इंग्लंड
वेल्स वेल्स[nb १]
विजेते इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (४ वेळा)
सहभाग
सामने ३१
मालिकावीर इंग्लंड टॅमी बोमाँट
सर्वात जास्त धावा इंग्लंड टॅमी बोमाँट (४१०)
सर्वात जास्त बळी दक्षिण आफ्रिका डेन व्हान नीकर्क (१५)
अधिकृत संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
दिनांक २४ जून – २३ जुलै
२०१३ (आधी) (नंतर) २०२१

२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक ही क्रिकेट स्पर्धा २४ जून ते २३ जुलै, २०१७ दरम्यान इंग्लंडमध्ये खेळविली गेली. [] ही स्पर्धा महिला क्रिकेट विश्वचषकाची ११वी आवृत्ती होती., आणि इंग्लंडमधील ही तिसरी विश्वचषक स्पर्धा होती (ह्या आधी १९७३ आणि १९९३ मध्ये ही स्पर्धा खेळविली गेली होती. ही पहिलीच स्पर्धा अशी होती की ज्यामध्ये सर्व व्यावसायिक खेळाडूंचा सहभाग होता.[] स्पर्धेसाठी एकून आठ संघ पात्र ठरले होते. लॉर्ड्सवर २३ जुलै रोजी झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने भारतीय महिला संघाचा ९ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.[]


या स्पर्धेसाठी आठ संघ पात्रता स्पर्धा खेळून पात्र ठरले. हे संघ दोन गटांत विभागले गेले असून ते एकमेकांशी साखळी सामने खेळले. दोन्ही गटांतून प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीत गेले.

या स्पर्धेतील १० सामन्यांत डीआरएस वापरण्यात आली. महिला क्रिकेटमध्ये डीआरएसचा हा पहिला वापर होता.

गट अ

[संपादन]
इंग्लंड ऑस्ट्रेलिया भारत न्यू झीलँड
हेदर नाइट मेग लॅनिंग मिताली राज सुझी बेट्स
टॅमी बोमाँट सॅराह ॲले एकता बिष्ट एमी सॅथरवाइट
कॅथेरीन ब्रंट क्रिस्टेन बीम्स राजेश्वरी गायकवाड एरिन बर्मिंगहॅम
जॉर्जिया एल्विस ॲलेक्स ब्लॅकवेल झूलन गोस्वामी सोफी डिव्हाइन
जेनी गन निकोल बोल्टन मानसी जोशी मॅडी ग्रीन
ॲलेक्स हार्टली ॲशली गार्डनर हरमनप्रीत कौर हॉली हडलस्टन
डॅनियेल हॅझेल रेचॅल हेन्स वेदा कृष्णमूर्ती ली कॅस्पेरेक
बेथ लँग्स्टन अलिसा हीली स्मृती मंधाना आमेलिया केर
लॉरा मार्श जेस जोनासन मोना मेश्राम केटी मार्टिन
आन्या श्रबसोल बेथ मूनी शिखा पांडे थॅमसिन न्यूटन
नॅटली सायव्हर एलिस पेरी नुझात परवीन केटी पर्किन्स
सॅराह टेलर मेगन शुट पूनम राउत ॲना पीटरसन
फ्रान विल्सन बेलिंडा वाकारेवा दीप्ती शर्मा रेचेल प्रीस्ट
लॉरेन विनफील्ड एलिस व्हिलानी सुषमा वर्मा हॅना रोव
डॅनियेल वायट अमांडा-जेड वेलिंग्टन पूनम यादव लिया ताहुहु

