मराठा
| मराठे / मराठी माणसे / महाराष्ट्रीय |
|---|
| छत्रपती शिवाजीमहाराज भीमराव रामजी आंबेडकर • बाळ गंगाधर टिळक धुंडिराज गोविंद फाळके • तुकाराम • ज्योतिबा फुले सचिन तेंडुलकर • माधुरी दीक्षित • रजनीकांत |
| एकूण लोकसंख्या |
|
आठ ते नऊ कोटी |
| लोकसंख्येचे प्रदेश |
| प्रमुख लोकसंख्या
लक्षणीय लोकसंख्या इतर |
| भाषा |
| मराठी |
| धर्म |
| हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध, यहुदी |
| संबंधित वांशिक लोकसमूह |
| इंडो-युरोपीय, इंडो-इराणी, इंडो-आर्यन |
मराठे (अन्य नावे: मराठी माणसे, महाराष्ट्रीय ;) हा गट मूळचा भारतीय उपखंडातील असून, दक्षिण भारतातील दख्खन/डेक्कन प्रांत किंवा सध्याचे महाराष्ट्र राज्य ह्या ठिकाणी ह्या लोकांचे मूळ निवासस्थान आहे.मराठी ही त्यांची मातृभाषा असून ती इंडो-आर्यन दक्षिण विभाग समूहातील एक प्रमुख भाषा आहे. मराठी माणसांचा लष्करी इतिहास हा असामान्य आहे. इंग्रजांच्या भारतातील प्रवेशापूर्वी मराठा साम्राज्य हे भारतीय उपखंडात पसरले होते. मराठे हे द्रविडी परंपरेतले असून,बळीवंशातील ते मूळनिवासी आहेत. मराठा हा लढवैय्या व पूवी क्षत्रिय म्हणून त्यांची ओळख होती.[ संदर्भ हवा ] काही जण हे हूण, ग्रीक, पर्शियन वंशातील आहेत.
अनुक्रमणिका |
शब्दस्रोत[संपादन]
मराठे किंवा मराठी माणसे हे महाराष्ट्रीय या समूहनावानेही ओळखली जातात. महाराष्ट्रीय माणसांना मराठी माणूस म्हणण्याचे कारण म्हणजे त्यांची भाषा मराठी ही आहे. महाराष्ट्र आणि मराठी या शब्दांच्या उत्पत्तीबाबत वेगवेगळी माहिती उपलब्ध आहे. एका माहितीनुसार मराठी लोकांचे पूर्वज असलेल्या दख्खन प्रांतातील लोकांना सम्राट अशोक च्या काळात "राष्ट्रिक" म्हणून संबोधले जात होते. महाराष्ट्री प्राकृत भाषा ही या लोकांशी संबंधित असून मराठी या शब्दाचा उगम हा महाराष्ट्री या शब्दापासून झाला आहे.
महाराष्ट्री प्राकृत ही भाषा सातवाहन काळातील अधिकृत भाषा होती. मात्र या माहितीमध्ये राष्ट्रिक या शब्दाचे मूळ व राष्ट्रिक शब्द व दख्खनचे लोक यातील संबंध कोठेही दिलेला नाही. संस्कृत शब्द "राष्ट्र" हा सध्या देश या अर्थाने वापरला जातो. मात्र काही शतकांपूर्वी हा शब्द कोणत्याही एका प्रशासकीय घटकासाठी वापरला जात असावा. दुसऱ्या माहितीनुसार मराठी आणि राष्ट्री यांचा संबंध "रट्ट" या शब्दाशी जोडला जातो. रट्ट हा राष्ट्रकूट शब्दाचा अपभ्रंश आहे. राष्ट्रकूट घराणे हे आठव्या ते दहाव्या शतकामध्ये दख्खन प्रांतावर राज्य करत होते. मात्र अशोकाच्या काळातील लेख हे राष्ट्रकूटांपेक्षा बरेच पुरातन असल्यामुळे दोन्ही लेखांचा पडताळा घेणे अवघड आहे.
मराठी ही यादव राजवटीमध्ये राजभाषा होती.यादव राजा सिंघण हा त्याच्या दानशूरपणाबद्दल प्रसिद्ध होता. त्याच्या दानशूरपणाबद्दलची माहिती ही मराठी शिलालेखांच्या स्वरूपात कोल्हापूरच्या देवीच्या मंदिरात पहायला मिळते. हेमाद्रीसारख्या विद्वान व्यक्तींच्या रचनाही मराठीत उपलब्ध आहेत. हेमाद्री यांची हेमाडपंती मंदिरांची रचना प्रसिद्ध आहे.
मराठीतील शिलालेख हे रायगडमधील आक्षी, पाटण, पंढरपूर वगैरे ठिकाणी आहेत. या शिलालेखांपैकी सर्वांत लोकप्रिय शिलालेख हा कर्नाटकातील श्रावणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या (बाहुबली) पायाशी आहे. हा लेख खालीलप्रमाणे आहे.
