गायत्री देवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg
राजा रवी वर्मा यांनी काढलेले गायत्री देवीचे चित्र

गायत्री ही वैदिक हिंदू धर्मातील एक देवता आहे. गायत्री देवता प्रातःकाळी बाल्यावस्थेत, मध्यान्हकाळी युवावस्थेत व सायंकाळी वृद्धावस्थेत असते.

गायत्री मंत्र येणेप्रमाणे :

ॐ भूर्भूवः स्वः। तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात्।

गायत्रीचे वर्णन[संपादन]

वैदिक संध्याविधीतील गायत्री ध्यानाच्या श्लोकात गायत्रीचे वर्णन आले आहे.

मुक्ताविद्रुमहेमनीलधवलच्छायैर्मुखेस्त्रीक्षणैर्युक्तामिन्दुकलानिबद्धमुकुटां तत्त्वार्थवर्णात्मिकाम्| गायत्रीं वरदाभयाङ्कुशकशाशूलं कपालं गुणं शङ्ख चक्रमथारविन्दयुगुलं हस्तैर्वहन्तीं भजे||

गायत्री देवीला प्रत्येक मुखाला तीन डोळे असतात. चंद्रकलेने युक्त असा प्रत्येक मुकुट असतो. मोती, पोवळी, सोने, इंद्रनील व धवल अशा वर्णांची पाच मुखे असतात. तिला दहा हात असून त्या हातात वरदचिन्ह, अभयचिन्ह, अंकुश, चाबूक, शूल, कपाल, रज्जू, शंख, चक्र व कमळांची जोडी असते. ती ब्रह्मप्रतिपादक आहे.

गायत्री जयंती[संपादन]

हिंदू महिन्यातल्या ज्येष्ठ शुक्ल एकादशीला गायत्री जयंती असते.

बाल्यावस्थेतील गायत्री[संपादन]

बालां बालादित्यमण्डलमध्यस्थां रक्तवर्णां रक्ताम्बरानुलेपनस्रगाभरणां चतुर्वक्त्रां दण्डकमण्डल्वक्षसुत्राभयाङ्कचतुर्भुजां हंसासनरूढां ब्रह्मदैवत्यामृग्वेदमुदाहरन्तीं भूर्लोकाधिष्ठात्रीं गायत्रीं नाम देवतां ध्यायामि |

प्रातःकाळी गायत्री बाल्यावस्थेत असून ती उदयकालीन सूर्यमंडळाच्या मध्यवर्ती असते. तिचा वर्ण व वस्त्रे रक्तवर्णाची(लाल)असतात. तिला चार मुखे असतात. चार हात असून त्या हातात दंड,कमंडलू,वक्षसूत्र व अभयचिन्ह असते. ती ब्रह्मस्वरूपी असून हंसावर बसलेली असते. ती ऋग्वेदाचे पठण करत असून भू-लोकाची नियंत्रक असते.

युवावस्थेतील गायत्री[संपादन]

युवतीं युवादित्यमण्डलमध्यस्थां श्वेतवर्णां श्वेताम्बरानुलेपनस्रगाभरणां चतुर्वक्त्रां प्रतिवक्त्रं त्रिनेत्रां चन्द्रशेखरां त्रिशूलखड्गखट्वाङ्गडमर्वंकर्भुजां वृषभासनरूढां रुद्रदैवत्याम् यजुर्वेदमुदाहरन्तीं भूवर्लोकाधिष्ठात्रीं गायत्रीं नाम देवतां ध्यायामि |

मध्यान्हकाळी गायत्री युवावस्थेत असून ती मध्यान्हकालीन सूर्यमंडळाच्या मध्यवर्ती असते. तिचा वर्ण व वस्त्रे श्वेतवर्णाची(पांढरा)असतात. तिला चार मुखे असतात.प्रत्येक मुखाला तीन डोळे असून तिच्या मस्तकावर चंद्र असतो. चार हात असून त्या हातात त्रिशूळ, खड्ग, खट्वांग व डवरू असते. ती रुद्रस्वरूपी असून बैलावर बसलेली असते. ती यजुर्वेदाचे पठण करत असून भुव-लोकाची नियंत्रक असते.

वृद्धावस्थेतील गायत्री[संपादन]

वृद्धां वृद्धादित्यमण्डलमध्यस्थां श्यामवर्णां श्यामम्बरानुलेपनस्रगाभरणामेकवक्त्रां शङ्खचक्रगदापद्माङ्क गरुडासनरूढां विष्णुदैवत्यां सामवेदमुदाहरन्तीं स्वर्लोकाधिष्ठात्रीं सरस्वतीं नाम देवतां ध्यायामि |

सायंकाळी गायत्री वृद्धावस्थेत असून ती अस्तकालीन सूर्यमंडळाच्या मध्यवर्ती असते. तिचा वर्ण व वस्त्रे श्यामवर्णाची(सावळा)असतात. तिला एकच मुख असते. चार हात असून त्या हातात शंख, चक्र, गदा व पद्म असते. ती विष्णुस्वरूपी सरस्वती असून गरुडावर बसलेली असते. ती सामवेदाचे पठण करत असून स्वर्ग-लोकाची नियंत्रक असते.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ ग्रंथ[संपादन]

  1. गायत्री : विज्ञान आणि उपासना - लेखक पं.मीमांसातीर्थ श्रीपादशास्त्री किंजवडेकर, ईशावास्य प्रकाशन, पुणे