गट ब

[संपादन]
दक्षिण आफ्रिका श्रीलंका वेस्ट इंडीज पाकिस्तान
डेन व्हान नीकर्क इनोका रणवीरा स्टेफानी टेलर सना मीर
तृषा चेट्टी चामरी अटापट्टू मेरिसा ॲग्विलेरा आयेशा झफर
नेडीन डि क्लर्क चंडिमा गुणरत्ने रेनीस बॉइस नाहिदा खान
मिन्यॉन दु प्रीझ निपुणी हंसिका शमिलिया कॉनेल मरिना इकबाल
शबनिम इस्माईल अमा कंचना शनेल डेली बिस्माह महरूफ
मॅरिझॅन कॅप ईशानी कौशल्या डिआंड्रा डॉटिन जवेरिया खान
अयाबाँगा खाका हर्षिता मादवी अफि फ्लेचर नैन आबिदी
मासाबाटा क्लास दिलानी मनोदरा कियाना जोसेफ सिद्रा नवाझ
लिझेल ली हसिनी परेरा किशोना नाइट कैनात इम्तियाझ
सुने लूस चामरी पोल्गाम्पोला हेली मॅथ्यूस अस्माविया इकबाल खोखर
रैसिबे न्टोझाखे उदेशिका प्रबोदनी अनिसा मोहम्मद डायना बेग
अँड्री स्टाइन ओशादी रणसिंगे चेडिअन नेशन वहीदा अख्तर
क्लोई टायरॉन शशिकला सिरिवर्दने अकीरा पीटर्स नश्रा संधू
मोझेलिन डॅनियेल्स प्रसादनी वीराक्कोडी शकीरा सलमान गुलाम फातिमा
लॉरा वोल्व्हार्ट श्रीपाली वीराक्कोडी फेलिशिया वॉल्टर्स सादिया युसुफ

मैदाने

[संपादन]

या स्पर्धेती सामने पाच मैदानांवर खेळले जातील. यात डर्बीशायर, लीस्टरशायर, सोमरसेट, ग्लाउस्टरशायर या काउंट्यांची मैदाने व लॉर्ड्स यांचा समावेश आहे. अंतिम सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल.[][]

लंडन डर्बी ब्रिस्टल लीस्टर टाँटन
लॉर्ड्स काउंटी मैदान ब्रिस्टल काउंटी ग्राउंड ग्रेस रोड काउंटी मैदान
क्षमता: २८,००० क्षमता: ९,५०० क्षमता: ८,००० क्षमता: १२,००० क्षमता: ८,५००

साखळी सामने

[संपादन]

स्पर्धेत भाग घेणारे आठ संघ दोन गटांत विभागले गेले. प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर सगळ्या संघांशी एक-एक सामना खेळला. त्यांपैकी सर्वोत्तम दोन संघ उपांत्य फेरीत दाखल झाले. २३ जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर अंतिम सामना खेळाल गेला. एकूण २८ दिवसांतर ३१ सामने खेळले गेले होते.[][] या सामन्यांआधी आठ सराव सामने खेळले गेले[]

संघ सा वि गुण निधा
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२ +१.२९५
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १२ +१.००४
भारतचा ध्वज भारत १० +०.६६९
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका +१.१८३
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड +०.३०९
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज -१.५२२
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका -१.०९९
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान -१.९३०

  उपांत्य फेरीसाठी पात्र

१ली फेरी

[संपादन]
२४ जून २०१७
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१८८/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१८९/१ (३७.४ षटके)
चामरी अटापट्टू ५३ (६६)
हॉली हडलस्टन ५/३४ (१० षटके)
सुझी बेट्स १०६* (१०९)
चंडिमा गुणरत्ने १/२० (५ षटके)
न्यू झीलंड महिला ९ गडी व ७४ चेंडू राखून विजयी
ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: अनिल चौधरी (भा) आणि क्लेर पोलोसाक (ऑ)
सामनावीर: हॉली हडलस्टन (न्यू)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, गोलंदाजी.
  • गुण: न्यू झीलंड महिला २, श्रीलंका महिला ०.

२४ जून २०१७
धावफलक
भारत Flag of भारत
२८१/३ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२४६ (४७.३ षटके)
स्मृती मंधाना ९० (७२)
हेदर नाइट २/४१ (७ षटके)
फ्रान विल्सन ८१ (७५)
दीप्ती शर्मा ३/४७ (८.३ षटके)
भारतीय महिला ३५ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट, डर्बी
पंच: अहसान रझा (पा) आणि ग्रेगरी ब्रेथवेट (वे)
सामनावीर: स्मृती मंधाना (भा)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, गोलंदाजी.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग सात अर्धशतके झळकावणारी मिताली राज (भा) ही पहिलीच खेळाडू.[]
  • गुण: भारत महिला २, इंग्लंड महिला ०.

