झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा २०१७
Flag of Sri Lanka.svg
श्रीलंका
Flag of Zimbabwe.svg
झिम्बाब्वे
तारीख ३० जून – १८ जुलै २०१७
संघनायक ॲंजेलो मॅथ्यूज (ए.दि.)
दिनेश चंदिमल (कसोटी)
ग्रेम क्रिमर
कसोटी मालिका
निकाल श्रीलंका संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा असेला गुणरत्ने (१२५) क्रेग अर्व्हाइन (१६५)
सर्वाधिक बळी रंगना हेराथ (११) ग्रेम क्रिमर (९)
मालिकावीर रंगना हेराथ (श्री)
एकदिवसीय मालिका
निकाल झिम्बाब्वे संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा दनुष्का गुनतिलक (३२३) हॅमिल्टन मासाकाद्झा (२५८)
सर्वाधिक बळी वनिदु हसरंगा (८) तेन्डाई चटारा (६)
मालिकावीर हॅमिल्टन मासाकाद्झा (झि)

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने १-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी जून आणि जुलै २०१७ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला.[१][२][३] सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार, दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने होणार होते.[४][५][६] जानेवारी २००२ नंतर हा झिम्बाब्वेचा पहिलाच श्रीलंका दौरा होता. दौऱ्यावरील सर्व सामने दिवसा खेळवले गेले.[७]

झिम्बाब्वेने एकदिवसीय मालिका ३–२ अशी जिंकली.[८] हा त्यांचा श्रीलंकेविरुद्ध पहिलाच मालिकाविजय.[९] २००९ च्या केन्या दौऱ्यातील विजयानंतर हा त्यांचा परदेशातील पहिलाच विजय[१०] तसेच हा त्यांचा २००१ मधील बांगलादेश विरुद्धच्या विजयानंतर कसोटी खेळणाऱ्या संघाविरुद्ध परदेशातील पहिलाच मालिका विजय.[११] त्याशिवाय झिम्बाब्वेचा हा पाच सामन्यांच्या मालिकेत परदेशातील पहिलाच विजय.[१२] झिम्बाब्वेच्या कर्णधार, ग्रेम क्रिमरने, हा विजय "माझ्या कारकिर्दीचा कळस" असल्याची भावना व्यक्त केली.[१३] त्या विरुद्ध, श्रीलंकेचा कर्णधार, ॲंजेलो मॅथ्यूज, म्हणाला हा पराभव "माझ्या कारकिर्दीतील सर्वात खालचे टोक आहे "[१४] आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याने सर्व तीनही प्रकारांतून कर्णधारपदाचा राजीनामा दिला.[१५] दिनेश चंदिमलची त्यानंतर नवीन कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.[१६]

श्रीलंकेने एकमेव कसोटीमध्ये ४ गडी राखून विजय मिळवला.[१७]

संघ[संपादन]

कसोटी ए.दि.
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका[१८] झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे[१९][२०] श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका[२१][२२] झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे[१९][२३]

एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला एकदिवसीय सामना[संपादन]

३० जून २०१७
९:४५
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३१६/५ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
३२२/४ (४७.४ षटके)
कुशल मेंडिस ८६ (८०)
तेंडाई चटारा २/४९ (९ षटके)
सोलोमन मायर ११२ (९६)
असेला गुणरत्ने २/४५ (७ षटके)
झिम्बाब्वे ६ गडी राखून विजयी
गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली
पंच: इयान गोल्ड (इं) आणि रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: सोलोमन मायर (झि)
 • नाणेफेक : श्रीलंका फलंदाजी.
 • कुशल मेंडिसच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेकडून सर्वात जलद १,००० धावा करण्याच्या विक्रमाशी बरोबरी.[२४]
 • सोलोमन मायरचे (झि) पहिले एकदिवसीय शतक.[२४]
 • हा झिम्बाब्वेचा श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेमध्ये पहिलाच विजय.[२४]
 • श्रीलंकेमधील एकदिवसीय क्रिकेटमधील हा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग तसेच ३०० पेक्षा जास्तधावांचा पहिलाच यशस्वी पाठलाग.[२५]

२रा एकदिवसीय सामना[संपादन]

२ जुलै २०१७
९:४५
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१५५ (३३.४ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१५८/३ (३०.१ षटके)
उपुल तरंगा ७५* (८६)
तेंडाई चटारा २/३३ (५ षटके)
श्रीलंका ७ गडी राखून विजयी
गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली
पंच: नायजेल लॉंग (इं) आणि रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: लक्षण संदाकन (श्री)
 • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
 • एकदिवसीय पदार्पण: वनिदु हसरंगा (श्री).
 • वनिदु हसरंगा (श्री) हा एकदिवसीय क्रिकेट पदार्पणात हॅट्ट्रीक घेणारा जगातील सर्वात लहान तर श्रीलंकेचा पहिलाच गोलंदाज.[२६]

