बिंबिसार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सम्राट बिंबिसार (इ.स.पू. ५४४ - इ.स.पू. ४९१) हा मगध साम्राज्याचा संस्थापक व अजातशत्रूचा पिता होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बिंबिसार (इ.स.पूर्व ५४३ ते ४९१)

   इ.स.पूर्व सहाव्या शतकात भारतात कुरू,पांचाल, गांधार, अवंती, मगध अशी सोळा महाजनपदे होती. यातील मगध महाजनपदाचे साम्राज्यात रुपांतर करण्याची सुरुवात बिंबिसारने केली. त्याने मगधला राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिली.
  बिंबिसार वयाच्या १५ वर्षी इ.स.पूर्व ५४३ मध्ये मगधच्या गादीवर आला. तो हुशार, मुत्सद्दी, धोरणी व पराक्रमी होता. सुपीक व संपन्न देश, भौगोलिक संरक्षण लाभलेला विभाग आणि सुसज्ज सैन्य यांचा सुयोग्य उपयोग करून साम्राज्य वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याने अवतीभोवतीची महाजनपदे वेगवेगळ्या मार्गांनी वर्चस्वाखाली आणण्याचे प्रयत्न सुरू केले. 
  
'अंग'महाजनपदावर आक्रमण:
     'अंग' या महाजनपदावरती 'ब्रह्मदत्त' या राजाची सत्ता होती. तो कुशल संघटक होता. बिंबिसारने अंगवर आक्रमण करून तो प्रदेश पादाक्रांत करून आपल्या साम्राज्यात विलीन करून घेतला. त्या प्रदेशाची 'चंपा' ही बाजारपेठ व राजधानी मगधच्या ताब्यात आली. त्याने आपल्या कुणाल या मुलाची तेथे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली.