डेल्टा एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेल्टा एरलाइन्स
Delta logo.svg
आय.ए.टी.ए.
DL
आय.सी.ए.ओ.
DAL
कॉलसाईन
डेल्टा
स्थापना जून १७, इ.स. १९२९
हब अटलांटा, न्यू यॉर्क-जेएफके, अॅम्स्टरडॅम, सिनसिनाटी, डीट्रॉइट, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, मिनीयापोलिस-सेंट पॉल
मुख्य शहरे मेम्फिस, टोक्यो, पॅरिस-चार्ल्स डि गॉल, सॉल्ट लेक सिटी
अलायन्स स्टार टीम
विमान संख्या ७२२
मुख्यालय अटलांटा
प्रमुख व्यक्ती रिचर्ड अँडरसन
संकेतस्थळ http://www.delta.com

डेल्टा एरलाइन्स अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी जगभर विमानसेवा पुरवते.डेल्टा एअर लाईन्स ही जॉर्जिया मधील अटलांटा येथे मुख्यालय असलेली अमेरीकन विमानप्रवासी कंपनी आहे.[१] स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून या कंपनीची सहा खंडामधून मोठया प्रमाणावर विमानवाहतूक सेवा कार्यान्वित आहे. ८०,००० पेक्षा जास्त कामगार वर्ग आणि दैनंदिन ५००० उड्डाणे करत असलेली ही सर्वांत मोठी विमानप्रवासी कंपनी आहे.[२] या कंपनीच्या विमानांचे विश्रांतीस्थळ हर्टजफिल्ड येथील जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे असून जगामधील प्रवासी वाहतूकीसाठी सर्वांत व्यस्त ( वार्षिक ९१ अब्ज पेक्षा जास्त प्रवासी ) व या कंपनीच्या विमानांचे तांत्रिक दुरूस्ती केंद्र म्हणून ओळखले जाते.[३] ही एअर लाईन्स सर्वांत जुनी एअरलाईन्स असून स्थापना केल्यापासून ६ व्या क्रमांकावर आहे. २०११ मध्ये विमांनाच्या ताफयाच्या [४] व २०१२ मध्ये प्रवाशांच्या [५] तुलनेत जगामधील सर्वांत मोठी कंपनी आहे.

इतिहास[संपादन]

डेल्टा एअरलाईन कंपनीने ३० मे, १९२४ रोजी जॉर्जिया मधील मेकॉन येथे पिकांवर फवारणी करण्यासाठी पहिले विमान वापरले. १९२५ मध्ये ही कंपनी लुईसिना मन्रेा येथे स्थलांतरीत झाली. कंपनीचे मूळ संस्थापक , कॉलेट वूलमन यांनी १३ सप्टेंबर, १९२८ रोजी ही कंपनी विकत घेतली आणि त्याचे ‘डेल्टा एअर सर्विस’ असे नामकरण केले. १९२९ च्या सुमारास प्रवासी वाहतूक करण्यास सुरुवात केली. दक्षिणपूर्वेकडील राज्यामधून एका प्रवाशाच्या वाहतूकीने पहिला मार्ग सुरू झाला.[६] त्यानंतर या कंपनीने अनेक विमानवाहतूक कंपन्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली. १९६० मध्ये जेट विमानांचा वापर केला आणि १९७० मध्ये युरोपपर्यंत आणि १९८० मध्ये पॅसिफिकपर्यंत मजल मारत आंतराराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपली घोडदौड कायम ठेवली.

पूर्वीचा इतिहास[संपादन]

८० वर्षांपासून अस्तित्त्वात असलेली सध्याची डेल्टा एअर लाईन्स ही कंपनी अनेक विमान वाहतूक कंपन्यांच्या एकत्रिकरणामुळे बनलेली आहे. अलिकडेच २९ ऑक्टोबर, २००८ मध्ये नॉर्थवेस्ट एअरलाईन्स बरोबर झालेल्या एकत्रिकरणामुळे जगातील सर्वांत मोठी विमान वाहतूक कंपनी म्हणून या कंपनीचा लौकीक आहे. सुरूवातीच्या काळात एकत्रिकरण झाले तरी नॉर्थवेस्टच्या नावाने विमान वाहतूक कंपनीचे व्यवहार चालत होते. परंतू ३१ जानेवारी, २०१० मध्ये आरक्षण पध्दती आणि वेबसाईट इ. चे एकत्रिकरण झाल्यानंतर नॉर्थवेस्ट व्यवहारामधून अधिकृतरीत्या सेवानिवृत्त झाली आणि डेल्टा एअर लाईन्स या नावांने विमानवाहतूक सुरु राहीली.[७][८]