३रा एकदिवसीय सामना[संपादन]

६ जुलै २०१७
९:४५
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
३१०/८ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
३१२/२ (४७.२ षटके)
दनुष्का गुणतिलक ११६ (१११)
माल्कम वॉलर १/३२ (८ षटके)
 • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
 • निरोशन डिक्वेल्ला आणि दनुष्का गुणतिलक (श्री) ह्या दोघांचे पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक.[२७]
 • घरच्या मैदानावरील एकदिवसीय सामन्यातील हा श्रीलंकेचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग.[२८]

४था एकदिवसीय सामना[संपादन]

८ जुलै २०१७
९:४५
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३००/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२१९/६ (२९.२ षटके)
निरोशन डिक्वेल्ला ११६ (११८)
माल्कम वॉलर २/४४ (१० षटके)
झिम्बाब्वे ४ गडी व १० चेंडू राखून विजयी (ड-लु पद्धत)
महिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय मैदान, हंबन्टोटा
पंच: नायजेल लॉंग (इं) आणि रणमोर मार्टिनेझ (श्री)
सामनावीर: क्रेग अर्व्हाइन (झि)
 • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
 • झिम्बाब्वेच्या डावा दरम्यान आलेल्या पावसामुळे त्यांच्यासमोर ३१ षटकांमध्ये २१९ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.
 • असित फर्नांडो (श्री) एकदिवसीय पदार्पण.
 • निरोशन डिक्वेल्ला आणि दनुष्का गुणतिलक (श्री) यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये लागोपाठ दोन सामन्यांमध्ये द्विशतकी भागीदारी केली. असे करणारे ती पहिलीच जोडी ठरली.[२९]

५वा एकदिवसीय सामना[संपादन]

१० जुलै २०१७
९:४५
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२०३/८ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२०४/७ (३८.१ षटके)
असेला गुणरत्ने ५९* (८१)
सिकंदर रझा ३/२१ (१० षटके)
झिम्बाब्वे ३ गडी व ७१ चेंडू राखून विजयी
महिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय मैदान, हंबन्टोटा
पंच: इयान गोल्ड (इं) आणि रविंद्र विमलासिरी (श्री)
सामनावीर: सिकंदर रझा (झि)
 • नाणेफेक : झिम्बाब्वे, गोलंदाजी.
 • हा झिम्बाब्वेचा श्रीलंकेविरुद्ध पहिलाच मालिकाविजय.[१२]

कसोटी मालिका[संपादन]

एकमेव कसोटी[संपादन]

