लेयटे आखाताची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लेयटे गल्फची लढाई या पानावरून पुनर्निर्देशित)

लेयटे आखाताची लढाई (मराठी नामभेद: लेयटे गल्फची लढाई ; इंग्लिश: Battle of Leyte Gulf, बॅटल ऑफ लेयटे गल्फ) ही दुसर्‍या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रे आणि शाही जपानी आरमार यांच्यात फिलिपिन्सजवळील लेयटे आखातात लढली गेलेली आरमारी लढाई होती. ही लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यानची सगळ्यात मोठी आरमारी लढाई होती आणि काही हिशोबाप्रमाणे ही जगाच्या इतिहासातीलच सगळ्यात मोठी आरमारी लढाई होती.[१]

युद्धाच्या सुरुवातीस जपानने आग्नेय आशियातील अनेक प्रदेश हस्तगत करून तेथील तेलसाठे व खनिज संपत्ती मिळवलेली होती. जपानचे बरेचसे युद्धतंत्र या सामग्रीवर आधारित होती. येथून जपानकडे जाणारी ही रसद तोडण्यासाठी दोस्त राष्ट्रांना फिलिपिन्स जिंकून तेथे तळ उभारणे गरजेचे होते. यासाठी अमेरिकेने २० ऑक्टोबर रोजी लेयटे बेटावर चढाई केली. हे पाहताच जपानी आरमाराने आपली शक्ती एकवटून प्रतिहल्ला केला. पण अमेरिकन आरमाराच्या तिसर्‍या आणि सातव्या तांड्याने हा प्रतिहल्ला उधळून लावला. या लढाईत जपानी आरमाराची इतकी हानी झाली, की युद्धाच्या अंतापर्यंत ते यातून सावरलेच नाही [२][३].

संदर्भ व नोंदी [संपादन]

  1. वूडवार्ड, सी. व्हॅन (इ.स. १९४७). द बॅटल फॉर लेयटे गल्फ. मॅकमिलन. (इंग्लिश मजकूर) 
  2. फुलर, जॉन एफ.सी. (इ.स. १९५६). द डिसाइझिव बॅटल्स ऑफ द वेस्टर्न वर्ल्ड (इंग्लिश: The Decisive Battles of the Western World). आयर अँड स्पॉटिसवूड. (इंग्लिश मजकूर) 
  3. मॉरिसन, सॅम्युअल ई. (इ.स. १९५६). "लेयटे, जून १९४४ – जानेवारी, इ.स. १९४५", हिस्टरी ऑफ युनायटेड स्टेट्स नेव्हल ऑपरेशन्स इन वर्ल्ड वॉर २ (इंग्लिश: History of United States Naval Operations in World War II). लिटल अँड ब्राउन. (इंग्लिश मजकूर) 


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.