सना मीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सना मीर

सना मीर (५ जानेवारी, इ.स. १९८६:तक्षशिला, पाकिस्तान - ) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. मीर उजव्या हाताने फलंदाजी व ऑफस्पिन गोलंदाजी करते.

मीर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना २८ डिसेंबर, इ.स. २००५ रोजी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाविरुद्ध खेळली.

मीर पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाची संघनायिका आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मानांकनयादीत ऑक्टोबर २०१८ मध्ये अव्वल स्थान मिळविणारी ती पाकिस्तानची पहिली महिला क्रिकेटपटू आहे. २०१० आणि २०१४ मध्ये सना मिर हिच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. महिला टी-२० प्रकारात १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी सना मिर ही पाकिस्तानची पहिली महिला क्रिकेटपटू आहे. २०१९ मध्ये तिने शंभरावा आंतरराष्ट्रीय महिला टी-२० सामना खेळला. २५ एप्रिल २०२० रोजी तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली.[१]

साचा:पाकिस्तान संघ - २०१७ महिला क्रिकेट विश्वचषक

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "न ऐकलेल्या कॅप्टन कूलची कहाणी..." kheliyad (इंग्रजी भाषेत). 2020-04-28. 2020-07-14 रोजी पाहिले.