मुख्यालय आणि कार्यालय[संपादन]

डेल्टाचे मुख्यालय अटलांटा शहर


१९४१ पासून अटलांटा शहराच्या उत्तरेकडे व्यापारी संकुलामध्ये हर्टजफिल्ड – जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ या कंपनीचे मुख्यालय आहे. [९][१०]

विश्रांतीस्थळांबाबतचा तपशील[संपादन]

डेल्टा ला खालीलप्रमाणे सात स्थानिक आणि तीन आंतरराष्ट्रीय विश्रांतीस्थळे आहेत.[११]

  • ॲमस्टरडॅम एअरपोर्ट शिफोळ
  • सिनसिनाटी / उत्तर केंचुकी आंतरराष्ट्रीय विमानतळ
  • डेट्रॉईट मेट्रोपोलिटन वायने कंट्री विमानतळ
  • हर्टजफिल्ड - जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ
  • जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्यू यॉर्क सिटी
  • लागार्डीआ विमानतळ, न्यू यॉर्क सिटी
  • मिनॉपोलिस - संत पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ
  • नरीता आंतरराष्ट्रीय विमानतळ, टोकियो
  • पॅरीस – चार्ल्स गॉली विमानतळ
  • सॉल्ट लेक सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ

पूर्वीची विश्रांतीस्थळे[संपादन]

पूर्वीची दुय्यम विश्रांतीस्थळे[संपादन]

व्यापा-याच्या गरजेनुसार खालील विश्रांतीस्थळ बंद करण्यात आलेली आहेत.

कामगार वर्ग[संपादन]

या कंपनीमध्ये अंदाजित ८०,००० कामगार मुख्य आणि भागीदारी कंपनीमध्ये कार्यरत आहेत.[२] १२,००० इतकी वैमानिकांची संख्या असलेली ही एकमेव कंपनी आहे. युनायटेड स्टेटसमधील वैमानिक संख्या , विमानांचे उड्डाण या व्यतिरिक्त इतर सर्वच बाबतीत डेल्टा सर्वांत मोठी विमान कपंनी आहे. नॉर्थवेस्ट विमान वाहतूक कंपनीसोबत एकत्रिकरण झाल्यानंतर तेथील कामगारांचे विलिनीकरण झाल्यामुळे कामगारांच्या बढती, वेतन , ज्येष्ठता इ. विषयी बरेच प्रश्न उभे राहिले होते. त्यांना सामावून घेणे, नव्याने वेतन ठरविणे , कामाचे व्यवस्थापन इत्यादी बाबतीत नियम ठरविणे आवश्यक होते. त्यानंतर कामगार वर्गाचे संघटन करुन त्याबाबत निर्णय घेण्याचे काम चालू आहे.

अंतर[संपादन]

६ खंडामध्ये ४९३२ उड्डांणाव्दारे आणि २५३३ रोजच्या फे-यांव्दारे डेल्टा एअर लाईन्स ची विमाने प्रवाशांना विमान सेवा देत आहेत.[२]

हब सिटी स्टॅटिसटीक[संपादन]

श्रेणी विमानतळ दैनंदिन फे-या अंतर
अटलांटा (एटीएल) ९६० २१६
डेट्रॉईट (डीटीडब्ल्यू) ४५० १३२
मिनेपोलिस- सेंट पॉल (एमएसपी) ४१० १३६
न्यू यॉर्क सिटी (एलजीए) २६८ ६३
सॉल्ट लेक सिटी (एसएलसी) २४३ ८६
न्यू यॉर्क सिटी (जेएफके) १४३ ७८
सिनसिनाटी/एन.केंचुकी (सीव्हीजी) १०१ ४२
पॅरीस (सीडीजी) २४ १९
ॲमस्टरडॅम (एएमएस) २३ २०
१० टोकीयो (एनआरटी) २२ १९

