लक्झेंबर्ग शहर (लक्झेंबर्गिश: Stad Lëtzebuerg, फ्रेंच: Ville de Luxembourg, जर्मन: Luxemburg Stadt) ही पश्चिम युरोपातील लक्झेंबर्ग देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फ्रँक लोकांनी मध्य युगात वसवलेले हे शहर लक्झेंबर्गच्या दक्षिण भागात आल्झेट व पेट्र्युस नद्यांच्या संगमावर स्थित आहे. हे शहर पश्चिम युरोपामध्ये मध्यवर्ती स्थानावर असून ते ब्रसेल्सपासून २१३ किमी ( मैल), पॅरिसपासून ३७२ किमी ( मैल), क्योल्नपासून २०९ किमी ( मैल) तर फ्रान्सच्या मेसपासून ६५ किमी ( मैल) अंतरावर स्थित आहे.[१]
२०१० साली लक्झेंबर्ग शहराची लोकसंख्या सुमारे १ लाख होती. एक सुबत्त व प्रगत शहर असलेल्या लक्झेंबर्ग शहराचा २००९ साली जगात वार्षिक दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत तिसरा क्रमांक होता.[२] बँकिंग व पर्यटन हे येथील प्रमुख उद्योग आहेत. येथील ऐतिहासिक तटबंदीमुळे ह्या शहराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत स्थान मिळाले आहे.
|
|
|
लक्झेंबर्गची सर्वात प्रसिद्ध खुण - अडोल्फी पूल
|
|
|
|
एकेकाळी लक्झेंबर्गच्या तटबंदीचा भाग असलेला किल्ला
|
|
|
१६२१ साली बांधले गेलेले लक्झेंबर्ग नोत्र देम कॅथेड्रल
|
|