२०१७ दक्षिण आफ्रिका चौरंगी मालिका
Appearance
२०१७ दक्षिण आफ्रिका चौरंगी मालिका | |
---|---|
दिनांक | ४ – २१ मे २०१७ |
व्यवस्थापक | आयसीसी |
क्रिकेट प्रकार | ५० षटके |
यजमान | दक्षिण आफ्रिका |
विजेते | भारत |
सहभाग | ४ |
सामने | १४ |
मालिकावीर | दिप्ती शर्मा |
सर्वात जास्त धावा | दिप्ती शर्मा (३४७) |
सर्वात जास्त बळी | शबनीम इस्माईल (१७) |
२०१७ दक्षिण आफ्रिका चौरंगी मालिका ही महिला क्रिकेट मालिका ४ ते २१ मे २०१७ दरम्यान पॉचेफस्ट्रूम, दक्षिण आफ्रिका येथे खेळवली गेली.[१] सदर मालिका भारत, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या संघांदरम्यान खेळवली गेली.[२] मालिकेतील सामने सेन्वास पार्क आणि द पुक ओव्हल येथे खेळवले गेले.[३] महिला एकदिवसीय दर्जा नसलेल्या झिम्बाब्वेचा समावेश असलेल्या सामन्यांव्यतिरिक्त इतर सर्व सामने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट म्हणून खेळवण्यात आले.[४]
मालिकेआधी, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार डेन व्हान निकेर्कला पायाला झालेल्या दुखापतीमुळे वगळण्यात आले.[५] दक्षिण आफ्रिकेने अंतरिम कर्णधाराची निवड केली, परंतु संघात नव्या खेळाडूला निवडले गेले नाही.[५]
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात ८ गडी राखून पराभूत करून मालिकेचे विजेतेपद मिळविले.[६]
संघ
[संपादन]भारत[७] | आयर्लंड[८] | दक्षिण आफ्रिका[९] | झिम्बाब्वे[१०][११] |
---|---|---|---|
गुणफलक
[संपादन]संघ | सा | वि | प | ब | अ | बो | गुण | निधा |
---|---|---|---|---|---|---|---|---|
भारत | ५ | ४ | १ | ० | ० | ३ | १९ | +२.४८३ |
दक्षिण आफ्रिका | ५ | ४ | १ | ० | ० | ३ | १९ | +१.९८३ |
झिम्बाब्वे | ५ | २ | ३ | ० | ० | ० | ८ | -१.५३७ |
आयर्लंड | ५ | ० | ५ | ० | ० | ० | ० | -२.७१६ |
सामने
[संपादन]सराव सामने
[संपादन]वि
|
भारत
१०७/४ (१९.५ षटके) | |
- नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, फलंदाजी.
- भारताने विजयी लक्ष्य १९.५ षटकांत गाठले, परंतू शेवटच्या षटकांत भारतीय संघ २९१ धावांवर सर्वबाद होईपर्यंत सामना सुरू राहिला.
साखळी फेरी
[संपादन]वि
|
भारत
९९/० (१८.४ षटके) | |
दिप्ती शर्मा ५१* (४७)
|
- नाणेफेक : भारतीय महिला, गोलंदाजी.
- आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय पदार्पण: ऑयफे बेग्स, राचेल डेलाने, लारा मारित्झ आणि लीह पॉल (आ).
वि
|
भारत
१२१/३ (४१.१ षटके) | |
- नाणेफेक : भारतीय महिला, गोलंदाजी.
- आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय पदार्पण: नादिने डी क्लर्क आणि रैजिबे न्टोझाखे (द).
- झुलन गोस्वामी (भा) ही महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली.[१२]
वि
|
आयर्लंड
१५९/८ (५० षटके) | |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.
- आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय पदार्पण: लुईज लिटल आणि रिबेका स्टॉकेल (आ).
- लॉरा डेलनेचा (आ) १००वा आंतरराष्ट्रीय सामना.[१३]
- दक्षिण आफ्रिका महिलांची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या.[१४]
वि
|
आयर्लंड
१०९ (४० षटके) | |
- नाणेफेक : भारतीय महिला, फलंदाजी.
- आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय पदार्पण: नुझत परवीन (भा) आणि सोफी मॅकमोहन (आ)
- दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत (भा) या दोघींचे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक.[१५]
- दिप्ती शर्मा आणि पूनम राऊत यांची कोणत्याही गड्यासाठी महिला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी भागीदारी (३२०).[१५]
- दिप्ती शर्माच्या धावा ह्या महिला एकदिवसीय क्रिकेधील दुसरी सर्वोच्च वैयक्तिक कामगिरी आणि एका सामन्यात सर्वाधिक चौकारांचा विक्रम (२७).[१५]
वि
|
आयर्लंड
२०३/६ (५० षटके) | |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.
- अँड्री स्टेनचे (द) महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक.
अंतिम
[संपादन]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "भारत महिलांचा दक्षिण आफ्रिकेतील चौरंगी मालिकेने विश्वचषक स्पर्धेसाठी सराव". क्रिकबझ (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "चौरंगी मालिकेसाठी आयर्लंड महिलांची दक्षिण आफ्रिकेकडे कूच". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). 2017-03-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "आयर्लंड महिला दक्षिण आफ्रिकेमध्ये चौरंगी मालिका खेळणार". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारतीय महिला दक्षिण आफ्रिकेत चौरंगी मालिका खेळणार". विस्डेन इंडिया (इंग्रजी भाषेत). 2017-03-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "दुखापतग्रस्त व्हान निकेर्क आगामी चौरंगी मालिकेतून बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारताच्या विजयात गोस्वामी, राज चमकले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारत महिला एकदिवसीय संघ". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "आयर्लंड महिलांचा नवा संघ". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). 2017-03-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "महिला चौरंगी मालिकेसाठी दोन नवोदितांची निवड". क्रिकेट दक्षिण आफ्रिका (इंग्रजी भाषेत). 2017-05-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "झिम्बाब्वे महिला संघात मुगेरिचे पुनरागमन". डेली न्यूझ (झिम्बाब्वे) (इंग्रजी भाषेत). 2017-04-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "झिम्बाब्वे महिला एकदिवसीय संघ". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "झुलन क्र. १". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "चौरंगी मालिकेत आयर्लंडचा यजमानांकडून पराभव". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). १२ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "वॉल्वार्डच्या झंझावाती खेळीने दक्षिण आफ्रिका महिलांचा मोठा विजय". क्रिकेट दक्षिण आफ्रिका (इंग्रजी भाषेत). 2017-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b c "रंगास्वामी लाउड्स दिप्ती, राऊत आफ्टर रेकॉर्ड ब्रेकिंग स्टँड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ मे २०१७ रोजी पाहिले.