२५ जून २०१७
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२०६/८ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२०७/७ (४९ षटके)
नाहिदा खान ७९ (१०१)
मोझेलिन डॅनियेल्स २/२१ (१० षटके)
लिझेल ली ६० (७९)
सादिया युसुफ २/३० (१० षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ३ गडी व ६ चेंडू राखून विजयी
ग्रेस रोड, लेस्टर
पंच: लँग्टन रुसेरे (झि) आणि शर्फुदौला (बां)
सामनावीर: शबनिम इस्माईल (द)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, गोलंदाजी.
  • मिन्यॉन दु प्रीझ ही १०० एकदिवसीय सामने खेळणारी पहिलीच दक्षिण आफ्रिकी महिला ठरली.[१०]
  • गुण: दक्षिण आफ्रिका महिला २, पाकिस्तान महिला ०.

२६ जून २०१७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२०४ (४७.५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०५/२ (३८.१ षटके)
हेली मॅथ्यूस ४६ (६३)
एलिस पेरी ३/४७ (९ षटके)
निकोल बोल्टन १०७* (११६)
स्टेफानी टेलर २/३३ (८.१ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ८ गडी आणि ७१ चेंडू राखून विजयी
काउंटी मैदान, टाऊंटन
पंच: कॅथी क्रॉस (न्यू) आणि अ‍ॅड्रीयन होल्डस्टॉक (द)
सामनावीर: निकोल बोल्टन (ऑ)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: फेलिशिया वॉल्टर्स (वे).
  • ॲशली गार्डनर ही विश्वचषक क्रिकेट खेळणारी पहिली मूळ ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू ठरली.[११]
  • गुण: ऑस्ट्रेलिया महिला २, वेस्ट इंडीज महिला ०.


२री फेरी

[संपादन]
२७ जून २०१७
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३७७/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१०७/३ (२९.२ षटके)
आयेशा झफर ५६* (७७)
कॅथेरीन ब्रंट २/२१ (६ षटके)
इंग्लंड महिला १०७ धावांनी विजयी (ड-लु पद्धत)
ग्रेस रोड, लेस्टर
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि जॅकलीन विल्यम्स (वे)
सामनावीर: नताली सायव्हर (इं)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, गोलंदाजी.
  • पाकिस्तानच्या डावा दरम्यान आलेल्या पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
  • नताली सायव्हर आणि हेदर नाइट (इं) यांची महिला एकदिवसीय क्रिकेटमधील पहिलीच शतके.[१२]
  • ही इंग्लंड महिलांची विश्वचषकातील सर्वोच्च तर एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.[१२]
  • गुण: इंग्लंड महिला २, पाकिस्तान महिला ०.

२८ जून २०१७
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.
  • गुण: न्यू झीलंड महिला १, दक्षिण आफ्रिका महिला १.

२९ जून २०१७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१८३/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१८६/३ (४२.३ षटके)
हेली मॅथ्यूस ४३ (५७)
पूनम यादव २/१९ (१० षटके)
स्मृती मंधाना १०६* (१०८)
शमिलिया कॉनेल १/२३ (४ षटके)
भारत महिला ७ गडी व ४५ चेंडू राखून विजयी
काउंटी मैदान, टाऊंटन
पंच: शॉन जॉर्ज (द) आणि क्लेर पोलोसाक (ऑ)
सामनावीर: स्मृती मंधाना (भा)

२९ जून २०१७
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२५७/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२६२/२ (४३.५ षटके)
चामरी अटापट्टू १७८* (१४३)
निकोल बोल्टन २/१८ (३ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ८ गडी व ३७ चेंडू राखून विजयी
ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: अनिल चौधरी (भा) आणि Sue Redfern (इं)
सामनावीर: चामरी अटापट्टू (श्री)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, गोलंदाजी.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: बेलिंडा वाकारेवा (ऑ).
  • चामरी अटापट्टूची (श्री) महिला एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरी सर्वोच्च धावसंख्या आणि महिला विश्वचषकामध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या.[१४]
  • चामरी अटापट्टूचे पूर्ण झालेल्या सामन्यात सर्वाधिक टक्के धावा (६९.२६%) आणि चौकारांसहीत सुद्धा सर्वाधिक धावा (१२४).[१४]
  • गुण: ऑस्ट्रेलिया महिला २, श्रीलंका महिला ०.