चामुंडराये करवियले, गंगाराये सुत्ताल करवियाले.... या लेखामधून पुतळ्याचे शिल्पकार व तत्कालीन राजाबद्दल माहिती मिळते.
मराठ्यांचा इतिहास[संपादन]
सन १६०० पूर्वीचा ( शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वीचा)[संपादन]
उपलब्ध असलेल्या सर्वांत पुरातन माहितीनुसार हल्ली महाराष्ट्र या नावाने ओळखला जाणारा प्रदेश पूर्वी "दंडकारण्य" म्हणून ओळखला जात होता. दंडकारण्य या शब्दाचा अर्थ "कायद्याचे राज्य असलेले अरण्य" असा आहे.
इसवी सन पूर्व ६०० मध्ये महाराष्ट्र हा प्रदेश हे एक महाजनपद होते. मात्र आर्यांच्या प्रवेशापूर्वी या प्रदेशाचे नागरिकीकरण झाले होते की नाही ही माहिती अज्ञात आहे. अशोक राजानंतर हा प्रदेश मौर्य साम्राज्याचा भाग झाला व त्याचे आर्यीकरण संपादन झाले.
इसवी सन पूर्व २३० मध्ये स्थानिक राजघराणे सातवाहन हे महाराष्ट्रात सत्तेवर आले. पुण्याजवळील जुन्नर येथील या घराण्याने पुढे उत्तर कर्नाटक व आंध्र प्रदेशातील विजयानंतर एक मोठे साम्राज्य स्थापन केले.
आजचे बहुतेक मराठी लोक हे या साम्राज्याचे वंशज आहे असे मानण्यात येते. हे साम्राज्य गौतमपुत्र सत्कर्णी उर्फ शालिवाहन याच्या काळात उत्कर्षाला पोचले. शालिवाहन राजाने नवीन दिनदर्शिका व कालगणना सुरू केली. शालिवाहन शक नावाची ही कालगणना मराठी माणसांकडून आजही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. या साम्राज्याचा अस्त इसवी सन ३०० च्या आसपास झाला. मराठीच्या पूर्वीची भाषा असलेल्या महाराष्ट्री भाषेचा वापर सातवाहन काळात सुरू झाला.
सातवाहन काळानंतर या प्रदेशावर अनेक लहान लहान राजघराण्यांनी राज्य केले. हा प्रदेश पुढे आठव्या शतकात राष्ट्रकूट घराण्याने जिंकून आपल्या राज्याला जोडला. राष्ट्रकूट घराण्याच्या पाडावानंतर येथे देवगिरीच्या यादवांचे राज्य आले. त्यांनी मराठी ही अधिकृत भाषा बनवली. त्यांचे राज्य १३व्या शतकापर्यंत चालले. पुढे हा प्रदेश मुस्लिम साम्राज्यांतर्गत आला. दख्खनच्या सुलतानीच्या अमलाखाली महाराष्ट्र सुमारे तीन शतके होता.
मराठा साम्राज्य[संपादन]
१७व्या शतकाच्या मध्यात शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. अनेक विजय व असामान्य कामगिरीनंतर शिवाजी महाराजांचे १६८० मध्ये निधन झाले. शिवाजी महाराजांकडून अनेक वेळा पराभव झालेल्या मोगलांनी १६८१ मध्ये महाराष्ट्रावर आक्रमण केले. शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी हा एका छोट्या लढाईनंतर महाराष्ट्राचा राजा झाला. तुलनेने अधिक बलवान शत्रूशी लढा देताना संभाजीने मराठ्यांचे उत्कृष्ट नेतृत्व केले. संभाजी एकही किल्ला किंवा प्रदेश हरला नाही. मात्र १६८९ मध्ये फितुरीमुळे औरंगजेबाच्या हाती सापडल्यानंतर संभाजीची क्रूरपणाने हत्या करण्यात आली. आपल्या नेत्याच्या मृत्यूमुळे निर्नायकी व निराश झालेल्या मराठ्यांचे नेतृत्व संभाजीचा धाकटा भाऊ राजाराम याने केले. त्याच्या मृत्यूनंतर साम्राज्याची सूत्रे पेशव्यांच्या हातात आली. पहिला बाजीराव आणि बाळाजी बाजीराव यांनी मोठा साम्राज्यविस्तार केला. त्यांच्या काळखंडात संपूर्ण उपखंडावर मराठ्यांची सत्ता होती. पुणे हे सत्तेचे केंद्र झाले होते. मात्र पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर हे साम्राज्य छोट्या छोट्या प्रदेशात विभागले गेले. ब्रिटिशांनी दुसऱ्या बाजीरावाचा पराभव करेपर्यंत महादजी शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे हे प्रदेश एकत्र होते.
