राजेश्वरी गायकवाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजेश्वरी गायकवाड

राजेश्वरी शिवानंद गायकवाड (१ जून, १९९१:विजापूर, कर्नाटक, भारत - ) ही भारताकडून १ कसोटी, १२ एकदिवसीय तसेच ६ टी२० सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.राजेश्वरी गायकवाड (जन्म १ जून १९९१) एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. १९ जानेवारी २०१४ला श्रीलंकाविरूद्ध एक दिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ती डावखुरी फलंदाज आहे आणि डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एका कसोटी सामन्यात ती खेळली.[१]

वैयक्तिक जीवन[संपादन]

१८ वर्षाची असताना तिने क्रिकेट खेळायला सुरुवात केली.त्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा तिला तिच्या वडिलांकडून म्हणजेच शिवानंद गायकवाड याकडून मिळाली.आणि औपचारिक प्रशिक्षण मिळाले. त्यांनी कर्नाटक मधील महिला क्रिकेट संघाकडून खेळण्यास सुरुवात केली.२०१४ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.राजेश्वरीच्या वडिलांनी आपल्या सर्व मुलांना खेळामध्ये पुढे जाण्यास प्रेरित केले. राजेश्वरी क्रिकेटमध्ये नाव कमवत होती, तर तिचा भाऊ विश्वनाथ गायकवाड बॅडमिंटन आणि वॉलीबॉल खेळाडू आहे.राजेश्वरीची सर्वात लहान बहिण रामेश्वरेही स्टेट लेव्हल क्रिकेट खेळाडू आहे.त्याचबरोबर ती इंडिया ग्रीन च्यासाठी देखील खेळली आहे.तिची दुसरी बहीण भुवनेश्वरी हॉकी खेळाडू आहे.तथापि तिचा दुसरा भाऊ काशीनाथ टबला वादक आहे. राजेश्वरी ने न्यू झीलंड विरुद्ध मैदानात केवळ १५ धावांवर ५ विकेट्स घेऊन भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवले.तिला क्रिकेट खेळाडू बनायचे नव्हते तिला तिच्या भावसारखे वॉलीबॉल खेळायला आवडायचे. [२]राजेश्वरीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीलंके विरुद्ध ट्वेंटी -२० स्पर्धेनंतर २०१४ मध्ये तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला.२०१७ च्या महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम फेरी नंतर,जलसंपदा मंत्री एम. बी. पाटील यांनी ५ लाख रु. किमतीची गाडी भेट दिली,परंतु त्यांनी नकार दिला आणि त्यांनी म्हटले की याक्षणी त्यांचे प्राधान्य तिच्या कुटुंबासाठी घर मिळवणे आहे.त्यावेळी तिच्या वडिलाच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबासाठी ती एकमेव होती.[३]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Cricket Archive - Paywall". cricketarchive.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-08 रोजी पाहिले.
  2. ^ Tripathi, Gunjan (2017-07-17). "राजेश्वरी गायकवाड के पिता नहीं देख पाए उनके कारकीर्द का सर्वश्रेष्ठ प्रदर्शन". Cricket Country (इंग्रजी भाषेत). 2018-07-08 रोजी पाहिले.
  3. ^ "India spinner Rajeshwari Gayakwad living in rented house - Times of India". The Times of India. 2018-07-08 रोजी पाहिले.