३री फेरी

[संपादन]
२ जुलै २०१७
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२०४/८ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२०६/३ (३०.२ षटके)
हसिनी परेरा ४६ (६३)
लॉरा मार्श ४/४५ (१० षटके)
हेदर नाइट ८२ (७६)
अमा कंचना २/३८ (६ षटके)
इंग्लंड महिला ७ गडी व ११८ चेंडू राखून विजयी
काउंटी मैदान, टाऊंटन
पंच: कॅथी क्रॉस (न्यू) आणि अ‍ॅड्रीयन होल्डस्टॉक (द)
सामनावीर: लॉरा मार्श (इं)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.
  • गुण: इंग्लंड महिला २, श्रीलंका महिला ०.

२ जुलै २०१७
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२१९/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२२०/५ (४८.४ षटके)
केटी पर्किन्स ५२ (५९)
जेस जोनासन ३/३३ (१० षटके)
एलिस पेरी ७१ (९१)
ॲना पीटरसन २/२७ (६.४ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ५ गडी व ८ चेंडू राखून विजयी
ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: अहसान रझा (पा) आणि जॅकलीन विल्यम्स (वे)
सामनावीर: एलिस पेरी (ऑ)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
  • सुझी बेट्सचा (न्यू) १०० वा आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय सामना.[१५]
  • गुण: ऑस्ट्रेलिया महिला २, न्यू झीलंड महिला ०.

२ जुलै २०१७
धावफलक
भारत Flag of भारत
१६९/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
७४ (३८.१ षटके)
पूनम राऊत ४७ (७२)
नश्रा संधू ४/२६ (१० षटके)
सना मीर २९ (७३)
एकता बिष्ट ५/१८ (१० षटके)
भारत महिला ९५ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट, डर्बी
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि शॉन जॉर्ज (द)
सामनावीर: एकता बिश्ट (भा)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
  • गुण: भारत महिला २, पाकिस्तान महिला ०.

२ जुलै २०१७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
४८ (२५.२ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
५१/० (६.२ षटके)
लिझेल ली २९* (१६)
दक्षिण आफ्रिका महिला १० गडी व २६२ चेंडू राखून विजयी
ग्रेस रोड, लेस्टर
पंच: सू रेडफर्न (इं) आणि शर्फुदौला (बां)
सामनावीर: मॅरिझॅन कॅप (द)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, गोलंदाजी.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: रेनीस बॉइस आणि कियाना जोसेफ (वे).
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय इतिहासातील ही वेस्ट इंडीजची दुसरी निचांकी धावसंख्या.[१६]
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही धाव न देता ४ गडी बाद करणारी डेन व्हान नीकर्क (द) ही पहिलीच गोलंदाज ठरली.[१६]
  • गुण: दक्षिण आफ्रिका महिला २, वेस्ट इंडीज महिला ०.

४थी फेरी

[संपादन]
५ जुलै २०१७
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३७३/५ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३०५/९ (५० षटके)
टॅमी बोमाँट १४८ (१४५)
मॅरिझॅन कॅप ३/७७ (१० षटके)
लिझेल ली ७२ (७७)
डॅनियेल हॅझेल ३/७० (१० षटके)
इंग्लंड महिला ६८ धावांनी विजयी
ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: कॅथी क्रॉस (न्यू) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: सॅराह टेलर (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • टॅमी बोमाँट आणि सॅराह टेलर (इं) यांच्या दरम्यान महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील सर्वात मोठी भागीदारी (२७५).[१७]
  • महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ३०० पेक्षा अधिक धावा करणारा दक्षिण आफ्रिका हा पहिलाच संघ.[१८]
  • गुण: इंग्लंड महिला २, दक्षिण आफ्रिका महिला ०.

५ जुलै २०१७
धावफलक
भारत Flag of भारत
२३२/८ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२१६/७ (५० षटके)
दिलानी मनोदरा ६१ (७५)
पूनम यादव २/२३ (१० षटके)
भारतीय महिला १६ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट, डर्बी
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: दीप्ती शर्मा (भा)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
  • गुण: भारत महिला २, श्रीलंका महिला ०.

५ जुलै २०१७
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२९०/८ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३१ (५० षटके)
एलिस पेरी ६६ (९७)
सना मीर ३/४९ (१० षटके)
सना मीर ४५ (८५)
क्रिस्टेन बीम्स ३/२३ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १५९ धावांनी विजयी
ग्रेस रोड, लेस्टर
पंच: अनिल चौधरी (भा) आणि सू रेडफर्न (इं)
सामनावीर: एलिस व्हिलानी (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: सॅराह ॲले (ऑ)
  • रेचॅल हेन्सचा कर्णधार म्हणून पहिलाच एकदिवसीय सामना.[१९]
  • गुण: ऑस्ट्रेलिया महिला २, पाकिस्तान महिला ०.

६ जुलै २०१७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१५० (४३ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१५१/२ (१८.२ षटके)
किशोना नाइट ४१ (६०)
ली कॅस्पेरेक ३/१७ (१० षटके)
न्यू झीलंड महिला ८ गडी व १९० चेंडू राखून विजयी
काउंटी मैदान, टाऊंटन
पंच: अहसान रझा (पा) आणि अ‍ॅड्रीयन होल्डस्टॉक (द)
सामनावीर: ली कॅस्पेरेक (न्यू)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, गोलंदाजी.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: अकीरा पीटर्स (वे).
  • गुण: न्यू झीलंड महिला २, वेस्ट इंडीज महिला ०.


५वी फेरी

[संपादन]
८ जुलै २०१७
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१४४ (४६.५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४७/२ (१५ षटके)
सना मीर ५० (८६)
हॅना रोव ३/२२ (९ षटके)
सोफी डिव्हाइन ९३ (४१)
डायना बेग १/२८ (४ षटके)
न्यू झीलंड महिला ८ गडी व २१० चेंडू राखून विजयी
काउंटी मैदान, टाऊंटन
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि शर्फुदौला (बां)
सामनावीर: हॅना रोव (न्यू)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, फलंदाजी.
  • सना मीरचे (पा) १०० आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय सामने पूर्ण [२०]
  • लिया ताहुहुचे (न्यू) ५० आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय सामने पूर्ण.[२१]
  • सोफी डिव्हाइनचे (न्यू) ९३ धावांच्या खेळीत नऊ षट्कार, जे आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक आहेत.[२२]
  • गुण: न्यू झीलंड महिला २, पाकिस्तान महिला ०.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान महिला संघ स्पर्धेतून बाद.[२३]

८ जुलै २०१७
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२७३/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५८ (४६ षटके)
लिझेल ली ९२ (६५)
शिखा पांडे ३/४० (९ षटके)
दीप्ती शर्मा ६० (१११)
डेन व्हान नीकर्क ४/२२ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ११५ धावांनी विजयी
ग्रेस रोड, लेस्टर
पंच: जॅकलीन विल्यम्स (वे) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: डेन व्हान नीकर्क (द)
  • नाणेफेक : भारत महिला, गोलंदाजी.
  • गुण: दक्षिण आफ्रिका महिला २, भारत महिला ०.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे श्रीलंका महिला आणि वेस्ट इंडीज महिला संघ स्पर्धेतून बाहेर.

९ जुलै २०१७
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२५९/८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२५६/८ (५० षटके)
टॅमी बोमाँट ४९ (८८)
एलिस व्हिलानी ३/४२ (५ षटके)
एलिस पेरी ७० (८६)
ॲलेक्स हार्टली २/३१ (१० षटके)
इंग्लंड महिला ३ धावांनी विजयी
ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि अ‍ॅड्रीयन होल्डस्टॉक (द)
सामनावीर: कॅथेरीन ब्रंट (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • गुण: इंग्लंड महिला २, ऑस्ट्रेलिया महिला ०.
  • इंग्लंड महिला संघाचा १९९३ च्या विश्चचषकानंतर ऑस्ट्रेलिया महिला संघावरील हा विश्वचषकातील पहिलाच विजय.[२४]

९ जुलै २०१७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२२९/९ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१८२ (४८ षटके)
वेस्ट इंडीज महिला ४७ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट, डर्बी
पंच: शॉन जॉर्ज (द) आणि क्लेर पोलोसाक (ऑ)
सामनावीर: अनिसा मोहम्मद (वे)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, गोलंदाजी.
  • गुण: वेस्ट इंडीज महिला २, श्रीलंका महिला ०.


