कर्‍हाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कराड
जिल्हा सातारा जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या ५६,१४९.
२००१
दूरध्वनी संकेतांक ०२१६४
टपाल संकेतांक ४१५ ११०
वाहन संकेतांक MH-50
निर्वाचित प्रमुख सौ.उमा हिंगमिरे .
(नगराध्यक्ष)
प्रशासकीय प्रमुख श्री.के.एन.कुंभार.
(नगरपालिका आयुक्त)
संकेतस्थळ [१]
कराड येथील कृष्णा व कोयना नद्यांचा संगम=प्रितीसंगम

कराड हे सातारा जिल्ह्यातील शहर आहे. हे कराड तालुक्याचे प्रशासकीय केंद्र आहे. कराड तालुका भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक तालुका आहे.

कऱ्हाड हे सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव आहे. यालाच कराड असेही म्हणतात. कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’प्रीतिसंगम’ असे म्हणतात. या नद्यांचा महाबळेश्वर येथे उगम झाला आहे. महाबलेश्वर कराड पासुन १०० कि.मी. अंतरावर स्थित आहे. या नद्या महाबलेश्वर येथे वेगळ्या होतात व पुन्हा कराड येथे एकत्रीत होत.

स्थान[संपादन]

  कराडचे मूळ नाव करहाट्केश्वर होते. येथे स्थित असलेल्या पूर्वातन हट्केश्वर मन्दिरावरुन हे नाव प्रसिद्ध झाले.
नन्तर त्याचे रुपान्तर करहाटक असे झले. कालान्तर भाशीक बदलान्मुळे हे शहर काराड नावाने  प्रसिद्ध झाले.

कसे जाल?[संपादन]

पुण्याहुन कराडला जाण्यासाठी, सातारा मार्गे जावे लागते. कराड रेल्वे स्थानक पुणे-मिरज रेल्वेमार्गावर असून येथे रोज अनेक रेल्वेगाड्या थांबतात. कराड -सातारा अन्तर-५२ कि.मी. कराड- कोल्हपुर अन्तर- ७५ कि.मी.

भौगोलिक महत्त्व[संपादन]

कराड मध्ये कृष्णाकोयना या नद्यांचा संगम आहे.तसेच कराड पासुन ८ किमी वरती शेरे हे गाव या गावात कृष्णवंशीय यादव राहतात.

ऐतिहासिक महत्त्व[संपादन]

राजकीय वारसा[संपादन]

राजकीय वारसा[संपादन]

  • कराड ही यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते.
  • महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स म्हणून ओळखले जाणारे थोर विचारवंत यशवंतराव मोहिते हे कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक या गावाचे आहेत. यशवंतराव मोहिते हे जवळ जवळ २५-३० वर्षे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते.
    • कराड दक्षिण चे आमदार माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांनीसुद्धा अनेक खात्यांची मंत्रीपदे भूसावली आहेत.
  • पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील कै. आनंदराव चव्हाण हे केंद्रीय मंत्री मंडळात होते.
    • पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई प्रेमालाकाकी यांनीसुद्धा महत्त्वाची राजकीय पडे भूषवली आहेत.
  • कराड उत्तर चे आमदार श्री. बाळासाहेब पाटील हे आहेत. त्यांचे वडील कै. पी.डी. पाटील यांनी सर्वाधिक काळ कराड चे नगराध्यक्षपद भूषवले आहे.

वैशिष्ट्य[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]