भागीदार[संपादन]

  • अलास्का एअरलाईन्स
  • गोल ट्रान्सपोर्टस एरोज(१८)
  • हवालिअन एअरलाईन्स
  • मलेशिआ एअरलाईन्स
  • ऑलम्पिक एअर
  • वर्जिन अटलांटीक(१९)
  • वर्जिन ऑस्ट्रिलिआ

उड्डाण[संपादन]

जानेवारी २०१३ पर्यंत डेल्टा कडून एअरबस, बोइंग आणि मॅकडोनेल डग्लस यांचेकडून बनविण्यात आलेल्या ७०० पेक्षा जास्त विमानांचे उड्डाण केले होते. इतर यू.एस.विमानवाहतूक कंपनीच्या मानाने बोइंग ७५७, बोइंग ७६७, आणि एअरबस ए३३० विमानांची वाहतूक जास्त होते. जगामध्ये मॅकडोनेल डग्लस एमडी – ८८ आणि मॅकडोनेल डग्लस एमडी-९० या विमानांची वाहतूक जास्त होते.

केबीन[संपादन]

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्यापारी वर्गासाठी बोइंग ७७७ – २०० एल आर सारख्या विमानांमध्ये डेल्टाकडून बिझनेस एलाईट कक्ष तयार केलेले आहे. हा विशेष वर्ग असल्यामुळे यामध्ये जेवण, नाश्ता, मदय आणि इतर सुविधा पुरविलेल्या आहेत.

याव्यतिरिक्त प्रथम वर्ग व्यापारी वर्ग, इकॉनॉमी कम्फर्ट क्लास आणि इकॉनॉमी क्लास या विमानकंपनीकडून पुरविलेल्या आहेत.

सुविधा[संपादन]

वाय फाय , पॅनासोनिक इएफएक्स ॲडिओ व्हिडिओ सारख्या अत्याधुनिक सोशल नेटवर्कींग सुविधा मागणीनुसार वरील सर्व क्लाससाठी पुरविल्या जातात.

संदर्भ[संपादन]

  1. "फेडरल एव्हिऐशन ॲडमिनिस्ट्रेशन- एअरलाईन सर्टीफिकेट इनफॉर्मेशन-डिटेल व्हिव", २०१२-०५-०१. (इंग्लिश मजकूर) 
  2. २.० २.१ २.२ "डेल्टा स्टेट ॲण्ड फॅक्टस", डिसेंबर ११,२०१२. (इंग्लिश मजकूर) 
  3. "डेल्टा टेकओप्स", २०१४-०३-१२. (इंग्लिश मजकूर) 
  4. "जगातील दहावी विमानवाहतूक कंपनी", रेडीफ.कॉम., सप्टेंबर १५,२०११. (इंग्लिश मजकूर) 
  5. "प्रवासांना विमान वाहतूक सेवा", आयएटीए वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट स्टॅटिस्टीक,५७ वे प्रकाशन, ,२०१३-७-०५. (इंग्लिश मजकूर) 
  6. "डेल्टा एअर लाईन्स", द न्यू जॉर्जिया एनसायक्लोपेडिया, ( मे ३१, २००७). (इंग्लिश मजकूर) 
  7. "डेल्टा विमान वाहतूकीचे काम कराण्यासाठी प्रमाणपत्र मिळविण्यात यशस्वी", यूएसए टूडे.कॉम., २०१३-०१-३१). (इंग्लिश मजकूर) 
  8. "डेल्टा नॉर्थवेस्ट यांच्या एकत्रिकरणाचा निर्णय", द न्यू यॉर्क् टाईम्स, २०१३-०१-३१). (इंग्लिश मजकूर) 
  9. "डेल्टामध्ये झालेला गोंधळ", द न्यू यॉर्क् टाईम्स, २००९-१२-२७. (इंग्लिश मजकूर) 
  10. "कॉन्टॅक् कोर्पोरेट", डेल्टा एअरलाईन्स, ऑक्टोबर १७, २००८. (इंग्लिश मजकूर) 
  11. "डेल्टा एअर लाईन्स", क्लियर ट्रिप डॉट कॉम. (इंग्लिश मजकूर) 


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.