६वी फेरी

[संपादन]
११ जुलै २०१७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२८५/४ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
११७/३ (२४ षटके)
जवेरिया खान ५८* (७२)
अनिसा मोहम्मद २/२१ (४ षटके)
वेस्ट इंडीज महिला १९ धावांनी विजयी (ड-लु पद्धत)
ग्रेस रोड, लेस्टर
पंच: सू रेडफर्न (इं) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: डिआंड्रा डॉटिन (वे)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, गोलंदाजी.
  • पाकिस्तानच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे त्यांच्यासमोर २४ षटकांमध्ये १३७ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.
  • डिआंड्रा डॉटिनचे (वे) पहिले एकदिवसीय शतक,[२५] आणि ते वेस्ट इंडीज महिलेतर्फे सर्वात जलद शतक होते (७१ चेंडू).[२६]
  • गुण: वेस्ट इंडीज महिला २, पाकिस्तान महिला ०.

१२ जुलै २०१७
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१०१ (४०.३ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१०४/२ (२३.१ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ८ गडी व १६१ चेंडू राखून विजयी
काउंटी मैदान, टाऊंटन
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि कॅथी क्रॉस (न्यू)
सामनावीर: डेन व्हान नीकर्क (द)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.
  • गुण: दक्षिण आफ्रिका महिला २, श्रीलंका महिला ०.

१२ जुलै २०१७
धावफलक
भारत Flag of भारत
२२६/७ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२२७/२ (४५.१ षटके)
पूनम राऊत १०६ (१३६)
एलिस पेरी २/३७ (१० षटके)
मेग लॅनिंग ७६ (८८)
पूनम यादव १/४६ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ८ गडी व २९ चेंडू राखून विजयी
ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: अ‍ॅड्रीयन होल्डस्टॉक (द) आणि शर्फुदौला (बां)
सामनावीर: मेग लॅनिंग (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, गोलंदाजी.
  • इंग्लंडच्या शार्लोट एडवर्ड्सचा महिला एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीमधील सर्वाधिक ५,९९२ धावांचा विक्रम मागे टाकून भारताच्या मिताली राजचा (भा) ६,००० धावांचा विक्रम.[२७][२८]
  • ह्या सामन्याच्या निकाला मुळे ऑस्ट्रेलिया महिला संघ उपांत्य फेरीसाठी पात्र.[२९]
  • गुण: ऑस्ट्रेलिया महिला २, भारत महिला ०.

१२ जुलै २०१७
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२८४/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२०९ (४६.४ षटके)
नताली सायव्हर १२९ (१११)
आमेलिया केर ४/५१ (९ षटके)
सुझी बेट्स ४४ (६८)
ॲलेक्स हार्टली ३/४४ (९.४ षटके)
इंग्लंड महिला ७५ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट, डर्बी
पंच: अहसान रझा (पा) आणि जॅकलीन विल्यम्स (वे)
सामनावीर: नताली सायव्हर (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • कॅथेरीन ब्रंट (इं) आणि एमी सॅथरवाइट (न्यू) ह्या दोघींचा १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[३०][३१]
  • गुण: इंग्लंड महिला २, न्यू झीलंड महिला ०.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ उपांत्य फेरीसाठी पात्र.[३२][३३]

७वी फेरी

[संपादन]
१५ जुलै २०१७
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२६९ (४८.३ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२१० (५० षटके)
निकोल बोल्टन ७९ (८७)
सुने लूस ५/६७ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ५९ धावांनी विजयी
काउंटी मैदान, टाऊंटन
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: एलिस पेरी (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • गुण: ऑस्ट्रेलिया महिला २, दक्षिण आफ्रिका महिला ०.

१५ जुलै २०१७
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२२०/७ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२८/९ (५० षटके)
हेदर नाइट ६७ (८८)
अफी फ्लेचर ३/३३ (१० षटके)
इंग्लंड महिला ९२ धावांनी विजयी
ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: अनिल चौधरी (भा) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: हेदर नाइट (इं)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, गोलंदाजी.
  • गुण: इंग्लंड महिला २, वेस्ट इंडीज महिला ०.

