पाणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाणी (H2O) हे हायड्रोजनऑक्सिजन या अणूंपासून बनलेला पदार्थ आहे. सामान्य तापमानाला पाणी द्रव स्वरुपात असते. पाण्याला वास व चव नसते. पृथ्वीवर पाणी विपुल प्रमाणात आढळते.

पाण्याचा थेंब

पाणी हे रंगहीन असून प्राणी-वनस्पतींच्या सर्व जैविक प्रक्रियेत आवश्यक असते. पाण्याच्या घन स्वरुपाला बर्फ व वायुरुपाला वाफ असे संबोधतात. अनेक पदार्थ पाण्यात विरघळतात व म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक (Universal solvent) असे संबोधतात.