Jump to content

राज्यराणी एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दादर - सावंतवाडी राज्यराणी एक्सप्रेस

राज्यराणी एक्सप्रेस ही भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी ह्यांनी २०११ सालच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये ह्या गाड्यांची घोषणा केली होती. राज्यराणी गाड्या अनेक राज्यांमधील महत्त्वाच्या सांस्कृतिक, पर्यटन अथवा व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या शहरांना राज्याच्या राजधानीसोबत जोडतात. ह्या रेल्वेगाड्यांना कूच बिहारची युवराज्ञी व जयपूरची महाराणी गायत्री देवी ह्यांचे नाव देण्यात आले आहे. ह्याच गाड्यांसोबत रविंद्रनाथ टागोर ह्यांचे नाव दिल्या गेलेल्या कवी गुरू एक्सप्रेसस्वामी विवेकानंदांचे नाव देण्यात आलेल्या विवेक एक्सप्रेस ह्या रेल्वेगाड्या देखील चालू करण्यात आल्या.

मार्ग

[संपादन]

सध्या एकूण १० राज्यराणी एक्सप्रेस मार्ग कार्यरत आहेत.

क्रम रेल्वे क्रमांक प्रकार नाव राज्य अंतर (km) क्षेत्र कधी सुरुवात
1 16557 - 16558 एक्सप्रेस म्हैसूर - बंगळूर कर्नाटक 139 द.प. रोज[] 01-जुलै-2011
2 11003 - 11004 एक्सप्रेस दादर - सावंतवाडी महाराष्ट्र 497 मध्य रोज[] 01-जुलै-2011
3 22861 - 22862 दृतगती शालिमारबांकुरा पश्चिम बंगाल 229 द.पू. आठवड्यातून तीनदा 01-ऑक्टोबर-2011
4 22161 - 22162 दृतगती भोपाळ - दामोह मध्य प्रदेश 291 प.म. रोज 12-नोव्हेंबर-2011
5 16349 - 16350 एक्सप्रेस त्रिवेंद्रम – निलांबुर केरळ 393 दक्षिण रोज 16-नोव्हेंबर-2011
6 18417 - 18418 एक्सप्रेस रुरकेलाभुवनेश्वर ओडिशा 341 पू.त. आठवड्यातून तीनदा 16-नोव्हेंबर-2011
7 15817 - 15818 एक्सप्रेस धुब्री – सिलघाट आसाम 460 उ.पू.सी. आठवड्यातून तीनदा 14-फेब्रुवारी-2012
8 22453 - 22454 दृतगती मेरठलखनौ उत्तर प्रदेश 459 उत्तर रोज 11-मार्च-2012
9 22101 - 22102 दृतगती लोकमान्य टिळक टर्मिनसमनमाड महाराष्ट्र 242 मध्य रोज 12-मार्च-2012
10 12567 - 12568 दृतगती सहर्सापाटणा बिहार 214 पूर्व रोज 18-मार्च-2012

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Indiarailinfo: Mysore Bangalore Rajya Rani Express/16557., Indiarailinfo, August 28, 2011.
  2. ^ Indiarailinfo: Dadar Sawantwadi Rajya Rani Express/11003., Indiarailinfo, August 28, 2011.