पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रशांत महासागर
प्रशांत महासागर (इतर उच्चारः पॅसिफिक ओशन) हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे. प्रशांत महासागराच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, दक्षिणेला दक्षिणी महासागर, पश्चिमेला आशिया व ऑस्ट्रेलिया तर पूर्वेला अमेरिका खंड आहेत.
प्रशांत महासागराचे एकुण १.६९२ कोटी वर्ग किमी इतके क्षेत्रफळ असलेल्या प्रशांत महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ३२ टक्के भाग व्यापला आहे व जगातील एकूण पाण्याच्या ४६ टक्के पाणी प्रशांत महासागरामध्ये आहे. १०,९११ मीटरs ( फूट) इतकी खोली असलेला मेरियाना गर्ता हा प्रशांत महासागरातील सर्वात खोल बिंदू आहे. न्यू गिनी हे प्रशांत महासागरामधील सर्वात मोठे बेट आहे.
युरोपियन शोधकांनी प्रशांत महासागराचा १६व्या शतकामध्ये शोध लावला. पॅसिफिक ओशन हे नाव पोर्तुगीज शोधक फर्डिनांड मेजेलन ह्याने आपल्या विश्वसफरेदरम्यान ह्या महासागराला पोर्तुगीज भाषेत दिलेल्या मार पॅसिफिको (शांत समुद्र) ह्या वरून ठेवण्यात आले आहे.
भोवतालचे देश व प्रदेश [संपादन]
सार्वभौम देश [संपादन]
मोठी शहरे व बंदरे [संपादन]
- आकापल्को, मेक्सिको
- अँकरेज, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
- अंतोफागास्ता, चिली
- ऑकलंड, न्यू झीलंड
- बँकॉक, थायलंड
- ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया
- बुसान, दक्षिण कोरिया
- कायाओ, पेरू
- दानांग, व्हियेतनाम
- ग्वायाकिल, इक्वेडोर
- हाँग काँग, चीन
- होनोलुलु, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
- इंचेवॉन, दक्षिण कोरिया
- कोबे, जपान
|
- लाँग बीच, कॅलिफोर्निया, अमेरिका
- लॉस एंजेल्स, अमेरिका
- मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
- मनिला, फिलिपिन्स
- ओकलंड, अमेरिका
- पनामा सिटी, पनामा
- पर्ल हार्बर
- पोर्टलंड, ओरेगन, अमेरिका
- प्वेर्तो व्हायार्ता, मेक्सिको
- हो चि मिन्ह सिटी, व्हियेतनाम
- सॅन डिएगो, अमेरिका
- सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका
- सिअॅटल, अमेरिका
|
- शांघाय, चीन
- शेन्झेन, चीन
- सिंगापूर
- सिडनी, ऑस्ट्रेलिया
- तिआंजिन, चीन
- तिहुआना, मेक्सिको
- टोकियो, जपान
- बाल्परेझो, चिली
- व्हँकूव्हर, कॅनडा
- व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा
- व्लादिवोस्तॉक, रशिया
- वेलिंग्टन, न्यू झीलंड
- वूलाँगाँग, ऑस्ट्रेलिया
- योकोहामा, जपान
|