Jump to content

ब्रिस्टल काउंटी मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्रिस्टल काउंटी मैदान
मैदान माहिती
स्थान नेव्हिल रोड, ॲश्ले डाऊन, ब्रिस्टल
स्थापना १८८९
आसनक्षमता ८,००० (स्थानिक)
१७,५०० (आंतरराष्ट्रीय)

प्रथम ए.सा. १३ जून १९८३:
न्यू झीलंड वि. श्रीलंका
अंतिम ए.सा. २६ जून २०१६:
इंग्लंड वि. श्रीलंका
प्रथम २०-२० २८ जून २००६:
इंग्लंड वि. पाकिस्तान
अंतिम २०-२० २५ जून २०११:
इंग्लंड वि. श्रीलंका
यजमान संघ माहिती
ग्लाउस्टरशायर (१८८९-सद्य)
शेवटचा बदल १ जुलै २०१६
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

ब्रिस्टल काउंटी मैदान (नेव्हिल रोड), हे प्रायोजकत्वाच्या कारणामुळे द ब्राईटसाईड मैदान म्हणूनही ओळखले जाते. क्रिकेटसाठी वापरले जाणारे हे मैदान इंग्लंडमधील ॲशले डाऊन जिल्ह्यातील ब्रिस्टल येथे स्थित आहे. हे मैदान ग्लाउस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबचे घरचे मैदान आहे.

सुरुवातीला ॲश्ले डाऊन मैदान म्हणून ओळखले जाणारे हे मैदान विल्यम गिल्बर्ट ग्रेसने १८८९ मध्ये विकत घेतले आणि तेव्हापासून ते ग्लाउस्टरशायरचे घरचे मैदान आहे. कालांतराने ते जे.एस. फ्रे आणि सन्स ह्या मिठाई कंपनीला विकले घेले आणि त्याचे फ्रेचे मैदान असे नामकरण करण्यात आले. १९३३ मध्ये क्लबने ते पुन्हा विकत घेतले आणि त्याला पुर्वीचेच नाव पुन्हा दिले गेले. १९७६ साली पुन्हा एकदा मैदान विकले गेले ते रॉयल अँड सन अलायन्सला ज्यांनी त्याचे नामकरण आधी फिनिक्स काउंटी मैदान आणि आठ वर्षांनंतर रॉयल अँड सन अलायन्स काउंटी मैदान असे केले. त्यानंतर पुन्हा ते क्लबने विकत घेऊन त्याला सध्याचे नाव दिले.

येथे साधारणतः दरवर्षाला एक एकदिवसीय सामना होतो, त्यावेळी मैदानाची प्रेक्षकक्षमता, जास्त आसनांची भर टाकून तात्पुरती वाढवली जाते. इंग्लंडचा संघ वेस्ट इंडीजविरूद्ध २०१७, भारताविरूद्ध २०१८ आणि पाकिस्तानविरूद्ध २०१९ साली ह्या मैदानावर खेळेल. ह्याशिवाय क्रिकेट विश्वचषक, २०१९चे चार सामने ह्या मैदानावर होतील.

इतर काउंटी क्रिकेट क्लबच्या मैदानांपेक्षा ह्या मैदानाच्या सीमारेषा जास्त लांब आहेत.

प्रेक्षकांच्या गच्चीवर असलेले जुने पक्के छत पाडून त्या जागी सुमारे १९६० मध्ये टी.एच.बी बुरफ यांची रचना असलेल्या, ३० चौ.फुटाच्या आठ हायपरबोलिक-पॅराबोलॉईड छत्र्या लावण्यात आल्या आहेत.

गुणक: 51°28′38.01″N 2°35′02.96″W / 51.4772250°N 2.5841556°W / 51.4772250; -2.5841556