आर्यदेव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आर्यदेव (तिसरे शतक) नागार्जुनाचे एक प्रमुख शिष्य आणि महायान माध्यमक बौद्ध संप्रदायातील अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांचे लेखक होते. त्यांना चान (?) बौद्ध धर्मातील १५ व्या कुलपतीची मान्यता देत 'काणदेव' असेही म्हटले जाते. ते श्रीलंकेत "बोधिसत्त्व देव" म्हणून ओळखले जातात.

आर्यदेव सिंहली राजाचे पुत्र म्हणून श्रीलंकेत जन्माला आले व त्यांना महायान संप्रदायाचा संस्थापक मानले जाते.

चिनी भाषेतील कुमारजिवा यांनी अनुवादित केलेल्या एका जीवनचित्रात असे म्हटले आहे की आर्यदेवांचा जन्म एका दक्षिण भारतीय ब्राह्मण कुटुंबात झाला होता.