ॲडॉल्फ हिटलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ॲडॉल्फ हिटलर
ॲडॉल्फ हिटलरची एक मुद्रा

जर्मनीदेशाचा हुकूमशहा. नाझी पक्षाच्या या नेत्याचे नाव त्याच्या क्रूरपणा व ज्यूंच्या कत्तलीकरता कुप्रसिद्ध आहे. तो नाझी जर्मनीचा प्रमुख होता. जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटणारा महत्त्वाकांक्षी नेता म्हणून हिटलर सदैव जगाच्या स्मरणात राहील.

हिटलर(२० एप्रिल १८८९ ते ३० एप्रिल १९४५) याचा जन्म ऑस्ट्रिया या देशातील एका लहानश्या गावी झाला.हा ॲलॉइस व क्लारा या दांपत्याचा चौथा मुलगा.एका मामुली सरकारी अधिकारी असलेल्या वडिलांच्या घरी झाला. व्हिएन्नामध्ये काहीकाळ हस्त चित्रे विकुन अथवा रस्त्यावरिल बर्फ साफ करुन उपजिविका करणारा हा माणुस ,अवघ्या थोड्या अवधीत बुद्धिमंतांच्या देश म्हणून ओळखल्या गेलेल्या जर्मनीचा भाग्यविधाता बनला.पुढे आपल्या बुद्वीचातुर्याच्या आणि वक्र्तुत्वाच्या जोरावर तो जर्मनीचा हुकूमशहा झाला. त्याने जर्मनीच्या विकासाला चालना दिली. जर्मनीला जगातील सगळ्यात शक्तीशाली देश बनवण्याचे त्याचे स्वप्न होते,त्यासाठी त्याने प्रचंड प्रयत्न केले.त्याने सक्तीचे लष्करी शिक्षण सुरू केले. लष्कर व नौदलात वाढ केली. शक्तिशाली विमानदल उभारले. इटली व जपान या दोन देशांशी मैत्रीचा करार करून आपले हात मजबूत करून घेतले.


हिटलर हा एक महत्त्वाकांक्षी तसेच मुत्सद्दि नेता होता.

बाह्य दुवे [संपादन]