झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१७
स्कॉटलंड
झिम्बाब्वे
तारीख १५ – १७ जून २०१७
संघनायक काईल कोएट्झर ग्रेम क्रिमर
एकदिवसीय मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा काईल कोएट्झर (१७०) माल्कम वॉलर (९२)
सर्वाधिक बळी कॉन डी लॅंग (५) ग्रेम क्रिमर (६)

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने जून २०१७ मध्ये दोन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी स्कॉटलंडचा दौरा केला.[१] दोन्ही सामने द ग्रेंज क्लब, एडिनबरा येथे खेळवले गेले.[२] ह्या दोन देशांमधील ही पहिलीच द्विदेशीय मालिका.[३] पहिल्या सामन्यात स्कॉटलंडने झिम्बाब्वेला हरवून त्यांचा कसोटी खेळणाऱ्या संघाविरुद्धचा पहिला एकदिवसीय विजय नोंदवला.[४] दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने ६ गडी राखून विजय मिळवला आणि मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.[५]

संघ[संपादन]

स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड[६] झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे[७]

एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला एकदिवसीय सामना[संपादन]

१५ जून २०१७
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
३१७/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२७२ (४१.४ षटके)
काईल कोएट्झर १०९ (१०१)
शॉन विल्यम्स २/४८ (१० षटके)
माल्कम वॉलर ९२ (६२)
कॉन डी लॅंग ५/६० (८ षटके)
स्कॉटलंड २६ धावांनी विजयी (ड-लु पद्धत)
द ग्रेंज क्लब, एडिनबरा
पंच: रुचिरा पल्लियागुरूगे (श्री) आणि इयान रामाजे (स्कॉ)
 • नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.
 • झिम्बाब्वेच्या डावा दरम्यान आलेल्या पावसामुळे त्यांच्यासमोर ४३ षटकांमध्ये २९९ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.
 • कॉन डी लॅंगचे (स्कॉ) एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ५ बळी.
 • उभय देशांमधील हा पहिलाच एकदिवसीय सामना आणि कसोटी खेळणाऱ्या देशाविरुद्ध स्कॉटलंडचा हा पहिला एकदिवसीय विजय.[८]


२रा एकदिवसीय सामना[संपादन]

१७ जून २०१७
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१६९ (४२ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१७१/४ (३७ षटके)
काईल कोएट्झर ६१ (६०)
ग्रेम क्रिमर ५/२९ (१० षटके)
सिकंदर रझा ५८* (८८)
क्रिस सोल ३/३६ (९ षटके)
झिम्बाब्वे ६ गडी व ७८ चेंडू राखून विजयी.
द ग्रेंज क्लब, एडिनबरा
पंच: रुचिरा पल्लियागुरूगे (श्री) आणि इयान रामेज (स्कॉ)
 • नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "जून मध्ये झिम्बाब्वेचा स्कॉटलंड दौरा". क्रिकेट स्कॉटलंड. Archived from the original on 2017-03-23. २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
 2. ^ "दोन एकदिवसीय सामन्यांसाठी स्कॉटलंड झिम्बाब्वेचे यजमान". स्पोर्ट२४. २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
 3. ^ "जून मध्ये झिम्बाब्वेचा स्कॉटलंड दौरा". इएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
 4. ^ "झिम्बाब्वेला हरवून स्कॉटलंडचा कसोटी क्रिकेट खेळणार्‍या संघाविरुद्ध पहिला एकदिवसीय विजय". बीबीसी स्पोर्ट. २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
 5. ^ "क्रिमरच्या पाच बळींमुळे झिम्बाब्वेची मालिकेत बरोबरी". इएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
 6. ^ "स्कॉटलंड लूक टू कॅपिटलाइज ऑन रेअर फुल मेम्बर सिरिज". इएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
 7. ^ "मसाकद्झा फाइंड्स फेवर अहेड ऑफ झिम्बाब्वेज ट्रीपल टूर". इएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
 8. ^ "स्कॉटलंडच्या पूर्ण सभासदावरील पहिल्याच विजयात कोएत्झर, डी लॅंग चमकले". इएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]