तेलंगणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारताच्या नकाशावर तेलंगणाचे स्थान
हैद्राबाद येथील चारमिनार

तेलंगणा हा आंध्र प्रदेशचा भाग असून भौगोलिक दृष्टया मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर कर्नाटक यांच्या सीमांलगत आहे. तांदूळ हे मुख्य पीक असलेला हा प्रदेश गोदावरी खोऱ्यात असून हा भाग ऐतिहासिक काळात सातवाहन (इ.स.पू. २२१ - इ.स. २१८), गोवळकोंड्याची कुतुबशाही (इ.स. १५२० - इ.स. १६८७)आणि हैदराबादचा निजाम (इ.स. १७२४ - इ.स. १९४८) यांच्या सत्तेखाली राहिला. इ.स.च्या विसाव्या व एकविसाव्या शतकात साम्यवाद आणि नक्षल विचारप्रणालींचा लक्षणीय प्रभाव या प्रदेशावर आढळतो. हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर इ.स. १९४८ साली हा भाग स्वतंत्र भारतीय संघराज्यात विलीन झाला

तेलंगणा हे वेगळे राज्य घोषित करण्यात यावे, यासाठी अनेक वर्षे तेलंगणा राष्ट्रीय समितीने लढा चालवला आहे. डिसेंबर ९, २००९ रोजी या प्रयत्नांना यश येऊन भारत सरकारने तेलंगणा हे वेगळे राज्य होणार असल्याचे जाहीर केले.

तेलंगणा भागात खालील जिल्ह्यांचा समावेश होतो: आदिलाबाद जिल्हा, करीमनगर जिल्हा, खम्मम जिल्हा, नालगोंडा जिल्हा, निजामाबाद जिल्हा, मेडक जिल्हा, वारंगळ जिल्हा, रंगारेड्‍डी जिल्हा, महबूबनगर जिल्हाहैदराबाद जिल्हा.

हेही पाहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]