१४–१८ जुलै २०१७
धावफलक
वि
३५६ (९४.४ षटके)
क्रेग अर्व्हाइन १६० (२५६)
रंगना हेराथ ५/११६ (३२ षटके)
३४६ (१०२.३ षटके)
उपुल तरंगा ७१ (१०७)
ग्रेम क्रिमर ५/१२५ (३९.३ षटके)
३७७ (१०७.१ षटके)
सिकंदर रझा १२७ (२०५)
रंगना हेराथ ६/१३३ (३९.१ षटके)
३९१/६ (११४.५ षटके)
निरोशन डिक्वेल्ला ८१ (११८)
ग्रेम क्रिमर ४/१५० (४८ षटके)
श्रीलंका ४ गडी राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: इयान गोल्ड (इं) आणि नायजेल लॉंग (इं)
सामनावीर: असेला गुणरत्ने (श्री)
 • नाणेफेक: झिम्बाब्वे, फलंदाजी.
 • कसोटी पदार्पण: तरीसाई मुसाकांडा (झि)
 • दिनेश चंदिमलचा श्रीलंकेचा कर्णधार म्हणून पहिलाच कसोटी सामना.[३०]
 • झिम्बाब्वेच्या पहिल्या दिवशीच्या ३४४ धावा ह्या त्यांनी कसोटीच्या एका दिवशी केलेल्या सर्वात जास्त धावा आहेत.[३१]
 • रंगना हेराथ (श्री) हा कसोटी डावात ५ बळी ३० वेळा घेणारा पाचवा गोलंदाज.[३२]
 • पहिल्यांदाच पाच बळी घेणारा ग्रेम क्रिमर (झि), हा झिम्बाब्वेचा पहिलाच कर्णधार.[३३]
 • सिकंदर रझाचे (झि) पहिले कसोटी शतक.[३४]
 • श्रीलंकेचा कसोटीमधील तसेच आशियातील कसोटीमध्ये कोणत्याही संघाचा हा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग.[३५]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "हबंटोटा मैदानाकडे श्रीलंका क्रिकेटचे पुन्हा लक्ष". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 2. ^ "श्रीलंका क्रिकेट हबंटोटाच्या सूरीयावेवा मैदानाचे रुप पालटणार". क्रिकेट काउंटी (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 3. ^ "२००० नंतर पहिल्यांदाच झिम्बाब्वे दौर्‍यादरम्यान गालीवर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 4. ^ "भाविष्यातील दौरे" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 5. ^ "झिम्बाब्वे-श्रीलंका कसोटीमालिकेऐवजी त्रिकोणी मालिका होण्याची शक्यता". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 6. ^ "झिम्बाब्वेच्या १००व्या कसोटीमध्ये नेतृत्वासाठी हेराथ सज्ज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 7. ^ "१५ वर्षांनंतर झिम्बाब्वे श्रीलंकेचा दौरा करणार". हिंदुस्तान टाईम्स (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 8. ^ "ऐतिहासिक विजयात रझा चमकला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 9. ^ "झिम्बाब्वेचा ऐतिहासिक विजयद". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 10. ^ "पूर्ण सदस्याविरुद्धचा विजयाचा दुष्काळ झिम्बाब्वेने १६ वर्षांनंतर संपवला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 11. ^ "श्रीलंकेला ३ गडी राखून पराभूत करित झिम्बाब्वेचा मालिकाविजय". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 12. ^ a b "झिम्बाब्वेचा ऐतिहासिक विजय असण्याची चार कारणे". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 13. ^ "दोन्ही संघ क्षेत्ररक्षणामुळे वेगळे; आमचे क्षेत्ररक्षण अतिशय चांगले - क्रेमर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 14. ^ "माझ्या कारकिर्दीतील सर्वात खालच्या टोकांपैकी एक - मॅथ्यूज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 15. ^ "मॅथ्यूज श्रीलंकेच्या कर्णधारपदाहून पायउतार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 16. ^ "कसोटीमध्ये श्रीलंकेचे नेतृत्व चंदिमलकडे आणि इतर प्रकारांमध्ये तरंगा कर्णधार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 17. ^ "विक्रमी पाठलागात डिक्वेला, गुणरत्ने चमकले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 18. ^ "झिम्बाब्वे कसोटीमधूल धनंजय डीसिल्वाला वगळले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 19. ^ a b "श्रीलंका दौर्‍यासाठी डावखूरा फिरकी गोलंदाज वेलिंग्टनची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 20. ^ "रिकॉल्ड वेलिंग्टन मसाकद्झा इन्जर्ड". डेली न्यूज (इंग्रजी भाषेत). ५ जुलै २०१७ रोजी पाहिले.
 21. ^ "डिप्लेटेड श्रीलंका ऑफर झिम्बाब्वे अ ग्लिमर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 22. ^ "झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांतून चंदिमल बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 23. ^ "हबन्टोटामध्ये खेळपट्टी आणि उलट्या दिशेने वाहणार्‍या वार्‍यांचे संघांसमोर आव्हान". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 24. ^ a b c "मायरच्या पहिल्या शतकामुळे झिम्बाब्वेचा विक्रमी पाठलाग". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 25. ^ "झिम्बाब्वेचा श्रीलंकेमध्ये पहिलाच ३० पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग" (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 26. ^ "श्रीलंका वि झिम्बाब्वे, २रा एकदिवसीय सामना: वनिदु हसरंगा पदार्पणात हॅट्ट्रीक करणारा सर्वात लगान खेळाडू" (इंग्रजी भाषेत). २ जुलै २०१७ रोजी पाहिले.
 27. ^ "गुणतिलक, डिक्वेल्लाची झिम्बाब्वेवर मात" (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 28. ^ "श्रीलंका रॅक अप सिरीज लीड इन देअर हायएस्ट ओडिआय चेस अ‍ॅट होम" (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 29. ^ "शांत अर्व्हाइनमुळे मालिका बरोबरीवर" (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 30. ^ "कॅन कॉन्फिडन्ट झिम्बाब्वे टॉपल चंदिमल्स श्रीलंका?". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 31. ^ "अर्व्हाईन्स सेंच्युरी पॉवर्स शेव्हरॉन्स". द हेराल्ड (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 32. ^ "श्रीलंकेच्या फलंदाजीतील कमकुवत दुव्यांचा झिम्बाब्वेला फायदा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 33. ^ "रझामुळे झिम्बाब्वेचा डाव सावरला". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 34. ^ "रझाच्या शतकाने ४थ्या दिवशी झिम्बाब्वेची आघाडी वाढली". टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
 35. ^ "श्रीलंकेचा आशियातील सर्वात मोठा यशस्वी पाठलाग". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]