१५ जुलै २०१७
धावफलक
भारत Flag of भारत
२६५/७ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
७९ (२५.३ षटके)
मिताली राज १०९ (१२३)
ली कॅस्पेरेक ३/४५ (१० षटके)
भारत महिला १८६ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट, डर्बी
पंच: शॉन जॉर्ज (द) आणि क्लेर पोलोसाक (ऑ)
सामनावीर: मिताली राज (भा)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, गोलंदाजी.
  • भारत महिलांचा धावांचा विचार करता हा महिला विश्वचषकामधील सर्वात मोठा विजय.[३४]
  • महिला विश्वचषक स्पर्धेत राजेश्वरी गायकवाडचा (भा) भारतीय महिलांतर्फे सर्वोत्कृष्ट गोलंदाजी विक्रम.[३४]
  • महिला विश्वचषक स्पर्धेतील न्यू झीलंडची सर्वात निचांकी धावसंख्या.[३४]
  • गुण: भारत महिला २, न्यू झीलंड महिला ०.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे भारत महिला संघ उपांत्य फेरीसाठी पात्र.[३५]

१५ जुलै २०१७
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२२१/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२०६ (४६.४ षटके)
दिलानी मनोदरा ८४ (१११)
डायना बेग ३/४१ (१० षटके)
नैन आबिदी ५७ (६८)
चंडिमा गुणरत्ने ४/४१ (१० षटके)
श्रीलंका महिला १५ धावांनी विजयी
ग्रेस रोड, लेस्टर
पंच: कॅथी क्रॉस (न्यू) आणि सू रेडफर्न (इं)
सामनावीर: चंडिमा गुणरत्ने (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.
  • शशिकला सिरिवर्दनेचा (श्री) १०० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • गुण: श्रीलंका महिला २, पाकिस्तान महिला ०.


बाद फेरी

[संपादन]
  उपांत्य सामने अंतिम सामना
             
१८ जुलै – काउंटी मैदान, ब्रिस्टल
  दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २१८/६  
  इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २२१/८  
 
२३ जुलै – लॉर्ड्स, लंडन
      इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २२८/७
    भारतचा ध्वज भारत २१९
२० जुलै – काउंटी मैदान, डर्बी
  भारतचा ध्वज भारत २८१/४
  ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २४५  

उपांत्य सामने

[संपादन]
उपांत्य सामना १
१८ जुलै २०१७
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२१८/६ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२२१/८ (४९.४ षटके)
सॅराह टेलर ५४ (७६)
सुने लूस २/२४ (५ षटके)
इंग्लंड महिला २ गडी व २ चेंडू राखून विजयी
ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: सॅराह टेलर (इं)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.

उपांत्य सामना २
२० जुलै २०१७
धावफलक
भारत Flag of भारत
२८१/४ (४२ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२४५ (४०.१ षटके)
हरमनप्रीत कौर १७१* (११५)
एलिस व्हिलानी १/१९ (१ षटक)
भारत महिला ३६ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट, डर्बी
पंच: अहसान रझा (पा) आणि शॉन जॉर्ज (द)
सामनावीर: हरमनप्रीत कौर (भा)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना ४२ षटकांचा करण्यात आला.
  • हरमनप्रीत कौरच्या (भा) नाबाद १७१ धावा ह्या विश्वचषक बाद फेरीतील सर्वाधिक धावा आणि भारतीय महिलेतर्फे विश्वचषक स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या.[३६]

