युनायटेड एरलाइन्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
युनायटेड एरलाइन्स जगातील सगळ्यात मोठी विमानवाहतूक कंपनी आहे. अमेरिकेतील या कंपनीत ४८,००० कर्मचारी[१] व ३६० विमाने[२] आहेत.
युनायटेड कॉन्टिनेन्टल होल्डिंग्ज या कंपनीची उपकंपनी असलेल्या युनायटेड एरलाइन्सचे मुख्यालय शिकागो येथे आहे तर डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ, शिकागो आंतरराष्ट्रीय विमानतळ, वॉशिंग्टन डल्लेस आंतरराष्ट्रीय विमानतळ, सान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ, लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नरिता आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून मोठ्या प्रमाणात उड्डाणे होतात.[३] युनायटेड एरलाइन्स स्टार अलायन्स या विमानवाहतूक कंपनीगटाचा पहिल्यापासून भाग आहे व त्यांतर्गत १७० देशांत १,०००पेक्षा जास्त ठिकाणांहून प्रवाशांची ने-आण करते.[४]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
[संपादन] संदर्भ आणि नोंदी
- ↑ United Airlines press release August 6, 2009.
- ↑ Federal Aviation Administrationसाचा:Ndash Airline Certificate Informationसाचा:Ndash Detail View
- ↑ http://www.united.com/press/detail/0,7056,67943,00.html
- ↑ UAL Corporation – Investor Relations – Company Information.