२०१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१७ आयसीसी क्रिकेट लीग विभाग तीन
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार ५०-षटके
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
यजमान युगांडाचा ध्वज युगांडा
विजेते ओमानचा ध्वज ओमान
सहभाग
सामने १८
सर्वात जास्त धावा कॅनडा भाविंदू अधिहेट्टी (२२२)
सर्वात जास्त बळी ओमान खावर अली (१४)
दिनांक २३ – ३० मे २०१७
२०१४ (आधी) (नंतर) २०१८

२०१७ आयसीसी क्रिकेट लीग विभाग तीन ही क्रिकेट स्पर्धा २३ ते ३० मे २०१७ दरम्यान युगांडा येथे पार पडली.[१] स्पर्धेतील सामने लुगोगो, क्याम्बोगो आणि एंटेबी येथे पार पडले.[२] स्पर्धेतील ओमान आणि कॅनडा ह्या पहिल्या दोन स्थानांवरील संघांना, विभाग दोन मध्ये बढती मिळाली.[३] पावसामुळे अंतिम सामना अनिर्णित राहिला आणि गट फेरीतील पहिल्या स्थानावर राहिल्याने ओमानला स्पर्धेतील विजेता संघ म्हणून घोषित करण्यात आले.[४]

स्पर्धेच्या यजमानपदासाठी कॅनडा, मलेशिया आणि युगांडा ह्या तीन देशांनी बोली लावली होती.[५] ऑक्टोबर २०१६ मध्ये, सुरक्षाव्यवस्था आणि खर्चाची योग्य व्यवस्था असल्यास, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने स्पर्धेसाठी युगांडाचा प्रस्ताव मान्य केला.[६] डिसेंबर २०१६ मध्ये दोन आयसीसी अधिकाऱ्यांनी, देशाची फर्स्ट लेडी जॅनेट मुसेवेनी आणि पंतप्रधान रुहाकाना रुगुंडा यांची भेट घेतली. मुसोविनींनी ह्यावेळी स्पर्धेला पाठींबा दर्शविला.[५]

संघ[संपादन]

पात्र संघांची नावे खालीलप्रमाणे:

मैदाने[संपादन]

स्पर्धा खालील मैदानांवर पार पडली:

तयारी[संपादन]

अमेरिकेने मार्च महिन्यात ह्युस्टन, टेक्सास येथे एक निवड शिबिर आयोजित केले, ज्यामध्ये प्रथम श्रेणीतील अनुभव असलेल्या इब्राहिम खलील, रॉय सिल्वा आणि कॅमिलस अलेक्झांडर ह्या तीन खेळाडूंसह ५० खेळाडू होते.[७] स्पर्धा सुरू होण्या आधी दक्षिण आफ्रिकेतील सहा दिवसांच्या दौऱ्यातसुद्धा अमेरिकेने भाग घेतला.[८] स्पर्धेपूर्वी मलेशिया संघ एसीसी इमर्जिंग टीम्स एशिया कप २०१७ स्पर्धेमध्ये खेळला,[९] कॅनडा संघ बार्बाडोस येथे काही सराव सामन्यांमध्ये सहभागी झाला[१०] आणि युगांडाने केन्याला पाच ५०-षटकांचे सामने खेळण्यास आमंत्रित केले होते.[११] कॅनडा संघ झिम्बाब्वेत तीन सराव सामने सुद्धा खेळला.[१२]

संघ[संपादन]

स्पर्धेसाठी खालील खेळाडूंची नियुक्ती करण्यात आली:[१३]

कॅनडाचा ध्वज कॅनडा[१४]
प्रशिक्षक: हेन्री ओसिंडे
मलेशियाचा ध्वज मलेशिया[१५]
प्रशिक्षक: बिलाल असद
ओमानचा ध्वज ओमान[१६]
प्रशिक्षक: दुलिप मेंडीस
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर[१७]
प्रशिक्षक: ट्रेव्हर चॅपल
युगांडाचा ध्वज युगांडा[१८]
प्रशिक्षक: स्टीव्ह टिकोलो
Flag of the United States अमेरिका[१९]
प्रशिक्षक: पुबुदु दस्सानायके

लॉस एन्जेल्स येथील प्रशिक्षणादरम्यान झालेल्या हाताच्या दुखापतीतून न सावरल्याने फहाद बाबरऐवजी सागर पटेलची निवड अमेरिकेच्या संघात करण्यात आली.[२०]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "टिम्स ट्रॅव्हल टू युगांडा जस्ट थ्री स्टेप्स फ्रॉम क्रिकेट वर्ल्ड कप २०१९". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
 2. ^ "युगांडा: मोर टूर्स फॉर क्रिकेट क्रेन्स बिफोर वर्ल्ड क्रिकेट लीग". ऑल आफ्रिका (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
 3. ^ "ओमान, कॅनडा सेक्युअर प्रमोशन; युएसए अव्हॉइड रेलीगेशन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
 4. ^ "अंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्याने ओमानला २०१७ आयसीसी क्रिकेट लीग विभाग तीन स्पर्धेचे विजेतेपद". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
 5. ^ a b "फर्स्ट लेडी प्लेजेस गव्हर्नमेंट बॅकिंग फॉर वर्ल्ड क्रिकेट लीग". डेली मॉनिटर (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
 6. ^ "केप टाऊन येथील आयसीसी मंडळाच्या बैठकीचे परिणाम". आंतररराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-10-17. ८ जून २०१७ रोजी पाहिले.
 7. ^ "अमेरिकेच्या निवड शिबिरामध्ये माजी भारतीय, श्रीलंका आणि वेस्ट इंडीजचे खेळाडू". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
 8. ^ "मधल्या फळीतील फलंदाजीमध्ये सुधारणा करण्याचे अमेरिकेचे प्रशिक्षका दासनायके ह्यांचे लक्ष्य". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
 9. ^ "एमर्जिंग टीम्स एशिया कप प्रिव्ह्यू". आशियाई क्रिकेट कौन्सिल (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
 10. ^ "कॅनडाचा बार्बाडोस दौरा". क्रिकेट कॅनडा (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
 11. ^ "केनियाचा युगांडा दौरा". युगांडा क्रिकेट असोसिएशन (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
 12. ^ "क्रिकेट: कॅनडा ह्या महिन्यान झिम्बाब्वेचा दौरा करणार". न्यू झिम्बाब्वे (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.[permanent dead link]
 13. ^ "आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन कर्णधारांना क्रिकेट विश्वचषक २०१९ चे स्वप्न जिवंत राहण्याची आशा". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
 14. ^ "क्रिकेट कॅनडा संघ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग ३". क्रिकेट कॅनडा (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
 15. ^ "आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग ३ साठी मलेशिया क्रिकेट संघ". मलेशिया क्रिकेट ट्विटर (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
 16. ^ "आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग ३: युगांडाच्या संघाचे नेतृत्व सुलतानकडे". मस्कत डेली (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-05-24. ८ जून २०१७ रोजी पाहिले.
 17. ^ "विश्व क्रिकेट लीग विभाग ३ साठी सिंगापूरचा संघ". फेसबूक (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
 18. ^ "विश्व क्रिकेट लीग विभाग ३ साठी युगांडाचा संघ जाहीर". कावोवो स्पोर्ट्स (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
 19. ^ "खलील आणि अलेक्झांडर अमेरिकेकडून पदार्पण करणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
 20. ^ "युएसए कॉन्फिडन्ट अ‍ॅज दासनायके हेल्स प्रिपेअरेशन्स". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.