अंतिम सामना

[संपादन]
अंतिम सामना
२३ जुलै २०१७
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२२८/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२१९ (४८.४ षटके)
नताली सायव्हर ५१ (६८)
झुलन गोस्वामी ३/२३ (१० षटके)
पूनम राऊत ८५ (११५)
आन्या श्रबसोल ६/४६ (९.४ षटके)
इंग्लंड महिला ९ धावांनी विजयी
लॉर्ड्स, लंडन
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि शॉन जॉर्ज (द)
सामनावीर: आन्या श्रबसोल (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड दोन्ही देशांचे प्रतिनिधित्व करित असल्याने अधिकृतरित्या स्पर्धा इंग्लंड आणि वेल्स मध्ये आयोजित केली गेली होती; परंतू सर्व सामने इंग्लंडमध्येच खेळविले गेले.
  1. ^ "२०१७ आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या तारखा घोषित". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "विमेन्स क्रिकेट, लाँग साइडलाईन्ड, मूव्ह्ज इनटू स्पॉटलाईट". द न्यू यॉर्क टाईम्स (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "महिला विश्वचषक: लॉर्ड्सवरील थरारक सामन्यात इंग्लंडची भारतावर ९ धावांनी मात". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "महिला विश्वचषक: २०१७ मालिकेसाठी पाच स्थळांची नावे जाहीर". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "लॉर्ड्वर होणार महिला विश्वचषकाचा अंतिम सामना". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "महिला विश्वषकाची स्थळे घोषित". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). 2016-10-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१६-१०-२६ रोजी पाहिले.
  7. ^ "आंतरराष्ट्रीय महिला दिनादिवशी आयसीसी महिला विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर". आयसीसी (इंग्रजी भाषेत). २०१७-०३-०८ रोजी पाहिले.
  8. ^ "महिला विश्वचषक २०१७ च्या सराव सामन्यांच्या तारखा जाहीर". आयसीसी (इंग्रजी भाषेत). २०१७-०४-२१ रोजी पाहिले.
  9. ^ "आकडेवारी: महिला विश्वचषक २०१७– फलंदाजांचा खेळ". विस्डेन (इंग्रजी भाषेत). 2017-07-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ "इस्माईल, लुसमुळे दक्षिण आफ्रिकेचा थरारक विजय". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.[permanent dead link]
  11. ^ "ॲशली गार्डनर स्टँड्स ऑन कस्प ऑफ हिस्ट्री". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  12. ^ a b "सायव्हर आणि नाइटच्या शतकांमुळे इंग्लंडचा मोठा विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  13. ^ "टेलर, डॉटिन इन साइट ऑफ जॉईंट लॅन्डमार्क". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  14. ^ a b "चामरी अटापट्टूज वन-विमेन एफर्ट". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ जून २०१७ रोजी पाहिले.
  15. ^ "ऑसिज आऊट टू स्पॉईल बेट्स १००थ पार्टी". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  16. ^ a b "वेस्ट इंडीज स्लम्प टू न्यू लो आफ्टर ४८ ऑल आऊट". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  17. ^ "महिला विश्वचषक: इंग्लंडच्या विजयात सराह टेलर आणि टॅमी बोमाँट चमकले". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  18. ^ "टेलर, बोमाँटच्या शतकांमुळे इंग्लंडचा दणदणीत विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  19. ^ "लॅनिंग संघाबाहेर, हेन्स कर्णधार". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  20. ^ "१०० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने पूर्ण करणारी सना मीर ही पहिलीच पाकिस्तानी महिला". जिओ टीव्ही (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  21. ^ "दक्षिण आफ्रिका, भारत, न्यू झीलंड in उपांत्य फेरीच्या स्पर्धेत". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  22. ^ "सांख्यिकी: राजने घडविला इतिहास, ली आणि व्हान निकेर्कने सोडला ठसा". विस्डेन (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  23. ^ "रोव अँड डिव्हाइन मॉव डाऊन पाकिस्तान". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  24. ^ "ब्रंट, गनमुळे इंग्लंडची २४ वर्षांची प्रतिक्षा संपली". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  25. ^ "डॉटिन, टेलरमुळे पाकिस्तानी संघाला एकही विजय नाही". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  26. ^ "टेलर-डॉटिन स्टारर सेंड्स पाकिस्तान टू लॉस". विस्डेन (इंग्रजी भाषेत). 2017-07-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  27. ^ "राजचा विक्रम, महिला यादीत सर्वोच्च स्थानी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  28. ^ "इंग्लंडच्या शार्लोट एडवर्ड्सला मागे टाकून मिताली राज महिला एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वाधिक धावा करणारी फलंदाज". इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.[permanent dead link]
  29. ^ "फिरकी गोलंदाज आणि लॅनिंगच्या जोरावर ऑस्ट्रेलिया उपांत्यफेरी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  30. ^ "कॅथरीन, द ब्रंट ऑफ ऑल थिंग्स रेजिलंट". विस्डेन इंडिया (इंग्रजी भाषेत). 2017-07-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  31. ^ "'क्रिकेट इज वन ऑफ दोज स्पोर्ट यू कॅन नेव्हर कम्पलीटली मास्टर'". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  32. ^ "सायव्हर आणि बोमाँटमुळे इंग्लंडची उपांत्य फेरीत धडक". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  33. ^ "इस्माईल, व्हान निकेर्कने काढले दक्षिण आफ्रिकेचे उपांत्य फेरीचे तिकीट". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  34. ^ a b c "भारताचा महिला विश्वचषक स्पर्धेतील सर्वात मोठा विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  35. ^ "गायकवाड सिझेस ऑन बॅटिंग हेरॉइक्स अ‍ॅज इंडिया एन्टर्स सेमी-फायनल". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  36. ^ "३० चेंडू १०३ धावा, १ षटकात २२". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]