पुढे स्वतंत्र भारताच्या निर्मितीपर्यंत मराठ्यांची अनेक छोटी छोटी संस्थाने अस्तित्वात होती.
मराठ्यांचा प्रभाव[संपादन]
मराठी राज्यकर्ते आणि प्रांत[संपादन]
मराठी /मराठे राज्यकर्त्यांच्या सविस्तर यादीसाठी व त्यांच्या प्रांतांच्या माहितीसाठी इथे टिचकी मारा.
सैन्यात सेवा[संपादन]
इतिहासातील कर्तबगार मराठी व्यक्ती.[संपादन]
भोसले व इतर घराणे[संपादन]
- छत्रपती शिवाजी महाराज भोसले (१६३०-१६८०) - मराठी साम्राज्याचे संस्थापक.
- छत्रपती संभाजी महाराज भोसले (१६५७-१६८९) - शिवाजी महाराजांचे सुपुत्र. मराठी साम्राज्याचे दुसरे राज्यकर्ते.
- छत्रपती राजाराम राजे भोसले (१६७०-१७००)
- छत्रपती शाहू महाराज भोसले (उर्फ शिवाजी २ रे, छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र)
- छत्रपती रामराजा महाराज भोसले (बहुधा राजाराम महाराजांचे व राणी ताराबाईंचे नातू)
- मल्हारराव होळकर - मावळ प्रांताचे पहिले सुभेदार.
- अहिल्याबाई होळकर - इंदूर संस्थानाच्या पालक संस्थानिका.
- यशवंतराव होळकर - इंदूर संस्थानाचे अधिपती.
- कान्होजी आंग्रे - मराठ्य़ांचे नौदलप्रमुख.
- हंबीरराव मोहिते - मराठा सैन्याचे सरनोबत.
- संताजी घोरपडे - मराठा सैन्यातील सेनाधिकारी.
- महादजी शिंदे - ग्वाल्हेर संस्थानाचे अधिपती.
- राणी ताराबाई - कोल्हापूर गादीच्या पालक राणी.
- झाशीची राणी लक्ष्मीबाई(माहेरची मणिकर्णिका तांबे)
पेशवे घराणे[संपादन]
- बाळाजी विश्वनाथ
- बाजीराव बाळाजी (थोरले बाजीराव पेशवे)
- नानासाहेब पेशवे
- माधवराव पेशवे
- नारायणराव पेशवे (माधवरावांचा लहान भाऊ)
- रघुनाथराव पेशवे ( स्वतःस पेशवे घोषित केले)
- सवाई माधवराव पेशवे
- दुसरे बाजीराव पेशवे
- दुसरे नानासाहेब पेशवे
हेही पहा[संपादन]
- पुणे
- पेशवे
- मराठी भाषा
- महाराष्ट्र
- मराठा साम्राज्य
- तंजावर महाराष्ट्रीय
- तंजावरचे मराठा राज्य
- सरस्वती महाल ग्रंथालय
- मराठा लाइट इन्फन्ट्री रेजिमेन्ट (मराठ्यांची भारतीय सैन्यदलातील तुकडी )
- महाराष्ट्रातील किल्ले(मराठ्यांच्या ऐतिहासिक अस्तित्वाच्या खुणा असणारे किल्ले.)
संदर्भ[संपादन]
| या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या. |
- जेम्स ग्रांट डफ ह्यांचे - A History of the Mahrattas, 3 vols. London, Longmans, Rees, Orme, Brown, and Green (1826) ISBN 8170209560
- Haplogroups of the Marathi people
- Molecular insight into the genesis of ranked caste populations of western India सोनाली गायकवाड आणि व्ही.के.कश्यप लिखित.
- Influence of language and ancestry on genetic structure of contiguous populations संघमित्र शाहू आणि व्ही.के.कश्यप लिखित.
- Polarity and Temporality of High-Resolution Y-Chromosome Distributions in India Identify Both Indigenous and Exogenous Expansions and Reveal Minor Genetic Influence of Central Asian Pastoralists सेनगुप्ता लिखित.
बाह्य दुवे[संपादन]
| या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या. |
- [१]
- Information about Maratha Legends from Manase.org I म.न.से.अधिकृत संकेतस्थळावरील माहिती.
- http://www.gutenberg.org/files/20583/20583-8.txt
- The Maratha community मराठा.नेट.
- The Maharajas of Thanjavur सरस्वती महाल ग्रंथालय,तंजावुरची अधिकृत संकेतस्थळ.
- Maratha history
- "The Marathas" at Columbia Encyclopaedia
- J.T.Platt's Dictionary of Urdu, Hindi
- RoyalArk- (former British) India (here the Glossary page, see also individual dynasties)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |