पृथ्वी
अपोलो १७ यानातून घेतलेले पृथ्वीचे छायाचित्र |
||||||||||
| कक्षीय गुणधर्म | ||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| इपॉक J2000 | ||||||||||
| अपसूर्य बिंदू | १५,२०,९७,७०१ कि.मी. १.०१६७१०३३३५ खगोलीय एकक |
|||||||||
| उपसूर्य बिंदू: | १४,७०,९८,०७४ कि.मी. ०.९८३२८९८८१२ खगोलीय एकक |
|||||||||
| अर्धदीर्घ अक्ष: | १४,९५,९७,८८७.५ कि.मी. १.००००००११२४ खगोलीय एकक |
|||||||||
| वक्रता निर्देशांक: | ०.०१६७१०२१९ | |||||||||
| परिभ्रमण काळ: | ३६५.२५६ दिवस १.००००१७५ वर्ष |
|||||||||
| सरासरी कक्षीय वेग: | २९.७८३ कि.मी./से. १०७,२१८ कि.मी./तास |
|||||||||
| कक्षेचा कल: | संदर्भ (०) ७.२५° सूर्याच्या विषुववृत्ताशी |
|||||||||
| असेंडिंग नोडचे रेखावृत्त: | ३४८.७३९३६° | |||||||||
| उपसूर्य बिंदूचे अर्ग्युमेंट: | ११४.२०७८३° | |||||||||
| कोणाचा उपग्रह: | सूर्य | |||||||||
| उपग्रह: | १ (चंद्र) | |||||||||
| भौतिक गुणधर्म | ||||||||||
| सरासरी त्रिज्या: | ६,३७१.० कि.मी. | |||||||||
| विषुववृत्तीय त्रिज्या: | ६,३७८.१ कि.मी. | |||||||||
| धृवीय त्रिज्या: | ६,३५६.८ कि.मी. | |||||||||
| फ्लॅटनिंग: | ०.००३३५२८ | |||||||||
| परीघ: | ४०,०७५.०२ कि.मी. (विषुववृत्तीय) ४०,००७.८६ कि.मी. (रेखावृत्तीय) ४०,०४१.४७ कि.मी. (सरासरी) |
|||||||||
| पृष्ठभागाचे क्षेत्रफळ: | ५१,००,७२,००० कि.मी.² [१] १४,८९,४०,००० कि.मी.² जमीन (२९.२ %) ३६,११,३२,००० कि.मी.² पाणी (७०.८ %) |
|||||||||
| घनफळ: | १.०८३२०७३ × १०१२ कि.मी.³ | |||||||||
| वस्तुमान: | ५.९७३६ × १०२४ किलोग्रॅम | |||||||||
| सरासरी घनता: | ५.५१५३ ग्रॅ./सें.मी.³ | |||||||||
| पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षण (विषुववृत्ताजवळ): | ९.७८०३२७ मी./से.² ०.९९७३२ g |
|||||||||
| मुक्तिवेग: | ११.१८६ कि.मी./से. ४०,२७० कि.मी./तास |
|||||||||
| सिडेरियल दिनमान: | ०.९९७२५८ दिवस २३ तास ५६ मि.०४.०९०५४ से. |
|||||||||
| विषुववृत्तावरील परिवलनवेग: | ४६५.११ मी./से. | |||||||||
| आसाचा कल: | २३.४३९२८१° | |||||||||
| उत्तर धृवाचे अक्षवृत्त: | ९० | |||||||||
| परावर्तनीयता: | ०.३६७ | |||||||||
| पृष्ठभागाचे तापमान: केल्व्हिन सेल्सियस |
|
|||||||||
| विशेषणे: | पार्थिव | |||||||||
| वातावरण | ||||||||||
| पृष्ठभागावरील दाब: | १०१.३ कि.पा. (समुद्रसपाटीवर) | |||||||||
| संरचना: | ७८.०८% नायट्रोजन (N2) २०.९५% ऑक्सिजन (O2) ०.९३% आरगॉन ०.०३८% कार्बन डायॉक्साइड बाष्प (हवामानानुसार बदलते) |
|||||||||
पृथ्वी सूर्यमालेतील सूर्या पासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे. पूर्ण विश्वात ही एकमेव जागा आहे जिथे जीवन आढळलेले आहे. पृथ्वीची घडण साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झाली आणि तिचा उपग्रह चंद्र साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी तिच्या प्रदक्षिणा घालू लागला. आपली पृथ्वी एक संपूर्ण विश्वामधील जीवसृष्टी असलेली एकमेव ग्रह आहे. पृथ्वीला निळा ग्रह सुध्दा म्हणतात. पृथ्वीचा व्यास १२,७५६ कि. मी. एवढा आहे, व सूर्यापासून पॄथ्वीचे अंतर साधारणपणे १४९,५९७,८९० कि. मी. एवढे आहे. पृथ्वीला स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४ तास लागतात. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. या ३६५ दिवसांच्या कालावधीला आपण एक वर्ष म्हणतो. पृथ्वी तिच्या आसाभोवती २३.५ अंशांनी कललेली आहे आणि याच स्थितीत ती स्वत:भोवती व सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतूचक्र सुरू असते. आपल्या पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहचण्यासाठी साधारणत: ८ मिनिटे लागतात. पृथ्वी सूर्याभोवती वर्तुळाकार मार्गाने प्रदक्षिणा पूर्ण करते. या प्रदक्षिणेमध्ये थोडाजरी फरक पडला असता तर पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली नसती, तसेच पृथ्वीची रचना, गुरुत्वाकर्षण व सूर्यापासूनचे ठरावीक अंतर आणि पृथ्वीवर असलेले वातावरण यामुळेच आपल्या पृथ्वीवर सजीवसृष्टी निर्माण झाली असावी. पृथ्वीला एक उपग्रह आहे तो म्हणजे चंद्र.
पृथ्वीच्या उत्पत्ती नंतर भौगोलिक आणि जैविक प्रक्रियांनी तिच्यात खूप परिवर्तन झाले आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] बाह्यरचना
पृथ्वीचा पृष्ठभाग अनेक भागांत आहे. हे भाग, अथवा टेक्टॉनिक प्लेट्स [मराठी शब्द सुचवा], अतिसूक्ष्मगतीने पृष्ठभागावर तरंगत आहेत. यांच्यावर ७१% भागात समुद्राचे पाणी आहे तर इतर भाग जमीन आहे.. 
[संपादन] आंतररचना
पृथ्वीच्या सर्वांत वरचे आवरण म्हणजे भूकवच होय. त्याखाली प्रावरण असते. प्रवरणाखाली बह्यगाभा व त्याखाली अंतर्गाभा असतो. भूकवच - ३० किमी जाडी. भूकंपलेख यंत्राद्वारे मिळालेल्या माहितीवरून भूपृश्तापासून ते केंद्रापर्यंत तीन थर असावेत :
- शिलावरण
- पायारोस्फेअर
- बरीस्फेअर
[संपादन] वातावरण
वातावरणात तपांबर,स्थितांबर व दलांबर यान्चा समावेश होतो. स्थितांबरात ओझोनाचा पट्टा आहे. तपांबरातून विमाने व पक्षी उडतात. स्थितांबराच्या खालच्या थरातून काही विमाने उडतात.
[संपादन] चंद्र
प्रूथ्विचा उपग्रह साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी तिच्या प्रदक्षिणा घालू लागला. त्यालाच आपण चंद्र म्हणतो.
[संपादन] काही महत्वाची सांख्यिकी
- विषुवृत्त त्रिज्या - ६,३७८.१३७ कि.मी
- एकूण जमीन - १४,८९,३९,१०० चौ.कि.मी. (क्षेत्रफळ) २९.२%
- एकूण पाणी - ३६,११,२६,४०० चौ.कि.मी. (क्षेत्रफळ) ७०.८%
- वस्तुमान - ५९,७३६ x १०२४ किलो
[संपादन] संदर्भ
- ↑ Pidwirny, Michael (February 2, 2006). "Surface area of our planet covered by oceans and continents.(Table 8o-1)". University of British Columbia, Okanagan. Retrieved on 2007-11-26.