कॅस्पियन समुद्र
| कॅस्पियन समुद्र स | |
|---|---|
|
|
|
| स्थान | मध्य आशिया, युरोप |
| गुणक: | |
| प्रमुख अंतर्वाह | वोल्गा नदी, उरल नदी, कुरा नदी |
| प्रमुख बहिर्वाह | बाष्पीभवन |
| भोवतालचे देश | |
| कमाल लांबी | १,०३० किमी ( मैल) |
| कमाल रुंदी | ४३५ किमी ( मैल) |
| पृष्ठभागाचे क्षेत्रफळ | ३,७१,००० किमी२ ( sqmi) |
| सरासरी खोली | १८७ मी ( फूट) |
| कमाल खोली | १,०२५ मी ( फूट) |
| पाण्याचे घनफळ | ६९,४०० किमी३ ( घन मै.) |
| किनार्याची लांबी | ७,००० किमी ( मैल) |
| भोवतालची शहरे | बाकू (अझरबैजान), रश्त (इराण) |
कॅस्पियन समुद्र (अझरबैजानी: Xəzər dənizi, फारसी: دریای خزر or دریای مازندران, रशियन: Каспийское море, कझाक: Каспий теңізі, चेचन: Paama Xord, तुर्कमेन: Hazar deňzi) हा पृथ्वीवरील जमिनीने वेढलेला सर्वात मोठा पाण्याचा साठा आहे (पृष्ठभागच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने). कॅस्पियन समुद्राचे जगातील सर्वात मोठे सरोवर किंवा एक वेगळा समुद्र ह्या दोन्ही प्रकारांनी वर्गीकरण केले जाते. ३,७१,००० किमी२ ( sqmi) इतके पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व ७८,२०० किमी३ ( घन मै.) इतके पाण्याचे घनफळ असलेल्या कॅस्पियन समुद्राच्या उत्तरेला रशिया, दक्षिणेला इराण, पश्चिमेला अझरबैजान तर पूर्वेला तुर्कमेनिस्तान व कझाकस्तान हे देश आहेत. कॅस्पियन समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यापाशी कॉकासस पर्वतरांगेची सुरुवात होते. बाकू हे कॅस्पियन समुद्रकिनाऱ्यावरील सर्वात मोठे शहर आहे.
वोल्गा नदी, उरल नदी व कुरा नदी ह्या कॅस्पियन समुद्राला मिळणाऱ्या सर्वात मोठ्या नद्या आहेत. कॅस्पियन समुद्रामधून पाण्याचा बहिर्वाह केवळ बाष्पीभवनाद्वारे होतो. येथील पाण्याचा खारटपणा १.२ टक्के आहे.
कॅस्पियन हे नाव मुळात कॅस्पियन ह्या लोकांपासून मिळाले आहे. जुन्या काळात ग्रीक आणि पर्शियन लोकं कॅस्पियन समुद्राला हैरकॅनीयन समुद्र म्हणून उल्लेखित असत. आजच्या काळात पर्शियात माझानदरान सागर असे हे उल्लेखले जाते.